Type Here to Get Search Results !

लोकसंख्या मराठी माहिती | Population Marathi Mahiti

 लोकसंख्या मराठी माहिती | Population Marathi Mahiti 


प्रस्तावना 


Population Marathi Mahiti मित्रांनो आज आपण लोकसंख्या मराठी माहिती या विषयावर नाविन्यपूर्ण माहिती चा अभ्यास करू या .आपणास हा लेख आवडल्यास आपण आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक वाचण्यासाठी शेअर करावा. मित्रांनो ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धेसाठी उपयुक्त असल्यामुळे यासंदर्भात लेख लिहिण्याचे ब्लॉगरने प्रयत्न केले आहेत.


मित्रांनो,केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने दर दहा वर्षांनी देशाची लोकसंख्या किती आहे? हे जाणून घेण्यासाठी लोकसंख्या म्हणजेच जनगणना करते. या जनगणनेच्या आधारे सर्व प्रकारचे माहितीचे स्पष्टीकरण जनगणनेत दिलेले असते. म्हणून आपण आज लोकसंख्या मराठी माहिती या विषयावर मार्गदर्शनपर लेख लिहिण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे.


मित्रांनो, आज आपण लोकसंख्या मराठी माहिती यासंदर्भामध्ये जनगणना 2001 ते 2011 कालखंडातील जनगणनेच्या बाबत माहिती या लेखातून प्राप्त करणार आहोत. माहितीमध्ये सर्व घटकांना महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आलेले आहेत. ही जनगणना मालिकेतील पंधरावी जनगणना लोकसंख्येच्या संदर्भात केलेली आहेतयाबाबत पुढील प्रमाणे सविस्तर माहिती चा अभ्यास करूया. 

Population Marathi Mahiti
 Population Marathi Mahiti 



Population Marathi Mahit(toc)


लोकसंख्या मराठी माहिती 


भारत सरकारने सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाच्या  सरकारच्या  सरसहकार्य ने 21 व्या शतकात 2001 ते 2011 मध्ये करण्यात आलेल्या या कालखंडामध्ये दहा वर्षांमधील पंधरावी जनगणना करण्यात आली होती. या केलेल्या जनगणनेच्या संदर्भात पुढील प्रमाणे माहिती आपण या लेखातून अभ्यासू या.


लोकसंख्या बाबत व्यापक स्वरूपात जनगणना 


जनगणनेच्या आधारे लोकसंख्येच्या बाबत सविस्तर माहिती जनगणना पूर्ण केल्यानंतर आपणास प्राप्त झाली आहे त्यानुसार या योजने बाबत सविस्तर व्यापक स्वरूपात केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे माहिती उपलब्ध जनगणनेच्या आधारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.


भारतीय जनगणना सन 2011 


भारताने 2011 मध्ये संपूर्ण देशात सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची पंधरावी जनगणना पूर्ण केली. या जनगणनेच्या आधारे प्राप्त झालेली महत्वपूर्ण माहिती जनतेसाठी शासनाने उपलब्ध करून दिले.' Population Marathi Mahiti ' या जनगणना नुसार लोकसंख्येचे प्रमाण पुढील प्रमाणे या लेखात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत. 


भारताची लोकसंख्या सन 2011 


भारताच्या लोकसंख्येची जन गणना 2011 मध्ये पूर्ण झाल्यानंतर लोकसंख्येच्या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण भारत सरकारने संपूर्ण भारतीय जनतेसाठी वेगवेगळ्या मीडियाच्या मार्फत प्रसिद्ध करून लोकसंख्या वाढीवर आळा घालावा यासाठी सरकार काय प्रयत्न करतात हे सुद्धा महत्त्वाचे आहेत.  म्हणूनच भारत सरकारने फक्त दोन अपत्य बाबत परिपत्रक सुद्धा निर्गमित केले आहे 


जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या वाढ 


सन 2011 मध्ये केलेल्या जनगणनेच्या आधारे संपूर्ण भारताची लोकसंख्या 1124 कोटी एवढी होती. ही लोकसंख्या व्यापक स्वरूपात जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या ठरली. Population Marathi Mahitiया लोकसंख्या मध्ये स्त्री व पुरुष लोकसंख्येचे शतमान प्रमाण समाविष्ट केलेले आहे .


पुरुषाचे सन्मान प्रमाण 

झालेल्या जनगणनेनुसार 2011 मध्ये एकूण लोकसंख्या पैकी पुरुषांचे शतमान प्रमाण 59. 90% आढळून आले.


स्त्रियांचे शतमान प्रमाण


जनगणनेच्या आधारे प्राप्त झालेल्या एकूण लोकसंख्या पैकी स्त्रियांचे यांचे जनगणनेनुसार शतमान प्रमाण 48. 1% एवढे आढळून आले. पुरुषाच्या मानाने स्त्रियांचे शतमान प्रमाण कमी प्रमाणात आहे. याचाच अर्थ स्त्रियांचे जन्मदर प्रमाण पुरुषाच्या संख्येच्या मानाने घट त चालले आहे. या जन्म दरात किती फरक आहे ते खालील प्रमाणे जाणून घेऊया.

पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील लोकसंख्येत तफावत

पुरुषांचे लोकसंख्येचे शतमान प्रमाण जास्त असून स्त्रियांपेक्षा पुरुषाचे प्रमाण 11. 80% आढळून आले आहेत. दर पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण कमी कमी होत आहे. याचा भविष्यात समान प्रमाण नसल्यामुळे विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

लोकसंख्या वृद्धी दर घट


महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या जनगणनेच्या प्रमाणात दश वार्षिक लोकसंख्या  वृद्ध दर 2001 – 2011 या कालखंडामध्ये किंवा कालावधीमध्ये काल 6.7% अंकांनी कमी झाला झाला . इतरही घटक राज्यात तशाच प्रकारची परिस्थिती जनगणना  तून पुढे आली आहे.भारतामध्ये  राष्ट्रीय पातळीवर लोकसंख्या जनगणना प्रमाण लक्षात घेता असे दिसून आले की, 3.8 %  अंकांनीवृद्धी दर गठीत झाला आहे . राज्यांमध्ये दश वार्षिक लोकसंख्या वृद्धी दर मध्ये नोंदवली गेलेली ही सार्वत्रिक माहितीच्या आधारे स्पष्टीकरण लक्षात घेतले तर पूर्वी लोकसंख्या वाढीचा दर जास्त होता आता मात्र सर्वसामान्य लोकांना लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम दिसून आल्यामुळे प्रत्येक कुटुंब आता आम्ही दोन आणि आमचे दोन अपत्य या संकल्पनेने विचार करून लोकांनी स्वतःहून जन्मदर मध्ये घट केलेली आहे.त्यामुळे  आपोआपच संपूर्ण भारताची लोकसंख्या पूर्वीसारखी वाढताना दिसून येत नाही तरीसुद्धा दरवर्षी लोकसंख्या वाढतच चालली असल्यामुळे शासनाने लोकसंख्या वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय निर्गमित करून लोकसंख्या वाढीला आळा घातला आहे.


देशाच्या दृष्टीने लोकसंख्या एक साधन संपदा


मित्रांनो,संपूर्ण आपल्या देशाचा सर्व क्षेत्रातील विकासाचा विचार करता आणि त्याचं बरोबर लोकसंख्या वाढीचा विचार करता अनेक प्रश्न सरकार समोर किंवा भारत सरकार समोर निर्माण झाले आहेत 


संपूर्ण देशाचा विचार करता भारतीय लोकसंख्या ही एक नैसर्गिक संसाधन असल्याचे नमूद केले आहेत. देशाच्या लोकसंख्या ची गुणवत्ता आणि कार्यक्षमता कशी आहे हे सुद्धा लोकसंख्या वाढीच्या संदर्भात पाहणे आवश्यक ठरते आहे. देशातील लोकसंख्या ही सर्व घटक राज्यात साक्षर असेल तर लोके सुशिक्षित व सुजन नागरिक म्हणून देशाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण घटक म्हणून नैसर्गिक संसाधन ठरत आहे. 

भारतीय लोकसंख्येची सतत होणारी वाढ नागरिकांची गुणवत्ता , कार्यक्षमता, साक्षरता, बुद्धिमत्ता आणि आर्थिक घटक यावर अवलंबून असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. जगातील कोणत्याही देशातील विचार केला तर तेथील लोकसंख्येची गुणवत्ता आणि वाढ ही त्या देशामध्ये असणारे उद्योगधंदे, शेती, व्यापार, खाणकाम, संरक्षणासाठी आणि व्यवसायाच झालेली प्रगती याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जगातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर अवलंबून देशाची प्रगती अवलंबून असते असते.

 लोकसंख्येने जास्त असणाऱ्या देशांमध्ये देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून मानवी शक्ती म्हणून फार मोठ्या प्रमाणात आजच्या युगात आवश्यक ठरत त्यामुळे लहान देशांमध्ये मानवी शक्ती कमी असल्यामुळे तेथे सैनिक सुद्धा कमी असते आणि अशा देशाला इतर देशा पासून बचाव करण्यासाठी मानव संसाधन शक्ती उपलब्ध होत नाही. 

जगात चीन हा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश असून तेथे सैनिक शक्ती प्रचंड प्रमाणात मानव संसाधन म्हणून चीनला त्याचा फायदा होतो. तसेच आपल्या भारताची लोकसंख्या जगातील सर्व देशांपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारताच्या सर्व सीमेवर भरपूर सैनिक मानव संसाधन शक्ती म्हणून सरकारने तैनात केले आहेत. त्यामुळेच तर भारताला इतर देशाकडून होणारा संरक्षणाचा प्रश्न केव्हा निर्माण होईल हे सांगता येत नाही. भारत-पाक सीमेवर असा प्रकार जास्त असल्यामुळे तेथे लोकसंख्येचे सैनिकी स्वरूपात सर्वात जास्त भारताने अत्याधुनिक साहित्य सह सैनिक तैनात केलेले आहे.


महाराष्ट्रातील मानवी संसाधने 


मित्रांनो, आता आपण आपल्या घटक राज्याकडे माहिती प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्राकडे एक दृष्टिक्षेप टाकूया. 

महाराष्ट्रातील मानवी संसाधन शक्ती संदर्भात सविस्तर विचार या लेखात पुढील प्रमाणे करण्यात आला आहेत.

इतर घटक राज्याच्या मानाने महाराष्ट्रात संसाधने भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. आपल्या महाराष्ट्रातील पाणी, महाराष्ट्रातील भूमी स्थिती, महाराष्ट्रातील वने संपादन साधने, त्याचबरोबर महाराष्ट्रातील खनिजे  आणि प्राणी प्राणी संसाधने याबाबत सविस्तर विचार केला असता ही संसाधने समान प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात आढळून येत काही भागात डोंगराळ प्रदेश असतो तर काही भागात सपाट प्रदेश असतो. तर काही भागांमध्ये वाळवंट ही सुद्धा असते. महाराष्ट्रातील संसाधने वितरण अत्यंत असमान आहे. या संसाधना ना  महत्त्व केवळ मानव मुळे प्राप्त झाल्याचे आढळून आले आहे. 


महाराष्ट्रातील लोकसंख्या 


संपूर्ण देशात पंधरा वी लोकसंख्येच्या बाबत जनगणना झाली असता पुढील आकडेवारी महाराष्ट्रात जनगणना आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य हे भारतातील लोकसंख्येच्या इतर घटक राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे घटक राज्य आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार भारतात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असल्याचे जनगणना वरून आढळून आले आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11 कोटी 23 लाख 72 हजार 9 72 (112372975) एवढी असल्याचे जनगणना तून निष्पन्न झाले. म्हणूनच संपूर्ण घटक राज्यात महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक आहे. भारतातील एकूण लोकसंख्येच्या पैकी महाराष्ट्रात 9. 29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. असे सिद्ध झाले आहे.यामध्ये एका 51.9 % पुरुष व 48. 1% स्त्रिया आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9. 29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. 


महाराष्ट्रातील लोकसंख्येची वाढ

संयुक्त महाराष्ट्रातून महाराष्ट्राचा नवीन राष्ट्र म्हणून एक मे 1960 रोजी स्थापना झाली आणि त्या स्थापना नुसार महाराष्ट्राची स्थळ निर्मिती निश्चित झाली. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर एक मे 1960 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे फक्त चार कोटी त्यावेळी होती. तेव्हापासून तर 50 वर्षात महाराष्ट्रामध्ये महत्त्वपूर्ण विकासाने वेग घेतला. 

महाराष्ट्र इतर घटक राज्याच्या मानाने विकसित घटक राज्य म्हणून भारतात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त केलेले घटक राज्य आहेत. कारण महाराष्ट्राच्या स्थापनेपासून तर 2011 पर्यंत 50 वर्षात अनेक प्रकारचे महाराष्ट्रात उद्योगधंदे निर्माण झाले. व्यापारात सुद्धा भरपूर वाढ झाली. वाहतूक व्यवस्था मध्ये भरपूर प्रमाणात दळणवळण सुव्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यात आली. वाहतूक आणि पर्यटन यामध्ये तर प्रचंड प्रमाणात महाराष्ट्र विकसित घटक राज्य असल्याचे जनगणना तून दिसून आले. महाराष्ट्रात झालेल्या पन्नास वर्षाच्या अवधी मध्ये विकसित घटक राज्य म्हणून संपन्न झाले आहे. शेतीचा ही भरपूर प्रमाणात विकास झाल्यामुळे मानवी जीवनात महाराष्ट्रात स्थिरता निर्माण झाली.

 महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे विकसित झाल्यामुळे बाहेरच्या घटक राज्यातून म्हणजेच सर्व घटक राज्यातून लोक अविकसित असल्यामुळे महाराष्ट्रात हळूहळू स्थलांतरित मुख्य शहरात झाले. बाहेरच्या घटक राज्यातून अनेक रोजगार महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यामुळे महाराष्ट्राची लोकसंख्या सतत इतर घटक राज्याच्या मानाने दरवर्षी वाढवताना दिसून येत आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात बाहेरून आलेले व्यवसाय करण्यासाठी उद्योगपती व्यापारी आणि लहान उद्योग पती महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. यामुळे महाराष्ट्राची लोकसंख्या सध्या वाढलेली आहेत.


महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीचा वेग 


महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये निरक्षरता फार मोठ्या प्रमाणात आहे. लोकांमध्ये असलेले दारिद्र्याचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये कुटुंब नियोजनाचा भरपूर प्रमाणात अपुरा प्रचार झाला आहे. कुटुंब कल्याण नियोजन याकडे महाराष्ट्रीयन जनतेने दुर्लक्ष केले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जन्मदर वाढला आहेत. जेवढ्या प्रमाणात दर वाढला आहेत तेवढ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा मुळे , अन्नधान्याचा पुरवठा आणि महाराष्ट्रात आलेल्या निर्णया रोगांच्या साथीवर झालेले वैद्यकीय सुविधेमुळे नियंत्रण याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये जन्म दरात वाढ झाली आणि मृत्यु दर घट झाली त्याचा परिणाम महाराष्ट्रातील लोकसंख्या भारतातील इतर घटक राज्याच्या मानाने वेगाने वाढ झाली आहे.मित्रांनो  महाराष्ट्र या घटक राज्यांच्या लोकसंख्या वाढीचा वेग भारताच्या लोकसंख्या वाढी पेक्षा प्रत्यक्षात कमी प्रमाणात आहे.


महाराष्ट्र राज्य  1960 ते 1971 चा कालखंड 


 महाराष्ट्र राज्यात लोक संख्या वृद्धी दर 27.45% एवढ्या प्रमाणात 1960 ते 19 71 एवढा होता होता. त्याचवेळी आपल्या देशाचा म्हणजे भारताचा लोकसंख्या वृद्धी दर हा  24.8% होता. वरील आकडेवारी वर एक दृष्टिक्षेप टाकला असता महाराष्ट्रातील लोकसंख्या वृद्धीदर कमी आढळून आला आहे. 


महाराष्ट्र राज्य 1981 ते 1991 चा कालखंड 


मित्रांनो उपरोक्त कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्या वृद्धी दर 25.73% इतका आढळून आला होता. याच कालखंडामध्ये आपल्या या भारताचा लोकसंख्या वाढ वृद्धी दर 23. 85% इतका आढळून आला या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या वाढीचा वृद्धीदर भारतापेक्षा जास्त दिसून आला याची मुख्य कारण म्हणजे बाहेरील घटक राज्यातून निरनिराळे व्यवसाय करण्यासाठी आलेले लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यामुळे वाढल्याचे आढळून आले आहे. 


महाराष्ट्र राज्य 2001 ते 2011 चा कालखंड 


महाराष्ट्रामध्ये 2001 ते 2011 चा कालखंड पाहिला असता महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीचा दर वेग 15.99% आढळून आला आहे. हे आकडे जनगणनेनुसार प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सर्वात जास्त महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर ठाणे जिल्ह्यात आढळून आला. ठाणे जिल्ह्यामध्ये या कालखंडामध्ये ठाण्याचा लोकसंख्या वाढ दर 35. 94% असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सर्वात कमी लोकसंख्या वृद्धीदर - 7. 57% असल्याची नोंद जनगणना तून पुढे आली. हा वृद्धीदर वजा किंवा ऋण स्वरूपात आढळून आला. याच कालखंडामध्ये महाराष्ट्रातील प्रथमच तीन शहराचा लोकसंख्या वाढीचा दर ऋणात्मक दृष्टीस आला. ते तीन महाराष्ट्रातील मुख्य जिल्हे म्हणजे मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे होत.


लोकसंख्या वितरण परिणामकारक मुख्य घटक


महाराष्ट्र या आपल्या घटक राज्यात लोकसंख्येचे प्रमाण वितरण पाहिले असता वितरण असमान दिसून येते. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण मध्ये लोकसंख्या ची वाढ झालेली दिसून येते. औरंगाबाद कोकण, आणि नागपूर विभागामध्ये लोकसंख्या विरळ प्रमाणात विभागलेली दिसून येते. महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यातील  सर्वाधिक लोकसंख्या चे प्रमाण दिसून येते. पुणे जिल्ह्यात 9.84% लोकसंख्या वृद्धी चा दर दिसून आला आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या वृद्धीदर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात दृष्टीस आला आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसंख्या वृद्धी दर 0.08% आढळून आला आहे लोकसंख्या वाढीचे वितरणाचे प्रमाण हे मुख्यत्वे करून घटक राज्यातील नैसर्गिक आर्थिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कशा स्वरूपाची आहे यावर हे परिणाम आणि वितरण झालेले दिसून येते. खालील काही घटकांच्या पुढील प्रमाणे माहिती मित्रांनो या लेखामार्फत पाहूया


1)  नैसर्गिक घटक :

महाराष्ट्र या घटक राज्यातील पश्चिम भागात आणि दक्षिण भागात त्याच बरोबर उत्तर सह्याद्री पर्वती भागात नैसर्गिक दृष्ट्या पसरलेला महाराष्ट्र आढळून येतो. येथे नैसर्गिक घटक जास्त प्रमाणात उपलब्ध आहेत.सह्याद्री पर्वत आणि या पर्वतातील डोंगर रांगा तून भरपूर प्रमाणात नैसर्गिक घटक आढळून येतात. येथील नैसर्गिक घटका तून नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भरपूर प्रमाणात उत्पन्न सुद्धा प्राप्त होते. निघणाऱ्या डोंगर रांगे मुळे तसेच कोकणा या प्रदेशामध्ये जमिनीचा भाग म्हणजेच भूपृष्ठाचा भाग मध्ये उंच-सखल भूप्रदेश व दाट वने असल्याचे दिसून येते. व तसेच पूर्व महाराष्ट्रातील  वनक्षेत्र जास्त असल्याने तेथे लोकसंख्या कमी आढळते दिसून आले आहे. महाराष्ट्र राज्यातील पठारी भागात सह्याद्री पर्वताच्या पूर्व कडील भागात मैदानी प्रदेश जास्त असल्यामुळे तेथे नद्या ची ही प्रमाण जास्त आहेत शेतकऱ्यांच्या पिकांच्या दृष्टिकोनातून मैदानी प्रदेशातील नद्यांश मुळे तेथील हवामान शेतीसाठी उपयुक्त असल्यामुळे या नद्यांच्या काठावर दाट वस्ती निर्माण झाल्यामुळे या नद्यांच्या काठी राहतात कारण तेथे शेतीला सुपीक वातावरण प्राप्त झालेले असते, त्यामुळे अशा नद्यांच्या मैदानी प्रदेशात दाट लोकसंख्या आढळून आली आहेत हा ही एक परिणामकारक महत्त्वाचा घटक याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.


2) आर्थिक घटक :


मित्रांनो या लेखाच्या अंतर्गत आर्थिक घटकाचा ही विचार होणे महत्त्वाचे असल्यामुळे आपण या घटकाबाबत लेखातून स्पष्टपणे माहिती नमूद करत आहेत. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पुणे- मुंबई हा भाग होय. त्याचप्रमाणे याच विभागात कोल्हापूर ते इचलकरंजी हा विभाग महत्वपूर्ण आहे त्याच बरोबर नागपूर जालना व नागपूर हा ही प्रदेश महत्वपूर्ण आहे.

त्यामुळे या भागामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्राची आर्थिक प्रगती झालेली आहे म्हणून या भागामध्ये किंवा या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात अनेक भागातून लोक स्थलांतरित होऊन व्यवसाय आणि उद्योगधंदे करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी ,औरंगाबाद ,जालना आणि नागपूर या प्रदेशात वाहतूक व उद्योगधंदे आणि व्यापार यांचा एवढा झपाट्याने विकास झाला आहे की त्याबाबत आपण विचारही करू शकत नाही. सर्वात जास्त झपाट्याने महाराष्ट्रात वाढलेले शहर म्हणजे औरंगाबाद. यामुळे उपरोक्त दर्शविलेल्या जिल्ह्यांमध्ये व्यवसायाच्या दृष्टिकोनातून लोक स्थलांतरित झाल्यामुळे या भागातील आर्थिक घटकामुळे लोकसंख्या जास्त किंवा दाट असल्याचे आढळून येते आहे. तसेच या भागामध्ये जलसिंचनाच्या विविध योजना शासनामार्फत राबवल्या मुळे शेतीचा ही विकास भरपूर प्रमाणात महाराष्ट्रात झालेला आहेत. त्याचबरोबर पूर्व महाराष्ट्रात आर्थिक दृष्टीने विचार करता अमरावती वर्धा नागपूर आणि यवतमाळ या भागामध्ये खनिज संपत्ती भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याचे आढळून आल्यामुळे येथेही सुद्धा लोकसंख्या दाट असल्याचे जनगणना नंतर दिसून आले आहेत. उद्योग व्यापार आणि व्यवसाय हे सर्व घटक लोकसंख्या वाढीवर आर्थिक घटक म्हणून परिणामकारक ठरले आहेत.


लोकसंख्येची रचना 


महाराष्ट्रातील लोकसंख्येची रचना पाहता शहरी व ग्रामीण अशा स्वरूपात दिसून येते. त्याचबरोबर लिंगाचे प्रमाण, वयाची स्वरचना, व्यावसायिक विकास, साक्षरता यानुसार महाराष्ट्रात ग्रामीण भागाकडून शहरी भागात लोकसंख्या लोकसंख्येच्या स्वरचना प्रमाणे सर्वात जास्त आढळून येत आहेत. भविष्यकाळात तर असे दिसून येईल की ग्रामीण भागामध्ये लोक सापडणार नाहीत. सर्व लोक शहराकडे नोकरी धंदे आणि व्यवसाय त्याचबरोबर व्यापार या सर्व कारणास्तव शहरीकरणाचा झपाट्याने वेग वाढत आहे."Population Marathi Mahiti"भविष्यकाळात शहरात मानवाला पाय ठेवण्यास सुद्धा जागा मिळते किंवा नाही अशी शंका आता दिसून येत आहेत81 म्हणून या घटकांचा विचार लोकसंख्या वाढीवर नक्कीच झालेला दिसून येतो.


वय संरचना 


वय संरचना मध्ये लोकसंख्येचे वर्गीकरण खालील प्रमुख विभागात करण्यात येते 

१) पहिला गट म्हणजे 00 ते 14 वर्षे हा गट होय. हा गट प्रमुख ने लहान मुले आणि बालकांचा वयोगट असल्यामुळे हा वयोगट परावलंबी आहे या गटाला त्यांच्या आई-वडिलांवर अवलंबून राहावे लागते. या वयोगट चे कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसते पण संख्या जन्मदार मुळे सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचाही परिणाम लोकसंख्या वाढीवर झालेला आहे. 

२) वयोमानानुसार दुसरा गट म्हणजे साठ वर्ष वयापेक्षा जास्त असणाऱ्या लोकांचा वयोगट आहे. हा वयोगट वृद्ध स्वरूपात आहेत. हा घटक सुद्धा परावलंबी घटक आहे. या घटकाला सुद्धा आपले जीवन जगताना इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या गटाचा विचार करणेही आवश्यक आहे. या गटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या गटाचे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून कोणतेही नियोजन केलेले नसते. लोकसंख्येच्या रचनेमध्ये हा घटक जास्त प्रमाणात आढळून येण्याचे प्रमाण अलीकडे दिसून येत आहेत. 

३) देशात सर्वात महत्त्वाचा कार्यक्षम गट म्हणजे वयानुसार वय वर्ष 15 ते 59 वयाचा असतो. हा घटक कार्यक्षम आहेत. कुटुंबाचे राज्याचे तसेच देशाचे श्रमिक म्हणून उत्पादन करणारे लोक याच वयोगटात आपणास आढळून येते.

ह्या तीन गटांचे वर्गीकरण पोस्ट करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की, लोकसंख्या स्वरचना पाहताना या तिन्ही घटकांचा लोकसंख्या वाढीवर विपरीत परिणाम होत असतो. म्हणून या घटकांचा अर्थशास्त्र या विषयात अभ्यास करण्यात आला आहे लोकसंख्या हे प्रकरणच मुख्य करून अर्थ शास्त्र या विषयाचे एक मुख्य प्रकरण आहे.


महाराष्ट्रात आणि देशात जनगणनेनुसार काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण फक्त 42 टक्के आहे. तर 58% लोक हे परावलंबी असून हे लोक 42% लोकांनी श्रमा तून मिळवलेल्या उत्पन्नावर 58% लोक जगत असतात. ही परिस्थिती 2001 मध्ये आढळून आले. त्याचबरोबर लहान मुलांचे प्रमाण हे 58% पैकी 50% एवढे प्रमाण आहे 

तर वृद्ध लोकांचे 58 टक्के पैकी फक्त 8% टक्के लोक हे वृद्ध असून ते इतरांवर अवलंबून असतात.

जनगणनेच्या 2011 नुसार सुमारे 20 टक्के मुले हे किशोरवयीन आहेत. त्याचबरोबर 15 ते 24 या वयोगटातील सर्वात जास्त किशोरवयीन मुले दिसून येतात. अर्थशास्त्रात हे वय शिक्षण शिकण्याचे असल्यामुळे हाही घटक इतर घटकावर अवलंबून असल्यामुळे परावलंबी च आहे. या घटकांमध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुलांमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये 23 टक्के किशोरवयीन मुले सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहेत त्यानंतर दुसरा क्रमांक हा मुंबई शहराचा असून मुंबई शहरामध्ये किशोरवयीन मुलाची संख्या 16.1% एवढी आहे011 नुसार राज्यातील सुमारे 20% लोकसंख्या किशोरवयीन गटातील (वय 10 ते 19 वर्षे) असून युवा गटाचे वय (वय 15 ते 24 ) प्रमाणही सारखेच आहे.युवक या  लोकसंख्येचे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 20.5% युवक आढळून आलेले आहेत त्याचप्रमाणे सर्वात कमी युवक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवक वर्गाची टक्केवारी 16.5% एवढी आहे.


देशातील 2011 च्या जनगणनेनुसार विचार केला असता महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या ही साठ वर्षे वयोगटातील आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते तर हीच लोकसंख्या 2001 मध्ये 8. 7% टक्केजनगणना 2011 नुसार राज्याची सुमारे 9.9% लोकसंख्या 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय गटातील असून 2001 मध्ये हे प्रमाणात 8.7% होते.राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण 2001 व 2011 करिता अनुक्रमे 7.4% व 8.6% आहे.  राज्यामध्ये 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींची सुमारे 5.12 लाख एक सदस्य कुटुंबे आहेत तर राष्ट्रीय पातळीवर अशा कुटुंबांची संख्या 49. 76 लाख आहे.राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण भागांमध्ये 60 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींचा एक सदस्य कुटुंबांची संख्या अधिक आहे.


सारांश 


लोकसंख्या मराठी माहिती यासंदर्भामध्ये या प्रकरणातून म्हणजेच या लेखातून पंधराव्या जनगणनेच्या संदर्भात प्रथम भारत आणि नंतर महाराष्ट्र राज्य याबाबत लोकसंख्या वाढीचे कमी जास्त असलेले प्रमाण पाहिले असून त्यानुसार सर्वात जास्त प्रमाण कोठे आहे याचाही सुद्धा अभ्यास केला आहे. अर्थशास्त्र विषयाच्या दृष्टिकोनातून तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दृष्टिकोनातून व विविध स्पर्धा परीक्षेच्या संदर्भाने या माहितीच्या आधारावर नेहमी वेगवेगळे प्रश्न परीक्षेत येत असतात या प्रश्नाच्या संदर्भामध्ये उत्तरे शोधण्यासाठी हा लेख विद्यार्थ्यांना उपयुक्त नक्कीच ठरणार आहे. त्या दृष्टिकोनातून संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहेत.

 मित्रांनो आपणास हा लेख आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा. तसेच या लेखाच्या संदर्भाने आपणास काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्यास या ब्लॉग पोस्ट लेखाच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया आणि त्रुटी आवश्यक कळवा. आपल्या त्रुटी आणि प्रतिक्रिया योग्य असल्यास तात्काळ लेखात दुरुस्ती करून लेख अद्यावत करण्यात येईल.


FAQ

1) पंधरा वेळा जनगणनेत भारताची लोकसंख्या किती होती? 

उत्तर-1124 कोटी भारताची लोकसंख्या होती. 


2) पंधराव्या जनगणनेत स्त्रियांची शतमान टक्केवारी किती होती? 

उत्तर पंधराव्या जनगणनेनुसार स्त्रियांची शेतमाल टक्केवारी 48.10% एवढी होती.

3) पंधराव्या जनगणनेनुसार पुरुषांची शतमान टक्केवारी किती होती?

उत्तर-पंधराव्या जनगणनेनुसार पुरुषाची शेतमाल टक्केवारी 59. 90% एवढी होती.

4) महाराष्ट्राची 15 व्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती होती? 

उत्तर -महाराष्ट्राची 15 व्या जनगणनेनुसार लोकसंख्या 11 कोटी 72 लाख 9 72 एवढी होती. 


5) महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचे प्रमाण भारतात कितव्या क्रमांकावर आहेत? 

भारतात महाराष्ट्र राज्य हे लोकसंख्या वाढीच्या संदर्भात दुसऱ्या क्रमांकाचे घटक राज्य आहे. 


अधिक माहितीसाठी खालील लेख आवश्यक वाचा.


शालेय अभिलेखे मराठी माहिती



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.