बातमी लेखन कौशल्य मराठी माहिती | News Writing Skill In Marathi Mahiti
प्रस्तावना
News Writing Skill In Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण आपल्या ब्लॉक पोस्ट लेख लिहिण्यासाठी महत्त्वपूर्ण तसेच नाविन्यपूर्ण लिहिण्यास हाती घेतला आहे. आज आपण आपल्या लेखातून बातमी लेखन कौशल्य मराठी माहिती या विषयावर सविस्तर माहिती या लेखात स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे. बातमी लेखन मराठी माहिती हा लेख आपण वाचल्यानंतर आपल्याला आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा.
माहिती आणि तंत्रज्ञान असणाऱ्या आजच्या डिजिटल युगात प्रसार माध्यमे व्यक्तीच्या खूप आले आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडलेली माहिती क्षणार्धात आपणापर्यंत प्रसार माध्यमाच्या मार्फत प्राप्त होते. आधुनिक युगात प्रसारमाध्यमांचा फार मोठ्या प्रमाणात माहिती प्राप्त करण्यासाठी उपयोग होताना दिसून येतो. प्रसार माध्यमाच्या अनेक साधना मार्फत जगात घडलेली माहिती त्वरित जगातील सर्व लोकांना माहितीस्तव प्राप्त होते.
आपण आपल्या घरबसल्या वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, इंटरनेट आणि भ्रमणध्वनी माध्यमातून अनेक बातम्या दररोज पाहतो. आपल्या दैनंदिन जीवनातील आपल्या सभोवतालच्या स्थानिक, प्रादेशिक, विभागीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील आणि जागतिक स्तरावरील सर्व प्रकारची माहिती मीडिया मार्फत प्राप्त होते. पण ही माहिती तयार करताना अगोदर बातमी लेखन कौशल्य प्राप्त झाल्याशिवाय बातमी लेखन करता येत नाही. तसेच शालेय स्तरावर सुद्धा अनेक परीक्षेसाठी सर्व भाषा विषयांमध्ये बातमी लेखन कौशल्य यावर आधारित प्रश्न विचारण्यात येतात. आलेल्या प्रश्नपत्रिकातील बातमी लेखन कौशल्या वर आधारित माहिती सोडवण्यासाठी उपयुक्त अशी माहिती या लेखा द्वारे बातमी लेखन कौशल्य कसे? विकसित करावेयासंदर्भात स्पष्टीकरण करणार आहोत.
News Writing Skill In Marathi Mahiti |
News Writing Skill In Marathi Mahiti(toc)
बातमी लेखन कौशल्य
बातमी लिहिणे ही एक कला आहे.विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही कला विद्यार्थ्यांनी हमखास व आवश्यक विकसित केल्यास परीक्षेतील या विषयावर आधारित असणारे प्रश्न विद्यार्थी हमखास पणे सोडू शकतो.
बातमी लेखन किंवा वृत्तांत बातमी लेखन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. आपल्या भारतातून प्रत्येक घटक राज्यातून दररोज अनेक वर्तमानपत्रे नियमित प्रकाशित होऊन आपल्यापर्यंत वाचण्यासाठी सकाळीच आलेले असते. पण या वृत्तपत्रातील किंवा वर्तमानपत्रातील बातमीचे लेखन कौशल्य असल्याशिवाय बातमी लिहिता येत नाही. वर्तमानपत्रा साठी किंवा इतर कोणत्याही माध्यमांसाठी बातमी लिहिणे ही एक आवश्यक अशी कला आहेत. यासाठी तर विद्यार्थ्यांना पदवी स्तरावर बातमी लेखन बाबत अनेक विद्यापीठातून बॅचलर ऑफ जर्नलिझम हा अभ्यासक्रम पण विकसित झालेला आहे. वृत्तपत्र क्षेत्रात कार्य वार्ताहरांना, पत्रकार आणि संपादक या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी आधुनिक युगात करिअरचा महत्त्वपूर्ण विषय ठरला आहे.'News Writing Skill In Marathi Mahiti 'या कारणास्तव विद्यार्थ्यांना बातमी लेखन कौशल्य या विषयावर आधारित माहिती आजच्या लेखातून पाहूया.
बातमीचे क्षेत्र
मित्रांनो, बातमी लिहिण्यासाठी पुष्कळ क्षेत्र असून त्या क्षेत्रात बातमीचे वर्णन जशास तसे आपल्या वृत्तांत लेखनातून करताना बातमी कोणत्या क्षेत्रातील आहे याची जाणीव होण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्या सर्व क्षेत्रात संबंधी सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. बातमी लेखन करण्यासाठी खालील प्रकारचे विविध प्रकारचे स्तर आहे. विविध स्तरा पैकी काही महत्त्वपूर्ण बातम्यांचे क्षेत्र खालील प्रमाणे पाहूया. सर्वसामान्यपणे बातम्यांचे क्षेत्र आठ आहे. या आठही क्षेत्रावर सविस्तर माहिती या लेखात पुढील प्रमाणे स्पष्टपणे नमूद केली आहे. तर जाणून घ्या ही संपूर्ण खालील क्षेत्राच्या संबंधातील माहिती.
१)दैनंदिन घटना क्षेत्रे
२)वैद्यकीय घटना क्षेत्रे
३)वाड्:मयीन घटना क्षेत्रे
४)सामाजिक घटना क्षेत्रे
५)शालेय , शैक्षणिक आणि क्रीडा घटना क्षेत्रे
६)राजकीय घटना क्षेत्रे
७)वैज्ञानिक घटना क्षेत्रे
८)संस्कृतिक घटना
वरील सर्व घटनेच्या बाबत सविस्तर माहिती या लेखात मित्रांनो पुढील प्रमाणे पाहू या.
दैनंदिन घटना क्षेत्रे
दररोज दैनिक असंख्य घटना खेड्या पासून तर गल्ली ते दिल्ली अनेक घटना घडतात. त्याचबरोबर जागतिक ही दैनंदिन घटना दररोज घडत असतात. या घटनेची माहिती आपणास मीडिया मार्फत प्राप्त होते. उदाहरणार्थ. समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल बस अपघात 28 जखमी तर जायबंदी. अशा स्वरूपाच्या ह्या घटना दररोज घडतात म्हणून या घटनेला दैनंदिन घडणारी घटना असे म्हणतात.
वैद्यकीय क्षेत्रातील घटना क्षेत्रे.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक घटना घडत असतात. त्या सर्व घटना वर्तमानपत्रा मार्फत किंवा निरनिराळ्या मीडिया मार्फत आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात किंवा आपण अशा घटना दूरदर्शन वाहिनीवर पहात असतो. ह्या सर्व घटना वैद्यकीय म्हणजेच मेडिकल क्षेत्रातील असतात. उदाहरणार्थ. कोरोना महामारी ने जग होरपळून निघाले. किंवा covid-19 लस फक्त भारतात उपलब्ध." देवीचा रोग दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा. "अशा स्वरूपाच्या बातम्या वैद्यकीय क्षेत्राशी संघटित असतात. या क्षेत्रातील विषयावर बातमी लेखन करणे.
वाड्:मयीन घटना क्षेत्र.
वाड्:मय हे जगातील विविध भाषेवर आधारित असणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये अनेक लेखक आणि कवी जगभर आपापल्या भाषेतून या क्षेत्रात माहिती लिहीत असतात. या क्षेत्रात नाविन्यपूर्ण माहिती लिहून पुरस्कार प्राप्त करण्याच्या संदर्भात जर एखादी बातमी प्रसिद्ध झाली तर त्या बातमीला वाड्: मयीन क्षेत्रातील बातमी असे म्हणतात. या स्वरूपाच्या ही बातम्या परीक्षेत येऊ शकतात.
"लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित." अशा स्वरूपाच्या बातम्या या विभागात येतात.
सामाजिक घटना क्षेत्रे.
सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे जगात अनेक व्यक्ती कार्य करत असतात. त्यांनी जगभर केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या संदर्भात बातमीचे लिखाण काम हे सामाजिक घटना क्षेत्रे या विभागात समाविष्ट करण्यात येतात. समाजातील संबंधाने असणाऱ्या अनेक बातम्या दररोज वर्तमानपत्रातून प्रकाशित होत असतात व त्या आपण वाचतो.News Writing Skill In Marathi Mahiti समाज क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या बातम्या समाजातील घटनेवर आधारित असतात.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला त्यांचा हक्क प्राप्त करून दिला म्हणून ही बातमी सामाजिक क्षेत्रातील असलेली बातमी आहे. ही बातमी सोप्या पद्धतीने पुढील प्रमाणे सांगता येईल.
"अस्पृश्य समाजाला दिला न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर."
शालेय व क्रीडा घटना क्षेत्रे
शालेय क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कार्य व उल्लेखनीय असलेले शैक्षणिक कार्य या संदर्भामध्ये शैक्षणिक हा विषय घेतला असतो. शाळा कॉलेज आणि महाविद्यालय तसेच विद्यापीठ यांच्या संदर्भातील असणाऱ्या बातम्या शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या असतात. तसेच क्रीडा क्षेत्रातील बातम्याही सुद्धा अशाच स्वरूपाच्या असतात. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संदर्भात किंवा क्रीडा विषयी यासंदर्भात माहिती बातमीच्या स्वरूपात लिहिताना क्रीडा क्षेत्राशी संबंधित बातमी असते. म्हणूनच क्रीडा आणि शालेय घटना क्षेत्रे या बातम्या विद्यार्थ्यांना विशेष करून परीक्षेत बातमी लेखन कौशल्याच्या अंतर्गत प्रश्नावर आधारित असतात.
" बारावी परीक्षा निकाल मे च्या शेवटच्या आठवड्यात लागणार"
"सचिन तेंडुलकर च्या बॅट ने ऑस्ट्रेलियाचे बॉलर धुतले."
राजकीय घटना क्षेत्रे
जगात सर्वात जास्त लोकांचा महत्त्वपूर्ण विषय राजकारण हा असतो. विशेष करून राजकारण क्षेत्रातील बातम्यांचे वर्णन मीडियाच्या मार्फत जनतेपर्यंत बातमीच्या द्वारे पोहोचवणारे राजकीय क्षेत्र असते. राजकारण लोकांना फार आवडते. राजकारणातील बातम्या लोक आवडीने वाचतात. राजकारणाशी संबंधित असणाऱ्या बातम्या राजकीय शीर्षकाखाली स्पष्ट केल्या जातात.
"2024 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान जाणून घ्या"
वैज्ञानिक बातम्या क्षेत्रे
वैज्ञानिक क्षेत्रात म्हणजेच विज्ञानावर आणि संशोधनावर जागतिक स्वरूपात वेगवेगळे दिवसेंदिवस संशोधन होत असतात. अशा संशोधनावर आधारित व विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य संदर्भामध्ये समाविष्ट होणाऱ्या बातम्या ह्या वैज्ञानिक बातम्या म्हणून मीडियाच्या मार्फत प्रसिद्ध होत असतात आणि आपण त्या मीडिया मार्फत वैज्ञानिक ज्ञान प्राप्त करत असतो.
" भारताने चंद्रावर ठेवले पहिले पाऊल"
संस्कृतिक बातमी घटना क्षेत्रे
जगाला आपापली संस्कृती लाभलेली असते. भारतालाही सुद्धा एक संस्कृती लाभलेली आहे. त्याचबरोबर भारतामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेक पदार्पण केली असून भारतीय सांस्कृतिक क्षेत्रात घडणाऱ्या बातम्या चा आढावा सांस्कृतिक बातम्या म्हणून समाविष्ट केल्या जातात. प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येणारे संपूर्ण भारतातील सांस्कृतिक कार्यक्रम हे सांस्कृतिक घटना संबंधित बातम्या समाविष्ट असते. प्रत्येक घटक राज्याची संस्कृती आणि सांस्कृतिक कार्यक्रम भारतात वेगवेगळे आहे. यावर आधारित बातमी लिखाण हे सांस्कृतिक शीर्षकाखाली लेखन बातमी रूपात केले जाते.
"मराठवाडा विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न"
बातमी लेखन कौशल्याचा उद्देश
स्वतःच्या ज्ञानात भर घालून आपल्या सभोवताली घडणाऱ्या अद्यावत घटनेबाबत माहिती मिळवणे आहेत. वरील आठ क्षेत्रा त घडलेल्या सर्व बाबतीत ज्ञान प्राप्ती व माहितीचे संकलन हाच मुख्य उद्देश असल्यामुळे वरील क्षेत्रे परिपूर्ण रीतीने या लेखातून आपण अभ्यासले आहे.
आपण आपल्या ज्ञानात या बातम्या द्वारे भर घालत असतो. बातम्यांच्या पाठीमागचा मुख्य उद्देश माहिती देणे, ज्ञान संपादन करणे, समाज प्रबोधन करणे, सद्यस्थितीत घडणाऱ्या दैनंदिन आणि राजकीय घडामोडी चे अद्यावत माहितीचे संकलन करणे हा बातमी लेखन मागील मुख्य उद्देश असतो. घडलेल्या घटनेतचे संपूर्ण नखशिकांत वर्णन बातम्या देण्याचा उद्देश असतो.
बातमी लेखन कौशल्याबाबत लेखन करताना उत्तम कौशल्य विकसित करणे."News Writing Skill In Marathi Mahiti " विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तसेच त्याच्या परीक्षेच्या दृष्टीने तयारी करण्याच्या उद्देशाने लेखन कौशल्य चा अभ्यास करणे गरजेचे आहे.
उत्तम बातमी लेखन कौशल्यासाठी महत्त्वपूर्ण गुण
१)बातमी ज्या विषयात लिहितो त्या विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.
२)भाषेतील व्याकरणावर प्रभुत्व मिळवलेले असणे आवश्यक आहे.
३) बातमी लेखन करताना सुटसुटीत व सोप्या शब्दात वाक्यरचना करणे आवश्यक आहे.
४) सखोल व समग्र वाचन गुण आत्मसात करणे.
६) बातमी लिखाण करण्याचे गुण आत्मसात करणे.
अगोदर घडलेल्या बातमी संदर्भात बाबी
अगोदर घडून गेलेल्या बाबीवर बातमी लिहिताना महत्वपूर्ण आवश्यक बाबी लक्षात असणे आवश्यक आहे.
यासंदर्भामध्ये खालील बाबी विद्यार्थी मित्रांनो बातमी लिहिताना चांगल्या लक्षात असू द्या.
१)घटनेमागील विश्वासाहर्ता असणे आवश्यक आहे.
२) बातमीचे तटस्थपणे लिखाण लिहिल्या गेलीच पाहिजे.
३) घटनेबाबत अचूक व योग्य तपशील तंतोतंत बरोबर देणे.
४/प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे अनिवार्य आहे
५) बातमीत स्वतःच्या मनाचा कोणताही विचार समाविष्ट होऊ देऊ नये. बातमी जशी घडली तशी लिहिणे.
बातमी लेखन कसे करावे?
मित्रांनो, बातमी लिखाण करताना सर्वसाधारणपणे पाच मुद्दे आपणास माहीत असणे आवश्यक आहे.
ब्लॉग पोस्ट लेख लिहिताना ब्लॉगर H1, H2, H 3, H 4 आणि H 5 Tags वापर करून ब्लॉक पोस्ट लिहितात त्याचप्रमाणे बातमी लिखाण कौशल्य तसेच आहे.
तर चला पाहूया यासंदर्भामध्ये बातमीचे लिखाण कसे करावे या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो येथे स्पष्ट करूया.
१) शीर्षक
२) दिनांक स्थळ व कालावधी
३) भूतकाळात लेखन
४) बातमीचा मथळा
५) बातमीचा शेवट
वरील पाच मुद्दे खालील प्रमाणे स्पष्ट करूया.
शीर्षक
बातमी लिहिताना बातमीचा माथळा संपूर्ण न लिहिता सर्व बातमीवर आधारित शीर्षका मध्ये शीर्षक वाचल्या बरोबर वाचकाला बातमीचा अर्थ समजला पाहिजे. नेमक्या अचूक परिपूर्ण शब्दात शीर्षक म्हणजे बातमीचा आरसा असतो. त्यामुळे वाचताना बातमीच्या शीर्षक वरून च बातमी कशा प्रकारची आहे याची संपूर्ण कल्पना ठळक शीर्षकावरून समजून येते. म्हणूनच वर्तमानपत्र वाचताना लोक अगोदर पेपर मधील सर्व शीर्षक वाचून घेतात नंतर सविस्तर पेपर वाचण्यास सुरुवात करतात. बातमीच्या अनुषंगाने योग्य शीर्षक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शीर्षक हे मोठ्या अक्षरात लिहिणे. यालाच आपण एच वन टॅग असे म्हणतो.
दिनांक स्थळ व कालावधी.
बातमी लिखाण करताना ज्या दिवशी घडली त्या दिवसाची दिनांक आणि जेथे घडली तेथील स्थळ किंवा वार्ताहर आणि जेथून प्रकाशित केली ते स्थळ तसेच बातमी मध्ये समाविष्ट असणाऱ्या व्यक्ती बाबत संपूर्ण अचूक माहिती एका ओळीत लिहिण्याचा च प्रयत्न करावा. याला आपण एस टू टॅग असे म्हणतो.
भूतकाळात लिखाण
आपल्या हाती दररोज सकाळी वाचण्यासाठी वर्तमानपत्र घेतो. त्याला आपण वर्तमानपत्र असे म्हणतो. मात्र त्यामध्ये घडलेल्या सर्व घटना या भूतकाळात घडलेल्या असतात परंतु वर्तमानपत्र आणि त्यातील बातमीचे संदर्भ वर्तमानकाळात भाषेचा वापर करून लिहिल्यामुळे बातमीचे लिखाण भूतकाळात असते आणि लिहिले असते पण वाचताना आपणास आता घडली आहेत आता घडत आहे अशाप्रकारे स्पष्ट संकल्पना दिसून येते. बातमी ही घडलेल्या सत्य घटनेवर आधारलेली असल्यामुळे ती भूतकाळात लिहिली गेली पाहिजे परंतु वाचताना वर्तमान काळात वास्तव आहे असा वाचकाला भास निर्माण झाला पाहिजे. याला आपण एच थ्री टॅग असे म्हणतो.
बातमीचा मथळा
बातमी लिहीत असताना येथे सविस्तर बातमी लिहिणे आवश्यक आहे. बातमी लिहिताना कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाही किंवा बातमी लिहिल्यानंतर जन समाजामध्ये त्या बातमी संदर्भ मध्ये संतापाची लाट ट उसळता कामा नये. समाजात तणाव निर्माण होणारे शब्दप्रयोग शक्यतो बातमी तून टाळावे. बातमी आहे व जशी घडली आहे तशीच त्याच संदर्भात सत्य वर्णन करणारी 50 ते 60 शब्दांमध्ये वर्णन करण्यात आलेले असावे.
बातमीचा शेवट.
बातमीच्या संदर्भातील सुरुवातीस घेतलेला महत्त्वाचा मुद्दा येथे सुरुवातीला नमूद करून त्यानंतर बातमीची तपशीलवार माहिती ज्या क्रमाने बातमी घडली आहेत त्या क्रमाने पुढे पुढे लिहित जाऊन शेवटी बातमीचा शेवट करावा. याला आपण पॅरेग्राफ असे म्हणतो किंवा एच 5H Tag असे म्हणतो.
उपरोक्त पद्धतीने बातमी लेखन कौशल्य विकसित झाल्यानंतर. परीक्षेत बातमी दिलेल्या विषयावर लेखन कशी करावी ? यासाठी एक बातमी नमुना उदाहरण म्हणून खालील प्रमाणे बातमी लेखन लिहूया आणि पाहूया.
परीक्षेत विचारलेला प्रश्न बातमी लेखन वर आधारित महाराष्ट्र बोर्ड मार्च 2019 ला आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे.
प्रश्न-15 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग अमरावती तर्फे आयोजित शालेय निबंध स्पर्धेत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला यावर आधारित एक बातमी तयार करा.
आदर्श नमुना बातमी
उत्तर-
आंतरशालीय निबंध स्पर्धेत पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटा संपन्न
दि. 16 डिसेंबर 2019,
अमरावती वार्ताहर-
दिनांक 15 डिसेंबर 2019 रोजी अमरावती येथील जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या अंतरशालीय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माननीय शिक्षण मंत्र्याच्या उपस्थित मोठ्या थाटात पार पडला.
माध्यमिक आणि प्राथमिक विभागातर्फे निबंध स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन्ही वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा सध्याच्या युगातील समस्या मांडणारे विद्यार्थी उपस्थित राहून आपापले त्यांनी मांडले.
अमरावती जिल्ह्यातील जवळपास शंभरहून अधिक शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने प्रतिसाद दिल्याबद्दल माननीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे कौतुक केले.
दरवर्षी अशा स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना त्यांचे मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल, अशी घाई त्यांनी उपस्थितांना दिली. माननीय शिक्षण मंत्र्याच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना मानचिन्ह व बक्षिसाची रोख रक्कम देऊन गौरविण्यात वण्यात आले. मुख्यमंत्र्याच्या भाषणानंतर आभार प्रदर्शन होऊन सभेची सांगता झाली.
वरील प्रमाणे बातमी लेखन कौशल्य विकसित केल्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो हमखास बातमी लेखन कौशल्य च्या आधारे परीक्षेतील बातमी लेखन या विषयावर चांगले गुण प्राप्त करू शकतात. म्हणूनच आजचा मुख्य विषय बातमी लेखन कौशल्यावर आधारित निवडण्यात आला आहे.
सारांश
बातमी लेखन कौशल्यावर आपण आपल्या महत्त्वाच्या विषयाच्या संबंधाने बातमी लेखन हा भाग विद्यार्थ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ही आजची खरी वस्तुस्थिती आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला बातमी लेखन करता येणे काळाची गरज आहे. बातमी लेखन कौशल्यातून मित्रांनो आपण वार्ताहर, पत्रकार आणि एखाद्या वेळी संपादकही होऊ शकता. आपले करियर घडवण्यासाठी बातमी लेखन कौशल्य आवश्यक शिका. मुख्य कारण म्हणजे आपल्या सभोवताली दररोज शेकडो घटना घडत असतात. घडलेल्या घटनेवर बातमी लिहिणे हे एक महत्वपूर्ण कौशल्य आहे. म्हणून वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे हे महत्त्वाचे कौशल्य ठरते हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी बातमी लेखन या घटकाचा अभ्यास क्रमांक सरकारने समावेश केला आहे. बातमी लेखन परीक्षेत 60 ते 90 शब्दात अपेक्षित आहे.
मित्रांनो या लेखाच्या संदर्भा ने आपण लेख वाचल्यानंतर लेखात काही त्रुटी आढळल्यास ब्लॉगरला ब्लॉग पोस्ट च्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आणि त्रुटी अवश्य कळवा. आपल्या त्रुटी बरोबर असल्या स ब्लॉगर लेखामध्ये त्वरित दुरुस्त करून हा लेख अद्यावत करण्यात येईल.
FAQ
1) बातमी लेखन करण्याच्या किती स्टेप आहे?
उत्तर बातमी लेखन करण्याच्या पाच स्टेप आहे.
2) आजच्या जीवनात मानवाचा अविभाज्य घटक कोणता आहे?
उत्तर-आजच्या जीवनात मानवाचा अविभाज्य घटक आहेत.
3) बातमी लेखनाचे किती क्षेत्रे आहेत?
उत्तर - बातमी लेखनाचे आठ क्षेत्रे आहे.
4) बातमी चा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे?
उत्तर-बातमी चा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बातमीचे 'शीर्षक' हा होय.
5) बातमीचे लिखाण कशाप्रकारे केले पाहिजे?
उत्तर-बातमीचे लिखाण तटस्थ प्रकारे केले पाहिजे. वस्तुस्थिती व पारदर्शक पणा बातमी देणे आवश्यक आहे. स्वतःच्या मनाचे कोणतेही शब्द बातमी वृत्त लिखाण करताना लिहू नये. याची दक्षता घ्यावी.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख वाचा.
अधिक माहितीसाठी आपण आमच्या ॲक्टिव्ह एज्युकेशन youtube व्हिडिओ आवश्यक पहा.