Type Here to Get Search Results !

शिक्षक सेवा ज्येष्ठता मराठी माहिती | Seniority Of Teachers In Marathi Mahiti

 शिक्षक सेवा  ज्येष्ठता मराठी माहिती | Seniority Of Teachers In Marathi Mahiti 


Seniority Of Teachers In Marathi Mahiti मित्रांनो आज आपण आपल्या लेखातून शिक्षक सेवा ज्येष्ठता मराठी माहिती यासंदर्भात सविस्तर माहिती पाहूया. आपण लेख वाचल्यानंतर आपल्याला आवडल्यास या लेखाला वाचक प्रेमी आपल्या मित्रांना शेअर करावा ही विनंती. 

Seniority Of Teachers In Marathi Mahiti
Seniority Of Teachers In Marathi Mahiti 


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे.Seniority Of Teachers In Marathi Mahiti 

निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचे शीर्षक पुढील प्रमाणे आहे. "महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली. 1981 मध्ये नमूद शिक्षक संवर्गांची सेवाज्येष्ठता निषेध करण्याबाबतच्या तरतुदींचे सविस्तर स्पष्टीकरण "या संदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला आहे. Seniority Of Teachers In Marathi Mahiti याच शासन निर्णयाचे स्पष्टीकरण चला तर पाहूया आजच्या ब्लॉग पोस्ट लेखातून स्पष्टपणे माहिती जाणून घेऊ या सविस्तर. 


विभागाचे नाव-

महाराष्ट्र शासन 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई 32. 


शासन निर्णय निर्गमित दिनांक -

हा शासन निर्णय 28 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केला आहे. 


शासन निर्णयाचे शीर्षक


महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली, 1981 मध्ये नमूद शिक्षक संवर्गाची 

सेवाज्येष्ठता निषित करण्याबाबतच्या तरतुदींचे सविस्तर स्पष्टीकरण.'Seniority Of Teachers In Marathi Mahiti '


शासन निर्णयाचे संदर्भ

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी एकूण अनुक्रमे 01 ते 09 संदर्भ विचारात घेऊन शासन शासन परिपत्रक निर्गमित केले आहे.

शासन परिपत्रक 

या शासन निर्णय परिपत्रकात शासन निर्णय स्पष्टीकरण करताना प्रथम परिपत्रकाची प्रस्तावना देण्यात आली आहे. 

शासन निर्णयाची प्रस्तावना 

संदर्भ सूचीमध्ये अनुक्रमे एक ते नऊ संदर्भावर आधारित शासन निर्णयाची प्रस्तावना ती पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे. 

1)संदर्भ क्रमांक एक मध्ये अधिनियमातील तरतुदी स्पष्ट केल्या आहेत.

2) संदर्भ क्रमांक दोन मध्ये संपूर्ण शासन निर्णयातील नियमावली बाबत माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. या नियमातील नियम क्रमांक 12 व या नियमाच्या संबंधित असणारी अनुसूची "फ"नमूद करण्यात आली आहे. राज्यातील शिक्षकांसाठी अधिनियम व नियमावली लागू असलेल्या सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संदर्भात निश्चित सेवाज्येष्ठता निश्चित करण्याच्या संदर्भातील सर्व तरतुदी स्पष्टपणे नमूद केलेल्या आहेत.

 आजचा आपला लेखाचा विषय हा शिक्षकांच्या

सेवाज्येष्ठता संदर्भातला आहे .

अनेक शाळांमध्ये सेवाज्येष्ठता वरून वादविवाद

हे निर्माण होत असतात .या सर्व पार्श्वभूमीवर आजचा हा 28 जानेवारी 2025 चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय सेवाज्येष्ठता संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा ठरतो. सेवाजेष्ठतेच्या अनुषंगाने या शासन निर्णयाच्या अगोदर निर्गमित झालेली एक महत्त्वाची शासनाची अधिसूचना आली होती .

संदर्भ क्रमांक 9 आपण या ठिकाणी पाहू शकता .

शासन अधिसूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 24 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेली ही जी अधिसूचना होती.

त्या अधिसूचने चा चुकीचा अर्थ अनेक ठिकाणी पदोन्नती देण्यात आलेले आलेली आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर

आजचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय महत्त्वाचा ठरतो.

महत्त्वाचा निर्णय

या शासन निर्णयामध्ये महत्त्वाचे कोणते बिंदू आहेत?

ते आता आपण जाणून घेऊ या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवाज्येष्ठता ही कशा प्रकारे निश्चित करायची आहे ?

त्यासोबतच आपल्या राज्यामध्ये

शालेय शिक्षणाची जी व्यवस्था आहे.

ती व्यवस्था काही ठिकाणी इयत्ता 1 ते 8 किंवा

काही ठिकाणी इयत्ता 1 ते 7 तसेच 

काही ठिकाणी इयत्ता 8 ते 10 किंवा काही ठिकाणी इयत्ता5 ते 10 वी अशा प्रकारची असल्यामुळे 

मग याच्यामध्ये प्राथमिक शाळा कोणत्या ?

माध्यमिक शाळा कोणत्या? त्या सोबतच प्राथमिक शिक्षक कोणते? माध्यमिक शिक्षक कोणते ? याचा ही अर्थ या शासन निर्णयामध्ये अत्यंत स्पष्टपणे दिलेला आहे. सोबतच पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता आवश्यक आहे का? अहर्ता आवश्यक आहे का? की दोन्ही आवश्यक आहे? याबाबतचे विश्लेषण  या शासन निर्णय यामध्ये केलेले आहे .या सोबतच जे डीएड झालेले शिक्षक बंधू भगिनी आहेत .ते शिक्षक बंधू भगिनी हे माध्यमिक शिक्षक आहेत का ?या ही संदर्भातला एक महत्त्वाचा भाग आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता.Seniority Of Teachers In Marathi Mahiti निर्गमित केलेला शासन निर्णय फार मोठा असून एकूण बारा पानाचा आहे. 

शासन निर्णय

  आपण या ठिकाणी थोडक्या मध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू या.

आपल्याला हा शासन निर्णय संपूर्ण व्यवस्थित जाणून घ्यायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .

त्याचा ही उपयोग आपण त्यानिमित्ताने घेऊ शकता.

या शासन निर्णयातील महत्त्वाचा जो भाग आहे.

तो शासनाची अधिसूचना स्पष्ट करणे येथे आवश्यक आहे.
शासनाची अधिसूचना

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक  24 मार्च 2023 ही आहे. सुरुवातीला आहे. ती पार्श्वभूमी . यथावकाश पार्श्वभूमी व्यवस्थित पाहू शकता. 

स्पष्टीकरण 

अधिसूचनेनंतर शासन निर्णयाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या स्पष्टीकरणात शासन निर्णयातील महत्त्वाच्या भागाचे स्पष्टीकरण येथे आपण या लेखात पुढील प्रमाणे करणार आहे. चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण.Seniority Of Teachers In Marathi Mahiti 

प्राथमिक शाळा कोणत्या ?

माध्यमिक शाळा कोणत्या?

आणि उच्च माध्यमिक शाळा कोणत्या ?

याबाबत स्पष्टीकरण या ठिकाणी प्रामुख्याने दिलेला आहे. प्राथमिक शाळा त्यांच्या अर्थ काय आहे? तो या ठिकाणी आपल्याला भाग 1,2 आणि 3 मध्ये प्रामुख्याने दिसून येते. भाग तीन मध्ये काय दिले आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया. संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतचे अथवा त्यापैकी कोणत्याही इयत्तेपर्यंत चे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण व इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या शिक्षण स्पष्टपणे माध्यमिक शिक्षण म्हणून ठरविण्यात आलेले आहे. अर्थात संदर्भ क्रमांक 4 नुसार या शासन निर्णयातील प्रस्तावनाचे अवलोकन केले असता संदर्भ क्रमांक 3 येथील अधिनियम लागू होण्यापूर्वी शैक्षणिक स्तराबाबत जी व्यवस्था अमलात होती. त्याचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे .त्यानुसार इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंतचा शिक्षण हे प्राथमिक शिक्षण असल्याचे स्पष्ट होते. संदर्भ क्रमांक 3 येथील अधिनियम दिनांक 1 एप्रिल 2010 रोजी अमलात आलेला आहे. तत्पूर्वी शैक्षणिक स्तरात बाबतची व्यवस्था जी अमलात होती. त्यानुसार इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण देणाऱ्या शाळा या माध्यमिक शाळा म्हणून गणल्या जात असत.Seniority Of Teachers In Marathi Mahiti  या संदर्भात शासन स्तरावर शाळास मान्यता देण्याबाबतची जी आदेश निर्गमित करण्यात आले आहे .त्याची अवलोकन केले असता माध्यमिक शाळा म्हणून एखाद्या शाळेत मान्यता देण्यासाठी इयत्ता आठवीच्या वर्गास मान्यता देण्यात येत असे.

संदर्भ क्रमांक 3 येथील अधिनियम अमलात येण्याच्या दिनांकापूर्वी म्हणजेच 31/0 3 /2010 पर्यंत एखादा आवश्यक अहर्ता धारण करणारा शिक्षक इयत्ता आठवीच्या वर्गा करिता रीतसर नियमानुसार नियुक्त झाला असल्यास अशा शिक्षकास माध्यमिक शिक्षक म्हणून गणता येईल .तथापि दिनांक 01/04/2010 व त्यानंतर जे शिक्षक इयत्ता नववी व इयत्ता दहावी करिता रीतसर नियमानुसार नियुक्त झाले असतील .अशा शिक्षकांना माध्यमिक शिक्षक म्हणून घडले जाईल. प्राथमिक शिक्षक कोण ?आणि माध्यमिक शिक्षक कोण? हे आपण या ठिकाणी आता निश्चित करता येईल. एखादी शाळा संयुक्त असल्यास म्हणजेच ज्यात वर उल्लेख केलेल्या प्रमाणे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिले जात असल्यास अशा शाळेचा जो भाग प्राथमिक शिक्षण देतो त्यास प्राथमिक शाळा व जो भाग माध्यमिक शिक्षण देतो त्यास माध्यमिक शाळा गणने आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंत ची शिक्षण देणाऱ्या शाळांना माध्यमिक शाळा म्हणून मान्यता नाही. त्यामुळे अशा शाळा अथवा संयुक्त शाळेचा जो भाग असे शिक्षण देतो ती शाळा म्हणजे प्राथमिक शाळा होय.

उच्च माध्यमिक शाळा

अकरावी व बारावी संदर्भामध्ये काय म्हटले ते आता आपण येथे पाहूया. 

इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी या वर्गाचे शिक्षण देणाऱ्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय या पूर्वीपासूनच उच्च माध्यमिक शाळा म्हणून मान्यता प्राप्त आहे. 

या सर्व विवेचनावरून प्राथमिक शाळा कोणत्या?, माध्यमिक शाळा कोणत्या? आणि कनिष्ठ  महाविद्यालय अर्थात उच्च माध्यमिक कोणत्या? ते या ठिकाणी स्पष्ट होते.

महाराष्ट्र खाजगी शाळा नियमावली 1981

आता जो महत्त्वाचा भाग आहे .

तो आता आपण जाणून घेऊया .महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी( सेवेच्या शर्ती )नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 12 व या नियमांशी संबंधित अनुसूची  "फ "मधील तरतुदी बाबतचा खुलासा काय? तो पहा .अनुसूची "फ "मधील नियम क्रमांक 1 अन्वये प्राथमिक शाळा मधील शिक्षकांची सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबतची तरतूद विहित करण्यात आली आहे.

या नियमाचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मधील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता संदर्भात कोणताही संबंध नाही. या नियमानुसार प्राथमिक शाळा मधील शिक्षकांचीसेवाज्येष्ठता त्याने या पदासाठी विहित करण्यात आलेली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण केल्याच्या दिनांकापासून ग्राह्य धरणे आवश्यक आहे .याचाच अर्थ नियुक्तीच्या वेळी संबंधित शिक्षकाने आवश्यक अहर्ता धारण केली असल्यास ,त्याची सेवाज्येष्ठता सेवेत रुजू होण्याच्या दिनांकास निश्चित करावे लागेल . प्राथमिक शिक्षकाने विहित केलेल्या आवश्यक अर्हतापेक्षा अधिक चीअर्हता धारण केली असल्यास, अशा अर्हतेचा सेवाज्येष्ठता साठी विचार करता येणार नाही .

अत्यंत महत्त्वाचे वाक्य आहे .अशी अहर्ता केवळ एक अतिरिक्त अहर्ता समजण्यात यावे .प्राथमिक शाळेतील शिक्षक अशा सेवा ज्येष्ठता च्या आधारे त्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकाचे पद मंजूर असल्यास मुख्याध्यापक प्राथमिक शाळा या पदांवर पदोन्नतीसाठी पात्र असतील. अनुसूची " फ" मध्ये नियम क्रमांक 2 हा माध्यमिक शाळा ,अध्यापक विद्यालय व माध्यमिक शाळांशी तसेच वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची सेवाज्येष्ठता  निश्चित करण्याची संबंधित आहे.

English rule

इंग्रजीत हा नियम खालील प्रमाणे आहे. Guidelines for fixation of seniority of teachers in the secondary School junior College of education and junior college classes attached to secondary School and senior colleges 

माध्यमिक विद्यालय ,अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्थात उच्च माध्यमिक शाळा यामध्ये कार्यरत शिक्षकांची सेवाज्येष्ठता या नियमानुसार निश्चित करावे याची आहे .अर्थात सेवाज्येष्ठता यादीत समावेश होण्यासाठी संबंधित शिक्षक माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यात कार्यरत असला पाहिजे .म्हणजेच त्याची अशा संस्थांमध्ये रीतसर नियुक्ती होणे आवश्यक आहे . केवळ या संस्थांमध्ये नियुक्त होण्यासाठी आवश्यक असलेले अहर्ता धारण करणे. पुरेसे नसून प्रत्यक्षात माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अशा संस्थांमध्ये नियुक्ती होणे व कार्यरत राहणे क्रमपात्र  आहे. हा सर्वसाधारण प्रस्थापित नियमातून यासाठी वेगळ्याने स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही.

संदर्भ क्रमांक 1 येथील अधिनियम व संदर्भ क्रमांक 2 येथील नियमावली लागू होऊन साधारणपणे 45 वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. त्यावेळी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने संस्था व्यवस्थापनाकडून अशा संस्थांमध्ये निरनिराळ्या अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती होत असे .

त्यावेळी माध्यमिक विद्यालय ,अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्थात उच्च माध्यमिक शाळा या संस्थांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या अहर्ता विचारात घेऊन अनुसूचित " फ" च्या उपरोक्त नियम क्रमांक 2 मध्ये अ ,ब, क, ड ,इ फ,ग आणि ह असे प्रवर्ग विहित करण्यात आलेले आहेत. हे जे प्रवर्ग दिलेले आहेत .त्या प्रवर्गामध्ये कोणाच्या समावेश होतो .


अनुसूची "फ" मधील नियम क्रमांक 2 मधील तळ टीप-4 नुसार उपरोक्त प्रवर्ग हे सेवाज्येष्ठता शिडी असून 

ते उतरत्या क्रमाने दर्शविण्यात आले आहेत. म्हणजेच कनिष्ठ प्रवर्गातून वरिष्ठ प्रवर्गात त्या विशिष्ट वरिष्ठ प्रवर्तकाची अहर्ता धारण केल्यानंतर प्रवेश करता येतो व त्यानुसार सेवाज्येष्ठता निश्चित होते.Seniority Of Teachers In Marathi Mahiti 

शिक्षकाने कनिष्ठ प्रवर्गातून वाढीव अर्हतेमुळे वरिष्ठ प्रवर्गात प्रवेश केल्यास मूळ पदांवरील रुजू दिनांक नुसार नव्हे तर वरिष्ठ प्रवर्गात प्रवेश केल्याच्या दिनांकापासून त्या शिक्षकांची त्या वरिष्ठ प्रवर्गातील सेवाज्येष्ठता निश्चित होते. अशा आशाचे अनेक न्याय निर्णय माननीय उच्च न्यायालयाने पारित केले आहेत. त्यामुळे संदर्भ क्रमांक 8 अन्वये शासनाने निर्गमित केलेले सूचना यथोचित आहे. यासाठी अनुसूची "फ" मधील नियम क्रमांक 2 खालील  ती तळटीप कडे लक्ष वेधण्यात येत आहे. यानुसार एकाच समान प्रवर्गात नियुक्त शिक्षकांचा नियुक्तीचा दिनांक समान असल्यास जो शिक्षक वयाने अधिक असेल तो सेवा ज्येष्ठ मानला जाईल .यावरून सेवा ज्येष्ठता  ही प्रवर्ग निहाय व प्रवर्गात प्रवेश केल्याच्या दिनांकापासून निश्चित करावयाची आहे. ही बाब स्पष्ट होते .उपरोक्त प्रवर्गा पैकी ड, इ,फ,ग आणि ह या प्रवर्गात नमूद अर्हता धारकांची नियुक्ती मागील अनेक वर्षा पासून माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या संस्थांमध्ये शिक्षक म्हणून होत नसल्याने वस्तूत: हे प्रवर्ग आता काळबाह्य झाले आहेत. त्यामुळे आता  प्रवर्ग क, ब आणि क हे विचारात घेण्याची आवश्यकता आहे Seniority Of Teachers In Marathi Mahiti 


माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक पदोन्नती ने नियुक्ती


आपण या ठिकाणी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीने नियुक्त करण्यासाठी जे महत्त्वाचे स्पष्टीकरण आहे. ते पाहू शासन निर्णयानुसार पाहू शकता.

त्यानंतरचा जो महत्त्वाचा भाग आहे . "Seniority Of Teachers In Marathi Mahiti "

तो शिक्षकांसाठी महत्त्वाचा आहे. संदर्भ क्रमांक 9 येथील दिनांक 24 /03/2023 रोजीच्या अधिसूचनेतील तरतुदीबाबत खुलासा .हा खुलासा सर्व शिक्षकांनी जाणून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. 24 मार्च 2023 रोजीच्या अधिसूचित नुसार अनुसूचित "फ "अधिनियम क्रमांक 2 अंतर्गत असलेल्या प्रवर्ग क मध्ये काही सुधारणा करण्यात आले आहेत. व तळटीप 1अन्वये संदिग्ध वाटणाऱ्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आला आहे. दिनांक 24/03 / 2023 रोजी ची अधिसूचना निर्गमित होण्यापूर्वीची स्थिती व निर्गमित झाल्यानंतरची स्थिती याचा तुलनात्मक तक्ता या संबंधित 28 जानेवारी 2025 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयात देण्यात आला आहे. देण्यात आलेला तक्ता खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपण तो शासन निर्णय लिंकच्या आधारे पाहणे आवश्यक आहे. आपल्या व्हेज पेज मध्ये या शासन निर्णयाची लिंक शेवटी दिलेली आहे तेथून तो निर्णय डाऊनलोड करून संपूर्ण शासन निर्णय आवश्यक वाचा कारण येथे स्पष्टीकरण करणे म्हणजे फार मोठी माहिती स्पष्ट करावी लागेल ती माहिती आपण शासन निर्णयामार्फत जाणून घेऊ शकता. प्रमाणे देण्यात येत आहे .तसेच ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांचे कारण देखील देण्यात येत आहेत.Seniority Of Teachers In Marathi Mahiti 

भाग क्रमांक चार

आपण थोडक्यात समजून घेऊ.

डी एड ओल्ड दोन वर्षाचा अभ्यासक्रम ही अहर्ता नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. याच अनुषंगाने बहुतांशी आक्षेप प्राप्त झाले असून न्यायालयीन प्रकरणे देखील दाखल झाली आहेत .त्यामुळे त्याचा सविस्तर अर्थ समजावून घेणे आवश्यक आहे. 

याचे सविस्तर स्पष्टीकरण शासन निर्णयातील तक्त्यामध्ये देण्यात आले आहेत व स्वतंत्रपणे विवेचन करण्यात आले आहेत. या ठिकाणी तक्त्यातील अनुक्रमांक 4 महत्त्वाचा आहे तो येथे स्पष्ट केला आहे. याच संदर्भाने या ठिकाणी शासन निर्णय महत्त्वाची माहिती देणारा आहे.Seniority Of Teachers In Marathi Mahiti 


डीएड अहर्ता समाविष्ट करण्याचे स्पष्टीकरण

सदर अर्थ तलटिप दोन नुसार प्रशिक्षित शिक्षकांची अहर्ता ठरवण्यात आली आहे.Dip .T .old two years course ही  समान स्वरूपाची अर्हता पूर्वीपासूनच असल्यामुळे डीएड ओल्ड टू इयर कोर्स ही अर्हता समाविष्ट केल्याने कोणताही बदल होत नाही. या परिपत्रकात वारंवार उल्लेख करण्यात आला असल्यामुळे माध्यमिक शिक्षक पदावर नियुक्त झाल्याशिवाय अनुसूची "फ"नियम क्रमांक दोन अंतर्गत समाविष्ट अ ते ह यापैकी कोणत्याही प्रवर्गात कोणताही शिक्षकांचा समावेश होऊ शकत नाही. अनुसूची "फ"च्या दुरुस्ती दिनांक प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या कोणत्याही शिक्षकास प्रवर्ग "क"मध्ये दुरुस्तीमुळे आपोआप प्रवेश मिळेल. ही धारणा चुकीची आहे. Seniority Of Teachers In Marathi Mahiti 

पदवीधर डीएड प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षकांपेक्षा सेवा ज्येष्ठ होतील असा आक्षेप प्रामुख्याने नोंदवण्यात आला आहे. 

येथे दिलेल्या आक्षेपाचे निराकरण एक उदाहरण घेऊन येथे आपण स्पष्ट करूया. 

येथे आपण उदाहरणासाठी दोन शिक्षक घेतले आहेत. 

समजा हे शिक्षक पुढील प्रमाणे नावे दर्शवून उदाहरण स्पष्ट केले आहे.

श्री क्ष आणि श्री य हे दोन शिक्षक आहे असे गृहीत धरा. 

हा संपूर्ण शासन निर्णय जर आपल्या लक्षात आला नसेल तर या उदाहरणावरून आपणास सहज लक्षात येईल. 

शासन निर्णय सविस्तर सावकाश वाचल्यास नक्की आपणास हा शासन निर्णय समजेल यात कोणतीही शंका निर्माण होणार नाही. 

उदाहरण 

आता या ठिकाणी दोन व्यक्ती आहे. 

एका व्यक्तीचे नाव आहे क्ष

तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे य

क्ष व्यक्ती जो आहे. बीएससी डिएड आहे. 

आणि य व्यक्ती जो आहे तो बीएससी बीएड आहे. 

या दोन शिक्षकांतील बीएससी हा घटक दोघांसाठी कॉमन आहे. परंतु क्ष व्यक्ती डीएड झाला आहे. आणि य व्यक्ती

बीएड झाला आहे. हे दोन्ही मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. डीएड आणि बीएड हे दोन मुद्दे मुख्य आहे. 

क्ष या व्यक्तीची प्रथम नियुक्ती प्रार्थमिक शिक्षक म्हणून दिनांक एक जानेवारी 2020 रोजी झाली आहे. तर दुसऱ्या य व्यक्तीची प्रथम नियुक्ती माध्यमिक शिक्षक म्हणून 1 जानेवारी 2022 रोजी झाली आहे. 

अर्थात या ठिकाणी या उदाहरणात एक निवड जी आहे 2020 ला झाली आहेत तर आणि दुसरी जी निवड झाली आहे ती निवड 2022 ची आहे. 2020 मध्ये निवड झालेल्या जो  क्ष शिक्षक आहे. तो प्राथमिक शिक्षक आहे. आणि य व्यक्ती जो आहे. तो माध्यमिक शिक्षक आहे. Seniority Of Teachers In Marathi Mahiti 

आता या उदाहरणात पुढील निष्कर्ष पाहूया. 

उदाहरणाचे निष्कर्ष 

सेवा अंतर्गत उच्च व्यावसायिक अहर्ता क्ष या व्यक्तीने काय केले? डीएड ही अहर्ता धारण केली आहे. डीएड ही अर्हता व्यावसायिक आहे. ही व्यावसायिक अर्हता त्याने 1जानेवारी 2022 ला पूर्ण केली. य या व्यक्तीने बी. एड. व्यावसायिक अर्हता या ठिकाणी उच्च ही आधीच केली आहेत. कारण त्याची नियुक्ती प्रथमच बीएससी बीएड म्हणून करण्यात आली आहे. व व्यावसायिक अहर्ता नेमणुकीच्या वेळी प्राप्त केली होती. 

माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती क्ष ची आहे. 

माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती त्याची झाली 1 जानेवारी 2023 ला झाली. तर ये या व्यक्तीची माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती दिनांक एक जानेवारी 2022 ला झाली. व्यावसायिक अर्हता नुसार नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. 

प्रवर्ग क मध्ये कोणाचा कधी समावेश होईल ते लक्षात घेण्यासाठी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता या ठिकाणी जो क्ष व्यक्ती आहे त्याचा प्रवर्ग क मध्ये प्रवेश दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी होतो. त्याचा प्रवर्ग क मध्ये का समावेश होतो तर त्याची नियुक्ती माध्यमिक शिक्षक म्हणून झाली आहे. दुसरा व्यक्ती आहे य त्याचा क प्रवर्गात किंवा समावेश 01 जानेवारी 2022 ला झाला आहे.Seniority Of Teachers In Marathi Mahiti तर एक जानेवारी 2022 ही तारीख त्याची प्रथम नेमणुकीची तारीख आहे. ही बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे. पदोन्नतीसाठी आवश्यक व्यावसायिक अर्हता धारण जी आहे. दिनांक 1जानेवारी 2028 रोजी आहे ती क्ष या व्यक्तीची आहे. आणि य या व्यक्तीची पदोन्नती दिनांक 1 जानेवारी 2027 होईल. यातून महत्त्वाचा निष्कर्ष पुढे येतो की समान प्रवर्गात ज्याने व्यावसायिक पात्रता पूर्ण आधी केली असेल तो सेवा जेष्ठ म्हणून गणण्यात येतो. यासाठीच हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय स्पष्ट करण्यात आला आहे. 

सारांश 

महाराष्ट्र सेवा शर्ती नियमावली 1981 नुसार नियुक्ती व पदोन्नती देताना सेवा जेष्ठते नुसार तसेच प्रवर्गानुसार आणि व्यावसायिक अहर्ता धारण केलेली दिनांक सेवा ज्येष्ठता निश्चित करण्यासाठी अनुसूची "फ "मध्ये सविस्तर माहिती उदाहरण देऊन कोण सेवा जेष्ठ पदोन्नतीसाठी निश्चित केला जातो त्या संदर्भाने शासनाने महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केला आणि त्यानुसार सेवा ज्येष्ठता याद्या तयार करून सेवाजेष्ठतेनुसारच पदोन्नती देण्यात यावी म्हणजे अनेक प्रकारचे प्रकरणे न्याय प्रविष्ट होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित केला असून आपण या शासन निर्णयाचे उपरोक्त दर्शविलेले शासन निर्णय स्पष्टीकरण आणि उदाहरणासह सर्व बाबी सुस्पष्ट केल्या आहेत. मित्रांनो जर आपणास हा ब्लॉग पोस्टचा लेख आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर करा. 

शासन निर्णय 

FAQ

1) अद्यावत शासन निर्णय सेवा ज्येष्ठता च्या संदर्भात कोणत्या विभागाने व केव्हा निर्गमित केला?

उत्तर-शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अद्यावत शासन निर्णय 28 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केला.

2) हा शासन निर्णय निर्गमित करण्याचे मुख्य कारण काय आहे? 

उत्तर -हा शासन निर्णय निर्गमित करण्याचे कारण म्हणजे शैक्षणिक संस्था किंवा विभागांमध्ये शिक्षकांची सेवा ज्येष्ठता निश्चित करताना चुकीचे अर्थ लक्षात घेऊन कोणत्याही व्यक्तीला पदोन्नती दिली जाते त्याचा परिणाम संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट होते असे प्रकरण न्यायप्रविष्ठ होऊ नये म्हणून शासन निर्णय निर्गमित केला आहे.

3) सेवा ज्येष्ठता मुख्य कोणत्या मुद्द्यांवर निश्चित केली जाते?

उत्तर-ज्या व्यक्तीने व्यावसायिक पात्रता म्हणजे डीएड किंवा बीएड केव्हा पूर्ण केले त्यावर आधारित सेवा ज्येष्ठता निश्चित केली जाते.

4) सेवा ज्येष्ठता प्रवर्ग निश्चित करण्यासाठी कोणती सूची उपयोगात आणली जाते?

उत्तर-सेवा जेष्ठता प्रवर्ग निश्चित करण्यासाठी अनुसूची "फ"उपयोगात आणली जाते. 

5) सध्या आत्ता एकूण किती प्रवर्ग निर्माण करण्यात आले आहे. 

आता सध्या एकूण प्रवर्ग चार निश्चित करण्यात आले असून अ ब क आणि ड एवढेच प्रवर्ग निश्चित करण्यात आले आहे. 

अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.

बोर्ड परीक्षा मराठी माहिती 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.