Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत मराठी माहिती | Gram Panchayat Marathi Mahiti

ग्रामपंचायत मराठी माहिती | Gram Panchayat Marathi Mahiti 



Gram Panchayat Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण ग्रामपंचायत मराठी माहिती  Gram Panchayat Marathi Mahiti यासंदर्भात पंचायत राज स्तरावरील त्रिस्तरीय योजनेतील सर्वात शेवटच्या स्तरावर कार्यरत असलेल्या पंचायत राज मधील खेडेगावात स्थापन करण्यात आलेल्या ग्रामपंचायत बाबत माहिती या लेखातून पाहूया. ही माहिती आपणास वाचन केल्यानंतर आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी हा लेख आवश्यक शेअर करावा. 


मित्रांनो, पंचायत राज मधील निम्न स्तरावर किंवा तिसऱ्या पातळीवर कार्यरत  घटकाबाबत महत्त्वाचा घटक म्हणजे ग्रामपंचायत होय. या लेखातून ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती असल्यामुळे आपल्या माहितीस्तव हा लेख ब्लोगर ने ब्लॉग पोस्ट साठी नाविन्यपूर्ण लेख लिहिण्यासाठी अथवा अभ्यास करण्यासाठी हाती घेतला आहे.Gram Panchayat Marathi Mahit


ग्रामपंचायत यासाठी शासनाने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1958 ला अस्तित्वात आणला. या अधिनियमा अगोदर महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यापूर्वीच खेडे विभागात ग्रामपंचायत स्थानिक पातळीवर आधीच अस्तित्वात होत्या. परंतु विशिष्ट नियमानुसार ग्रामपंचायत कार्यरत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, 1958 मधील कलम क्रमांक पाच नुसार तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 40 नुसार खेडे विभागात खेड्याचा विकास करण्यासाठी महाराष्ट्रात ग्राम पंचायत नियमानुसार 'Gram Panchayat Marathi Mahiti' अस्तित्वात आणल्या आहेत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 हा महाराष्ट्र राज्यात खऱ्या अर्थाने एक जून 1959 पासून लागू करण्यात आला आहेत. या अधिनियमानुसार खेड्यात खेड्याचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यानंतर जर नवीन ग्रामपंचायत स्थापन करायची असल्यास ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी विभागीय पातळीवरील विभाग आयुक्तांना हे अधिकार कायद्याने प्राप्त करून दिले आहेत.Gram Panchayat Marathi Mahit


Gram Panchayat Marathi Mahiti
Gram Panchayat Marathi Mahiti 



 Gram Panchayat Marathi Mahit

महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतच्या बाबत असणारी महत्त्वाची व कामाची माहिती आज ग्रामपंचायत मराठी माहिती या शीर्षकाखाली ब्लॉगर ब्लॉक पोस्ट साठी लेख लिहिण्यासाठी हाती घेतला असून ग्रामपंचायत च्या संदर्भात सविस्तर माहितीचे स्पष्टीकरण या लेखात पुढील प्रमाणे स्पष्टपणे नमूद केले आहे.Gram Panchayat Marathi Mahit

ग्रामपंचायत ची रचना 

ग्रामपंचायत खेडे विभागात  लोकसंख्या च्या प्रमाणावर रचना आधारित आहे.खेडेगावातील लोकसंख्या 600 असेल तर तेथे एक ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली आहे. खेडेगाव ची लोकसंख्या 600 लोकसंख्येपेक्षा कमी असेल तर जवळपासचे दोन-तीन खेडे एकत्र करून त्या खेड्या गावाची लोकसंख्या 600 पर्यंत पूर्ण करून गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते. महाराष्ट्रात आदिवासी विभागामध्ये लोकसंख्या कमी असणाऱ्या ठिकाणी अनेक गट ग्रामपंचायत स्थापन करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी लोकसंख्या चे प्रमाण 300 ठेवण्यात आले आहे. डोंगरी भागामध्ये 300 लोकसंख्या असणाऱ्या गावा त एक ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते. Gram Panchayat Marathi Mahit


ग्रामपंचायत सदस्य संख्या 


मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 19 58 नुसार ग्रामपंचायत सदस्याची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. Gram Panchayat Marathi Mahit


1)कमीत कमी लहानात लहान ग्रामपंचायत मध्ये किमान 07 सदस्य व जास्तीत जास्त 07 सदस्य संख्या ग्रामपंचायत साठी निर्धारित केली आहे. 

ग्रामपंचायत मधील सदस्य संख्या ही गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित करण्यात आली आहे.


2) गावची लोकसंख्या 600 ते1500 असणाऱ्या गावच्या ग्रामपंचायत ची सदस्य संख्या सात सदस्य निश्चित करण्यात आलेली आहे. 


3) गावची लोकसंख्या 1501 ते 3000 पर्यंत असेल तर त्या ग्रामपंचायत साठी नऊ सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.


4) गावची लोकसंख्या 3001 ते 4500 पर्यंत असेल तर त्या ग्रामपंचायत साठी 11 सदस्य निश्चित करण्यात आले आहे.


5) गावची लोकसंख्या 4501 ते 6000 पर्यंत असेल तर तेथे त्या ग्रामपंचायत साठी 13 सदस्य निश्चित करण्यात आले आहे.


6) ज्या गावची लोकसंख्या 6001 ते 7500 पर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावातील ग्रामपंचायत साठी सदस्य संख्या 15 निश्चित करण्यात आली आहे. 


6) ज्या गावची लोकसंख्या 7501 ते त्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी ग्रामपंचायत ची सदस्य संख्या 17 निश्चित केलेली आहेत


7) महाराष्ट्रातील डोंगरी भागातील गावाची लोकसंख्या 300 ते 15 00 पर्यंत असेल त्या डोंगरी भागामध्ये सदस्य संख्या 07 निश्चित करण्यात आली आहे.

8) ग्रामपंचायत सदस्यांना पंच म्हणून समजण्यात येते. आपण ग्रामपंचायतचे सदस्य असे म्हणतो. तेच सदस्य पंच म्हणून ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असतात. 


8) खेडेगावात वार्ड घोषित करण्याचे अधिकार तहसीलदारास प्रदान करण्यात आले असल्यामुळे ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार घोषित करतो.


आरक्षण पद्धत 

ग्रामपंचायत मध्ये सदस्यांची प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने निवड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सदस्यांची निवड आरक्षण पद्धतीने ठरवण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय घेतलेला आहे. ग्रामपंचायत मध्ये सदस्यांसाठी राखीव जागा निर्धारित केल्या आहेत.Gram Panchayat Marathi Mahit

महिलांसाठी आरक्षण 

ग्रामपंचायत मध्ये महिलांना एकूण सदस्या पैकी 50% आरक्षण महिला प्रवर्गासाठी निश्चित केले आहे. 

अनुसूचित जाती - जमातीसाठी आरक्षण 

निवडणूक आयोगाने अनुसूचित जाती जमाती साठी आरक्षण काही जागांसाठी निश्चित केले आहे. ज्या गावांमध्ये अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या इतर समाजापेक्षा जास्त आहे तेथे हे आरक्षण अनुसूचित जाती जमातीसाठी निर्धारित केले आहे. Gram Panchayat Marathi Mahit

 मागास प्रवर्गासाठी आरक्षण 

एकूण सदस्यांच्या संख्येपैकी मागासवप्रवर्गासाठी 27% आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. 27% जागेवर मागासव प्रवर्गातील सदस्यांची निवड केली जाते. Gram Panchayat Marathi Mahit

 मागास महिलासाठी आरक्षण 

महिलांच्या एकूण 50 टक्के जागा राखीव असल्याने या राखीव जागेमध्ये अनुसूचित जाती जमाती व मागासवप्रवर्गाच्या महिलांसाठी असलेल्या सदस्यामध्ये देखील एकूण 50 टक्के पैकी 50 टक्के जागा राखीवठेवल्या जातात.Gram Panchayat Marathi Mahiti 50% आरक्षण भागिले दोन म्हणजेच पंचवीस टक्के आरक्षण होय.25%+25%=50% आरक्षण होय.

5) इतर 50% जागा खुल्या प्रवर्गासाठी निर्धारित करण्यात आलेल्या आहेत.Gram Panchayat Marathi Mahit

ग्रामपंचायत कार्यकाल. 

1)ग्रामपंचायत चा कार्यकाल सर्वसाधारणपणे पाच वर्ष निश्चित केलेला आहे. ग्रामपंचायत चा कार्यकाल पाच वर्षाचा असतो. 

2)ग्रामपंचायत चा हा कार्यकाल ग्रामपंचायत सदस्यांच्या पहिल्या मीटिंग पासून गणना जातो. 

3)एखाद्या वेळी अपवादात्मक परिस्थितीमध्ये ग्रामपंचायतचा कार्यकाल कमी किंवा जास्त होऊ शकतो. एक ग्रामपंचायत किंवा अधिक ग्रामपंचायत साठी एकाच वेळी ही आधी सूचना कार्यकाल वाढवण्याबाबत घोषित केली जाते किंवा कार्यकाल कमी करण्याबाबतची घोषणा अधिकृत घोषणा केली जाते. 

4) ग्रामपंचायत चा कालावधी जास्तीत जास्त साडेपाच वर्षापेक्षा जास्त होता कामा नये अशी एक महत्वपूर्ण अट आहे. Gram Panchayat Marathi Mahit


निवडणूक पद्धत 

1)ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक प्रत्यक्ष मतदान पद्धतीने होते.

2) प्रौढ मतदान पद्धतीचा वापर करण्यात येतो. 

3) प्रौढ मतदान पद्धतीमध्ये मतदान करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असलेल्या मतदारांना मतदान यादीत नाव असेल तर मतदान करता येते. यालाच प्रौढ मतदान पद्धत असे म्हणतात.

4) ग्रामपंचायत निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने होते. गुप्त मतदान पद्धतीमध्ये मतदाराने कोणत्या सदस्याला मत दिले आहे. हे कोणत्याही प्रकारे न समजणाऱ्या पद्धतीला गुप्त मतदान पद्धत असे म्हणतात.

5) ग्रामपंचायत साठी निवडणूक पद्धतीमध्ये ज्या सदस्यांना निवडणुकीत उमेदवारी प्राप्त करण्यासाठी त्याचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

6) ग्रामपंचायतच्या निवडणुकीतून निवडून आलेल्या सदस्यामधून एकाची निवड सरपंच म्हणून केली जाते तर एका सदस्याची निवड उपसरपंच म्हणून केली जाते. तेथेही गुप्त मतदान पद्धतच वापरली जाते. 

शासनाने दिनांक 14 जुलै 2022 च्या निर्णयानुसार मध्यंतरी प्रत्यक्ष संपूर्ण गावातून थेट मतदान घेऊन सरपंचाची निवड करण्याची पद्धत अस्तित्वात आणली होती. आता ती पद्धत बंद करण्यात आली आहे. आता दिनांक 5 फेब्रुवारी 2020 च्या रोजीच्या जुन्या शासन निर्णयाप्रमाणे सरपंच यांची निवड सदस्यांच्या बहुमताने होत असते. महाविकास आघाडीने जुन्या शासन निर्णयाप्रमाणे सरपंचाची निवडणूक करण्याचे विधेयक मंत्रिमंडळात मंजूर करून जुन्या पद्धतीने सरपंचाची निवड सदस्या मधून होते.Gram Panchayat Marathi Mahit

7) ग्रामपंचायत मधील सदस्य निवडीसाठी बहुमत पद्धतीचा वापर केला जातो. ज्या सदस्याला सर्वात जास्त मते प्राप्त होतील त्या सदस्याला त्या वार्डातून निवडून आल्याचे घोषित निवडणूक अधिकारी मार्फत घोषणा करून होते. 

9) ग्रामपंचायत च्या वार्डामधून किती लोक निवडून देणे अपेक्षित आहे ही संख्या तहसीलदार मार्फत निश्चित केली जाते. कमीत कमी दोन सदस्य एका वार्डातून बहुमत पद्धतीने निवडून येऊ शकतात. मोठ्या ग्रामपंचायत मध्ये जास्तीत जास्त एका वर्गातून तीन किंवा चार सदस्य ग्रामपंचायत वर निवडून पाठवले जातात..Gram Panchayat Marathi Mahit

ग्रामपंचायत  कार्य व अधिकार 

मित्रांनो,पंचायत राज संकल्पनेमधून खेड्याचा विकास करण्यासाठी पंचायत राज्यामध्ये त्रिस्तरीय योजना मध्ये ग्रामपंचायत ही खालच्या स्तरावर स्थापन करण्यात आली आहे. खेड्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ग्रामपंचायत महत्त्वपूर्ण खालील प्रमाणे कार्य करत असते. " Gram Panchayat Marathi Mahiti " ग्रामपंचायत चे कार्य या लेखात स्पष्टपणे खालील प्रमाणे नमूद करण्यात येत आहे. 

१) खेडे विभागातील लोकांच्या मूलभूत सेवा पूर्ण करणे. 

२) खेड्यात वाहतुकीची व्यवस्था व्यवस्थित तयार करून देणे. 

३) खेड्यातील लोकांची स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पूर्ण करणे. 

४) शासन स्तरावर आलेल्या अनेक योजना ग्रामपंचायत विभागामार्फत राबवणे.

५) शेतकऱ्यांच्या कृषी संदर्भातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या गरजा लक्षात घेऊन त्या गरजा शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणे.

६) खेडेगावात पक्के रस्ते बांधकाम करणे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांचे बांधकाम पूर्ण करणे.

७) खेड्यामध्ये सर्व रस्त्या रस्त्यावर इलेक्ट्रिक पोल बसून विद्युत व्यवस्थेच्या मार्फत किंवा सौर ऊर्जा च्या मार्फत रस्त्यावरील दिवाबत्तीच्या व्यवस्था पूर्ण करणे.

८) खेड्यात जन्मलेल्या, मृत्यू पावलेल्या व विवाह संबंधी असणाऱ्या अद्यावत नोंदी पूर्ण करून ठेवणे. जन्ममृत्यूची नोंद ही अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतवर आहेत. 

९) गावातील सार्वजनिक स्थळाची स्वच्छता नियमित ठेवण्याचे कार्य ग्रामपंचायत ने पूर्ण करणे.

१०) खेड्यातील सांडपाण्याची व्यवस्था लावणे. 

११)लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची भरपूर प्रमाणात व्यवस्था करणे. 

१२)ग्राम पातळीवरील निर्माण झालेल्या तक्रारी मध्यस्थ स्वरूपात ग्रामपंचायतीवरच सोडवणे. 

१३)खेड्यातील मुलांना योग्य शिक्षणाची व्यवस्था निर्माण करून देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करून योग्य प्रकारचे शिक्षण विषयक कार्य पूर्ण करणे. म्हणजेच शिक्षण सुख सोयी गावात निर्माण करणे. 

१४)गावातील लोकांसाठी आरोग्यविषयक सवलती शासन स्तरावरून प्राप्त करून देणे. 

१५)शासनाकडून प्राप्त झालेला निधी ज्या कामासाठी ग्रामपंचायत यांना दिला आहेत त्याच लेखाखर्ची घालून ते कार्य पूर्ण करणे. 

१६)गावाच्या आर्थिक व सांस्कृतिक विकासाला पाठिंबा देणे.

१७) गावातील घरपट्टी नळपट्टी आणि दिवाबत्ती कर वसूल करून शासन खात्यात जमा करून खेड्याच्या विकासासाठी खर्च करणे.

१८) शासन व गाव यांच्यामधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ग्रामपंचायत ने आपले कार्य पूर्ण करणे.

१९) गावातील शासकीय कामात शासकीय अधिकारी कामासाठी गावात आल्यास त्यांना योग्य सहकार्य करणे

२०) निवडणूक कार्यात सरकारला सहाय्य करणे. 

२१) ग्रामपंचायत मध्ये असलेल्या विविध समित्यांचे संपूर्ण कामकाज शासकीय नियमाप्रमाणे पूर्ण करणे. 

२२) गावातील प्रश्न सोडवण्यासाठी दर महिन्याला ग्रामसभा आयोजित करणे.

२३) शासनाचा प्रमुख घटक खेड्यातील ग्रामसेवक यांना ग्रामपंचायती कामामध्ये सहकार्य करून गावाचा विकास घडवून आणणे. 

२४) गावात निर्माण झालेल्या समस्येवर गावपातळीवरच निर्णय घेऊन समस्यांचे निराकरण करणे. 

२५) ग्रामपंचायत सदस्यांची दर महिन्याला मीटिंग बोलावून विकासात्मक कामाच्या संदर्भामध्ये योग्य प्रकारचे ठराव घेऊन ठराव रजिस्टर व सभेचा अजेंडा पूर्ण करणे. 

२६) शासकीय जागेवर गावातील लोकांनी अतिक्रमण केले असल्यास ते अतिक्रम हटवण्याचे कार्य शासनाच्या मदतीने पूर्ण करणे. या अगोदर आपल्या वरच्या स्तरावरील पंचायत राज संस्थेला ही माहिती अद्यावतरित्या कळविणे.Gram Panchayat Marathi Mahit


ग्रामपंचायत माहिती अधिकारी. 

ग्रामपंचायत मध्ये माहिती अधिकारी म्हणून ग्रामसेवक यांच्याकडे हे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. माहिती अधिकाराच्या संदर्भातील सर्व माहिती ग्रामसेवकाला देणे बंधनकारक आहे..माहिती अधिकार नियम 2005 पासून माहितीचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकारी व अपील अधिकारी म्हणून कोणाकडे तरी कार्य सोपवण्यात आलेले असते. ज्या अधिकाऱ्याकडे हे कार्य दिले असेल त्या अधिकाऱ्याने त्या संदर्भात माहितीच्या अधिकारात जी माहिती देणे आवश्यक आहे तीच माहिती देणे याची खात्री करून माहिती अधिकाराचा वापर करावाGram Panchayat Marathi Mahit


महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये माहिती अधिकाऱ्यांची ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार्टी लावणे बंधनकारक आहे. गाव पातळीवर ग्रामपंचायत मध्ये माहिती अधिकारी म्हणून ग्रामसेवक असून यांच्याकडे माहिती अधिकाऱ्यांची कार्य दिले आहे.. आलेल्या माहितीच्या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊन माहिती अधिकारात आलेल्या अर्जाच्या संदर्भात संबंधिताला शासन निर्णयाप्रमाणे  आठ दिवसाच्या आत माहिती देणे बंधनकारक आहेत.Gram Panchayat Marathi Mahit जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत आलेल्या माहिती अधिकाराच्या संदर्भामध्ये संबंधितांना माहिती देणे बंधनकारक आहे. जर ग्रामसेवक यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती दिली नसल्यास त्यावर माहिती मागवणाऱ्याला अपील करता येते.


आपली अधिकारी पंचायत समितीतील विस्तार अधिकारी 


ग्रामपंचायत च्या माहिती अधिकाराच्या संदर्भात माहिती देण्यास ग्रामसेवक यांनी टाळाटाळ केल्यास. माहिती मागवणाऱ्या व्यक्तीला पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकाऱ्याकडे अपील करता येते.ग्रामपंचायत मध्ये आपली अधिकारी म्हणून पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी हा अपिली अधिकारी असतो. त्यांच्याकडे आपली अर्ज दाखल करता येतो. माहिती मागवण्यासाठी शासनाने ठराविक नमुन्यात अर्ज उपलब्ध करून दिले आहेत त्याच ठराविक नमुन्यामध्ये माहिती मागणी आवश्यक आहे.Gram Panchayat Marathi Mahit


ग्रामपंचायतचे दप्तर 

महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत साठी 11 नमुन्यातील सर्व फार्म सही दप्तर अद्यावत ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायत ची आहेत. या दप्तरामध्ये विविध प्रकारचे नागरिकांसाठी लागणारे अर्ज नमुने आणि प्रमाणपत्रे नमुने सविस्तरपणे देण्यात आले असून. ग्रामपंचायत मधील असणाऱ्या विविध समित्यांचे बैठक बैठकीचे इतिवृत्तान्त ठराव रजिस्टर व सभेचा अजिंठा अद्यावत ठेवण्याचे कार्य ग्रामपंचायत ला पूर्ण करावी लागते. म्हणूनच शासनाने ग्रामपंचायत साठी 11 ठराविक नमुन्याचे दप्तर व्यवस्थित रित्या तयार करून दिले आहेत.Gram Panchayat Marathi Mahit

 दप्तरांमध्ये सर्व प्रकारचे फॉर्म आणि ठराव दिसते उपलब्ध करून दिली आहेत. त्याच नमुन्यात सरपंच आणि ग्रामसेवक यांनी अद्यावत माहिती ठेवणे गरजेचे आहे. सरकारकडून येणाऱ्या सर्व योजनेबाबतची ग्रामपातळीवरची माहिती सरपंचापर्यंत ग्रामसेवकामार्फत पोहोचवण्यात येते आणि ती योजना ग्रामपंचायत खेड्याच्या विकासासाठी उपलब्ध निधीच्या आधारे विकास करीत असते.Gram Panchayat Marathi Mahit


 ग्रामपंचायत कडून विविध लेखा खर्ची विभागामार्फत अनुदान देण्यात येत आहेत. दिलेल्या अनुदानाचा खर्च व विवरण यांचे अद्यावत माहितीसह ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी ऑडिट करून घेणे आवश्यक आहे. एक मार्च ते 30 एप्रिल या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतने केलेल्या कार्याचा व निधीचा वापर शासनापर्यंत पाठवून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. Gram Panchayat Marathi Mahit

सारांश 

मित्रांनो आज या लेखांमध्ये आपण ग्रामपंचायत म्हणजे काय. ग्रामपंचायत स्तरावरील सर्व प्रकारची ग्रामपंचायत बाबतची संपूर्ण माहिती या लेखात स्पष्टपणे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या माहितीमध्ये ग्रामपंचायतची निवडणूक पद्धत, ग्रामपंचायत ची रचना, ग्रामपंचायत ची कार्य स्पष्टपणे नमूद केली आहे. ग्रामपंचायत मधील सदस्यांचे आरक्षण पद्धत, ग्रामपंचायत चा कार्यकाल आणि ग्रामपंचायत च्या निधी बाबत सविस्तर चर्चा या लेखातून करण्यात आली आहे ग्रामपंचायतला केंद्र सरकारकडून 60 टक्के तर राज्य सरकारकडून चाळीस टक्के अनुदान वेगवेगळ्या कामांसाठी देण्याची पद्धत शासनाने महाराष्ट्रात 20 फेब्रुवारी 2019 पासून ही योजना लागू केली आहेत या योजनेच्या अंतर्गत गावाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत वर सोपवण्यात आली आहे.Gram Panchayat Marathi Mahit

मित्रांनो या संबंधांमध्ये या लेखाच्या बाबतीत आपणास काही तांत्रिक अडचण आली अथवा आपणास त्रुटी आढळून आल्यास ब्लोगरला या ब्लॉग पोस्ट च्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या सूचना तक्रारी आणि प्रतिक्रिया त्याच बरोबर त्रुटी कळवा. आपण दिलेली माहिती योग्य असल्यास ब्लोगरमार्फत या लेखा त्वरित अद्यावत सुधारणा करून पुन्हा लेख प्रकाशित करण्यात येईल.Gram Panchayat Marathi Mahit

FAQ

1) डोंगरी भागामध्ये किती लोकसंख्या वर ग्रामपंचायत निर्मिती केली जाते?

उत्तर-300 लोकसंख्या पूर्ण होणाऱ्या डोंगरी भागासाठी एक ग्रामपंचायत अस्तित्वात येते किंवा निर्माण केली जाते.

2) गट ग्रामपंचायत म्हणजे काय?

उत्तर-ज्या गावची लोकसंख्या 600 पूर्ण होत नसेल त्या गावांमध्ये आजूबाजूच्या दोन-तीन गावाची लोकसंख्या एकत्र करून दोन ते तीन खेड्यासाठी एक ग्रामपंचायत निर्माण केली जाते त्या ग्रामपंचायतीला गट ग्रामपंचायत असे म्हणतात.

3) ग्रामपंचायत मध्ये माहिती अधिकारी कोण असतो?

उत्तर-ग्रामपंचायत मध्ये माहिती अधिकारी म्हणून ग्रामसेवक हे काम पाहतो.

4) ग्रामपंचायत सदस्यांची वयाची अट सांगा? 

उत्तर-21 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे.

5) लहानात लहान ग्रामपंचायत मध्ये एकूण कमीत कमी किती सदस्य असतात? 

उत्तर-लहानात लहान ग्रामपंचायत मध्ये सात सदस्य कमीत कमी असतात. 


अधिक माहितीसाठी आपण आमचा खालील लेख आवश्यक वाचा. 


सरपंच मराठी माहिती 


अधिक माहितीसाठी आपण आमचा ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनेल चा व्हिडिओ वेळ मिळाल्यास आवश्यक पहा.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.