Type Here to Get Search Results !

यशाचे बीज बालपणात मराठी माहिती | Yeshache Bij Balpanat Marathi Mahiti

 यशाचे बीज बालपणात मराठी माहिती |  Yeshache  Bij Balpanat  Marathi Mahiti 

प्रस्तावना 

Yeshache  Bij Balpanat  Marathi Mahiti  मित्रांनो, आज आपण एक नाविन्यपूर्ण विषयावर ब्लॉग पोस्ट साठी लेख लिहिण्यास हाती घेतला आहेत. या लेखाचे नाव ,"यशाची बीज बालपणात मराठी माहिती."असे आहेत. हा लेख निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे आतापर्यंत एकाही ब्लॉगरने या विषयावर कोणत्याही प्रकारचा लेख लिहिलेला नाहीत. या लेखाच्या संदर्भात Keyword Generator मध्ये Keyword चा Search केला असताना एकही Keyword आढळून आला नाही. म्हणून या विषयावर ब्लॉगरने लेख लिहिण्यासाठी व अभ्यासासाठी हा लेख लिहीत आहोत. जर आपणास हा लेख आवडला तर मित्रांनो,   आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करावा. 
मित्रांनो, विद्यार्थ्यांवर लहान वयात चांगले संस्कार झाल्यास हा विद्यार्थी मोठेपणी आदर्श नागरिक म्हणून यशस्वीरित्या समाजात उभा राहू शकतो. विद्यार्थ्यांवर बाल वयात चांगल्या यशाचे बीज बालपणात त्याच्या वयात पेरले गेल्यास हा विद्यार्थी भविष्यात भावी पिढीला चांगला आदर्श निर्माण करून देणारा|   व स्वतःचे उज्वल आयुष्य उभे करण्यासाठी समर्थ असू शकतो. 
Yeshache  Bij Balpanat  Marathi Mahiti
Yeshache  Bij Balpanat  Marathi Mahiti 



  Yeshache  Bij Balpanat  Marathi Mahiti(toc)


मित्रांनो, विद्यार्थ्यांवर बालपणात लहान वयातच चांगल्या सवयी अभिवृद्धी यांचा प्रभाव भविष्यात उपयुक्त ठरतो. पालकांनी पाल्याच्या संदर्भात लहान वयात त्याची काळजी अवश्य घ्या कारण बाल व हे संस्कारक्षम वय असते .या वयात झालेल्या संस्कार हा पाल्याचे भावी जीवन ठरवणारी यशाची गुरुकिल्ली होय. 


यशाचे बीज बालपणात मराठी माहिती


मित्रांनो, पालक आणि बालक यांच्यामध्ये नेहमी सुसंवाद असावा लागतो. पाल्याचे वय लक्षात घेऊन त्याच्या विकासासाठी आणि पाल्याचे मानसिक बळ वाढवण्यासाठी पालकांनी केलेल्या आपल्या पाल्याच्या प्रशासा अत्यंत उपयोगी ठरते. लहान मुलाचे वय हे ओल्या माती सारखे असून या ओल्या मातीला जसा आकार देणार तसा विद्यार्थी घडणार हे शंभर टक्के सत्य आहे. म्हणूनच या विषयावर आज आपण माहिती पाहू या. या लेखाच्या संदर्भात खालील प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण माहिती या लेखाद्वारे प्राप्त करणार आहोत.  त्यासाठी खालील महत्त्वपूर्ण घटकाचा अभ्यास या लेखातून करणार आहोत


पालकाच्या अपेक्षा 


मित्रांनो पालकांच्या आपल्या पाल्य बाबत म्हणजेच आपल्या मुला बाबत काही महत्त्वपूर्ण अपेक्षा असते. अपेक्षा असणेही आवश्यक आहे. त्यात काही गैर नाही. पालकांना आपल्या मुलांच्या संदर्भात. पालकांनो आपल्या मुलाला लहानपणापासून योग्य वळण देणे काळाची गरज ठरत आहेत. मुलांना लहानपणी चांगल्या सवयी लावल्या तर मोठेपणी हा मुलगा आपल्या पालकाच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. जसा आपण दगडाला आकार देतो तसा दगडातून देवाची मूर्ती घडते. कुंभार ने जसा मातीला आकार देईल तसे कोरे ठणठणीत माठ तयार होईल. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी योग्य वयात मुलांवर संस्कार करा. म्हणजे तुमच्या अपेक्षा मुलगा पूर्ण करू शकेल.


पालकत्वाची शिदोरी 

मित्रांनो, मराठी मध्ये म्हण आहे की,"भूक नसावी पण सोबत शिदोरी असावी."या म्हणी प्रमाणे भावी काळातील पालकाची शिदोरी कोणती असेल तर ती ' शिदोरी म्हणजे आपल्या मुलाचे उज्वल भविष्य 'होय.

पालकांनी एक महत्वपूर्ण बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. आपल्या वडिलांचा भूतकाळ आणि आपला वर्तमान काळ यामध्ये प्रचंड तफावत आहेत. जग झपाट्याने बदलत असल्यामुळे नवीन काळ आपल्या मुलांना घडवण्यासाठी आजच्या मुलाच्या अपेक्षा म्हणजे आपली शिदोरी असल्यामुळे आपल्या मुलाला समुपदेशनाची गरज आहे. पालक बालपणीच आपल्या मुलाला नवनवीन बदल झेलण्यासाठी कृतीयुक्त कार्यक्रमाचा आराखडा आणि नियोजन पालकांनी मुलाचे भविष्य घडवण्यासाठी तयार करून त्या आराखड्याप्रमाणे आपल्या मुलांना घडवणे ही आजच्या काळाची नितांत गरज आहे.

अहम् भाव 

काळ झपाट्याने बदलत असून मुलांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहे. मुले आजच्या नवीन युगातील येणारे नवनवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा याबाबत फार गोंधळून गेलेली आहेत. त्यांना बालपणातच योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. आपण मार्गदर्शन करताना आपल्यातील आणि पाल्या तील अहम् भाव यामुळे कुटुंबात छोट्या मोठ्या वादामुळे त्याचा विपरीत परिणाम पाल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. घरात होणारे पती पत्नीचे भांडण हे मुलगा स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो. पण भांडणात काही करू शकत नाही. त्या भांडणाचा त्याच्या वयावर आणि भावनांवर विपरीत परिणाम होतो. आपल्या जीवनाची भावी शिदोरी एक तर मितभाषिक होईल किंवा भांडखोर आणि आक्रमक बनेल. याची जाणीव ठेवून पालकांनी आपले पाल्य घरी असताना त्याच्याबरोबर सौजन्याने वागणूक करून कोणत्याही प्रकारची घरातील भांडणे त्याच्यासमोर करू नका. भांडणे होत असेल तर मुलांचा भावनिक आधार त्याच्या मनातून हरवल्याची जाणीव होऊन त्याचा परिणाम त्याच्या शैक्षणिक विकासावर विपरीत परिणाम होतो. काल नवा आहे.  ' Yeshache  Bij Balpanat  Marathi Mahiti'  परंतु पालकत्वाची शिदोरी जुनी असेल तर कुठेतरी पालकांना स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे. 


बालपण आठवा पालकांनी स्वतःचे 


आज पालकाकडून नेहमी ओरड होताना दिसत आहे. आज पालकाची तक्रार आहे की मुले बिघडली आहेत. खरंच ही तक्रार बरोबर आहे काय? स्वतःच्याच मनाचे पालकांनी आत्मपरीक्षण करणे. तक्रार योग्य आहे की अयोग्य. स्वतःचे आत्मपरीक्षण करताना स्वतःचे तुमचे बालपण तुम्ही स्वतः आठवून पहा. आपल्या बाल वयात आपल्यावर कसे संस्कार झाले ?हे पहा.

पालकांनो तुम्ही सुद्धा बालवयामध्ये आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतःची स्वप्न तुम्ही स्वतःच बालपणातच रंगवली ना? बाल वयात तुम्ही आपल्या आई-वडिलांचे  चांगल्या संस्कारासाठी तुमच्यावर नजर ठेवून कार्य केले आहेत. तुमच्या हातातून चूक झाल्याबरोबर आई-वडिलांनी आपणास मार सुद्धा दिलेला आठवत असेल. कदाचित तुम्ही आई-वडिलांशी उद्धटपणे वागलाही असेल. तुमच्या वागणुकी वरून तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यावर संस्कार चांगले केले त्याचप्रमाणे तुम्ही हे अगोदर स्वतःचे बालपण जाणून घेण्याची गरज आहे. आपण जसे घडलो त्यापेक्षा आपला मुलगा चांगला घडवणार अशी स्वप्न तुम्ही रंगवत आहात म्हणून प्रथम जाणून घेतले पाहिजे की पालकांनी आपल्या पाल्याबरोबर उचित वागणूक ठेवावी. 

तुमच्या बाल वयातील तुमचे अनुभव तुमच्या पाल्यांना आवश्यक सांगा. तुम्ही काय चुका केल्या? तुमची फजिती कशी झाली? याबाबतची गंमत जंमत पालकांनी आपल्या मुलांना सांगून ह्या चुका होणार नाही हे टाळण्यासाठी स्वतःच्या बालपणाकडे दुर्लक्ष न करता आपल्यापेक्षा आपला पाल्य चांगला घडवण्याचा प्रयत्न करा.

जुना काळ  व नवा काळ यांचा समन्वय 


मित्रांनो, जुन्या काळात घडलेल्या पिढीतील मुलांपेक्षा नव्या पिढी घडत असलेल्या मुलांमध्ये जमीन आसमान चा फरक आहे. आधुनिक काळातील मुले आता स्वतंत्र विचार आणि भारावून गेलेली आहेत. त्यांना अधिक स्वातंत्र्य हवे आहेत. आजच्या काळातील मुले जुन्या काळापेक्षा अधिक बोलकी झाली आहे. परंतु काळ हा कोणासाठी थांबत नाही. काळ त्याच्या वेगाने धावतो आहे. त्या काळाबरोबर दोन्ही पिढीतील समन्वय साधून काळाच्या वेगाने पालकांनी आपल्या मुलांसाठी धावणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळातील संस्कार वेगळे झालेली आहेत. आताच्या काळातील संस्कार वेगळे होत आहे. प्रतिगामी व पुरोगामी या दोन विचाराची सांगड घालण्याची महत्वपूर्ण गरज आहे. काळाप्रमाणे संस्कारही बदलले आहेत. पाल्याचे संवर्धन करताना पालकांना पारंपारिक पद्धत व नवीन पद्धत यामध्ये संघर्ष निर्माण होत आहे. पूर्वीच्या काळात शिक्षणाला फारसे महत्त्व नव्हते महत्व होते परंतु ते समजले नाही. त्यामुळे अनेक पालक अशिक्षित राहिले. 


आताच्या काळामध्ये पाल्यांसाठी उत्कृष्ट शिक्षण देण्याची व मुलांना आदर्श बनवण्यासाठी वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रमात प्रवेश देऊन त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न पालक करत आहे. म्हणूनच पालकांनी नवीन काळ आणि जुना काळ यांचा सुवर्ण मध्य साधून आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास करावा. सर्वांगीण विकास करताना त्याला काही शास्त्रामध्ये पारंगत करणे आवश्यक आहे. 


आदर्श घडवणारे शास्त्र 

पालकांनी आता अलीकडच्या काळात आपल्या पाल्यांना घडवण्यासाठी स्वतः काही शास्त्रांचा अभ्यास करण्याची गरजही सुद्धा निर्माण झाली आहे. पालकांनी मुलांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी महत्वपूर्ण शास्त्र अभ्यासणे आवश्यक आहे. किमान पालकांनी पाच तोंड ओळख करून घ्यावी. त्या शास्त्रामधून महत्वपूर्ण मुद्दे आपल्या पाल्यात सांगा. पाच शास्त्र जे महत्त्वाचे आहे ते येथे पुढील प्रमाणे या लेखात स्पष्टपणे नमूद करत आहे. आहारशास्त्र, मेंदू शास्त्र ,अनुभव शास्त्र ,मानसशास्त्र आणि शिक्षण शास्त्र या शास्त्राविषयी पूर्ण ज्ञान जरी नसेल तरी किमान या शास्त्राची तोंड ओळख पालकांनी करून आपल्या पाल्यांना आपल्या घरातील अभ्यास, आपल्या घरातील वागणूक, शिस्त ,खेळ ,मनोरंजन आणि व्यायाम याकडे जरा लक्ष देत चला.


मुलाना शाळेत प्रवेश दिल्यानंतर त्याच्या प्रगतीचा वारंवार आढावा पालकांनी नियमितपणे घेणे आवश्यक आहे. पाल्याच्या शाळेतील शिक्षकाच्या संपर्कात राहून नियमितपणे प्रगतीचा आढावा घेऊन येणाऱ्या अडचणी आणि मार्गदर्शन याबाबत शिक्षकाकडून समुपदेशन करून घ्या. 


स्नेहपूर्ण संबंध. 

आजच्या आधुनिक काळात पालक आणि मुले यांचे संबंध काही ठिकाणी अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की, पाल्य आणि पालक यांच्यामध्ये स्नेह पूर्ण संबंध नाही. पालकांनी आपल्या मुलावर संपूर्ण विश्वास दाखवून त्यांच्याशी वर्तणूक आणि संबंध विश्वास पूर्ण तसेच स्नेहपूर्ण यश संपादन करणारे स्नेहपूर्ण संबंध निर्माण करणारे पिरॅमिड उभे करावे. वडील आणि मुलगा यामध्ये मित्रत्वाचे स्नेहपूर्ण संबंध असणे आवश्यक आहे. या संदर्भाने अनेक ठिकाणी समउपदेशनाचे प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. काही ठिकाणी तर कार्यशाळा आयोजित केल्या जातात. पाशी माते देशांमध्ये व्याख्याने देऊन समुपदेशन करतात. परंतु भारताला पाशीमात्य देशातील व्याख्याने विद्यार्थ्यांना ऐकवणे आवश्यक आहे. मुलगा आणि वडील    या दोघांनाही योग्य समुपदेशन जर पूर्ण झाले तर दोघांच्या मध्ये स्नेहपूर्ण संबंध निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातूनच आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास होणार आहे याची जाणीव पालकांना असायला हवी.   Yeshache  Bij Balpanat  Marathi Mahiti यासाठीच या लेखाचे ब्लॉगर ने ब्लॉक पोस्ट साठी लेख लिहिण्याचे निश्चित करून लेख लिहिण्यात येत आहे. 


पाल्यांना आधाराची आवश्यकता 


आधुनिक डिजिटल युगामध्ये आता पाल्यांना पालकाच्या आधाराची आवश्यकता निर्माण झाली आहे. पालकांना मुलांकडे लक्ष देण्यासवेळ नाही म्हणून आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. मुलांनी आपल्या पालकांना विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन पालकांनी करणे आवश्यक आहे. मुलांनी विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये पालकांनी जर आपल्या मुलांना मार्गदर्शन केले नाहीतर पाल्याच्या मनात उपेक्षा निर्माण होऊन उपेक्षाभंग झाल्याशिवाय राहत नाही.


 नवीन पिढीतील मुलांना त्यांच्या आधारांची आणि भूक भागवण्याची पाल्य इतरत्र आधार घेण्याचा मार्ग शोधत असतात. पालकांनी मुलांकडे दुर्लक्ष केले तर मुलगा इतर व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा शोध घेत असतो. घेतलेला शोध कधी चांगलाही होऊ शकतो तर कधी वाईटही होऊ शकतो. हे फक्त येणारा काळच सिद्ध करू शकतो. सर्व पालकांनी आपल्या मुलांना बाल वयातच ओळखणे आवश्यक आहे. त्याच्या भावना समजावून त्यांना चांगल्या मार्गांना लावण्याची मुख्य गरज आहे. ही गरज फक्त पालक कुटुंबातील एक सदस्य म्हणून पूर्ण करू शकतो. पालकांनी आपल्या मुलाला जर ओळखले नाही तर समाजात चांगल्या आणि वाईट अशा विविध शक्ती करत असतात. या दोन्ही शक्ती पैकी एका चक्रव्यूहात तुमचा पाल्य अडकू शकतो. म्हणून तुम्ही मुलांना आधार द्या. तुमच्या आधाराची त्याला नितांत गरज आहे. मुलांना कौटुंबिक आधार कवच मिळणे आवश्यक आहेजर कुटुंबाचा आधार कवच मिळाला नाही तर मुलगा सामाजिक कवचा कडे वळण्याची दाट शक्यता असते. 


समाजामध्ये चांगले परिणाम करणारे लोक कमी असतात तर वाईट परिणाम करणारे लोक सर्वात जास्त असतात. म्हणून आपला पाल्य ज्या स्थितीत असेल त्या स्थितीत त घरीच योग्य मार्गदर्शन करून परिपूर्ण करणे आणि आधार देणे आई-वडिलांचे कर्तव्य आहे. मुलगा चांगल्या मित्रांच्या संगतीने चांगले गुण प्राप्त करू शकतो. 


मुलगा जर वाईट मुलांच्या संगती त सापडला तर किंवा वाईट मुलांच्या जाळ्यात अडकला तर बाहेर काढणे फार मोठे अवघड असते. त्या वाईट मुलांच्या जाळ्यात जर मुलगा अडकला तर मुलगा व्यसनाच्या जाळ्याच्या कवचात जाऊन पडतो. म्हणून पालकांनी आपल्या पाल्याला सुरुवातीपासून चांगले सद्गुनी मित्र मिळावे यासाठी प्रयत्नशील राहणे आजच्या आधुनिक  डिजिटल युगातील नितांत गरज आहे. पालकांनी नेहमी मुलगा कोणत्या मित्रासोबत मैत्री करतो आहे हे प्रथम जाणून घ्या. यासाठी कदाचित त्याच्या मित्र मंडळांना आवश्य भेटा. चांगल्या मुलांसोबत मैत्री टिकवण्यात मुलांच्या बाबत सतर्कतेचा इशारा आपणास आपण जवळचे मित्र आहोत. म्हणून सर्व मुलांचे चांगल्या मुलांचे स्नेहसंमेलन घडून आणून योग्य मार्गदर्शन करा.

गैरसमज टाळा 


लहान मुल एखादेवेळी भिंतीवर चित्र काढतात किंवा चित्रकला वही मध्ये रेषा ओढतात आणि चित्र काढतात. याचा असा विचार करू नका की, आपला मुलगा चित्रकार बनेल असा समज करू नका. त्याच्या अंगात असणारी सूक्त शक्ती आपोआप त्याच्या गुणाला विकसित करण्यास मदत करत असते. कधी कधी काही मुले झोपेत बडबडत करत असतात. त्यांना झोपेत बोलण्याची सवय असते. याचा अर्थ तुम्ही त्याला वेडे समजू नका. तुमच्या मनातील प्रथम गैरसमज दूर करा. तुमच्या मुलाला जागतेपणी मनमोकळेपणाने बोलते करा. त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून किंवा वर्तनातून त्याच्या सुप्त गुणांना मोकळे करण्याचा मार्ग उपलब्ध करून द्या. मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात सूक्त गुण असतात. पालक या नात्याने तुम्ही ते गुण आवश्यक ओळखून त्याला मन मोकळे करून एकलकोंडाची भावना दूर करून त्याच्या मनातील असणारे सर्व गैरसमज दूर करण्याची मुख्य जबाबदारी आईवडिलांची असते. 

बळजबरी टाळा खाण्याची 


जगातील काही पालक म्हणजेच आई वडील स्वतःच्या माय पोटी मुलांना बळजबरीने खाऊ पिऊ घालतात. हे टाळणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांना बळजबरीने अन्न खाऊ घातल्यास त्या अन्नावर त्याची नावड निर्माण होते. त्यामुळे कदाचित त्याची भूकही सुद्धा मंदावु शकते. मुलांना टॉनिक देण्याच्या संदर्भात स्वतःच्या मनातील विचार मुलांवर खाण्यापिण्याच्या बाबतीत नेहमी प्रयत्न झालेला असतो. असा प्रयत्न टाळणे आवश्यक आहे. ज्यावेळेस त्याला भूक लागेल त्यावेळेस तो आपोआप नक्की जेवण करेल. आपण कितीही सांगितले तरी त्याला भूक नसताना बळजबरीने जेऊ घालणे म्हणजे पालकाची जेवण बाबत हुकूमशाही वृत्ती होय. ही हुकूमशाही वृत्ती पालकांनी टाळणे आवश्यक आहे. मुलांच्या भुकेच्या बाबतीत आई-वडील स्वतःच्या चष्म्यातून पाल्याला पाहता आणि त्याचे खाण्यापिण्याच्या बाबत मूल्यमापन करतात. शक्यतो पालकाने असे करू नये. मूलभूत लागल्यास आवश्यक जेवण करेल. हे सूत्र पालकांनी लक्षात घेऊन वागावे. पालकांनी मुलांना जेव्हा भूक असेल तेव्हाच जेवण देणे योग्य आहे.


आहार शास्त्राच्या नियमानुसार आहार


दोन मुले वयाने जरी सारखे असले तरी त्यांचे जेवणाचे प्रमाण आहार शास्त्रानुसार वेगवेगळे असते. याची पालकांनी भान ठेवावी. आहार शास्त्राच्या नियमानुसार जास्त जेवण करणे हे सुद्धा हानिकारक असते. तसेच अतिशय कमी प्रमाणात खाणे हेही सुद्धा हानिकारक असते. त्यामुळे मुलांना ज्या प्रमाणात भूक लागली असेल त्या प्रमाणात आवश्यक तेवढा आहार देणे. शरीराला चयापचन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी योग्य प्रमाणात आहार देणे आवश्यक आहे. यासाठी पालकांनी आपल्या मुलाला आहार शास्त्र तज्ञ डॉक्टर कडून तपासून घेऊन त्या प्रमाणात पौष्टिक आहार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार देणे योग्य होईल.

 एका मुलाची जेवणाची प्रक्रिया दुसऱ्या मुलाच्या जेवणाच्या प्रक्रियेमध्ये तुलना करू नका. कधीकधी मुलांना एका दिवसातून तीन ते चार वेळा जेवण करावे लागते तर काही वेळेस मुले फक्त दिवसातून दोन वेळा जेवण करत असतात. हे सर्व प्रमाण मुलांच्या शरीर नुसार पचनक्रिया नुसार आहार शास्त्राच्या नियमानुसार जीवन देणे आवश्यक आहे. आहार शास्त्राच्या नियमानुसार मुलांना डॉक्टरच्या सल्ल्याने फास्ट फूड घेणे योग्य आहे की अयोग्य आहे हे समजून घेणे. मुलांचे खाण्यांचे चोचले तसेच तेलकट खाण्याचे प्रमाण टाळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून शरीराचा योग्य विकास झाला तर बौद्धिक विकास योग्य होईल. त्यामुळे बालकाला आहारशास्त्राच्या पद्धतीनुसार जेवण देणे योग्य आहे. "Yeshache  Bij Balpanat  Marathi Mahiti" मुलाचे यशाची बीज हे आहार शास्त्रावर अवलंबून आहे याकडे कृपया दुर्लक्ष करू नका.


अधिकारासंदर्भात महत्वपूर्ण मुद्दा 

पालकांनी आपल्या मुलाच्या संदर्भात मुलांवर अधिक अधिकार गाजू नका. मुलांवर प्रत्येक वेळेस रागवून त्यांच्याकडून प्रत्येक वेळी काम करून घेऊ नका. पालकांनी पालकाच्या अधिकार वाणीने घरात वातावरण निर्माण केले तर बालकाला किंवा मुलाला पालकाची हिटलरशाही नकोशी होते. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उलट परिणाम होतो. मुलांवर अधिकार वाणीने जास्त पालक रागवून हे त्याला नकारात्मक करू नका. तू हे केलेच पाहिजे. हे केले पाहिजे नाही. असे म्हणून वारंवार मुलाला त्रास देऊ नका. मुलाचे वय व मुलाची मानसिकता लक्षात घेऊन पालकांनी मुलाशी घरात आल्यानंतर कशी वर्तणूक करावी याबाबत आज पालकांना प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे.यासाठी अनेक केंद्र सुद्धा कार्यरत आहेत.


पालकाचे दबाव युक्त वर्तणूक

पालक बाहेरील काम करून किंवा ऑफिस मधील काम करून घरी आल्यावर बरोबर मुलांवर ऑफिस मधील किंवा बाहेरील केलेल्या कामाचा ताण मुलांवर काढू नका. मुलावर दबाव तंत्राचा वापर करू नका. एक धागा एक विशिष्ट वेळ पर्यंत तानणे आवश्यक आहे पण त्याला जास्तच ताण दिला तर तो धागा तुटल्या शिवाय राहणार नाही. घरातील मुळे किशोरवयातील साधारणतः 11 ते 16 वर्षे वयोगटापर्यंत त्यांच्या मनात भावनिक संकल्पना वेगळ्या निर्माण झालेल्या असतात. या वयात मुलांची पालकांनी काळजी घेणे. आवश्यक आहे. या वयामध्ये मुलांमध्ये मानसिक बदल झालेले असतात. भावनिक आणि शारीरिक बदल सुद्धा झालेले असतात. शक्यतो या वयात मुलांना मारझोड करणे पालकांनी टाळणे आवश्यक आहे.पालकांनी प्रत्येक वेळी मुलांच्या चुका शोधत बसून त्याला कमी लेखणे किंवा कमी दर्जा देणे हे अयोग्य आहे. 


मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून किशोरवयीन मुलांना समुपदेशन करण्याची गरज आहे हे पालकांनी ओळखून समउद्देशाने अवश्य करून घ्या मुलांच्या यशामध्ये समुपदेशन महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असते. मुलाकडून घरात चूक झाली असेल तर चूक झाल्यावर त्वरित त्याच्यावर रागवू नये. त्याला एकांतात घेऊन जाऊन झालेली चूक समजावून सांगणे व पुढच्या वेळी अशी चूक करू नयेत असे त्याला योग्य मार्गदर्शन करणे. त्याचबरोबर संतापाने जोराने मुलाच्या धावून जाऊन मारझोड करू नका. त्यामुळे मुलांचा कोंडमारा होईल. रागाच्या भरात घरात आणि वस्तूची मुलगा तोडताड सुद्धा करू शकतो. सांगायचा अर्थ एकच येथे ब्लॉगर चा अपेक्षित महत्त्वपूर्ण उपदेश आहे की, किशोर वयातील मुलांना समजावून घेऊन त्याच्या सर्व समस्या पालकांनी आजच्या युगात सोडवणे आवश्यक आहे


आरोग्यासाठी खेळ योग्य 

पालकाला आपल्या मुलाने यश संपादन करावयाचे वाटत असेल तर विद्यार्थ्यांच्या रिकाम्या वेळा त्यांना वेगवेगळे अनेक प्रकारचे आउटडोर आणि इंदोर गेम शिकवा म्हणजेच खेळ शिकवा. मुलाचे खेळामुळे आरोग्य चांगले राहते. मुलाचे आरोग्य चांगले असेल तर तो अभ्यास स समर्थ होईल. Sound mind is sound body. या तत्त्वाप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देणे पालकाची गरज आहे. मुलांना सतत अभ्यास करत बसल्यानंतर थोड्यावेळाने खेळाव्याशी वाटत असते. त्यावेळेस पालक त्याला खेळू देत नाही. अभ्यास कर, अभ्यास कर असे वारंवार म्हणत राहतात. हे योग्य नाही. खेळ खेळणे म्हणजे आयुष्याचा खेळखंडोबा करणे हे धोरण पालकाचे जर असेल तर ते चूक आहे. मुलांच्या अंगातील सुप्त शक्तीच्या अंतर्गत खेळातूनहीसुद्धा स्वतःचे करिअर करू शकतो. सोळा वर्षाच्या सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये पदार्पण करून जगातील सर्व क्रिकेटर चे रेकॉर्ड ब्रेक केले. 


आपलाही मुलगा खेळाच्या माध्यमातून त्याला ज्या गोष्टीत आवड आहे ती जर त्याने पूर्ण केली तर शंभर टक्के तू यशस्वी होईल. खेळ आणि मैदान असा त्याचा समज असेल तर त्याला खेळू द्या. खेळायच्या वेळेस खेळ, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास, झोपायच्या वेळेस झोप, खाण्याच्या वेळी खाणे, आनंदाच्या वेळी आनंद आणि शाळेच्या वेळेत शाळा हे विद्यार्थ्यांना त्याच्या मनाप्रमाणे करू द्या. लहानपणी शिकलेले खेळ तो कधी विसरू शकत नाही. बाल वयात त मुलांना खेळ खेळणे फार आवडत असते. म्हणून खेळू द्या.  खेळण्यातच त्याचे यश अवलंबून आहे. 


तुलना टाळा 

पालकांनी आपल्या मुलाच्या संदर्भात इतर कुटुंबातील मुलांसोबत तुलना करू नका. इतर मुलांबरोबर तुलना करणे योग्य नाही. मानव जन्मताच अनेक सुप्त गुण घेऊन जन्माला आलेला असतो. त्याला जे जन्मतः सुप्त गुण प्राप्त झाले असेल त्या तो विकसित होणार आहेत. सर्वच जण सचिन तेंडुलकर होत नाही. सर्वच जण विवेकानंद होत नाही. ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीतून त्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून त्याची इतर मुलांबरोबर तुलना जर पालकांनी केली तर मुलाला वाईट वाटत असते.त्याच्या परिणाम योग्य होत नाही. 


एका वर्गामध्ये सर्वच विद्यार्थी अध्ययन करत असतात व शिक्षक अध्यापन करत असतात या अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून सर्वच विद्यार्थी सारख्याच दर्जाचे अध्ययन करेल असे सांगता येत नाही. याकरिता आपल्या मुलातील सुप्त गुण ओळखून त्या दिशेने त्याची वाटचाल करण्या स पालक या नात्याने आपण मार्ग मोकळा करून द्या. आवश्यक वेळेस आवश्यक सूचना जरूर करा. पण आपल्या शेजारच्या मुलाला बारावीच्या परीक्षेत 99% मार्क प्राप्त झाले आहेत आणि तुला 35 टक्के मार्क मिळून पास झाला आहे असे म्हणून तुलना करू नका. याचा विपरीत परिणाम फार मोठा होतो याची सुस्पष्ट कल्पना पालकांनी समजून घेतली पाहिजे. 34 मार्क मिळणारा नापास होतो तर 35 मार्काला पास होतो. पण 34 मार्क प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वेगळे सुप्त गुण असतात आणि 35 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे सुप्त गुण वेगळे असतात


स्पर्धेत भाग घेतलेले सर्वच स्पर्धक यशस्वी होतील हे सांगता येत नाही. काही स्पर्धेमध्ये यश संपादन करतील. तर काही मुलांना अपयश येऊ शकते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.. महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या परीक्षा देताना हा अनुभव विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवून यश संपादन केलेले भरपूर विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. 

सारांश 

मित्रांनो, या लेखाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण बाजूचे स्पष्टीकरण केले आहेत. या स्पष्टीकरणाचा सविस्तर अर्थ जाणून घ्या. यासाठी सत्यशाही बाबांचे विचार मुलांसमोर अवश्य मांडा. आपण जे बोलणार आहे .ते खरंच खरी आहे काय? किंवा गरजेचे आहे काय ?आपल्या बोलण्याने एक माणूस दुःखी तर होणार नाही ना ? याची काळजी घेऊन शांत मनाने विचार करून मुलात सुधारणा होणारच आहे. हे सकारात्मक विचार जर पालकांनी मुलाच्या संपर्कात असताना मुलांना समृद्ध व्यक्तिमत्त्वाचे बीज त्याच्या बालपणातच आहेत. बालपण ही त्याची एक जुनी शिदोरी आहेत पण काळ नवा आहेत. आपले स्वतःचे बालपण पालकांनी आठवण मुलांना योग्य वागणूक द्या. जुन्या काळातील आणि नवीन काळातील होणाऱ्या पिढीतील बदल लक्षात घेऊन कुटुंबात आपल्या मुलांना आवश्यक आधार द्या. बाल वयात त्याला आधार देण्याची गरज ही पालकाची असते कारण बालकाचे यश हे त्याच्या बालपणातच त्याच्या मनावर पालकांनी रुजवल्यास आणि आपल्या मुलाचे गैरसमज दूर केल्यास आपला पाल्य भावी जीवनात यशस्वी वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो आपण लेक वाचल्यानंतर आपणास या लेखाच्या संदर्भात काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्यास किंवा आपल्या काही प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असेल तर ब्लॉगच्या ब्लॉग पोस्ट कॉमेंट बॉक्स मध्ये ब्लॉगरला आवश्यक सूचना, त्रुटी आणि प्रतिक्रिया जरूर कळवा. आपण कळवलेल्या त्रुटी योग्य असल्यास त्वरित सुधारणा करून लेख अद्यावत करण्यात येईल.

FAQ

1) बालकाचे समृद्ध व्यक्तिमत्व कोठे आढळून येते?

उत्तर-बालकाचे समृद्ध व्यक्तिमत्व त्याच्या बालपणा त आढळून येते.

2) लहान वया त मुलांना कशाची गरज असते?

उत्तर-लहान वयात मुलाला पालकाच्या समुपदेशनाची गरज असते.

3) मुलाच्या भावना आणि शारीरिक भावना याबाबत केंव्हा जाणीव निर्माण होते?

उत्तर-किशोरवयीन वयात जाणीव होते.

4) किशोरवयीन मुलाचे वय किती असते? 

उत्तर-11 ते 16 वर्ष हे किशोरवयीन वय असते.

5) भिंतीवर चित्र काढणारा मुलगा चित्रकारच होईल का?

उत्तर-भिंतीवर चित्र काढणारा मुलगा चित्रकार होईल हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे पण त्याच्या अंगामध्ये जे सुप्त गुण असेल त्यामध्ये त्याने आपल्या सुप्त गुणाच्या विकासाच्या आधारे त्या क्षेत्रात तो परिपूर्ण बनेल. 


अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख वाचा. 


बोर्ड परीक्षा मराठी माहिती 


अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील व्हिडिओ पाहू शकता.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.