बोर्ड परीक्षा मराठी माहिती | Board Examination In Marathi Information
Board Examination In Marathi Information मित्रांनो, आज आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण विषय बोर्ड परीक्षा मराठी माहिती Board Examination In Marathi Information या विषयावर सविस्तर माहिती प्राप्त करूया. विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा याबाबत सर्वात मोठी भीती वाटते. कारण बोर्डाची परीक्षा म्हटले की, विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी घबराट सुरुवात होते. अभ्यास संपूर्ण केलेला असला तरीसुद्धा काही विद्यार्थी गोंधळून गेलेला असल्यामुळे त्याच्या मनातील भीती आणि सुद्धा दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा व बोर्ड च्या परीक्षेची भीती कशाप्रकारे दूर करावी यासंदर्भात सर्व माहिती प्रस्तुत लेखातून देण्याचा प्रयत्न केलेला आहेआपणास ही माहिती वाचल्यानंतर आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर्स करावीकारण विद्यार्थ्यांच्या जीवनात दृष्टिकोनातून बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनात ला टर्निंग पॉईंट म्हणून महत्वपूर्ण स्थान असल्यामुळे या परीक्षेकडे सर्व विद्यार्थी यशस्वी व्हावे म्हणून हा ब्लॉग पोस्ट लेख विद्यार्थ्यांसाठी लिहीत आहोत. Board Examination In Marathi Information
![]() |
Board Examination In Marathi Information |
विद्यार्थ्याच्या जीवनातील सर्वांगीण विकास होताना अनेक कौशल्य प्राप्त केल्यानंतर त्या कौशल्याची तपासणी करण्यासाठी बोर्ड परीक्षा घेतली जाते बोर्डपरीक्षेच्या भीतीपोटी अनेक विद्यार्थ्यांना एवढे टेन्शन येते की, बोर्ड परीक्षा का? घेतली जाते.विद्यार्थ्याच्या जीवनातील बोर्ड परीक्षा ही एक महत्त्वपूर्ण संधी असते. स्वतःला आपले कौशल्य आणि आपल्या अंगातील गुणात्मक बदल जाणून घेण्यासाठी बोर्ड परीक्षा आवश्यक असते. Board Examination In Marathi Information
विद्यार्थी बोर्डाने निर्धारित केलेल्या विषयाचा अभ्यास वर्षभर करत असतात. वर्गातही निर्धारित विषयातील अभ्यासक्रमानुसार शिक्षक अध्यापन करत असतात. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेतून विद्यार्थ्यांनी कोणते? कौशल्य आत्मसात केले आहे. तपासून पाहण्यासाठी वर्षाच्या शेवटी बोर्डाच्या निर्धारित वेळापत्रकानुसार नियोजित परीक्षा घेण्यात येतात. बोर्ड मार्फत घेणाऱ्या परीक्षा च्या संदर्भाने मित्रांनो या लेखात आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण बाबीचा सविस्तर विचार या लेखातून मुद्देसूदरीत्या अभ्यासणार आहोत.
Board Examination In Marathi Information |
Board Examination In Marathi Information
दरवर्षी विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा मार्च आणि एप्रिल या महिन्यात घेण्यात येते. बोर्डाचा प्रकार कोणताही असो? बोर्ड कोणतेही असो! परीक्षा मात्र दरवर्षी निर्धारित वेळेत विद्यार्थ्यांच्या अंगातील संपादन केलेले सर्व विषयाच्या बाबतीत कौशल्य तपासण्यासाठी परीक्षा घेतली जाते. म्हणूनच मित्रांनो, आज आपण या नाविन्य पूर्ण विषयावर पुढील प्रमाणे स्पष्टपणे माहिती या लेखात नमूद करणार आहोत. Board Examination In Marathi Information
परीक्षा एक संधी
विद्यार्थ्याला स्वतः वर्षभर केलेल्या अभ्यासाच्या संदर्भात गुण कौशल्य तपासून व जाणून घेण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. स्वतः वर्षभर पुरेसा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे काय? योग्य दिशेने अभ्यास केला आहे काय? केलेला अभ्यास कमी आहे किंवा जास्त आहेत याचे उत्तर शोधण्यासाठी माध्यम परीक्षा हेच असते. म्हणूनच परीक्षा एक विद्यार्थ्याच्या जीवनातील संधी आहे. 'Board Examination In Marathi Information' या संधीचे सोने करण्याची तयारी विद्यार्थ्यांजवळ असणे आवश्यक आहे.Board Examination In Marathi Information
विद्यार्थ्याला वर्षभर आपल्या अभ्यासाला योग्य दिशा किंवा अयोग्य दिशा समजण्यासाठी स्वतः जवळील क्षमतेचा विकास करण्याची म्हणजे परीक्षा. परीक्षा भविष्यातील समोर येणारे आव्हाने पेलण्याचा महत्त्व पूर्ण मार्ग म्हणजे एक संधी होय.
विद्यार्थ्यांच्या जीवनात अशा अनेक परीक्षा एका टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यापर्यंत त्याच बरोबर क्रमाक्रमाने अनेक टप्प्यावर परीक्षा देणे अनिवार्य असते म्हणूनच या लेखातून विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या बाबत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून परीक्षा एक उत्तम संधी शोधणारा मार्ग आहे. मागील टप्प्यात कमी गुण मिळाल्यास पुढील टप्प्यामध्ये जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त गुण प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहून वर्षभर अभ्यास करत नंतर परीक्षा देणे ही पण एक महत्त्वपूर्ण संधीच आहे.Board Examination In Marathi Information
अभ्यास केल्यानंतर बोर्ड परीक्षा दिली जाते. बोर्ड परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करून प्रयत्न करत असतो. प्रयत्न करूनही सुद्धा यश प्राप्त होईलच हे शंभर टक्के सांगता येत नाही. कधी बोर्डाच्या परीक्षेमध्ये अभ्यास पदरी पडण्याची शक्यता असते. अशा वेळेस विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता अपयशी यशाची पहिली पायरी आहे असे समजून पुन्हा डबल प्रयत्न करणे गरजेचे असते. म्हणूनच विद्यार्थ्यांना म्हणूनच विद्यार्थ्यांना मिळालेल्या अपयशातून यश संपादन करण्याची एक संधी आहे असे म्हणणे काहीसे वावगे होणार नाही.म्हणूनच परीक्षा एक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रियेतून जावे लागते.' Board Examination In Marathi Information 'याबाबत सविस्तरपणे स्पष्टीकरणात्मक महत्त्वपूर्ण मुद्दे मित्रांनो या ब्लॉग पोस्ट लेखांमधून पाहूया.
बोर्ड परीक्षेच्या आधीचे दोन महिने पूर्वतयारी नियोजन
वर्षभर अभ्यास केल्यानंतर अगदी परीक्षा जवळजवळ येते. जसजशी परीक्षा जवळ येते तशी तशी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या प्रकारे प्रयत्न गरज आहे. याबाबत स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया.Board Examination In Marathi Information परीक्षे आधी दोन महिने विद्यार्थ्याने करावयाचे नियोजन पुढील प्रमाणे स्पष्ट करूया.
१) शाळा, कॉलेज किंवा क्लासेस याबाबत विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा देण्याच्या उद्देशाने व्यवस्थित नियोजन करावे.
२) बोर्ड परीक्षेच्या आधी दोन महिने विद्यार्थ्यांनी लेखन सरावासाठी पुष्कळ वेळ देणे आवश्यक आहे. ब्लॉगर च्या मते विद्यार्थ्यांनी लेखन सरावासाठी 30 टक्के वेळ हमखास द्यावा.
३) परीक्षा जवळ आल्यामुळे विद्यार्थ्यांनी काम कमी झाले नाही तरीही कोणतीही चिंता न करता आता यश संपादन करण्यासाठी योग्य प्रकारचे नियोजन करावे.
४) परीक्षा दोन महिन्यावर येऊन ठेपली असता विद्यार्थ्यांनी अशा वेळेस सकारात्मक व्यक्तीच्या संपर्कात राहून अभ्यास करावा. वाईट विद्यार्थ्यांची संगत धरू नये.
५) कोणाचेही नकारात्मक बोलणे ऐकून घेऊ नका त्याचबरोबर स्वतःही सुद्धा कोणत्याही प्रकारचे नकारात्मक बोलू नका तर सर्वांना हिमतीने सकारात्मक उद्देशाने सांगत चला की मी शंभर टक्के परीक्षेत यश मिळवणार म्हणजे मिळवणार यासाठी कितीही अभ्यास करण्याची गरज भासल्यास अभ्यास करत राहणार आहे.
५) अभ्यास करताना एखादा विषय किंवा एखादा प्रश्न समजत नसेल तर तज्ञ व्यक्तीकडून किंवा आपल्या शिक्षकाकडून समजून घ्या. जे समजत नाही ते विचारण्यास कधीच संकोच करू नका. आपणास जे जे माहित नाही ते ते इतरांकडून समजावून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच संकोच करू नका.
६) अभ्यास करताना किती विषयाचा पूर्ण अभ्यास झाला. किती विषयाचा अभ्यास कमी झाला. याचे नियोजन करून प्रत्येक विषयासाठी आपल्याजवळ शिल्लक असलेल्या अवघ्या दोन महिन्यांमध्ये ज्या विषयाचा अभ्यास आणि सराव कमी असेल अशा विषयाच्या संदर्भात थोडक्यात लेखी स्वरूपात अभ्यास करून त्या संदर्भातील लिहिलेला प्रश्न उत्तरात्मक अभ्यास आपल्या शिक्षकाकडून तपासून घ्या. लाजू नका. थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्या विषयावर किती? भर द्यायचा याबाबत वेळीच नियोजन करा. परीक्षेत असे नियोजन आपणास उपयोगी पडेल.
७) अभ्यास घाई गडबडीत वेळ जवळ आल्यामुळे राहून जाण्याची दाट शक्यता असते. अशा वेळेस प्रश्न उत्तरे आपणास येतात का ते सोडून पहा. काही विषयात व्याख्या ,सूत्रे ,आकृत्या आणि रचना याबाबत योग्य नोट्स घेऊन परीक्षेच्या वेळेत अशा नोट्स विद्यार्थ्यांना तुमच्या कामी आल्याशिवाय राहणार नाही.
८) परीक्षा जवळ येत असताना प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र काही कागदे किंवा आवश्यकता वाटल्यास नोंद घेण्यासाठी प्रत्येक विषयासाठी एक एक डायरी तयार करून त्या डायरीमध्ये अनेक मुद्द्याचे स्पष्टीकरण लिहून घ्या. डायरीमध्ये नोंदच करा. विषयाचे विषयाचे नाव, किती महिने? परीक्षा शिल्लक आहे.किती दिवस? शिल्लक आहे तेही लिहून ठेवा. त्याप्रमाणे परीक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजन करावे.
९) एखादा विषय किंवा एखाद्या विषयाचा काही अभ्यास भाग समजला नसेल तर तो भाग थोडक्यात लिहून आपल्या शिक्षकाच्या मदतीने समजावून घ्या.
१०) विद्यार्थ्यांनी वेळेचा अंदाज घेऊन अभ्यास करण्याची गरज असते. वेळेच्या अंदाजानुसार केलेला अभ्यास आपला जास्त वेळ न वाया घालता एकाच वेळी शिक्षकाकडून एकाच भेटीत तपासून घ्या. शिक्षकाने केलेल्या मार्गदर्शनाचे योग्य स्वरूपाचे असल्यामुळे त्याप्रमाणे पुढील नियोजन करून बाकी राहिलेल्या विषयासाठी नियोजन करून अभ्यास करत रहा.
११) उपरोक्त दर्शविलेल्या एक ते दहा या बाबीच्या संदर्भात वरील प्रमाणे दोन महिन्यात दर महिन्याला किंवा पंधरा दिवसांनी प्रत्येक विषयांच्या अभ्यासासाठी आवश्यकतेनुसार नियोजन निर्धारित करून सर्व विषयांना पुरेशा प्रमाणात तास उपलब्ध करून देता येईल व ज्या विषयाचा अभ्यास कमी वाटत असेल असा अंदाज आल्यानंतर त्या विषयाच्या संदर्भात नियोजनात तास वाढवून अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर त्याची तपासणी करा. याचे मुख्य कारण विद्यार्थ्यांनी केलेले परीक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजन हे लवचिक असते. अभ्यास हा विषय आणि काही महत्त्वपूर्ण मुद्दे यासंदर्भात निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी नियोजन लवचिक असणे आवश्यक असते. त्यानुसार वेळीच नियोजन करून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
१२) परीक्षा जवळ आल्यानंतर पंधरा दिवस अगोदर सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका निर्धारित वेळे घड्याळ समोर ठेवून आदर्श नमुना प्रश्नपत्रिका सोडवून आपल्या विषय शिक्षकाकडून तपासून घेणे म्हणजे परीक्षेमध्ये अडचण निर्माण होणार नाही.
वर्षभराचे नियोजन वेगळे असते आणि परीक्षा अगोदर चे दोन महिन्याचे नियोजन वेगळे असते .त्यामुळे दोन्ही नियोजन यशस्वी गांभीर्याने घेऊन बोर्डाची परीक्षा देताना बोर्डाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून वर्षभर केलेल्या अभ्यासाचे सादरीकरण संपूर्ण कार्यक्षमतेने करण्यासाठी योग्य अभ्यासाला दिशा देण्याची गरज विद्यार्थ्यांना असल्यामुळे या लेखातून बोर्ड परीक्षा मराठी माहिती या सदराखाली स्पष्टपणे सर्व मुद्द्यावर सविस्तर विचार मित्रांनो आपण करत आहोत. Board Examination In Marathi Information
कार्यक्षमता
विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्षमतेने परीक्षेमध्ये यश संपादन होण्या साठी अभ्यासामध्ये कार्यक्षमतेने परीक्षेची अनुभूती घेण्यासाठी आणि आपल्या चुका सुधारण्यासाठी संधी विद्यार्थ्यांना वेळीच प्राप्त झालेली असते. विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्षमतेने अभ्यास केला तर परीक्षा जवळ येते त्याप्रमाणे दर महिन्याला दर दिवसाला परीक्षेची भीती वाटायला लागते म्हणून विद्यार्थ्यांनी भूतकाळात अभ्यास न केल्याचे टेन्शन व आपले भविष्य कसे होईल . याबाबत मनात कोणत्याही प्रकारचे टेन्शन न घेता अभ्यास करण्याची कार्यक्षमता विद्यार्थ्यांजवळ असणे आवश्यक आहे. Board Examination In Marathi Information
विद्यार्थ्यांनी स्वतःला कोंडून घेतले तर मनमोकळे कसे व्हावे? येणारा ताण कसा कमी होईल. परीक्षा जवळ आली असता शारीरिक व मानसिक ताण वाढू न देता फक्त आपले अभ्यास कार्य पूर्ण करणे आवश्यक आहे. निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे सकाळी उठून व्यायाम करणे, व्यायामानंतर प्रार्थना, प्रार्थना नंतर नाश्ता, नंतर निर्धारित वेळेत अभ्यास आणि दररोजचे नियमित जेवण ठरलेल्या निर्धारित वेळेत विद्यार्थ्यांनी कार्यक्षमतेने संपूर्ण काम पूर्ण करण्याची ही सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे. थोडीही नियोजन बिघडले की संपूर्ण काही बिघडण्याची शक्यता असते. याकडे जातीने लक्ष द्या म्हणजेच दुर्लक्ष करू नका. शक्यतो दुपारच्या वेळामध्ये कमी झोप घ्या किंवा झोपू नका.
परीक्षा वेळापत्रक
बोर्ड परीक्षा वेळापत्रक आपल्या अभ्यास खोलीमध्ये सुस्पष्ट शब्दा त लिहून वारंवार वेळापत्रकाचे निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर काही पेपर सकाळच्या वेळेमध्ये दहा ते दोन च्या दरम्यान असते तर काही पेपर दुपारी तीन ते पाच या वेळात निर्धारित केलेले असते. ही शासकीय स्तरावरून बोर्डाने निर्धारित केलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अगदी जुलै महिन्यापासून संभाव्य वेळापत्रक म्हणून जाहीर केलेले असते. फक्त एखाद्या वेळेस शासकीय कार्यक्रमामुळे किंवा सुट्टीमुळे किंवा एखाद्या ठराविक कारणास्तव थोडाफार फेरबदल होऊ शकतो. परंतु वेळापत्रकांच्या बोर्डाच्या तारखा निश्चित झालेल्या असतात. त्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत अभ्यास करणे हे कर्तव्य आपले असून त्याकडे विद्यार्थी मित्रांनो दुर्लक्ष करू नका.Board Examination In Marathi Information
परीक्षेच्या दिवशी करण्याची कार्य
1)बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशी निर्धारित वेळेत सकाळी सहा वाजता वेळापत्रकाकडे जातीने निरीक्षण करून कोणता पेपर व कोणत्या वेळात होणार आहे याची संपूर्ण अधिक खात्री करून घेऊन नंतर पुढील कामात सुरुवात करा.
2)सकाळी लवकरच विद्यार्थ्यांनी जो पेपर असेल त्या पेपरच्या विषयाच्या संदर्भात पूर्ण प्रकरणाच्या काढलेल्या नोंदीची उजळणी करा. पूर्ण प्रकरण वाचत बसू नका.
3)परीक्षेसाठी काही संकेत शब्द किंवा कोडवर्ड असते ते नजरे खालून घाला. सुक्ष्म टिपणे आकृत्या नकाशे किंवा आलेख यांचे धावते निरीक्षण करून ते संपूर्ण निरीक्षण चित्रबद्ध पद्धतीने आपल्या मेंदूत साठवून ठेवण्याचा प्रयत्न करा. परीक्षा कालावधीत दोन किंवा तीन तासात संपूर्ण केलेल्या टिपण्यांच्या किंवा नोंदणीच्या आठवणी परीक्षेत साकार होतील याकडे लक्ष द्या.
4)उद्या पेपर असेल तर आजच्या रात्री सलग पूर्ण झोप आठ ते दहा तास घ्या शक्यतो जागरण टाळा म्हणजे परीक्षेत झोप येणार नाही आणि टेन्शनही येणार नाहीत.
5)पहाटे लवकर उठून शांत आणि उत्साही वातावरणात अभ्यासाला सुरुवात करून अभ्यासाची नोटच्याद्वारे तोंड ओळख करून घ्या. लवकरच सकाळी आपल्या कपड्यांना इस्त्री करून त्याच बरोबर बूट किंवा चप्पल पॉलिश करून करून ठेवा. सकाळी लवकर स्नान करून देवदर्शन घेऊन अभ्यासाची संपूर्ण एक ते दोन तासात तोंड ओळख झाल्यानंतर परीक्षा केंद्र कुठे आहेत. परीक्षा केंद्र आपल्या घरापासून किती दूर अंतरावर आहे. याची जाणीव करून घ्या.
परीक्षेसाठी परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर किती वाजता आपणास पोहोचायचे आहे याची सर्व कल्पना पालकाला देऊन परीक्षेबाबत संपूर्ण माहिती पालकाला देणे आवश्यक आहे. परीक्षेत लागणाऱ्या सर्व शैक्षणिक साहित्याची तसेच ओळखपत्राची आठवण ठेवून सोबत घेऊन जाण्यास विसरू नका. परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर आपल्या संपूर्ण साहित्यासह तयारीनिशी परीक्षेच्या युद्ध मैदानात उतरण्याचा जंगबांधा.Board Examination In Marathi Information
परीक्षेला जाताना अगोदर करावयाची कार्य
1)विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ज्या विषयाची परीक्षा असेल त्या विषयाच्या संदर्भाने लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य सोबत घेणे. उदाहरणार्थ-बोर्डाकडून प्राप्त झालेले ओळखपत्र ज्याला आपण परीक्षा हॉल तिकीट असे म्हणतो ते सोबत जवळ ठेवा. ते ओळखपत्र संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये सोबत असणे गरजेचे असते. ते हरू नका किंवा घायाळ करू नका. ओळखपत्र जवळ असण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ओळखपत्राशिवाय परीक्षा हॉलमध्ये आपणास प्रवेश मिळत नाही याची जाण असू द्या.
2 ) किमान तीन पेन निळ्या शाईचे पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, आणि आवश्यकतेनुसार निळ्या शाईची रिफील सोबत घेऊन परीक्षा हॉलमध्ये जा. परीक्षेमध्ये परवानगी असेल तर ग्राफ पेपर, लॉक टेबल, कॅल्क्युलेटर, स्टेपलर, कच्च्या कामासाठी आवश्यक असणारी कागद, कंपास बॉक्स आतील संपूर्ण साहित्य, खोड रबर, पॅड , स्वच्छ पाण्याची बाटली, रुमाल आणि घड्याळ सोबत घेऊन जा. पण हे साहित्य आणण्यास परवानगी देण्यात आली असेल तरच सोबत न्या अन्यथा सोबत नेण्याची गरज नाही. कारण वरीलपैकी अनेक प्रकारचे साहित्य केंद्र संचालक द्वारे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात.
3)परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. योग्य वेळेचे निर्धारण करून परीक्षा पूर्वी अर्धा तास अगोदर पोहोचणे आवश्यक असते. अन्यथा काही वेळेस बोर्डाच्या परीक्षेच्या नियमानुसार वेळेवर न पोचलेल्या विद्यार्थ्यास परीक्षा केंद्रावर आत येण्यास सक्त मनाई केली जाते. संपूर्ण कल्पना पूर्व नियोजनानुसार डोक्यात ठेवणे आवश्यक आहे.
4)परीक्षेच्या दिवशी अगदी हलका आहार घ्या शक्यतो पोळी भाजी खा. मात्र पोटभर खाऊ नका. थोडी भूक राहील याप्रमाणे सकाळचे जेवण घेणे आवश्यक असते.
5)परीक्षेला जाताना रस्त्यावर होणारी गर्दी आणि ट्रॅफिक याचा विचार करून योग्य वेळेस परीक्षेस जाण्यास घरातून आई-वडील आणि देवदर्शन घेऊन बाहेर पडा.
6)परीक्षा केंद्रावर सायकलने जात असल्यास रुमाल आणि टोपी आवश्यक घाला कारण मार्च आणि एप्रिल मध्ये परीक्षा असतात आणि या वेळेस भरपूर उष्णता असते. त्याचबरोबर मोटार सायकलने जात असेल तर सोबत मोटरसायकल चालवण्याचा परवाना सोबत घेऊन डोक्यात हेल्मेट घालून टू व्हीलर ने प्रवेश केंद्रावर निर्धारित वेळेच्या अगोदर पोहोचणे आवश्यक आहे. बोर्डाच्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्याने अर्धा तास तरी अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावे अशा प्रकारचे सांगितलेले असतात. आपणास दिलेल्या ओळखपत्राच्या पाठीमागे दिलेले सर्व नियम आवश्यक वाचून त्या नियमाचे पालन करून परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित व्हावेBoard Examination In Marathi Information
परीक्षा हॉलमधील विद्यार्थ्याचे कर्तव्य
तुम्ही तुमचे ओळखपत्र दाखविल्यानंतर परीक्षा हॉलमध्ये तुम्हा स प्रवेश दिला जातो. प्रवेश दिल्यानंतर आपली परीक्षेसाठी बैठक आसन व्यवस्था प्रत्येक परीक्षा हॉलच्या समोर लावलेली असते. त्याप्रमाणे परीक्षा हॉलमध्ये आपल्या बैठक असणावर जाऊन बसणे. अगोदर खात्री करून घ्या की, आपणास देण्यात आलेला बेंच हालचाल तर करत नाही ना. किंवा व्यवस्थित आहे का. व्यवस्थित नसेल तर केंद्र संचालकाला सांगून बेंच बदलून घेऊ शकता.
आपणास त्वरित बेंच बदलून देण्यात येतो. परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षकांना त्यांनी मागता क्षणी तुमचे ओळखपत्र दाखवा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा आधी परिवेक्षक वर्गात येण्याच्या आधी आणि प्रश्नपत्रिका हातात पडण्याच्या आधी संपूर्ण मानसिकदृष्ट्या शांत वातावरणात आपल्या बेंचवर बसणे. कोणत्याही प्रकारचा ताण किंवा तणाव न येता शांत स्वभावात असणे आवश्यक आहे. एकाच पैशाच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे परीक्षेच्या दृष्टिकोनातून भीती आणि उत्सुकता .या दोन्ही एकाच वेळी आपणास अनुभूती होऊ शकते.
परीक्षा हॉलमध्ये श्वसनाची गती वाढते, घाम येण्यास सुरुवात होते, काही विद्यार्थ्यांना ताण सहन होत नाही तर आपल्याला काहीच येणार नाही आणि आपण परीक्षेत काहीच पाठवून लिहू शकणार नाही असे मत करूनही बसतात. सुद्धा त्यांच्या वाट्याला येत असतात. मित्रांनो तसे काही नाही. प्रश्नपत्रिका अतिशय सोपी असते. सामान्यपणे एखाद्या खेड्या वस्तीतील शाळातील विद्यार्थ्यांपासून तर मुकेश अंबानी सारख्या शाळांच्या मुलांच्या काठीण्य पातळीचा विचार करून प्रश्नपत्रिका सेट केलेल्या असतात. ज्ञान, आकलन, श्रवण आणि उपयोजन अशा विविध कौशल्यावर आधारित प्रश्नपत्रिका असतात .
परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवून आपण वर्षभर जो अभ्यास केला आहे त्या अभ्यासावर निश्चित माहिती लिहू शकतो असा विश्वास ठेवा. मग पहा. प्रश्नपत्रिका किती सोपी आहे? अभ्यास करण्यास कदाचित संधी मिळाली नसली तरी परीक्षेत मात्र लिहिण्यास संधी मिळत असते. वर्षभर केलेल्या अभ्यासावर आधारित प्रश्न पत्रिकेतील सूचनेप्रमाणे प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहू शकता अशी 100% ब्लॉगरची अपेक्षा आहेत. पटपट तुम्हास प्रश्नाचे उत्तर आठवण्यास सुरुवात होते.
वर्षभर माझा अभ्यास छान झाला आहे. नियोजनपूर्वक अभ्यास केला आहे. परीक्षेत नियोजनानुसार सर्व प्रश्नांची उत्तरे प्रश्नपत्रिकेतील सूचनेप्रमाणे लिहू शकतो अशी सकारात्मक भावना ठेवून सर्व कल्पनाचित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. परीक्षेतील तीन तास केव्हा लिहितांना निघून जातील हे समजणार ही देखील नाही.
परिवेक्षकांनी किंवा शिक्षकाने प्रश्नपत्रिका देण्यापूर्वी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐकून त्या सर्व सूचनांचे पालन करा. कारण परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर आपणास अर्धा तास सूचना देण्यासाठी व अमलात आणण्यासाठी दिलेला हा वेळ असतो. या वेळेत परीक्षेसंबंधी संपूर्ण संकल्पना परिवेक्षक किंवा केंद्र संचालक किंवा काही शिक्षक आवश्यक करतात . त्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करा. Board Examination In Marathi Information
उत्तर पत्रिका लिहित असतानाचे कर्तव्य
विद्यार्थी मित्रांनो, आपण परीक्षा हॉलमध्ये बसलेले आहात, आपणास अगोदर उत्तर पत्रिका देण्यात येते. उत्तर पत्रिकेवर स्वतःचे नाव व इतर संपूर्ण नियमानुसार सांगितलेल्या माहितीप्रमाणे बारकोड च्या आधारे नियमानुसार उत्तर पत्रिकेवर मुखपृष्ठावर दिलेली माहिती अचूक भरा. ही माहिती परिवेक्षकाकडून आपण तपासून घेऊ शकता. मात्र प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर कोणाशीही चर्चा करता येत नाही. याची जाणीव ठेवा. प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर संपूर्ण प्रश्नपत्रिका चे अचूक वाचन करून घ्या. घाबरून जाऊ नका. जे प्रश्न तुम्हास सोपे वाटत असेल त्या प्रश्नांची उत्तरे अगोदर लिहा. म्हणजे वेळेचा बचाव होईल. अवघड वाटणारे प्रश्न शेवटी शांत मनाने अचूक सोडवण्याचा प्रयत्न करा. लघुत्तरी प्रश्न अगोदर सोडवा आणि दीर्घोत्तरी प्रश्न शेवटी सोडवा.सोपे प्रश्न असतील तर खूप घाई करू नका. त्यामुळे सिली मिस्टेक Silly Mistakes होतात.
मित्रांनो ,आता तर बोर्डाच्या परीक्षेसाठी कृती आराखडा प्रश्नपत्रिका सोडवणे फार सोपे झाले आहेत. एक काळ असा होता की त्यावेळेस सर्व प्रश्न दीर्घोत्तरी असायचे. आता तसे नाही. काळ फार बदललेला आहेत. शिवाय प्रत्येक विषयासाठी प्रात्यक्षिक गुण सुद्धा अगोदरच शाळेकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेले असतात. प्रश्नांची उत्तर आठवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक व्हा.ऑटोमॅटिक म्हणजे आपोआप प्रश्नाचे उत्तरे आठवतील.
सातत्याने प्रश्नपत्रिका नेहमी अवघड येणारे कठीण प्रश्न कदाचित एखाद्या वेळेस चुकीने उत्तरे सोडले असेल तर खचून जाऊ नका. अतिशय शांत पद्धतीने आणि काळजीपूर्वक प्रश्नपत्रिकातील सर्व प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करीन असा शेवटपर्यंत आत्मविश्वास करून पेपर लिहीत राहा. "Board Examination In Marathi Information"आणि मग डोळे उघडा कठीण प्रश्नाचे उत्तरही सुद्धा तुम्हाला पाठवू शकतात.
परीक्षा हॉलमधील दक्षता
विद्यार्थी मित्रांनो, चुकीने ही प्रश्नांच्या उत्तरांची नक्कल करण्याचा प्रयत्न करू नका म्हणजेच कॉपी करू नका. कुणी कॉपी करण्याचा आग्रह धरत असेल तरीसुद्धा तुम्ही कॉपी करू नका. इतर विद्यार्थी कदाचित कॉपी करताना आपणास दिसून आले असले तरीसुद्धा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या आत्मविश्वासाने मनाने प्रश्नाचे उत्तरे सोडवणे. कॉपी करून नका. एका परीक्षेत कॉपी करणे म्हणजे भविष्यातील होणाऱ्या गंभीर समस्या सामोरे जावे लागेल. कॉपी ने पास होणारे विद्यार्थी भविष्यात अयशस्वी होतात.
तुम्ही प्रामाणिक राहा, प्रामाणिकपणे वर्षभर केलेल्या अभ्यासाच्या आधारे आणि आपल्या शिक्षकाने शिकवलेल्या मुद्द्याच्या संदर्भात मनाने माहिती प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भात उत्तर पत्रिकेत लिहा. स्वतःच्या शब्दात प्रश्नांची उत्तरे मनाने लिहिणे म्हणजे यशस्वी उत्तर होय. अशा प्रश्नास अपेक्षित असणारे अपेक्षित गुण नक्की मिळतात. म्हणून परीक्षा केंद्रामध्ये ही फार मोठी दक्षता घ्या की, उत्तर पत्रिका सोडवताना किंवा उत्तरे लिहिताना कॉपी करू नका.
परीक्षा लेखन कार्य
विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका आपल्या हातात पडल्यापासून आपणास अत्यंत मनात सकारात्मक भावना ठेवून गुरूर व भीती निर्माण होत असते ती दूर करून प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे लिहिण्याबाबत उत्सुक व सकारात्मक लिहा.
प्रश्नपत्रिकातील प्रश्नाबाबत उत्सुकता तर असतेच त्याचबरोबर त्या प्रश्नांची उत्तरेही सुद्धा आठवण्यास उत्सुक मन असावे लागते आणि म्हणून अभ्यासलेले प्रश्न चांगल्या पद्धतीने परीक्षेत लिहिले तर मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही याची काळजी घेऊन मन शांत ठेवून तीन तासात संपूर्ण प्रश्नपत्रिकेतील उत्तरे लिहून उत्तर पत्रिका चांगल्या हस्ताक्षरात लिहून काढावी.
चांगले हस्ताक्षर म्हणजे उत्तर पत्रिका तपासणाऱ्या शिक्षकासह वाचनीय असणारे अक्षर असावे. त्याला ते वाचता येणे आवश्यक असे असावे. म्हणजे तुमची उत्तर पत्रिका तपासणी सोपे जाईल असे परीक्षेतील लिखाण कर्तव्य असावे.
आदर्श उत्तरपत्रिका
- उत्तर पत्रिका लिखाणातील दक्षता व कर्तव्य
- उत्तर पत्रिकेवर आपला नंबर, केंद्र क्रमांक, विषय आणि दिनांक व्यवस्थित लिहा.
- निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेन चा वापर करावा.
- उत्तर पत्रिका लिहिताना लाल शाईच्या पेनाचा किंवा हिरव्या शाईच्या पेनाचा वापर करू नका.
- आकृत्या सुरुवातीला पेन्सिलने काढण्यास परवानगी होती. मार्च 2024 पासून पेनाने आकृत्या काढण्यास परवानगी बोर्डाने दिली आहेत.
- दोन किंवा तीन मिनिट प्रश्नपत्रिका एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या.
- सोपे प्रश्न वाचून घ्या आणि नंतर सोडवा .
- प्रश्नाचे उत्तर लिहिताना मनात उत्तराचा आराखडा तयार करून ठेवा.
- जे परीक्षेत विचारले असेल तेच लिहा.
- सूचनेत दिलेल्या शब्द संख्येनुसार मोजक्या शब्दात उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे.
- विनाकारांची न विचारलेली माहिती उत्तर पत्रिकेत लिहू नका.
- उत्तर लिहिण्याची हिंमत असेल तर हौसेला बुलंद ठेवा. लक्षात ठेवा.
- उत्तर पत्रिकेच्या दोन्ही बाजूने प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. विनाकारण जास्तीची जागा सोडू नका.
- उत्तर पत्रिकेला योग्य प्रकारचा अरुंद एक इंचाचा समास द्या. किंवा स्केलच्या साह्याने समा स उत्तर पत्रिकेच्या डाव्या बाजूला मारून घ्या. भला मोठा समाज मारू नका.
- एकाच पानावर एकाच प्रश्नाचे उत्तरे लिहावी.
- नवीन पानावर नवीन प्रश्नांची उत्तरे लिहा.
- दिलेला प्रश्नांचे क्रमांक आणि उपक्रमांक व्यवस्थित लिहा.
- प्रश्नाच्या गुणावरून आणि विचारलेल्या शब्द संख्येनुसार अपेक्षित प्रश्नाचे उत्तर मर्यादित शब्दात थोडक्यात लिहा.
- लेखन हे व्याकरणदृष्ट्या अचूक असावे. व्याकरणातील चुका करू नका.
- दीर्घोत्तरी प्रश्नासाठी म्हणजेच मोठ्या प्रश्नासाठी प्रथम प्रस्तावना करून नंतर उप मुद्दे लिहिणे व शेवटी प्रश्नांचा सारांश थोडक्यात योग्य शब्दात लिहा.
- प्रश्नाचे उत्तर लिहिताना योग्य ठिकाणी पॅरेग्राफ किंवा परिच्छेद सोडा.
- प्रश्नांची उत्तरे प्रभावीपणे सोडवा.
- प्रश्नांची उत्तरे सुटसुटीत लिहा.
- प्रश्नांची उत्तरे लिहिताना दोन अक्षरातील अंतर व्यवस्थित ठेवावे.
- उत्तर पत्रिकेत कोठेही खोडा तोड करू नका.
- आवश्यक ठिकाणीच आकृत्याची गरज असेल तेथेच आकृत्या काढा. विनाकारण जेथे आकृत्याची गरज नाही तेथे आकृती काढत वेळ घालू नका.
- आलेखाचा वापर किंवा नकाशाचा वापर करण्यास सांगितल्यास आले किंवा नकाशाचा वापर करा.
- प्रश्नाच्या लिहिलेल्या उत्तराच्या मुख्य भागास अधोरेखित करा.
- कुठेही उत्तर पत्रिकेवर शाईचा डाग पडू देऊ नका.
- उत्तर पत्रिकेच्या पहिल्या दोन पानावर उत्तरे लिहिल्यानंतर मध्येच चार-पाच पाने सोडून पुन्हा उत्तर पत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करू नका.
आकर्षक उत्तर पत्रिका लिखाण
काही विद्यार्थी पहिली दोन-तीन पाने काळजीपूर्वक लिहितात नंतर उत्तर पत्रिका लिहिताना शेवटी निष्काळजीपणाने उत्तर पत्रिका सोडवतात व अक्षरात फरक पडतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्तरपत्रिका सोडवताना एकाच प्रकारचे हस्ताक्षर असणे आवश्यक आहे. याची काळजीपूर्वक जाणीव असावी. अक्षरात बदल पडल्यास कॉपी प्रकरण बोर्ड निकाल राखून ठेवते.
प्रश्नाचे उत्तर लिहिल्यानंतर एक रेषा खाली सोडून तेथे एक रेषा मारा. उत्तर संपेल तेथे एक रेषा सोडणे अपेक्षित आहे. उत्तर पत्रिका तपासणाऱ्या तपासणी करणाऱ्या शिक्षकावर प्रभाव पडेल अशा प्रकारे उत्तर पत्रिका लिहा. म्हणजेच आकर्षक रीतीने उत्तर पत्रिका लिखाण कार्य होणे महत्त्वाचे आहे. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्याने उत्कृष्टरित्या यश संपादन करण्यासाठी हा लेखाचा मुख्य उद्देश समोर ठेवून लेख लिहिण्यात आला आहे. जर लेख आपणास आवडलास तर इतर मित्रांना शेअर करू शकता. Board Examination In Marathi Information
सारांश
सर्वसामान्यपणे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परीक्षेला अनन्य साधारण महत्व आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या परीक्षा देऊन यशस्वी व्हावे लागते. काही परीक्षा शालेय स्तरावर शाळेमार्फत घेतल्या जातात तर काही परीक्षा ठराविक मंडळ मार्फत आयोजित केल्या जातात. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे परीक्षा घेणारे शिक्षण मंडळे आहे.Board Examination In Marathi Information
साधारणतः शिक्षण मंडळ स्तरावरून घेण्यात येणाऱ्या परीक्षेला बोर्ड परीक्षा असे म्हणतात. या बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या जीवनात अनन्य साधारण महत्व प्राप्त करून देणाऱ्या आहेत. त्यामुळे आजच्या लेखातून आपण बोर्ड परीक्षा मराठी माहिती या सदराखाली ब्लॉग पोस्ट करिता ब्लोगर ने लेख उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे लिहिला आहे.
या लेखातून विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करावा. बोर्ड परीक्षेत यशस्वी व्हावे. म्हणून परीक्षा जशी जशी जवळ येत चालते तशी तशी विद्यार्थ्यांची भीती वाढत जाते ती भीती दूर करण्यासाठी व सकारात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करून बोर्ड परीक्षा साठी विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी याबाबत सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.
संपूर्ण निर्धारित वेळेत म्हणजे तीन किंवा दोन तासात या लेखात नमूद केलेल्या मुद्द्याच्या संदर्भात बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांनी काय करावे? काय करू नये? याबाबत सविस्तर कल्पना देण्यात आली आहेत. या लेखात दर्शविल्या संपूर्ण मुद्द्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी सविस्तर वाचन केल्यास हा लेख 100% विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा बाळगून ब्लॉगरने हा लेख लिहिला आहे.
लेखामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या काही राहून गेले असल्यास किंवा आपणास त्रुटी आढळल्यास ब्लॉगच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या काही प्रतिक्रिया असेल किंवा काही त्रुटी आढळून आल्यास आवश्यक कळविणे. आपल्या त्रुटी योग्य असल्यास त्वरित दुरुस्त करून लेख अद्यावत करण्यात येईल. धन्यवाद! वंदे मातरम्! मित्रांनो लेख लिहिण्यास येथे पूर्णविराम देतो आहे.Board Examination In Marathi Information
FAQ
1) महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत कोणत्या वर्गाच्या बोर्ड परीक्षा घेतल्या जातात?
उत्तर-शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ह्या बोर्ड परीक्षा म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे घेतात.
2) महाराष्ट्र बोर्ड मंडळ पुणे बोर्ड परीक्षा कोणत्या महिन्यात आयोजित करतात?
उत्तर-मार्च व एप्रिल महिन्यात दरवर्षी बोर्ड परीक्षा आयोजित करण्यात येते.
3) महाराष्ट्र बोर्ड परीक्षा घेताना दरवर्षी कोणते अभियान महाराष्ट्रात राबवण्यात येते?
उत्तर-कॉपीमुक्त अभियान दरवर्षी महाराष्ट्र बोर्ड राबवण्यात येते.
4) महाराष्ट्र बोर्ड नापास विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा साधारणतः कोणत्या महिन्यात आयोजित करत असते?
उत्तर-साधारणतः जुलै महिन्यात पुनर्परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र बोर्ड करत असते.
5) बोर्ड परीक्षा च्या संदर्भात विद्यार्थ्यांनी कोणती भावना मनात ठेवून परीक्षा देणे आवश्यक आहे?
उत्तर-वर्षभर नियोजन करून निर्धारित वेळेत सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवून 100% बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण होणारच आहे अशी भावना व्यक्त करून देत असतात.
मित्रांनो अधिक माहितीसाठी आवश्यक खाली लेख नक्की वाचवा व आपल्या ज्ञानामध्ये भर घाला.