Type Here to Get Search Results !

राज्यसभा मराठी माहिती | Rajya Sabha Marathi Mahiti

 राज्यसभा मराठी माहिती |  Rajya Sabha Marathi Mahiti 


प्रस्तावना 

Rajya Sabha Marathi Mahiti  मित्रांनो,  आज आपण संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा मराठी माहिती या विषयावर ब्लॉग पोस्ट साठी लेख याबाबत सविस्तर माहिती या लेखाद्वारे अभ्यास पाहूया. आपणास हा लेख आवडल्यास आपल्या वाचक मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करावा. 


मित्रांनो, भारतीय कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. संसदेची दोन सभागृहे आहेत. संसदेचे वरिष्ठ सभागृह पण दुसऱ्या क्रमांकाचे सभागृह म्हणजे राज्यसभा होयराज्यसभा सभागृहाची माहिती सविस्तर स्पष्टपणे या लेखात नमूद करण्यात आली आहे. 


मित्रांनो, संसदेच्या दोन्ही सभागृह पैकी राज्यसभा हे एक महत्त्वपूर्ण सभागृह आहेत. हे सभागृह राज्यांचे प्रतिनिधित्व व्यक्त करणारे सभागृह म्हणून ओळखले जाते. तर लोकसभा हे लोकांचे सभागृह म्हणून ओळखले जाते. आजच्या लेखात आपण फक्त राज्यांचे प्रतिनिधित्व व्यक्त करणाऱ्या सभागृह बाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहू 

Rajya Sabha Marathi Mahiti
 Rajya Sabha Marathi Mahiti 



Rajya Sabha Marathi Mahiti(toc)


राज्यसभा मराठी माहिती 


मित्रांनो आता आपण या ब्लॉग पोस्ट लेखाद्वारे राज्यसभा या सभागृह विषयी संसदेचे वरिष्ठ पण दुय्यम दर्जाचे असणारे सभागृह म्हणजे राज्यसभा होय. राज्यसभा ला वरिष्ठ दर्जा जरी प्राप्त झाला असेल तरीसुद्धा या सभागृहाला द्वितीय सभागृह म्हणून ओळखले जाते.


राज्यसभेची निर्मिती 


भारतीय घटनाकार ने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेनुसार हे सभागृह राज्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्यघटनेच्या कलमानुसार निर्माण केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटन किंवा इंग्लंड देशाचा राज्यघटनेचा संपूर्ण अभ्यास करून इंग्लंडच्या संविधान प्रमाणे भारतासाठी संसद हे एक कायदे करणारे मंडळ भारतीय राज्यघटनेत निर्माण केले आहे. असेल. भारतीय कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. आणि या संसदेचे दोन सभागृह म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा होय. याबाबत इंग्लंडच्या राज्यघटनेच्या आधारे भारतीय संसदेची निर्मिती केली आहे. यापैकी या अगोदर आपण लोकसभा या सभागृह मध्ये बाबत सविस्तर माहिती अभ्यासली आहेत . या लेखात आपण राज्यसभा या सभागृह बाबत माहिती अभ्यासणार आहोत.


राज्यसभेची पहिली बैठक


भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये कौन्सिल ऑफ स्टेटस म्हणजेच राज्यसभेची निर्मिती 03 एप्रिल 1952 मध्ये करण्यात आली आहेत . भारतीय राज्यसभेची पहिली बैठक  13 मे 1952 रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली झाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये 23 ऑगस्ट 1954 मध्ये ह्या सभेला कौन्सिल ऑफ स्टेट या नावाने उद्देशी त करून राज्यसभा म्हणून ओळखले जाईल .अशा प्रकारे पहिल्याच सभेत राज्यसभा म्हणून वरिष्ठ सभागृह पण दुसऱ्या क्रमांकाचे दुय्यम सभा गृह म्हणून घोषणा केली. प्रथम सभेमध्ये राज्यसभेची 216 सदस्य अस्तित्वात होते. 'Rajya Sabha Marathi Mahiti ' 'राज्यसभेच्या सदस्याला खासदार म्हणून ओळखले जाते.


राज्यसभेची रचना


भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 80 नुसार राज्यसभेची सदस्य संख्या  निर्धारित केलेली आहे.

1) प्रथम निर्मितीच्या वेळेस राज्यसभेची सदस्य संख्या 216 एवढी होती. 

2) आज राज्यसभेची सदस्य संख्या 250 एवढी निश्चित केली आहे.

3) राज्यसभा हे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ सभागृह आहे.

4) राज्यसभेच्या 250 सदस्य पैकी घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून 238 सदस्य निवडले जातात.

5) केंद्रशासित प्रदेश दिल्ली व पांडिचेरी या प्रदेशातून दोन सदस्य राज्यसभेवर निवडले जातात हे सदस्य 238 मध्येच समाविष्ट करण्यात आले आहेत.

6) राज्यसभेच्या 250 सदस्य पैकी 12 सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने राष्ट्रपती दिला आहे. म्हणजेच राष्ट्रपतीला राज्यसभेवर 12 सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार आहे. 12 सदस्य हे नामनिर्देशित सदस्य म्हणून ओळखण्यात येतात . या बारा सदस्यांची नामनिर्देशित नियुक्ती स्वतः राष्ट्रपती खालील क्षेत्रातून नियुक्ती करतो.

7) देशातील घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून महत्वपूर्ण विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतो. भारतीय कला क्षेत्रा त महत्वपूर्ण काम करणारे, साहित्य मध्ये उल्लेखनीय काम करणारे साहित्यिक त्याच बरोबर क्रीडाक्षेत्र, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातून उत्कृष्ट कार्य करणारे व्यक्ती राष्ट्रपती नियुक्त करतो त्याचे मुख्य कारण असे आहे की वरिष्ठ सभागृहामध्ये अनुभवी व्यक्ती असणे आवश्यक असते. राज्यसभेत अनुभवी लोकांचा ज्ञानाचा फायदा देशाला होणे आवश्यक असल्यामुळे संबंधित क्षेत्रातून या व्यक्तीची नियुक्ती केली जाते.कला साहित्य विज्ञान समाज सेवा क्षेत्रातील विशेष अनुभवी व्यक्ती पात्र असतो.

8) भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट क्रमांक चार मध्ये अशा प्रकारे स्पष्टपणे नमूद केले आहे की, विधानसभेतून राज्यसभा सदस्य निवडून येतील. सध्या राज्यसभेवर 245 सदस्य भरलेले आहेत. राज्यसभेच्या पाच जागा सध्या रिक्त आहे.

9) राज्यसभेवर महाराष्ट्रातून 19 सदस्य निवडून पाठवले जातात. हे 19 सदस्य विधानसभा सदस्य निवडून पाठवतात.


कायम सभागृह 


मित्रांनो, अनेक परीक्षेसाठी राज्यसभा या सभागृह वर आधारित महत्त्वाचा प्रश्न नेहमी विचारला जातो. तो प्रश्न म्हणजे पुढील प्रमाणे होय.

प्रश्न-राज्यसभा ला कायम सभा असे का म्हणतात? 

उत्तर- संसदेच्या दोन सभागृह पैकी राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. या सभागृहाचे कधीच पूर्णपणे विसर्जन होत नाही . एकूण सदस्य पैकी दर दोन वर्षांनी एक तृतीयांश राज्यसभा सदस्य निवृत्त आणि निवृत्त झालेल्या एक तृतीयांश सदस्य पुन्हा त्वरित राष्ट्रपती नियुक्त करत असतो. त्यामुळे या सभागृहाचे कधीही विसर्जन होत नाही म्हणून या सभागृहाला कायम सभा गृह असे म्हटले जाते.राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून हे सभागृह कायम आहेत याची कधी विसर्जन होत तर संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा या सभागृहाचे दर पाच वर्षांनी विसर्जन होते .दर पाच वर्षांनी लोकसभेच्या सदस्यांची पाच वर्षा करिता सदस्य म्हणून लोकांकडून प्रत्यक्षपणे निवडणुकीद्वारे लोकसभा सदस्य निवडून लोकसभेवर पाठवले जातात 


लोकसभा व राज्यसभा फरक 


लोकसभा हे लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. तर राज्यसभा हे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहेत. राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक पद्धत अप्रत्यक्ष आहे. राज्यसभेवर निवडून आलेले आणि नियुक्त केलेले दोन्ही प्रकारचे सदस्य अस्तित्वात असतात. लोकसभेवर प्रत्यक्ष मतदान पद्धतीने लोकांनी त्यांचे प्रतिनिधी निवडून पाठवतात.राज्यसभेच्या प्रत्येक एका सदस्याचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो तर लोकसभेच्या सर्व सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो. लोकसभेवर अँग्लो इंडियन समाजाचे सदस्य नियुक्त करण्याचा अधिकार यापूर्वी अस्तित्वात होता मात्र आता हा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या  कलमात दुरुस्ती करून संपुष्टात आणला आहे.


राज्यसभा सदस्य निवडणूक पद्धत 


भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह असणारे राज्यसभा हे आहे. या सभागृहाची निवडणूक पद्धत अप्रत्यक्ष पद्धत आहे. आपणास हे माहीत असणे आवश्यक आहे की, अप्रत्यक्ष मतदान पद्धत म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तरही येथे देणे उचित होईल. लोकांनी प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने राज्य विधानसभेवर जे सदस्य लोक निवडून पाठवतात. तेच सदस्य राज्यसभेची मतदार असतात. राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार हा विधानसभा सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांनाच आहे. राज्यसभेवर प्रत्यक्ष मतदान पद्धतीने लोकांना राज्यसभा सदस्य निवडून पाठवता येत नाही.राज्यसभेची निवडणूक अप्रत्यक्षपणे राज्य विधानसभेच्या सदस्य द्वारे केली जाते.

राज्यसभा मध्ये केवळ दोन केंद्रशासित प्रदेशात प्रतिनिधित्व प्राप्त आहे. पहिला केंद्रशासित प्रदेश म्हणजे पांडिचेरी होय आणि दुसरा केंद्रशासित प्रदेश म्हणजे दिल्ली हा होय. 

भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ असतील. Rajya Sabha Marathi Mahiti 

उदा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी क्षेत्रातून 12 सदस्यांची तज्ञ म्हणून राष्ट्रपती नियुक्ती करतो.


राज्यसभा सदस्य पात्रता


आपल्या भारताच्या राज्यघटनेच्या कलम क्रमांक 84 मध्ये राज्यसभेच्या सदस्य पात्रता भारतीय घटनाकारांनी निश्चित केली आहेत. कलम क्रमांक 84 आणि त्यातील पोट कलम नुसार सदस्यांची पात्रता निश्चित केली आहे.

सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे:

1 )तो भारताचा नागरिक पाहिजे.

2) निवडणुकीत उमेदवारी प्राप्त करण्यासाठी उमेदवाराचे वय 30 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे

3)संसदेने वेळोवेळी विहित नमुन्यात मान्य केलेल्या अटी वेळोवेळी पूर्ण करणे आवश्यक असते.


निवडणुका व उपनिवडणुका


राज्यसभेच्या सदस्याने जर एखाद्या सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले तर पद रिक्त होते. किंवा एखाद्या सदस्याचा आकस्मिक मृत्यूमुळे सुद्धा संबंधित पद रिक्त होते. राज्यसभेच्या सदस्यांचे कोणत्याही कारणाने पद जर रिक्त झाले तर या पदासाठी निवडणूक आयोगाकडून संबंधित रिक्त जागेवर निवडणुका किंवा पोटनिवडणुका घेऊन रिक्त पदे भरली जातात. अशा वेळेस रिक्त होणाऱ्या पदांचा कार्यकाळ सहा वर्ष पूर्ण होत नाही. रिक्त जागेवर नियुक्ती झाल्यामुळे उर्वरित रिक्त काळामध्ये जेवढा काळ शिल्लक असेल तेवढ्याच काळासाठी त्या सदस्यांची नियुक्ती होते.राज्यसभेचे सदस्य सहा वर्षांपर्यंत कार्यकाल असला तरी एखाद्या सदस्याने स्वखुशीने राजीनामा दिल्यास ते पण रिक्त होते.त्या पदासाठी सुद्धा निवडणुका व पोटनिवडणुका घेतल्या जातात.


राज्यसभेचा सभापती 

राज्यसभेचा सभापती हा भारताचा उपराष्ट्रपती पदसिद्ध सभापती म्हणून राज्यसभेचे कामकाज पूर्ण करतो. राज्यसभेचा सभापती हा राज्यसभेवर निवडून आलेला सदस्य नसतो. भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सभापती असल्यामुळे त्याला चर्चेमध्ये किंवा मतदानामध्ये भाग घेता येत नाही. एखाद्या विधेयकावर समसमान मतदान झाले तर अशा प्रसंगी उपराष्ट्रपती आपले मतदान करू शकतो.

उपसभापती 

राज्यसभेचे दैनंदिन काम व्यवस्थित रीतीने चालवण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती ही राज्यसभेचा उपसभापती म्हणून काम पाहत असतो. राज्यसभेचे दैनंदिन कामकाज पाण्याचे काम उप सभापतीचे असते.

राज्यसभेचे दैनंदिन कार्य तसेच अधिवेशन काळात किंवा एखाद्या बैठकीमध्ये राज्यसभे चे काम पाहण्यासाठी एका प्रमुख व्यक्तीची नियुक्ती केली जाते. राज्यसभेवर एक व्यक्ती उपसभापती म्हणून कामकाजावर नियंत्रण करत असतो.  "Rajya Sabha Marathi Mahiti "राज्यसभेचा सभापती जर गैरहजर असेल तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये राज्यसभेचा उपाध्यक्ष किंवा उपसभापती म्हणून निवड झालेला व्यक्ती हे सर्व कामकाज पूर्ण करीत असतो.

कार्य:-  

राज्यसभेचा सभापती व उपसभापती या दोघांचीही कार्य सारख्याच स्वरूपाचे असते 

राज्यसभेचा सभापती म्हणजे उपराष्ट्रपती हा जे कामकाज पहात असतो तेच काम त्याच्या उपस्थितीत राज्यसभेचा उपसभापती पहात असतो. राज्यसभेच्या उप सभापती ला विशिष्ट प्रकारचा केंद्रीय मंत्रिमंडळ प्रमाणे दर्जा प्राप्त करून देण्यात आला आहेत.2002 पासून उप सभापती ला केंद्रीय राज्यमंत्री प्रमाणेच भत्ता देण्याचे प्रावधान देण्यात आले .उपसभापती आपल्या पदावर तोपर्यंत राहतील जोपर्यंत तो राज्यसभेचा सदस्य असेल. 

सभापतीच्या नावे राजीनामा देऊन तो आपले पद रिक्त करू शकतो. किंवा उपसभापती कडून गैरवर्तन झाल्यास त्याच्याविरुद्ध महाभियोग चा खटला चालवला जातो. महाभियोग खटला बहुमताने मंजूर झाल्यास उपसभापती ला त्याच्या पदावरून पदच्युत केले म्हणजेचमहाभियोग प्रक्रियेने हटविले जाऊ शकते. जर उपसभापती विरुद्ध महाभियोग खटला चालवायचा असल्यास संबंधित उपसभापतीला अशा प्रकारची 14 दिवस आधी पूर्वकल्पना द्यावी लागते त्यानंतर 14 दिवसानंतर राज्यसभेचे अधिवेशन घेऊन त्याच्याविरुद्ध महाभियोग खटला चालवण्यात येतो.परंतु अशी सूचना 14 दिवस अगोदर त्यांना द्यावी लागते.


राज्यसभा सभापती व उपसभापती यांचे कार्य 

  • राज्यसभा कामकाजाचे नियंत्रण करणे 
  • अधिवेशन काळात त राज्यसभेचे कामकाज तहकूब करणे .
  • सदस्यांना प्रश्न विचारण्यास अनुमती प्रदान करणे. 
  • गणसंख्या अभावी सभा तहकूब करणे. 
  • विधेयकावर समसमान मते पडल्यास निर्णय मत देणे. 
  • संसदीय समित्या स्थापन करणे. 
  • विविध संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणे. 
  • लोकसभा अध्यक्ष व राज्यसभा सभापती यांचे कार्य जवळजवळ सारखेच आहे. फक्त धनविधेयक च्या बाबत वेगळेपणा आहेत. धनविधेयक हे फक्त लोकसभेतच मानतात. म्हणून एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हेही महत्त्वाचे कार्य त्याला पूर्ण करावे लागते. 
  • धन विधेयक असेल तर ते लोकसभेकडे त्वरित पाठवणे. 
  • राज्यसभेत धन विधेयक केव्हाच मानले जात नाही.
  • राज्यसभा सदस्यांचे विशेष हक्काचे संरक्षण करणे.
  • लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :
  • प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.
  • प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.
  • कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.
  • सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.
  • सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.
  • राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे चा अधिकार सभापती नाही.
  • सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष नसतो.


सारांश 

मित्रांनो, आजच्या या प्रमुख लेखात भारतीय संसद म्हणजे कायदे मंडळ होय. या कायदेमंडळा चे दोन सभागृह आहे. या दोन सभागृहा च्या वरिष्ठ सभागृहाचे सर्व मुद्द्यावर आधारित स्पष्टीकरण लेखातून करण्यात आले आहे. राज्यसभा म्हणजे काय? राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असे म्हणतात. हे सभागृह कधीही विसर्जन होत नाही. याबाबत सविस्तर माहिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.संसदेचे सभागृहसंसदेमध्ये 2 सभागृह आहे. एकास वरिष्ठ तर दुसऱ्यास कनिष्ठ सभागृह एकास प्रथम तर दुसऱ्याला द्वितीय या नावाने ओळखले जाते.राज्यसभा, लोकसभा या नावाने देखील ओळखले जाते ही व्यवस्था ब्रिटनच्या संविधानातून घेतलेली आहे.यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मित्रांनो आपणास या लेखा लेखा बाबत काही त्रुटी किंवा प्रतिक्रिया सुचवायच्या असल्यास आपण ब्लॉक पोस्टच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्यक सूचना करा. आपण केलेल्या सूचना योग्य असल्यास किंवा त्रुटी त्याचबरोबर प्रतिक्रिया योग्य असल्यास तपासणी करून लेखात योग्य प्रकारची त्वरित दुरुस्ती करून हा लेख अद्यावत करण्यात येईल. 


FAQ

1) राज्यसभेची सदस्य संख्या किती असते? 

उत्तर- राज्यसभेची सदस्य संख्या 250 असते 

2) राज्यसभेच्या सदस्यांचे किमान वय किती असावे लागते? 

उत्तर -राज्यसभेच्या सदस्याचे किमान वय 30 वर्ष पूर्ण होणे आवश्यक असते.

3) राज्यसभेवर राष्ट्रपती किती 

सदस्यांची नियुक्ती स्वतःच्या अधिकारात करत असतो?

उत्तर -राज्यसभेवर राष्ट्रपती विविध क्षेत्रातून 12 सदस्यांची नियुक्ती करत असतो.

4) राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून विधानसभेद्वारे पाठविण्यात येते? 

उत्तर-महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 सदस्य निवडून पाठवले जातात.

5) राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा किमान कार्यकाल किती वर्षाचा असतो. 

राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा किमान कार्यकाल सहा वर्षाचा असतो. 

अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.

लोकसंख्या मराठी माहिती

वेगवेगळ्या विषयावर आधारित आपण खालील व्हिडिओ अधिक माहितीसाठी पाहू शकता.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.