जाहिरात लेखन मराठी माहिती |Advertisement Writing In Marathi
प्रस्तावना
Advertisement Writing In Marathi मित्रांनो, आज आपण आपल्या ब्लॉग पोस्ट लेखासाठी जाहिरात लेखन मराठी माहिती यासंदर्भात नाविन्यपूर्ण विषय निवडला आहे. कारण आज जग फक्त जाहिरात बाजी पाठीमागे लागले आहे. सर्व क्षेत्रांमध्ये जाहिरात बाजी वर करोडो रुपये दररोज विविध व्यवसाय मार्फत खर्च केला जात आहे. आपण लेख वाचल्यानंतर जर आपणास हा लेख आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा.
आजचे जग हे जाहिरात जाहिरात बाजी चे युग आहे. तसेच जाहिराती बरोबरच स्पर्धेचे सुद्धा युग आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या निर्मिती केलेल्या माला कडे आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या माध्यमाच्या स्वरूपा तून जाहिरात देण्यात येते. उत्पादकाला आपल्या उत्पादित केलेल्या वस्तूकडे आकर्षित करण्यासाठी जाहिरात देऊन सर्वांचे लक्ष वेधले जाते.
जाहिरात म्हणजे जाहीर करणे. ही अगदी सोपी व्याख्या आहे. आपल्या वस्तूची जाहिरात करण्यासाठी उत्पादकाला करोडो रुपये खर्च करावे लागत आहेत. व्याख्या जरी सोपी असली तरी जाहिरात करणे सोपी बाब नाही. जाहिरात ही एक सृजनशील कला असून उत्पादकाला जाहिरात बाजी ची कला आत्मसात करणे आज काळाची गरज ठरत आहे जगातील उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तूंची आज जाहिरात आपणास मीडियाच्या माध्यमातून पहावयास मिळते.
Advertisement Writing In Marathi(toc)
जाहिरात लेखन
एखाद्या उत्पादकाला लोकांच्या मनामध्ये त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे आवश्यक आहे. उत्पादित केलेल्या वस्तू बाबत लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जाहिरात करण्यात येते. म्हणूनच मित्रांनो, आजच्या लेखातून आपण जाहिरात लेखन मराठी माहिती यासंदर्भामध्ये संपूर्ण आणि सविस्तर माहिती या लेखातून स्पष्टपणे नमूद करणार आहे.
जाहिरातीचा उद्देश
एखाद्या व्यावसायिक उत्पादका ने आपल्या कंपनीमध्ये वस्तू निर्माण केलेली असते.i जर ती वस्तू बाजारामध्ये विक्री सध्या उत्पादकाला आणावयाची असेल तर जाहिरात त्या वस्तूच्या संदर्भात करणे आवश्यक आहे. कित्येक कंपन्या वस्तूंच्या जाहिराती न केल्यामुळे कंपन्या बंद पडल्या आहेत. अगदी सुई पासून तर मोठ्यात मोठ्या वस्तू पर्यंत सर्व बाबतीत जाहिरात करणे महत्त्वपूर्ण बाब आहे. जाहिरातीचा मुख्य उद्देश उत्पादकांच्या माला बाबत आवड निर्माण करून लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी योग्य प्रकारे योग्य माध्यमातून जाहिरात करणे व जास्तीत जास्त उत्पादित मालाची विक्री करून गडगंज नफा प्राप्त करणे हा मुख्य उद्देश असतो. एखादी वस्तू कशीही जरी असली तरी सुद्धा त्या वस्तूच्या बाबत जर जाहिरातीने लोकांच्या मनावर छाप टाकली तर कोणी कितीही सांगितले तरी सुद्धा ते लोक ती वस्तू खरेदी केल्याशिवाय राहत नाही.
जाहिरातीच्या पाठीमागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांच्या मनावर आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी जबरदस्त छाप पाडणे आवश्यक आहे. जाहिरातीचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांच्या मनावर वस्तू बाबत आकर्षित करून विक्री करणे व विक्रीच्या माध्यमातून नफा प्राप्त करणे हा उद्देश असतो. जाहिरातीचे उत्तम गमक आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि संगणक युगात त मोबाईल आणि इंटरनेट यांच्यामार्फत जाहिरात बाजी च्या कक्षा रुंदावत किंवा व्यापक होत आहे आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला जाहिरात लेखन करता येणे आवश्यक आहे. माध्यमिक वर्गांच्या वार्षिक परीक्षेसाठी जाहिरात लेखन या विषयावर कृती आराखडा प्रश्नपत्रिका जाहिरात लिहिण्यासाठी एक प्रश्न दिलेला असतो.'Advertisement Writing In Marathi 'वार्षिक परीक्षेतील प्रश्न चांगल्या रीतीने सोडवण्यासाठी जाहिरात लेखन कशाप्रकारे करावे या उद्देशाने हा लेख लिहिण्याच्या पाठीमागचा ब्लॉगर चा उद्देश आहे.
लोकसभा निवडणुका 2024 च्या बाबत अनेक पक्ष आपल्याला बहुमत प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारच्या मीडिया च्या माध्यमातून जाहिरात बाजी चा चांगलाच बाजार मीडियामध्ये भरलेला दिसून येत आहे.
लेखन
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत इयत्ता दहावी परीक्षेसाठी किंवा शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी "मराठी "या विषयात जाहिरात लेखन या विषयावर प्रश्नपत्रिका एक प्रश्न देण्यात आलेला असतो. हा कृती युक्त आराखडा प्रश्नपत्रिका विभाग पाच मध्ये दहा गुणां साठी किंवा दहा मार्क साठी जाहिरात लेखन 60 ते 90 शब्दात करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी सोपा जावा . तसेच हा प्रश्न सोडवण्यासाठी मदत व्हावी आणि दहा पैकी दहा गुण प्राप्त व्हावेत. या उद्देशाने ब्लोगर ने जाहिरात लेखन विषयावर आधारित माहिती विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व जनतेसाठी देण्यात येत आहे. Advertisement Writing In Marathiअद्यावत कृतीयुक्त प्रारूपा वर आधारित विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आणि जाहिरात लेखन कसे करावे? हे महत्त्वपूर्ण सर्व संदर्भ या लेखातून स्पष्ट करण्यात येत आहे.
जाहिरातीचे घटक
जाहिरात लेखन कौशल्य ही एक जाहिरात बाजी करणाऱ्या व्यक्तीसाठी महत्वपूर्ण ठळक मुद्दा असून जाहिरात करण्यासाठी जाहिरात लेखन कला शिकणे आवश्यक आहे. जाहिरात लेखन कौशल्य अभ्यासताना जाहिरात बाजी करणाऱ्या व्यक्तीला किंवा परीक्षेत प्रश्न सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांना ही कला आत्मसात करण्यासाठी जाहिरात तिचे खालील चार मुख्य घटक देण्यात आले आहे. या चार घटकावर मित्रांनो,आपण खालील प्रमाणे सविस्तर वर्णन करू या.
1) मथळा
2) उप मथळा
3) तपशील
4) संपर्काचा तपशील
या चार घटकावर खालील प्रमाणे मित्रांनो आपण माहिती मिळवू या.
मथळा :
जाहिरातीमध्ये ग्राहकाचे किंवा व्यक्तीचे लक्ष वेधून घेणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे बातमीचा मथळा होय. त्यामुळे बातमी लिहिताना व्यक्तींना आकर्षित करण्यासाठी एखाद्या प्रकारची मराठीतील किंवा काव्यपंक्ती अथवा सुभाषित तसेच संत वचन घेऊन मथळा तयार करण्यात येतो."Advertisement Writing In Marathi "या मथळ्या च्या मुख्य भाग जाहिरातीच्या सुरुवातीलाच शीर्षक रूपात दिले जाते किंवा लिहिले जाते.
ज्ञानेश्वरी ग्रंथालय
या ग्रंथालया ने जाहिरात देताना पुढील संत वचन जाहिरात लिहिताना लिहिले आहे.
वाहतूक आनंदे!
"रसिक वाचकांसाठी आनंदाची बातमी"
उप मथळा :
जाहिरात लिहिताना मित्रांनो, या मुद्द्याच्या संदर्भामध्ये कधीही बातमीची संपूर्ण माहिती देऊ नये. जाहिरात लेखन करताना जाहिरात लिहिणारा कधीच संपूर्ण माहिती या मुद्द्या त देत नाही. उप मथळा संदर्भात फक्त माहितीचे स्पष्टीकरण च दिले जाते.माहितीचे स्पष्टीकरण देण्यासाठी जाहिरातीचा हा महत्त्वपूर्ण घटक आहे.
आपल्या परिसरातील सर्वात भव्य, विविध ज्ञान शाखेची पुस्तके असणारे ग्रंथालय आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत.
तपशील :
जाहिरात दाराने किंवा विद्यार्थ्यांनी जाहिरात लिहिताना जाहिरातीच्या संदर्भामध्ये आपल्या वस्तूची किंवा सेवेची अथवा उत्पादनाची जाहिरात करावयाची असते. ज्या वस्तूची किंवा सेवेची जाहिरात करायची आहेत त्या वस्तू किंवा सेवा ची संपूर्ण तपशील विद्यार्थ्यांनी जाहिरात लेखनामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. येथे संपूर्ण सेवा बाबतचे ठळक वैशिष्ट्ये दिलेले असतात. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे वस्तू उत्पादनातील जगातील इतर वस्तू पेक्षा आम्ही उत्पादित केलेली वस्तू किती आकर्षक आहे हे ग्राहकाच्या मनावर बिंबवणे साठी व मनावर छाप पाडण्यासाठी जाहिरात लिहिताना तपशीलवार मुद्देसूद खालील संपूर्ण वस्तूची तपशील आवश्यक आहे.विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लिहिणे आवश्यक आहे.
वैशिष्ट्ये
- वाचकांसाठी सकाळी आठ ते सायंकाळी आठ पर्यंत खुले
- 24 तास खुल्या आनंदी हवेशीर भरपूर प्रकाश युक्त एयर कंडीशन मध्ये अभ्यासिका वर्ग
- विविध प्रकारचे दैनिक वर्तमानपत्र उपलब्ध
- जुने संदर्भ ग्रंथ उपलब्ध
- विद्यार्थ्यांसाठी खास विशेष सवलत
- संपूर्ण ग्रंथालय डिजिटल स्वरूपात
- वाचकांसाठी आकर्षक सुविधा उपलब्ध
संपर्काचा तपशील :
जाहिरातीच्या घटक क्रमांक चार मध्ये विद्यार्थ्यांनी जाहिरात लिहिताना किंवा ग्राहकांना कोणत्या प्रकारची अधिक माहिती मिळवण्यासाठी संबंधित कंपनीचे नाव, पत्ता, कार्यालयाचा पत्ता, कार्यालयाचा ईमेल आयडी आणि कार्यालयाचे ठिकाण यासंदर्भात येणारे संपूर्ण मुद्दे लक्षात घेऊन बातमीचा संपर्क तपशील लिहिणे आवश्यक आहे. यामध्ये ग्राहकांना कोणत्याही प्रकारची माहिती संपर्क अंतर्गत तपशील मुद्द्या तून प्राप्त करून ईमेल आयडी द्वारे चौकशी सुद्धा करता येते. संपर्क तपशील मध्ये लेखन करताना कोणत्याही प्रकारची मित्रांनो चूक होऊ देऊ नका. एका चुकीमुळे ग्राहकाला वन वन बाजारी फिरावे लागेल. हे चांगले लक्षात असू द्या.
आपण ग्रंथालयाच्या संदर्भात चारी मुद्द्यांच्या स्पष्टीकरणात ग्रंथालयाच्या बाबतीत जाहिरात मुद्दे दिले आहेत.
तपसीला मध्ये ग्रंथालयाच्या संदर्भात पुढील तपशील अवश्य जाहिरातीमध्ये आवश्यक लिहा.
उद्घाटन सोहळा: दिनांक 01मे 2024
उद्घाटनाची वेळ: सकाळी दहा वाजता
प्रमुख पाहुणे: माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!
संपर्क : श्री सागर भूमकर (ग्रंथालय प्रमुख)
संपर्क पत्ता:-सदाशिव पेठ, शनिवार वाड्या जवळ, पुणे प्रगती पुस्तकालय जवळ दगडूशेठ गणपती मंदिर च्या अपोझिट सदाशिव पेठ पुणे.
मोबाईल क्रमांक- 8888333311
ईमेल आयडी - sbsq1111@gmail.com
जाहिरातीची भाषा
विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात लेखन करण्यासाठी विशिष्ट नाविन्यपूर्ण संवादात्मक भाषा मध्ये जाहिरात लिहिणे आवश्यक असते. जाहिराती संवादाच्या माध्यमातून संदेश देत असते. या संवादाचे 'भाषा' आहे मुख्य माध्यम असते.जाहिरात लिहीत असताना भाषेला फार महत्त्वाचा दर्जा प्राप्त झालेला असतो. भाषा जोडी चांगली तेवढी जाहिरात उत्कृष्ट होते. चला तर मग पाहूया जाहिरातीची भाषा.
1)आकर्षक भाषेत मजकूर लिहिणे.
2)जाहिरातीची भाषा साधी ,सोपी ,सरळ ,आकर्षक, स्पष्ट व ओघवती स्वरूपा ची असावी.
3) बुद्धी ला ताण न देणारी भाषा असणे आवश्यक आहे.
4)भाषे मधून जाहिरात बाबत विश्वासार्हता निर्माण करणारी असावी.
5) शब्दा चा गैर वापर करणारी भाषा असू नये.
6)जाहिरातीच्या भाषेने लोकभावनाशी सांगड घातलेली असावी लागते.
7)वेचक अर्थपूर्ण,ल मन प्रसन्न व प्रभावी भाषा जाहिरात लिहिताना वापर करावा.
8)जाहिरातीची भाषा लयबद्ध आणि सुसंवादी असावी लागते.
9) विनोदाचा किनार असलेली विनोदात्मक भाषा असावी लागते.
10)भावनाची संवेदनशीलता जाणणारी व जपणारी भाषा असणे आवश्यक आहे.
जाहिरात लेखन मुद्दे
1) जाहिरातीतील शब्द हलकीफुलकी असायला हवी. जाहिरातीचा आशयगर्भ शक्यतो ग्राहकाला समजेल अशा स्वरूपात कमीत कमी शब्दात अधिकाधिक माहितीचा आशय उत्तम प्रकारे जाहिरात लिखाण करण्यासाठी करणे अपेक्षित आहे.
2) जाहिरात लेखन करताना जाहिरात ठळक व आकर्षक रीतीने मांडणी करणारी असणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर जाहिरातीतील शब्द हे अलंकारिक ,प्रभावी आणि काव्यमय शब्दरचना चा वापर करून ग्राहकाचे लक्ष वेधून घेणारी जाहिरात समर्पक भाषेत लिहिणे अपेक्षित आहे.
3) जाहिराती मांडणी सुस्पष्ट शब्दात सर्वांना दिसेल व आवडेल अशा शब्द प्रकारात मोडणारी जाहिरात लिहिणे अपेक्षित आहे.
4) जाहिरात लेखन करताना जाहिरातीमध्ये ग्राहकाच्या आवडी निवडी फॅशन सवयी व गरज लक्षात घेऊन त्यांचे सर्व प्रतिबिंब जाहिरातीमध्ये ग्राहकांना स्पष्ट लक्षात येणे अपेक्षित आहे.
5) जाहिरात लेखन करताना ग्राहकांना स्थळा सुस्पष्ट कल्पना येऊन संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यांचा स्पष्टपणे उल्लेख होणे अपेक्षित आहे.
जाहिरात लेखन टीप
विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका ज्या मुद्द्यावर आपणास जाहिरात लिहायची आहे. त्याबाबत खालील दिलेली टीप लक्षात घेऊनच जाहिरातीचे लेखन उत्तर पत्रिकेत असणे अपेक्षित आहे.
1)जाहिरात लिहिण्यासाठी पेन चा वापर करा.
2) जाहिरात लिहिण्यासाठी पेन्सिल चा वापर करू नका.
3) परीक्षेत जाहिरात लेखन करताना जाहिरातीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची आकृती काढण्याची गरज नसते.
4) शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी भाषा विषयात जाहिरात लेखन करताना 60 ते 90 शब्दात जाहिरात लिहिणे अपेक्षित असून जास्तीत जास्त शब्दांचा वापर करू नका. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न परीक्षेसाठी अपेक्षित आहे.Advertisement Writing In Marathi
इयत्ता दहावी साठी जाहिरात लेखन
नमुना
कृती आराखडा नमुना प्रश्नपत्रिका जाहिरात लेखन कौशल्यावर आधारित खालील स्वरूपात परीक्षेत प्रश्न विचारल्या जातो.
प्रश्न -खालील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.
पूजा ड्रेसेस, शालेय गणवेश विक्रेते.
उत्तर-
पूजा ड्रेसेस शालेय गणवेशाचे होलसेल विक्रेते
पूजा ड्रेसेस चे वैशिष्ट्ये:
- महाराष्ट्रातील सर्व नामांकित शाळेचे गणवेश माफक दरात उपलब्ध
- विद्यार्थी मापाप्रमाणे गणवेश शिवून मिळतील
- रेडीमेड तयार गणवेश उपलब्ध
- एन. एस. एस. चे गणवेश उपलब्ध
- एनसीसी चे गणवेश उपलब्ध.
- स्काऊट गाईडचे गणवेश उपलब्ध.
- शालेय गणवेश सोबत सॉक्स, बूट ,दप्तर ,रेनकोट आणि छत्री उपलब्ध
- सर्व शालेय वस्तूच्या सेटवर दहा टक्के आकर्षक सूट मिळवा
वस्तू खरेदी साठी त्वरा करा. दहा टक्के सूट ऑफर फक्त मर्यादित काला साठी लागू.
संपर्क: पूजा ड्रेसेस, मेहकर ,जि. बुलढाणा
मेहकर बाजार गल्ली, शिवाजी चौक, मेहकर.
मोबाईल नंबर :- +9172888822××
ई-मेल आयडी puja8888@gmail.com
सारांश
स्पर्धेच्या युगात अतिशय महत्त्वपूर्ण स्थान हे प्रामुख्याने जाहिरातीचे युग आहे. जाहिराती शिवाय विक्रेत्याला आता कोणताही पर्याय उपलब्ध नाही. उत्पादकाने जर आपल्या मालाची जाहिरात केली तरच मार्केटमध्ये वस्तू उत्पादक टिकू शकतो. भारतभर रेडिओ ,टेलिव्हिजन, एफ .एन. रेडिओ ,भ्रमणध्वनी ,इंटरनेट, वाय-फाय, वर्तमानपत्रे, फेसबुक, यूट्यूब चैनल, इंस्टाग्राम, ट्विटर मासिके आणि शासनमान्य दूरदर्शन वाहिन्या त्याचबरोबर खाजगी मान्यताप्राप्त जाहिरात बाजी करणाऱ्या संस्था या माध्यमातून जाहिरातीचा भडिमार होत आहे.
गुगल जाहिरातीमार्फत एका दिवसाला किती करोड रुपये जमा करतात याचा हिशोब लागणे कठीण आहे. जाहिरातीच्या संदर्भाने आता घरबसल्या ऑनलाइन स्वरूपात youtube मार्फत व्हिडिओ व्हायरल करून पैसे कमवतात. म्हणजेच जाहिरात लेखन कौशल्य हे आता करियर होऊन बसले आहेत. जगातील अनेक कंपन्या फक्त जाहिरात न केल्यामुळे जमीनदोस्त झाल्या. संपुष्टात आल्या आहेत. म्हणून विद्यार्थी दशे पासूनच जाहिरात लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी शासनाने अभ्यासक्रमात जाहिरात लेखन हा मुद्दा समाविष्ट केला आहे. आपण या ब्लॉग पोस्ट लेखा उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहेत.
वाचकांनी लेक वाचल्यानंतर जर लेखांमध्ये काही त्रृटी आढळून आल्यास ब्लॉगरच्या ब्लॉग पोस्ट कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना, तक्रारी आणि प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आपण नोंदवले ल्या त्रृटी योग्य असल्या स या लेखा मध्ये त्वरित दूरुस्ती करून हा लेख अद्यावत करण्यात येईल.
FAQ
1) जाहिरात म्हणजे काय?
उत्तर-ग्राहकाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वस्तूच्या संदर्भात माहिती जाहीर करणे म्हणजे जाहिरात होय.
2) जाहिरातीचे किती घटक आहे?
उत्तर -जाहिरातीचे चार घटक आहेत.
3) आधुनिक युगात कोणत्या साधनाद्वारे जाहिरात बाजी केली जाते?
उत्तर-सोशल मीडिया मार्फत आधुनिक युगात जाहिरात बाजी केली जाते.
4) जाहिरात संवादाचे एक माध्यम सांगा.
उत्तर-जाहिरात संवादाचे 'भाषा' आहे एक उत्तम साधन आहे.
5) जाहिरातीच्या घटकांमध्ये सर्वात शेवटचा महत्वपूर्ण असणाऱ्या घटकाचे नाव सांगा?
उत्तर-संपर्काचा तपशील
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.
बातमी लेखन कौशल्य मराठी माहिती
अधिक माहितीसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनलचे व्हिडिओ नियमित पाहत चला.