लेखन कौशल्य मराठी माहिती | Writing Skill In Marathi Mahiti
प्रस्तावना
Writing Skill In Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण आपल्या या ब्लॉग पोस्ट लेखासाठी लेखन कौशल्य मराठी माहिती या विषयावर माहिती पाहूया लेखन कौशल्य यावर आधारित आपणास हा लेख आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर करावा . शैक्षणिक जीवनातील संपूर्ण आयुष्यभर विद्यार्थी आपला 80 टक्के माहिती ऐकणे व माहितीचे वाचन करण्यासाठी खर्च करतात. 80 टक्के वेळ खर्च केल्यामुळे लेखनासाठी विद्यार्थ्याजवळ फक्त 20 टक्के वेळ लेखन कौशल्यासाठी उपलब्ध असतो. लेखन कौशल्यासाठी कमी मिळाल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांचे लिखाणाकडे दुर्लक्ष होते म्हणून ब्लॉगर ने या ब्लॉग पोस्ट लेखाच्या मार्फत लेखन कौशल्य बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मित्रांनो, विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांना विविध वर्गातील तसेच अनेक स्पर्धा परीक्षे साठी लिखाण कौशल्य असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची लिहिलेली उत्तर पत्रिका सर्वसामान्यपणे लेखन कौशल्यावर आधारित असते. वर्षभर विद्यार्थी ऐकणे आणि वाचणे यातच भरपूर वेळ खर्च करतात. त्याचा परिणाम परीक्षेत लिखाण कौशल्य विकसित न झाल्यामुळे रहात नाही.
मित्रांनो, जगातील अनेक महापुरुषाने जगाचा इतिहास आणि भूगोल हा तलवारी च्या साह्याने बदलला आहे. त्याकाळी देश पारतंत्र्यात असल्यामुळे तलवारीच्या साह्याने स्वातंत्र्य प्राप्त केले असले तरी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी परदेशात जाऊन अनेक महापुरुषाने लेखणीच्या साह्याने अभ्यास करून जग बदलण्यास त्याकाळी सुरुवात केली. आता आपणास 21 व्या शतकात लेखणीने लेखन कौशल्याच्या सहाय्याने यशस्वी जीवनाचा इतिहास घडवायचा आहे. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला ज्ञान आणि अनुभव हे आपल्या लेखनातून अभिव्यक्त करण्याची गरज आहे.
Writing Skill In Marathi Mahiti(toc)
लेखन कौशल्य म्हणजे काय?
आपल्या मनातील महत्त्वपूर्ण विचार व आपली जाणीवपूर्वक व्यक्त केलेली मते इतर व्यक्तींना सुलभतेने समजतील अशा समर्पक शब्दात लिहिलेली माहिती म्हणजेच लेखन कौशल्य होय.
लेखन कौशल्य मराठी माहिती
मित्रांनो, लेखन कौशल्य मराठी माहिती 'Writing Skill In Marathi Mahiti' या सदराच्या अंतर्गत समाजातील सर्व व्यक्तीचे आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी व लेखन कौशल्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती स्पष्टपणे या लेखामार्फत नमूद करण्यात आली असून ही माहिती विद्यार्थ्याच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी तसेच परीक्षा मध्ये लेखन कौशल्य या घटकाच्या माध्यमातून उत्तर पत्रिका लिखाणाबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहूया.
लेखन कौशल्य विकसित करण्याचे उपाय किंवा घटक
विद्यार्थ्याचे लेखन कौशल्य सुधारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपाय पैकी खालील महत्वपूर्ण उपायाच्या संदर्भात माहितीचा अभ्यास करणार आहोत.
पूर्वतयारी
विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली पूर्वतयारी म्हणून लेखन कौशल्य विकसित करण्याच्या अगोदर काही कौशल्य हे विकसित केलेले असते. ते विकसित केलेले कौशल्य म्हणजे श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य आणि निरीक्षण कौशल्य होय. या वाचनातून ऐकण्यातून आणि आपल्या निरीक्षण शक्तीच्या ज्ञानातून आपण ज्ञान व माहिती भरपूर प्रमाणात प्राप्त करत असतो. पण ही माहिती लिखित स्वरूपाची नसते. ही माहिती वाचनातून ,श्रवणातून आणि निरीक्षणातून आत्मसात केलेली असते. आपल्या जवळील ज्ञानाचा साठा प्रभावी लेखनात करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुबलक प्रमाणात माहितीचा साठा अगोदर विकसित करणे गरजेचे आहे. माहितीचा साठा भरपूर असेल तर चांगल्या प्रकारचे लेखन कौशल्य विकसित करता येते.
लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यां जवळ विविध प्रकारचे आणि विविध स्वरूपाचे शब्द संग्रह, विविध अर्थाचे वाक्प्रचार, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द यांचा संग्रह तयार करून अगोदर ठेवा. आपल्या जवळील आपण प्राप्त केलेल्या माहितीच्या साठ्यावर अर्थपूर्ण लेखन करू शकता.लेखन कौशल्य विकसित करण्याची ही आवश्यक असणारी पूर्वतयारी अगोदर करून ठेवावे.
लिहिण्याचे साधन व जागा
लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांनी लिहिण्यासाठी जागेची निवड करावी. लेखन करण्यासाठी आपण निवडलेली जागा न घालणारी असावी. ज्या खुर्चीवर किंवा बेंचवर बसून आपण माहिती लिहिणार आहोत त्या संदर्भात बेंच व खुर्ची कोणत्याही परिस्थितीत न घालणाऱ्या ठिकाणी आपल्या अभ्यास खोलीत ठेवावी
लिहिण्यासाठी चांगल्या प्रकारची नोटबुक किंवा चांगला कागदाचा संग्रह प्रथम जवळ घ्या. लिहिण्यासाठी आपण वापर करत असणारा पेन किंवा पेन्सिल उत्तम चालणारी चांगल्या दर्जाची असावी लागते. लिहिण्यासाठी हातात पेन पकडण्याची उत्तम पद्धत अगोदर प्राप्त करून घ्या किंवा शिकून घ्या. पेन हातात धरताना अत्यंत जवळच्या टोकाजवळ किंवा अगदी मध्यभागी पेन धरू नका. पेन धरण्यासाठी व्यवस्थित असणाऱ्या ठिकाणीच पेन आपल्या हातात धरावा. पेन धरण्याची सवय आणि सराव करून घ्या. पेन धरताना पेनाच्या टोकापासून सर्वसाधारणपणे दीड ते तीन सेंटीमीटर अंतरावर पेन हातात धरून सराव करा.
लेखनाचा सराव करण्यासाठी वही किंवा कागद तिरप्या स्वरूपात धरू नका. आपली मान जास्त वाकडी करून लिखाण काम करण्याची सवय लावू नका. व्यवस्थित समोर वही किंवा नोट्स वही ठेवून ताठ मानेने लिखाण काम करण्यास सुरुवात करा.
सुंदर हस्ताक्षर
विद्यार्थी मित्रांनो, सुंदर हस्ताक्षर म्हणजे आपल्या परीक्षेतील अर्धे यश प्राप्त करणे होय. सुंदर हस्ताक्षर काढण्याची सवय करून घ्या. सुंदर हस्ताक्षर म्हणजे अगदी मोत्यासारखे अक्षर असेलच असे नव्हे. सुंदर हस्ताक्षर येथे अपेक्षित असे आहे की, आपण केलेले लिखाण दुसऱ्या व्यक्तीस वाचनीय असावे. त्याला ते बरोबर योग्य स्वरूपात वाचता येणे सारखे अक्षर म्हणजे सुंदर हस्ताक्षर असे म्हटले तरी काही वावगे होणार नाही.
आपल्या मनातील विचार कितीही चांगले असेल तसेच प्रश्नाचे उत्तर अचूक पाठ असेल तर ते योग्यच आहे. पण हे विचार आणि उत्तर येत असूनही सुद्धा हस्ताक्षर वाचकाला वाचता आले नाही तर त्या आपल्या चांगल्या विचाराची किंवा उत्तराची किमया शून्य होते. म्हणूनच वाचकाला वाचता येईल अशा स्वरूपात सुंदर अक्षर काढण्याची सवय करा. मराठी विषयांमध्ये सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी दोन रेषीय वहीचा वापर करा तर इंग्रजी विषयाचे लेखन काम करण्यासाठी चार रेषीय वहीचा वापर करा. हा वापर सुरुवातीच्या प्राथमिक व पूर्व प्राथमिक वर्गामध्येच सराव पूर्ण करून घ्यासुंदर हस्ताक्षर याबाबत एक वेगळा मुद्दा घेऊन त्या विषयावर माहिती या लेखातून स्पष्टपणे पुढे नमूद करणारच आहोत.
जलद लेखन
विद्यार्थी मित्रांनो, जलद लेखनाचा सराव दररोज नियमित कमीत कमी एक तरी तास करावा. या पाठीमागचा मुख्य हेतू असा आहे की, परीक्षेमध्ये उत्तर पत्रिका आपणास दोन किंवा तीन तासात वेळेच्या आत लिहून पूर्ण करावी लागते. आपल्याला सर्व लिहिता येते. लिहू शकतो. पण या लिहिण्याला तसा काहीच अर्थ राहणार नाही.
आपल्याला येत असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तीन तासात जलद वेगाने लिहून पूर्ण करणे आवश्यक आहे. अशावेळी घरी प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्यासमोर घड्याळाचे तीन तासाचा वेळ निर्धारित करून प्रश्नपत्रिका पूर्णपणे तीन तासात सोडण्याचा सराव करून घ्या. उत्तरे लिहिताना जलद लेखन करताना काही शब्द वाक्यातून सुटण्याची दाट शक्यता असते.
जलद लेखन करताना उत्तर पत्रिकेवर जास्त प्रमाणात खोडा तोड करू नका. तसेच उत्तर पत्रिकेवर शाईचे डागही सुद्धा पडू देऊ नका. त्याचा परिणाम परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणावर होऊ शकतो. उत्तर पत्रिका अचूक वेळा वाचनीय अक्षरात लिहा. अवांतर वाचन केलेले कार्य घरी लिखित स्वरूपात लेखन करण्याचा नेहमी सराव केला पाहिजे. सरावाने सर्व काही शक्य होते.
विद्यार्थी मित्रांनो शाळेत प्रवेश घेतलेल्या दिवसापासून म्हणजे सुरुवातीपासून अभ्यास करताना प्रश्नपत्रिका सोडवण्याचा लेखी स्वरूपात सराव करावा. कमीत कमी वर्षभरात एका विषयाच्या दहा प्रश्नपत्रिका जलद गतीने सोडवण्याचा सराव करणे गरजेचे आहे. जलद लेखन करण्या चा सराव प्रयत्नांती शंभर टक्के यशस्वी होतो. याचा मला भरपूर प्रकारे अनुभव आहे.
विचारावर आधारित लेखनाचा वेग
विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनातील विचानाचा जास्त असतो तर मनात आलेले विचार लेखन करण्याचा वेग कमी असतो. आपल्या मनातील वाचनाचा वेग व लेखन काम करण्याचा समतोल असला पाहिजे. हा वेग समतोल नसेल तर उत्तर पत्रिका लिहिताना काही प्रश्न तील उत्तराचे मधील शब्द सुटण्याची दाट शक्यता असते. कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की, वाचनाचा वेग कमी असतो व लेखनाचा वेग जास्त असतो. यातही समतोल असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दुकानातील तराजू प्रमाणे तराजूचे दोन्ही पारडे समान असणे आवश्यक असते. दुकानदार आपणास दुकानातील वस्तू मोजून देताना दोन्हीही पारडे तराजूचे समान असेल अशा प्रकारे मालाची विक्री करत असतो. त्याचप्रमाणे आपणाला ही सवय करून घ्यावी लागेल.
परीक्षेत आणि भावी जीवनात उज्वल यश संपादन करण्यासाठी आपल्या विचाराचा वेग व लिहिण्याचा वेग यांच्यामध्ये समन्वय साधण्याची नितांत गरज आहे. ही गरज लेखन कौशल्याचा भरपूर प्रमाणात सराव केल्यास शक्य आहे.
सर्व विषयाचा लेखन सराव
सर्व विषयांमध्ये लेखन कौशल्याचा सराव असणे आवश्यक आहे. केवळ शब्द लिहिणे म्हणजे लेखन सराव नवे. गणित , विज्ञान आणि भूगोल या विषयात अंक, सूत्रे, आकृत्या आणि आलेख सुद्धा लेखन करण्याची आवश्यकता असते.
मनाने आणि तोंडाने गणिताची उत्तरे आपण पटापट देतो आहे. पण तेच गणिते सोडवण्यासाठी दिले तर कधी काही पायऱ्या चुकण्याची शक्यता असते किंवा काही गणितातील चिन्ह सुटण्याची दाट शक्यता असते. गणितातील एक साधी चूक म्हणजे संपूर्ण गणिताचे उत्तर चुकीचे येते. म्हणूनच सर्व विषयातील ज्या ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहे त्या सर्व बाबीवर अचूक वेळेत निर्धारित लेखन काम विद्यार्थ्यांनी सरावांनी पूर्ण करावे. म्हणूनच लेखन म्हणजे शब्द लेखन नव्हे तर इतरसर्व प्रकारचे चिन्ह, अंक ,सूत्रे, आकृत्या, आलेख आणि नकाशा वाचन करण्यासाठी सुद्धा लेखन कौशल्याचा विकास होण्यासाठी सर्व विषयात लिखाण काम वेग जलद हवा आहे.सहा लेखन कौशल्य सुधारण्याचे उपाय किंवा घटक याबाबत संपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण उपरोक्त पणे नमूद करण्यात आले आहे.
लेखन कौशल्याचा वेग वाढवा.
विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी पाहतो आहे की, बरेच विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडून परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. मला सर्व प्रश्नांची उत्तरे येत होती पण वेग अपुरा पडला. तर काही विद्यार्थी असे म्हणतात की, उत्तर पत्रिका सोडवताना शासनाने जास्त वेळ दिला पाहिजे असेही मत व्यक्त करतात. याचे मुख्य कारण म्हणजे वाचनाचा आणि लिहिण्याच्या वेगाचा समतोल समन्वय संबंधित विद्यार्थ्यांनी साधलेला नसतो. त्यामुळे शासनावर दोषारोपण करून टीका करतात.
मित्रांनो तशी ही बाब नाही. परीक्षेची प्रश्नपत्रिका ची सोडवण्याची वेळ शिक्षण तज्ञा ने अभ्यासांती निश्चित केलेली असते. किती वेळा किती प्रश्न सोडू शकतात याचा संपूर्ण विचार करूनच प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेली असते व त्या प्रमाणातच वेळेचे निर्धारण केलेले असते. पण आपला लेखन कौशल्याचा वेग कमी असल्यामुळे विद्यार्थी असे म्हणतात की माझे दोन प्रश्न सोडवण्याचे च राहून गेले आहेत.Writing Skill In Marathi Mahiti निर्धारित केलेल्या वेळेतच आपली पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवायला हवी आहे.
लिखाण वेग वाढवा
लेखन कौशल्याचा वेग कमी असण्याचे परिणाम
लेखन कौशल्याचा वेग योग्य नसल्यास खालील परिणामास विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते किंवा तोंड द्यावे लागते.
1)अनेक बहुसंख्य विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा वेग कमी असल्यामुळे त्यांना निरनिराळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते.
2) वाचन काम करताना योग्य प्रकारच्या रनिंग नोटस न घेणे, गृहपाठ न सोडवणे, शिक्षक शिकवताना काळजीपूर्वक लक्ष न देता वर्गातील माहिती अचूक न लिहिता दुर्लक्ष करणे याचा परिणाम लेखन कौशल्याचा वेग कमी होण्यावर विपरीत परिणाम होतो.
3) लेखन कौशल्या अभावी लिखाणात जास्त वेळ घालून क्षमता असूनही निर्धारित वेळेत उत्तर पत्रिका पूर्ण करू शकत नाही.
4) बहुसंख्य विद्यार्थी हे परीक्षेत फक्त एका मिनिटात 25 शब्द लिहितात त्याचा परिणाम उत्तर पत्रिका निर्धारित वेळेत न सोडण्यावर होतो. प्रति मिनिट जास्तीत जास्त शब्द लिहिण्याची सवय असणे आवश्यक असते.
5) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना किमान एका मिनिटात 40 शब्द लिहिण्याचा सराव नसल्यामुळे ते निर्धारित वेळेत उत्तर पत्रिका पूर्ण लिहू शकत नाही. म्हणूनच निर्धारित वेळेत उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी प्रति मिनिट 40 शब्द लिखाण झालेच पाहिजे हे .आवश्यक आहे.
6) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लेखन कौशल्याचा वेध अतिशय जास्त प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्यांनी प्रति मिनिट कमीत कमी 100 शब्द लिहिणे आवश्यक असते.
7) लेखन कौशल्य मध्ये अक्षर सुवाच्च व अधोरेखित केलेले असणे आवश्यक आहे.
लेखन कौशल्य वाढवण्यासाठी " हे " टाळा.
लेखन कौशल्य करताना विद्यार्थी मित्रांनो, खालील दिलेल्या महत्वपूर्ण काही गोष्टी वर्षभर टाळण्याचा सराव करावा. लेखन कौशल्याचा जलद वेळ करण्यासाठी महत्त्वपूर्ण मुद्दे टाळणे आवश्यक आहे.
1) विषयाच्या संबंधित विषयाचे अपूर्ण ज्ञान टाळा. म्हणजेच पूर्वज्ञान अचूक संपादन करा.
2) आपल्या ज्ञानाचा शब्द साठा कमी करण्याचे टाळा. म्हणजेच आपल्या शब्दांचा जास्तीत जास्त साठा वाढवा.
3) शैक्षणिक साहित्याची अपूर्णता टाळा. आपल्या लिखाणात योग्य शैक्षणिक साहित्य पुरेपूर प्रमाणात वापरा.
4) अलंकार युक्त आणि प्रभावी लेखन आवश्यक आहे.
5) व्याकरणाकडे दुर्लक्ष टाळा. म्हणजेच व्याकरणाकडे अचूक रीतीने अभ्यास करून लिखाण हे व्याकरणदृष्ट्या अचूक होणे आवश्यक आहे.
लेखन कौशल्याचे महत्व
मित्रांनो, लेखन कौशल्य ही महत्वपूर्ण लेखन शैलीची कला आहे. एका व्यक्तीच्या मनातील निर्माण झालेली विचार तो आपले विचार लिखाणकृती करून आकृतीबंध रीतीने विशिष्ट प्रकारची माहिती लिहित असतो. ही लिहिलेली माहिती इतर व्यक्तींना वाचण्यासाठी उपयुक्त ठरत असते. विद्यार्थी दशे पासून आज पर्यंत तुम्ही तुमच्या मनातील विचार दैनंदिन डायरीमध्ये स्वतःची वैयक्तिक माहिती लिहून ठेवलेली असते. डायरीत लिहिलेली माहिती भविष्यात केव्हाही त्याला वाचण्यासाठी उपयोगी ठरते
लिखाण शैलीचे महत्व म्हणजे लेखन कौशल्यातून अभूतपूर्व माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे लिखित स्वरूपात संक्रमित करण्याचा व संदेश देण्याचा काम करत असते.
भारतीय स्वातंत्र्य काळातील लढ्यामध्ये अनेक क्रांतिकारकाने गुप्त पद्धतीने माहितीचे लिखाण करून सर्व देशभक्तांना वाचण्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून प्राप्त करून दिले. भारतीयांनी वृत्तपत्रातील माहिती वाचून जागृत झाले आणि देश स्वातंत्र्य करण्यासाठी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोपून दिली. स्वातंत्र्यलढा पेटवण्यासाठी लेखन कौशल्य क्रांतिकारकांनी अत्यंत प्रभावीपणे त्याकाळी त्यांच्या लेखनशैलीतून प्रसिद्ध करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात क्रांतीवीरांचा लेखन कौशल्याचा वापर महत्वपूर्ण ठरला आहे. "Writing Skill In Marathi Mahiti"
लोकमान्य टिळक यांनी आपल्या वृत्तपत्रातून लिखाण करून जनजागृती व समाज प्रबोधन तसेच भारतातील सर्व समाज सुधारक मंडळीने भारतीय समाजात लेखन कौशल्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लिखाण शैलीतून आपली भारताची जगातील सर्वात मोठी घटना त्यांच्या विचारशैलीतून लेखन कौशल्या रेखाटून आपणास व देशास राज्यकारभार करण्यासाठी उपयुक्त ठरली आहेत हेच तर महत्त्वाचे लेखनाचे महत्व होय.
सारांश
मित्रांनो, आपल्याला भावी आयुष्यामध्ये निरनिराळ्या परीक्षेत यश संपादन करावयाचे असल्यामुळे आपणास महत्वपूर्ण रीतीने जलद गतीने लेखन कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण वाचलेले ज्ञान आणि श्रवण केलेली माहिती अचूक शब्दात लेखन कौशल्यात रूपांतरित करण्याची सरावाने सवय लावून घ्या. दररोज नियमित जलद लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी किमान 1000 शब्द लिहिण्याचा सराव आजच्या आधुनिक डिजिटल युगात आवश्यक आहे. या आजच्या लेखांमध्ये लेखन कौशल्य म्हणजे काय? हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर लेखन कौशल विकसित करण्याचे उपाय किंवा घटक लेखाच्याद्वारे स्पष्टपणे लेखात नमूद करून समजावून सांगितले आहेत.
मित्रांनो आपण हा लेख वाचल्यानंतर आपणास या लेखाच्या संदर्भात काही तांत्रिक त्रुटी किंवा समस्या निर्माण झाल्यास या ब्लॉग पोस्ट लेखाच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्यक ब्लॉगरला कळवा. त्यासाठी ब्लॉगर चा कॉन्टॅक्ट ईमेल सुद्धा ब्लॉगमध्ये दिसून येईल. ते पुन्हा एकदा ब्लॉगरला सूचना करू शकता. आपल्या आलेल्या सूचना, तक्रारी, प्रतिसाद, प्रतिक्रिया किंवा त्रुटी तपासून पाहिल्या जातील. आढळून आलेल्या त्रुटी तंतोतंत बरोबर असल्यास त्वरित लेखात दुरुस्ती करून लेख अद्यावत केला जाईल.
FAQ
1) लेखन कौशल्य म्हणजे काय?
उत्तर-आपले विचार किंवा आपली मते इतर व्यक्तींना सुलभतेने समजतील अशा समर्पक शब्दात त माहिती लिहिणे म्हणजे लेखन कौशल्य होय.
2) लेखन कौशल्य सुधारण्याचे अचूक उपाय किती आहे?
उत्तर-लेखन कौशल्य सुधारण्याचे अचूक उपाय सहा आहेत.
3) लेखन कौशल्य विकसित करण्याची का गरज आहे?
उत्तर-विद्यार्थ्यांनी परीक्षेत निर्धारित तीन तासाच्या वेळेत संपूर्ण प्रश्नपत्रिका तील उत्तरे उत्तर पत्रिकेत लिहिण्यासाठी लेखन कौशल्य विकसित करण्याची गरज आहे.
4) सुंदर हस्ताक्षर म्हणजे काय?
उत्तर-वाचकाला वाचता येण्यासारखे वाचनीय असणारे अक्षर म्हणजे सुंदर हस्ताक्षर होय. आपले अक्षर इतरांना वाचता आले पाहिजे. ते हस्ताक्षर सुंदर हस्ताक्षर असते.
5) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रति मिनिट किती शब्द लिहिणे आवश्यक आहे?
उत्तर-इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रति मिनिट कमीत कमी 40 शब्द लिहिणे आवश्यक आहे तर जास्तीत जास्त 50 शब्दा पर्यंत वेळ असला तरी चालेल
अद्यावत माहितीसाठी.अधिक माहितीसाठी आपण आमची खालील लेख आवश्यक वाचा.
अद्यावत माहितीसाठी. अधिक माहितीसाठी आपण आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चे व्हिडिओ नियमित पाहत चला.