पत्रलेखन कौशल्य मराठी माहिती | Letter Writing Skill in Marathi Mahiti
प्रस्तावना
Letter Writing Skill in Marathi Mahiti विद्यार्थी मित्रांनो,पत्रलेखन कौशल्य मराठी माहिती, आज आपण एक नाविन्यपूर्ण विषयावर ब्लॉग पोस्ट लेख लिहिणार आहे. लेखाचे नाव 'पत्रलेखन कौशल्य मराठी माहिती' असे आहेत .यासंदर्भात लिहिलेल्या लेख आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा.
आजच्या डिजिटल युगात पत्रलेखन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. इंटरनेट आणि मीडियाच्या साधनांमुळे त्याचबरोबर मोबाईल च्या मुळे विद्यार्थी प्रत्यक्ष संवाद साधू शकतो. पण ठराविक नमुन्यात पत्र कसे लिहावे? हे आजच्या युगात विसरून गेले आहे. पत्र काय असते ?याबाबतही सुद्धा त्यांना काहीच माहिती नाही. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर परीक्षेत एक पत्र लेखनावर आधारित प्रश्न आलेला असतो. तो प्रश्न सोडवण्यासाठी योग्य प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या लेखातून मिळणार आहे.
मित्रांनो आजच्या आधुनिक युगातील एक महत्त्वपूर्ण कौशल्य म्हणजे पत्रलेखन या विषयाकडे पाहिले जात आहे. पत्र लेखन हे मानवी जीवनातील महत्त्वपूर्ण कला आहेत. आपल्या मनातील आलेले विचार किंवा भावना प्रत्यक्षपणे बोलू शकत नसेल तर पत्र लेखन कौशल्याच्या सहाय्याने आपली विचार दुसऱ्या व्यक्तीला पोहोचवण्याचे संदेशात्मक साधन म्हणजे पत्र लेखन कौशल्य होय.
Letter Writing Skill in Marathi Mahiti(toc)
पत्रलेखन कौशल्य
आपल्या चांगल्या भावना किंवा विचार अतिशय चांगल्या भाषेत लिहून इतरांना संक्रमित करण्याचे उत्तम तंत्र कौशल्य म्हणजे लिखित स्वरूपात असणारे पत्र होय. ज्याप्रमाणे आज आपण मोबाईल किंवा इतर साधनाच्या द्वारे आपला संदेश एका सेकंदात दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करतो त्याप्रमाणे फार पुरातन काळापासून पत्रलेखन करून आपल्याकडील संदेश दुसऱ्या व्यक्तीला लिखित स्वरूपात देण्यासाठी पूर्वीच्या काळापासून तर आतापर्यंत पत्र लेखन द्वारे विचार संक्रमित करीत असतो. आजही पत्र लेखन कला महत्त्वाची असल्यामुळे व परिचित या संदर्भात प्रश्न विचारल्या जात असल्यामुळे मित्रांनो.' Letter Writing Skill in Marathi Mahiti ' आपल्याला या लेखाच्या माध्यमातून पत्रलेखन कौशल्य याबाबत सविस्तर माहिती या लेखा स्पष्टपणे नमूद करणार आहे. तर चला मग पाहूया पत्र लेखन कौशल.
पत्रलेखन कौशल्याची गरज
खरे तर मीडियाचे फार मोठे संदेश देणारे साधने विकसित झाले आहे की पत्र लेखनाची गरजच भासत नाही असे नव्या पिढीला वाटत आहे. जरी ही इंटरनेट आणि मेल चा संदेश वाहनासाठी वापर होत असला तरी सुद्धा पत्रलेखन कौशल्य याचे महत्त्व कमी झाले असले तरी पत्रलेखन करणे. पत्रलेखन केले म्हणजे ते लिखित स्वरूपात असते. आणि हा संदेश पत्र जेवढी वर्ष तुम्ही जतन करून ठेवणार तेवढे वर्ष संदेश कायम राहणार आहेत. कधी तर न्यायालयामध्ये पत्रलेखनाचा पुरावा म्हणून न्यायाधीश सुद्धा पत्राचा विचार पुरावा सिद्ध करण्यासाठी करतात. ही काळाची महत्त्वपूर्ण आणि कामाची माहिती या लेखाच्या मार्फत आपण स्पष्ट करत आहोत
पत्रलेखन कौशल्या चे प्रकार.
पत्रलेखन कौशल्याचे प्रकार खाली नमूद केल्याप्रमाणे स्पष्टपणे या लेखात नमूद केले आहेत.
कमीत कमी चांगल्या शब्दात आपली विचार आणि प्रभावी भावना इतर व्यक्तींना कळवण्यासाठी संदेश वाहन करणारे पत्र लेखन कौशल्य असून या पत्रलेखन कौशल्याचे मराठी भाषेत किंवा इतर कोणत्याही भाषेत दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे औपचारिक पत्र होय. दुसरा प्रकार म्हणजे अनौपचारिक पत्र होय.
=================================================================
पत्रलेखन
|
-----------------------------------------------
| |
१)औपचारिक पत्र. २)अनौपचारिक पत्र
|. |
कार्यालयास पत्र कौटुंबिक पत्र
=================================================================
वरील दर्शविलेल्या पत्र प्रकारानुसार या बाबत सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे मित्रांनो ,पाहू या
=============================================================
औपचारिक पत्र
औपचारिक पत्राच्या द्वारे पत्र लिहिणाऱ्या नी त्यांच्या विविध प्रकारच्या प्रभावी भावना , त्यांच्या मागण्या, त्यांचे विचार ,स्वतःचे म्हणणे, विनंती आणि कार्यालयीन किंवा मुख्यालय विभागात संदेश पोहोचवणारे महत्त्वपूर्ण कौशल्य म्हणजे औपचारिक पत्र लेखन होय. आज विविध कार्यालयाला औपचारिक पत्र हे ईमेल आयडी द्वारे ई-मेल करून त्वरित पोहोचवता येते. पण पूर्वीच्या काळी नेट आणि इंटरनेटचा शोध नसल्यामुळे औपचारिक पत्र हे लिहून पोस्ट द्वारे पोच केली जात होते. औपचारिक पत्र हे स्वतःच्या हस्ताक्षरात सुद्धा लिहिता येते किंवा टायपिंग स्वरूपातही सुद्धा लिहिता येते. कमीत कमी शब्दांमध्ये औपचारिक पत्राचे लेखन करून एखाद्या कार्यालयाला पोस्ट ऑफिस किंवा कुरिअर ने सुद्धा पोच करता येते. पत्र लवकरात लवकर पोस्ट करण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये आता स्पीड पोस्ट चा सुद्धा वापर केला जात आहे.
औपचारिक पत्रांच्या महत्त्वपूर्ण बाबी
मित्रांनो ,आपण या लेखात औपचारिक पत्रामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट करण्यात येतात याविषयी सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आपण कार्य करत आहोत.
१) औपचारिक पत्र हे ज्या कार्यालयाला पाठवायचे आहे. त्या कार्यालयाला प्रति करावी. म्हणजे प्रति लिहून संबंधित व्यक्तीच्या नावाचा आणि पदाचा समर्पक हुद्दा नमूद करणे आवश्यक आहे. औपचारिक पत्र हे कार्यालय व व्यावसायिक कामकाजाच्या निमित्ताने लिहून पाठवले जाणारे पत्र असून त्यामध्ये मागणी आणि विनंती इत्यादी बाबी स्पष्ट शब्दात नमूद करणे आवश्यक असते. Letter Writing Skill in Marathi Mahiti पत्रात दिनांक विसरू नका.
औपचारिक पत्राचा मायना
प्रथम पत्राचा मायना आकर्षक व समर्पक शब्दात खालील प्रमाणे उदाहरणात दाखवल्याप्रमाणे लिहिणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ
प्रति,
माननीय मुख्याध्यापक साहेब,
शिवाजी विद्यालय, बुलढाणा.
२) औपचारिक पत्राचा विषय
औपचारिक पत्र लिहिताना पत्राचा दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे पत्राचा विषय सुस्पष्ट शब्दात लिहिणे. याचाच अर्थ पत्राचा मूळ विषय थोडक्यात खालील प्रमाणे लिहिणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ:-पत्राचा विषय कमीत कमी मोजक्या शब्दात खालील प्रमाणे औपचारिक पत्राच्या संदर्भाने लिहिणे आवश्यक आहे.
विषय :-शाळा सोडण्याचा दाखला मिळणे बाबत.
पत्राचा पत्राचा आशय
मित्रांनो परीक्षेत पत्र लिहिताना औपचारिक पत्राचा असे हा मुद्दा क्रमांक तीन मध्ये दर्शविल्याप्रमाणे असणे आवश्यक आहे. पत्राचा असे लिहिताना योग्य बिनचूक शब्दात म्हणजेच अचूकपणे मोजक्या शब्दात असे लिहिणे औपचारिक पत्रा गरज आहे. औपचारिक पत्राचा आशय पत्राच्या विषयाच्या संदर्भात कमीत कमी शब्दात लिहा. "Letter Writing Skill in Marathi Mahiti"
उदाहरणार्थ:-
माननीय महोदय/ महोदया ,
पत्रातील उपरोक्त विषयाच्या संदर्भाने मला शाळा सोडण्याचा दाखला मिळण्याबाबत आपणास सविनय पत्र व्यवहार केला असून आपल्या विद्यालयातून मार्च 2024 परीक्षेत शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालो असून मला बाहेरगावी पुढील शिक्षण घेण्यासाठी जाणे आवश्यक असल्यामुळे आपल्या स्तरावरून मला शाळा सोडण्याचा दाखला त्वरित द्यावा ही नम्र विनंती.
पत्राचा शेवट
औपचारिक पत्राचा शेवट हा पत्र लेखन करताना पत्राच्या डाव्या बाजूस अचूक शब्दात लिहिणे विद्यार्थ्यांनी आवश्यक आहे. कारण परिचय मध्ये पत्र लिहिताना प्रत्येक मुद्द्याला वेगवेगळे गुण निर्धारित केलेले असते. म्हणजेच पत्रलेखन गुणाचे वर्गीकरण करून गुण दिले जातात.
पत्रलेखन कौशल्या पत्राचा शेवट हा करणे अत्यंत आवश्यक आहे. पत्राच्या शेवटी डाव्या बाजूस पत्र पाठवण्याचा संपूर्ण पत्ता बिनचूक लिहिणे अत्यंत आवश्यक आहे. हे कधीही विसरू नका.
मोबाईलच्या दुनिया मध्ये तुम्ही पत्र लिहिण्याचा कधीच सराव करत नसाल तर आता आवश्यक सराव करा. सर्व स्पर्धा परीक्षा तसेच माध्यमिक उच्च माध्यमिक पदवी पदविका आणि पदव्युत्तर परीक्षेसाठी पत्रलेखन या विषयावर आधारित माहिती चा एक प्रश्न नेहमी प्रश्नपत्रिका शंभर टक्के असतो.
आपणास योग्य माहिती प्राप्त व्हावी या उद्देशाने हा लेख लिहीत आहे. पत्राचा शेवट खालील प्रमाणे लिहिणे आवश्यक आहे. जोपर्यंत पत्र लिहिण्याचा पत्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येक शब्दाच्या शेवटी स्वल्पविराम देण्यास विसरू नका. पत्ता पूर्ण लिहिल्यानंतर शेवटी फुल स्टॉप द्या. पत्रात दिनांक लिहिणे विसरू नका.
उदाहरणार्थ:-
आपला /आपली कृपाभिलाषी,
अ .ब. क.,
मु. हनवतखेड,
पो. सावखेड तेजन,
ता. सिंदखेड राजा,
जि. बुलढाणा, १०,
महाराष्ट्र राज्य.
दिनांक--------------
मोबाईल नंबर-××××××××××.
अनौपचारिक पत्र
पत्रलेखन कौशल्यातील अनौपचारिक पत्र लेखन कौशल्य ही कला फार महत्त्वाची आहेअनौपचारिक पत्र म्हणजे आपल्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा नातेवाईकांना विशिष्ट प्रकारचा संदेश कळवण्यासाठी लिहिण्यात आलेले पत्र म्हणजे अनौपचारिक पत्र होय.
अनौपचारिक पत्राच्या संदर्भामध्ये आपण आपल्या नातेवाईकाला किंवा कुटुंबाला आपले स्वतःचे म्हणणे विचार मागणी विनंती किंवा विशिष्ट प्रकारचा सुख आणि दुःख संदेश वहन करण्यासाठी योग्य तसेच कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती आपल्या संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवणारे हे अनौपचारिक पत्र लेखन कौशल्य आहेत.
सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये याही प्रश्नावर पत्रलेखन वर आधारित प्रश्न परीक्षेसाठी विचारण्यात येतो. कौटुंबिक पत्र हे विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुद्द्याच्या साह्याने कृती आराखडा उत्तर पत्रिकेत योग्य स्वरूपात लिहिणे अपेक्षित आहे. हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञाना नुसार आणि पद्धतीनुसार आता तर तंत्रज्ञानाच्या युगात ई-मेल आयडी च्या साह्याने सुद्धा आपण पाठवू शकतो.
पूर्वीच्या काळी हे पत्र पोस्ट ऑफिस मार्फत किंवा एखाद्या कुरिअर संस्थेमार्फत पत्र पाठवण्यात येत होते. हे पत्र आपल्या नातेवाईकाला मिळण्यास विलंब लागत होता. आता तर एका क्षणात ई-मेल आयडी च्या साह्याने आपले कौटुंबिक पत्र आपल्या नातेवाईकाला पोस्ट करू शकतो.
अनौपचारिक पत्र लिहितानाही सुद्धा ठराविक नमुन्यात पत्र लिहिण्याची मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. प्रत्येक मुद्द्याला परीक्षेत गुणाचे वर्गीकरण करून गुण देतात. पत्रलेखन करण्याचे चार मुद्दे आहेत
१ नाते दर्शक प्रमाणे सन्मान व्यक्त
२)पत्राचा विषय
३)पत्राचा आशय किंवा पत्राचा मथळा जिव्हाळा युक्त
४)पत्राचा शेवट
उपरोक्त दर्शविलेल्या मुद्द्याच्या आधारे उदाहरण घेऊन माहिती सुस्पष्ट शब्दात मित्रांनो आपण खालील प्रमाणे अभ्यासणार आहोत. सर्वांनी हे काळजीपूर्वक मुद्दे चांगले लक्षात ठेवा. कारण भविष्यात तुम्हाला याचा आवश्यक फायदा होणार आहे. म्हणूनच पत्र लेखन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याचे प्रयोजन येथे खालील प्रमाणे पोस्ट केलेली आहेत.
नाते दर्शक प्रमाणे सन्मान.
अनौपचारिक पत्र हे कौटुंबिक पत्र असल्यामुळे या पत्रात ज्या नातेवाईकांना पत्र लिहीत आहे. त्या नात्याच्या संदर्भाने सन्मानपूर्वक पहिल्या मुद्या माहिती देणे अपेक्षित आहे. यामध्ये ज्या व्यक्तींना पत्र लिहावयाचे आहे.
त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा योग्य प्रकारे योग्य नात्यासह सन्मान व्यक्त करणे हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहेत. आपल्या कुटुंबातील किंवा नातेवाईकातील मंडळीच किंवा मित्रास पत्र लिहीत असताना पत्राची सुरुवात नात्यानुसार सन्मान व्यक्त करून पुढील माहिती लिहिणे आवश्यक आहे. या मुद्द्याच्या शेवटी पत्र ज्या दिवशी लिहिणार आहे त्या दिवसाची दिनांक नमूद करा.
उदाहरणार्थ :-
तिर्थरूप बाबास/आईस,
साष्टांग नमस्कार विनंती विशेष,
२) पत्राचा विषय
हा पत्र लेखन करताना दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वपूर्ण मुद्दा असून यामध्ये कमीत कमी सुस्पष्ट शब्दात विषय व्यक्त करणे आवश्यक आहे. म्हणजेच पत्र ज्या अर्थाने आपणास लिहिणे आवश्यक आहे त्या अर्थाने निर्माण होणारा योग्य असा विषय सुस्पष्ट शब्दात लिहिणे अत्यंत गरजेचे आहेत.
पत्राचा विषय:-आईच्या वाढदिवसानिमित्त आईस हार्दिक शुभेच्छा!
पत्राचा आशय.
या मुद्द्याच्या संदर्भाने थोडक्यात आपल्या नातेवाईकाची खुशाली बाबत विचारपूस करून आपण आपल्या पत्राच्या मार्फत पत्र लिहिण्याचे मुख्य प्रयोजन काय आहेत याबाबत स्पष्टीकरण अनौपचारिक पत्रात देणे अपेक्षित आहे. पत्राचा विषय अचूक मोजक्या किंवा कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती व्यक्त करणारा पत्राचा विषय लिहिणे आवश्यक आहे. याबाबत खालील प्रमाणे असे आपणास लिहिता येणे आवश्यक आहे.
पत्र लिहिण्याचे मुख्य प्रयोजन असे आहे की, कालच वडिलांचे पत्र मिळाले, पत्र वाचून घरातील सर्व मंडळीची खुशाली कळाली. मी पुणे येथे सुखरूप आहेत काळजी नसावी.पत्रात लिहिल्याप्रमाणे आईच्या वाढदिवसा हजर राहण्याबाबत मला मुख्य माहिती वडीलाकडून पत्राद्वारे प्राप्त झाली. मला क्षमा करा.
आईच्या वाढदिवसा हजर राहू शकत नाही याचे मुख्य प्रयोजन असे आहे की, आईचा वाढदिवस आहे त्याच दिवशी माझी शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू होत आहे त्यामुळे मी वाढदिवस हजर न राहिल्याबद्दल क्षमा करावी. परंतु ह्या पत्राद्वारे आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्याकडून आई लाख लाख हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून पत्राचा शेवट करत आहे की, घरातील सर्व लहानथोर मंडळींना ईश्वराने सुखी आणि समृद्धी ठेवो!
मी माझा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासात मग्न असल्यामुळे जास्त काही लिहू शकत नाही.
वरील प्रमाणे आपण आपल्या पत्राचा असे लिहिणे अपेक्षित आहे.
पत्राचा शेवट
पत्र लिहून पूर्ण झाल्यानंतर पत्राचा शेवट हा पत्राच्या डाव्या बाजूस पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता व ज्या दिवशी पत्र लिहीत आहे त्या दिवसाची दिनांक पत्रा त स्पष्टपणे नमूद करावी. जोपर्यंत पत्ता लिहिणे पूर्ण होत नाही तोपर्यंत स्वल्पविराम देण्यास विसरू नका. पत्त्याचा शेवट झाल्यानंतर शेवटी पूर्णविराम देणे
आपला आज्ञाधारक चिरंजीव,
अ .ब क.,
२०५, आदर्श नगर,
क्रांती चौक,
शासकीय दूध डेरी जवळ,
औरंगाबाद.
दि.०६ मे २०२४.
मोबाईल नंबर.xxxxxxxxxx
=================================================================
उपरोक्त माहितीच्या आधारे औपचारिक आणि अनौपचारिक पत्राचे दोन नमुने आदर्श नमुने म्हणून लेखात नमूद करत आहे. या आदर्श नमुन्याप्रमाणे विद्यार्थिनी मित्रांनी परीक्षेत पत्रलेखन कौशल्य वापरून परीक्षेतील प्रश्नावर आधारित पत्र लिहिणे आवश्यक आहे.
=================================================================
औपचारिक पत्र
आदर्श नमुना
विनंती पत्र (औपचारिक पत्र)
दिनांक ०६ मे २०२४
प्रति,
श्री.रघुनाथ महाजन,
माननीय व्यवस्थापक,
आदर्श पुस्तकालय,
दुसरा मजला,
शनिवार वाड्या जवळ,
१०३, सदाशिव पेठ, ४१.
विषय-अधिक सवलत देण्याविषयी
माननीय महोदय,
उपरोक्त विषयांवर आपणास विनंती पत्र लिहीत आहे की, आमची शाळा
, जनता विद्यालय सावखेड तेजन, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. येथे इंग्रज काळापासून सुरू आहेत. आमच्या या शाळेसाठी आपण आपल्या पुस्तकालय संग्रहातून निवडक यादीत दर्शविल्याप्रमाणे कृपया आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी विशेष अधिक दरात सवलत देऊन पुस्तकाचा पुरवठा करण्याबाबत हे मागणी पत्र आपणास सादर करत आहे. आम्ही खरेदी केलेल्या पुस्तकावर ठरलेल्या रकमेत विशेष सवलत देण्यासाठी विनंती करत आहे.
आमच्या विनंतीस मान देऊन आपण विशेष सवलत द्यावी करिता आपणास हे मागणी पत्र प्राप्त होतात कृपया सवलत संदर्भात विचार करून लवकरात लवकर उत्तर खालील पत्त्यावर कळवावे ही विनंती.
आपला कृपाभिलाषी,
मुख्याध्यापक,
जनता विद्यालय सावखेड तेजन,
तालुका सिंदखेड राजा,
जिल्हा बुलढाणा.
दिनांक ०६ मे २०२४.
मोबाईल नंबर xxxxxxxxxx
=================================================================
कौटुंबिक ( अनौपचारिक पत्र)
दिनांक ०६/०५/२०२४
विषय-वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबतीत
प्रिय दादास,
सप्रेम नमस्कार.
कसा आहेस, दादा? परीक्षेच्या तयारीमुळे दादा मी आपल्या वाढदिवसाला मला घरी येता येणार नाही. वाढदिवसाला हजर राहू शकत नसल्यामुळे मला नाराजी या पत्राद्वारे व्यक्त करावा अशी वाटत आहे. आपले पत्र कालच उघडले. आपण पाठवलेली पुस्तकांची गिफ्ट मला मिळाली. आपण पाठवलेले पुस्तके फारच उपयुक्त असल्यामुळे मी सदैव आपली ऋणी राहील.
घराकडे आई-वडिलांस सर्व मंडळी आनंदी असल्याची वार्ता आपल्या पत्रातून प्राप्त झाली आहे. आपण पाठवलेल्या पत्रात आपल्या वाढदिवसा ची तारीख दिनांक १४ मे २०२४ मला आपण कळवली असून पत्रातून वाढदिवस हजर राहण्याची विनंती केली आहे. त्याबद्दल मी आपली सदैव ऋणी आहेत. पण दादा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा सकाळी ११ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत असल्यामुळे मी वाढदिवसाच्या दिवशी हजर राहू शकत नाही. क्षमा असावी.
आपण पाठवलेल्या भेटीबद्दल दादा तुझे माझ्याकडून खूप खूप आभार! माझ्या परीक्षेमुळे त्या दिवशी वाढदिवस साजरा करण्यासाठी मी घरी येऊ शकत नसल्याबद्दल मला खंत वाटत आहे. पण माझा नाईलाज आहे. कृपया माझा वाढदिवस हजर न राहिल्यामुळे राग मानू नये.
इकडे मी सुखी आहे. तिकडे आपण सुखी असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! देऊन पत्र लिहिण्यास पूर्णविराम देतो आहेस. वाढदिवस झाल्या नंतर कस काय झाला त? त्यासंदर्भात सविस्तर माहिती पत्राद्वारे कळवणे.
घरातील सर्व लहान थोर मंडळी आनंदी असो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे . वाढदिवसा बाबत ची संपूर्ण माहिती पत्राद्वारे कळवीत जाणे ही नम्र विनंती.याबाबत सविस्तर माहिती पत्राद्वारे कळवणे ही नम्र विनंती
तुझी लहान बहीण छोटुली,
अ .ब .क.,
उस्मानपुरा,
रेल्वे स्टेशन जवळ,
२०५ सरस्वती नगर,
औरंगाबाद.
मोबाईल नंबर xxxxxxxxxx
दिनांक ०६/०५/२०२४
=================================================================
उपरोक्त दोन पत्र आदर्श नमुना पत्र समजावे हे खरे पत्र नाही याची जाणीव असावी. विद्यार्थी मित्रांनी परीक्षेसाठी औपचारिक आणि अनौपचारिक पत्र कसे लिहावे यासंदर्भात सविस्तर आदर्श नमुना दिलेला आहे या नमुन्याप्रमाणे परीक्षेतील पत्रावर आधारित माहिती उत्तर पत्रिकेत अवश्य लिहिणे.
=================================================================
सारांश
वरील अनौपचारिक पत्रातील पत्र लिहिणाऱ्या चा पत्ता हा अचूक पत्राच्या डाव्या साईडला अवश्य लिहा.पत्रलेखन कौशल्य विद्यार्थ्यांचे विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून पत्र लेखन कौशल्य हे शालेय अभ्यासक्रमात शासनाने समाविष्ट केले आहेत.
आजच्या युगात विद्यार्थ्यांना पत्र कसे लिहावे. याची पुरेपूर माहिती नाही. माहिती नसण्याचे कारण म्हणजे आजच्या आधुनिक युगात त पत्रा आयोजित ई-मेल आयडी इंटरनेट व्हाट्सअप टेलिग्राम इंटरनेट आणि अनेक मीडियाच्या माध्यमातून संदेश एका क्षणात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला त्वरित प्राप्त होतो म्हणून पेन हातात घेऊन कागदावर पत्र लिहिण्याची मुलांची सवय हळूहळू कमी कमी होत चालली आहे.
पत्रलेखन कौशल्य एक दिवस असा येईल की पत्र लेखन हे साधन संपुष्टात येईल. हे पत्र लेखन कौशल्य संपुष्टात येऊ नये म्हणून अती प्राचीन पिढीपासून आजच्या युगापर्यंत पत्र लेखनाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने विविध परीक्षेसाठी पत्र लेखन हा प्रमुख मुद्दा अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला असल्यामुळे ब्लॉगर ने या विषयावर ब्लॉक पोस्ट ही लिहिली आहे
या लेखामध्ये लिहिलेली माहिती वाचकाने वाचल्यानंतर त्यांना काही त्रुटी आढळून आल्यास आवश्यक ब्लॉगच्या पोस्ट कॉमेंट बॉक्स मध्ये सूचना किंवा त्रृटी अवश्य कळवा. आपण कळवलेल्या त्रृटी अचूक असल्यास त्वरित लेख अद्यावत करण्यात येईल
FAQ
१) पत्रलेखनाचे किती प्रकार आहे?
उत्तर- पत्रलेखनाचे दोन प्रकार आहेत.
२) पत्रलेखनाच्या दोन्ही प्रकारची नावे सांगा?
उत्तर - पत्रलेखनाचे दोन प्रकार
औपचारिक पत्र लेखन
अनौपचारिक पत्र लेखन
३) औपचारिक पत्र लेखन म्हणजे काय?
उत्तर - शासकीय किंवा खाजगी कार्यालयाला लिहिलेल्या पत्रास औपचारिक पत्र असे म्हणतात.
४) अनौपचारिक पत्र म्हणजे काय?
उत्तर - कुटुंबास किंवा आपल्या नातेवाईक मंडळी तसेच मित्रास लिहिलेल्या पत्रा अनौपचारिक पत्र असे म्हणतात.
५) शाळा सोडण्याचा दाखला मिळण्याबाबत, मुख्याध्यापकास लिहिलेले पत्र कोणत्या पत्रप्रकारात समाविष्ट आहे?
मुख्याध्यापकास शाळा सोडण्यासाठी दाखला मिळणे बाबतचे पत्र हे औपचारिक पत्रात समाविष्ट करण्यात येते.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.
यशाचे बीज बालपणात मराठी माहिती.
अधिक माहितीसाठी आपण आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनलचे व्हिडिओ आवश्यक व हमखास पहा.
=================================================================