शिक्षकाची कर्तव्ये मराठी माहिती | Duties of Teachers Marathi Mahiti
प्रस्तावना
Duties of Teachers Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण शिक्षकांचे कर्तव्ये मराठी माहिती शिक्षकांचे कर्तव्ये मराठी माहिती या विषयावर ब्लॉग पोस्ट साठी लेख लिहिणार आहे. हा लेख अत्यंत महत्त्वाचा असून या विषयावर सविस्तर माहिती या लेखातून स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे. आपणास हा लेख वाचल्यानंतर आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर करावा.
शिक्षकांचे कर्तव्य संदर्भामध्ये सविस्तर माहिती माध्यमिक शाळा संहिता शालेय शिक्षण कायदा सेवा शर्ती नियमावली 19 81 नुसार अनुसूची "ज" मध्ये पोट कलम चार मध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत.त्या संदर्भाने शिक्षकांचे कर्तव्ये आणि जबाबदारी या संदर्भाने संपूर्ण विवेचन या लेखातून पाहूया.
![]() |
Duties of Teachers Marathi Mahiti |
Duties of Teachers Marathi Mahiti(toc)
शालेय विविध मानवी घटकांपैकी शिक्षक हा महत्वपूर्ण मानवी घटक म्हणून ओळखण्यात येतो. शैक्षणिक क्षेत्रातील शाळेमधील अध्यापन कार्यातील आणि मूल्यमापन कार्यातील शाळेचा मुख्य घटक जर कोण असेल तर तो घटक म्हणजे शिक्षक होय विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करणारा हा घटक असल्यामुळे या घटकाच्या संदर्भात या लेखातून माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
शिक्षकांचे कर्तव्ये
मित्रांनो यासंदर्भात आपण आता माहिती प्राप्त क रूया.
सूचनेचे पालन करणारा घटक
शैक्षणिक क्षेत्रातील अध्यापन कार्य करणारा मुख्य घटक शिक्षक हा असून या घटकाला वरिष्ठ स्तरावरून शासकीय अधिकारी, संस्था, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, परिवेक्षक आणि समाज तसेच विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांच्या सूचनेचा पालन करणारा घटक आहेत. उपरोक्त दिलेल्या घटकाने ज्या सूचना शिक्षकास दिल्या जातात त्या सर्व सूचनाचे पालन शिक्षकांना करावे लागते.' Duties of Teachers Marathi Mahiti' समाजातील सर्व घटकातील समाज आणि शाळा यामधील दुवा आहे.
अध्यापन करणारा प्रभावी घटक.
शिक्षक हा प्रामुख्याने शाळेतील वर्गनिहाय आणि विषयनिहाय अध्यापन करणारा प्रमुख घटक आहे. शालेय वेळापत्रकाप्रमाणे आपल्या हवाली असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे जबाबदारीच्या तत्त्वाने अध्यापन करणे महत्वपूर्ण शिक्षकांचे कर्तव्ये आहेत. या संदर्भाने आपण शिक्षकांच्या कार्याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे स्पष्ट करणार आहे.
शिक्षकांचे कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या
शिक्षकांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या खालील प्रमाणे मित्रांनो पाहूया.
अध्यापन कार्य
शालेय शिक्षणाला पोषक आणि पूरक अशा विहित नमुन्यात दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि नियोजनानुसार वर्ग आणि विषय निहाय वेळा पत्रकाप्रमाणे अध्यापन करणे. आपल्या अध्यापन कार्यात तयार केलेल्या नियमित पाठ नियोजनानुसार शिक्षकांना अध्यापनाचे कार्य करावे लागते.
शिक्षकांनी अध्यापन करताना दिलेला वर्ग आणि त्या वर्गाचा दिलेला विषय नियमित दिनांकानुसार दररोज सुट्टीचे दिवस सोडून शालेय कामकाजाच्या दिवसात शासन नियमाप्रमाणे घड्याळी तासिका प्रमाणे 19 तास हे एका आठवड्यात अध्यापन करण्याचा कार्यभार वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावा लागतो.
अभ्यासक्रमानुसार अध्यापन
महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या वर्गनिहाय अभ्यासक्रमाप्रमाणे दैनिक अध्यापन संपूर्ण वर्षभर करण्याची मुख्य जबाबदारी शिक्षकांची आहे. अध्यापनाच्या कालावधीत शिक्षकांनी शासनमान्य अभ्यासक्रम शिकवणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रमाच्या अंतर्गत येणारे मुख्य घटक आणि उपघटक यासंदर्भात पूर्वतयारी करून पाठ टाचण काढून अध्यापन करणे या अध्यापनामध्ये असणारे ठळक मुद्दे विद्यार्थ्यांच्या चांगले लक्षात आणून देणे. भाषा विषयी वाक्य प्रयोग, वाक्प्रचार, कल्पना, संकल्पना, तत्वे, घटनाक्रम यासारखे ठराविक मुद्दे अधोरेखित करून विद्यार्थ्यांना या मुद्द्यांची ओळख करून देणे.
अध्यापनात शैक्षणिक साधनाचा वापर.
शिक्षकांच्या कर्तव्ये आणि जबाबदारी यासंदर्भात अध्यापन करताना शिक्षकाने महत्त्वपूर्ण विषयासाठी शैक्षणिक साहित्य त्याचा प्रभावी अध्यापन करण्यासाठी वापर करावा.गणितातील काही संकल्पना, विज्ञानातील प्रयोग, भूगोलातील नकाशे, पृथ्वीचा गोल तसेच विषयानुसार शिक्षकाने स्वतः शैक्षणिक साहित्य निर्मिती करून त्या शैक्षणिक साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना अमूर्त कल्पना न समजणाऱ्या स्पष्ट करून सांगणे हे महत्त्वाचे कर्तव्य आहेत.
अध्यापकाने घ्यावयाच्या नोंदी
शिक्षकाने अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या संदर्भात लिखाणाचे काम विद्यार्थ्यांनी नियमित पूर्ण केले आहे काय हे तपासून घेणे. काही गणितीय सूत्रे आणि पाढे आणि विविध विषयांच्या ठळक संकल्पना विद्यार्थ्यांकडून पठण करून घेणे.विद्यार्थ्यांच्या मध्ये असणाऱ्या सुप्त गुणांच्या संदर्भात योग्य वेळी मूल्यमापन करून त्या नोंदी वेळीच घेऊन त्यांच्या पालकापर्यंत पालक संपर्क करून पालकांना सांगण्याची मुख्य जबाबदारी शिक्षकांची आहे.
गृहपाठ संबंधी कर्तव्य
वेळापत्रकाप्रमाणे शिक्षकांनी वर्ग अध्यापन केल्यानंतर प्रत्येक वर्गांना प्रत्येक विषयांचा प्रत्येक विषय शिक्षकाने तसेच वर्ग शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या साठी घरून लेखिका करून आणण्यासाठी काही स्वाध्याय गृहपाठाच्या संदर्भाने विद्यार्थ्यांना दररोज नोटीस वही त लिहून द्यावे. विद्यार्थ्यांनी लिहिलेले स्वाध्याय, गृहपाठ आणि प्रकल्प तपासणी दररोज पूर्ण करावी. शिक्षकांनी गृहपाठाचे नियमित तपासणी करून वेळीच चुका विद्यार्थ्याच्या लक्षात आणून दुरुस्त करून देणे .आवश्यक आहे.
अध्यापनातील प्रात्यक्षिक कर्तव्ये
शिक्षकांना काही विशेष ठराविक विषय शिकवताना त्या विषयाच्या संदर्भाने प्रात्यक्षिक कार्य प्रयोगशाळेत किंवा काही वेळेस वर्गात प्रात्यक्षिक करून दाखवून विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक कार्य पूर्ण करून घ्यावे. भूगोल, इतिहास, विज्ञान, गणित आणि भाषा विषययाबाबतीत मुख्य घटकावर अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अध्ययनसामग्रीचा त्याचप्रमाणे अध्यापन सामग्रीचा वापर करून विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष प्रयोग शाळेत प्रयोगाचे प्रादेशिक कार्य करून दाखवून त्या संदर्भातील प्रयोग प्रात्यक्षिक स्वरूपात विद्यार्थ्याकडून करून घेणे. Duties of Teachers Marathi Mahiti आता सर्व विषयासाठी प्रयोगशाळा नवीन शैक्षणिक धोरणाने गृहीत धरून सर्व विषय नवनवीन नव उपक्रम आणि कृती संशोधन द्वारे प्रात्यक्षिक स्वरूपाचे कार्य आणि कर्तव्य त्याचबरोबर संपूर्ण अध्यापनाची जबाबदारी शिक्षकावर आहे.
दैनिक कामाचा आराखडा व नियोजन
या संदर्भाने शिक्षकाने प्रत्येक विषयासाठी वेळापत्रकाप्रमाणे वर्गनिहाय तसेच विषयनिहाय आणि घटक नियाय आराखड्याप्रमाणे घटक नियोजन आणि वार्षिक नियोजन तयार करून नियोजनाप्रमाणे प्रत्यक्ष पाठ टाचण काढून अध्यापन कार्य पूर्ण करावे. नियोजनाप्रमाणे काही अध्यापन करणे बाकी असेल तर ज्यादा पिरेड किंवा जादा तास सुट्टीच्या दिवशी घेऊन पूर्ण करण्यास काहीच हरकत नाही. शिक्षकाने हे महत्त्वपूर्ण एक्स्ट्रा पिरेड सर्व विषयासाठी दररोज नियोजित वेळी एक एक्स्ट्रा तास आयोजित करून अध्यापनाचे कर्तव्य पूर्ण करणे.
मासिक बैठकीत अहवाल सादर
प्रत्येक महिन्याच्या शेवटी शिक्षक पालक संघाची मीटिंग आयोजित करून त्या मिटींगला मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि परिवेक्षक यांच्याशी विचारविनिमय करून असलेल्या तुरटीचा किंवा उनिवाच्या संदर्भात उपाययोजना करून पालक सभेत त पालकांना सर्व माहिती प्रत्येक महिन्याला देणे बंधनकारक असे कर्तव्य आहेत. विद्यार्थ्यांना आणि पालकांना सभेत उनिवा आणि त्रुटी निदर्शनास आणून दिल्यास त्या संदर्भामध्ये वेळीच उपाययोजना करणे सोपे ".Duties of Teachers Marathi Mahiti " होऊन शाळा पूर्वतयारी करून घेण्यास सोपे जाईल.
वर्ग शिक्षक म्हणून कर्तव्य
प्रत्येक वर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्याध्यापक प्रत्येक वर्गासाठी एक वर्गशिक्षक यांची नियुक्ती करतात. शिक्षकांची वर्ग शिक्षक म्हणून काम दिल्यास त्या वर्ग शिक्षकाने वर्ग शिक्षकांच्या संदर्भातील संपूर्ण कार्य पूर्ण करणे अपेक्षित असते. पहिल्याच तासाला दैनिक हजेरी घेणे, किती विद्यार्थी हजर आहे किती गैरहजर आहे याची नोंद घेऊन आपल्या डायरीत दैनंदिनी ठेवावी. गैरहजर विद्यार्थी शाळेत न आल्यास संबंधित पालकांना त्वरित सूचना देऊन मुख्याध्यापकामार्फत हे कार्य शिक्षकांना पार पाडावे लागेल.
वर्गशिक्षकाला सर्वसाधारणपणे प्रत्येक दिवशी पहिलाच तास देण्यात आलेला असतो. या तासामध्ये फळ्यावर सुविचार ,दिनांक ,आणि वार तसेच वर्ग व विषय यांची नोंद ब्लॅकबोर्डवर करावी. वर्ग शिक्षकाकडे अध्यापनासाठी मुख्याध्यापकाने दिलेल्या नियोजनाप्रमाणे दिलेल्या विषयावर अभ्यासपूर्वक तयारी करून अध्यापन करावे.
वर्गशिक्षकाला इतर शिक्षकांपेक्षा ज्यादा काम असते. विद्यार्थ्यांची दैनिक नोंदवही तपासणे. वार्षिक निकाल तयार करणे. संपूर्ण मूल्यमापनाची जबाबदारी पूर्ण करणे. वर्ग सजावट करून घेणे. नवनवीन उपक्रम व स्थानिक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचे नियोजन सुद्धा नियोजन समितीमार्फत पूर्ण करून घ्यावे.
वेळापत्रकाप्रमाणे अध्यापन
शिक्षकांनी वर्षाच्या सुरुवातीलाच प्रत्येक वर्गाचा वर्ग वेळापत्रक तयार करण्याचे मुख्य कर्तव्य शिक्षकांचे आहे. वर्ग वेळापत्रक तयार केल्यानंतर त्या वेळापत्रकाप्रमाणेच निर्धारित वेळेत दिलेल्या विषयाचे अध्यापन करावे. नाहीतर पिरेड कार्यानुभवचा असतो आणि त्यावेळेस शिक्षक गणित शिकवतात. असे होता कामा नये. कारण गणिता एवढेच महत्व कार्यानुभव या विषयास सुद्धा आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे म्हणूनच वेळापत्रकाप्रमाणे अध्यापन करण्याचे आठवड्यात नेमून दिलेल्या कमीत कमी 30 तर जास्तीत जास्त 35 तासिकांचे अध्यापन कर्तव्य पूर्ण करावे.
राष्ट्रीय सण व दिनविशेष संदर्भातील कर्तव्य
भारतातील किंवा महाराष्ट्रातील राष्ट्रीय सण शासनाने निर्धारित वेळेत दिलेल्या शासन परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रीय सण व दिनविशेष साजरे करणे. यासाठी प्रत्येक वेळेस शासनाकडून नियमित परिपत्रक शाळेला देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भाषण स्पर्धा गीत गायन वाद-विवाद निबंध लेखन चित्रलेखन तरंगचित्रे किंवा चित्रकला स्पर्धा ह्या सर्व कार्य च्या संदर्भात दिनविशेष ज्या दिवशी असेल त्या दिवशी राष्ट्रीय सण व दिनविशेष साजरे करण्याचे कर्तव्य पूर्ण करणे. शासनाकडून वर्षाच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय सण व दिनविशेष संदर्भात परिपत्रक प्राप्त झालेले असते त्या परिपत्रकाप्रमाणे कर्तव्ये पूर्ण करणे.
शालेय पोषण आहार बाबत कर्तव्य
शासनमान्य अनुदानित शाळेसाठी वर्ग एक ते पाच आणि वर्ग सहा ते आठ या वर्गांना शासनाने मध्यान भोजन योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार योजना राबवण्यात येत आहे. म्हणून प्रत्येक वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील मुलांना शालेय पोषण मिळाले किंवा नाही पाहावे तसेच शालेय पोषण आहार अंतर्गत मध्यान भोजन योजनेत दुपारच्या सुट्टीत आपल्या वर्गांच्या विद्यार्थ्यांचे नियोजन करून नियोजनपूर्वक शालेय पोषण आहार कार्यास मुख्याध्यापकास मदत करणे .हे महत्वपूर्ण कर्तव्य पार पाडणे.
शिक्षक पालक सभेचे आयोजन
शिक्षकांनी प्रत्येक महिन्यामध्ये शिक्षक पालक संघाची मासिक सभा आयोजित करून सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांची प्रगती आणि असणाऱ्या त्रुटी तसेच उनिवा वेळीच निदर्शनास आणून देणे.
आरोग्य तपासणी
शिक्षकांनी वर्षातून कमीत कमी दोन वेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्या संदर्भातील संपूर्ण नोंदी अभिलेखाच्या स्वरूपात तयार करून ठेवणे यासंदर्भामध्ये जर काही विद्यार्थ्यांना आरोग्याच्या काही अडचणी निर्माण झाल्यास पालकांना कळवणे. आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी अगोदर सरकारी रुग्णालयातील डॉक्टर यांना निमंत्रण पत्र देऊन त्यांच्याकडून वेळ निर्धारित करून त्या वेळेनुसार विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे काम शक्यतो प्रत्येक वर्गाच्या वर्ग शिक्षकाने पूर्ण करून घेणे.
विविध स्पर्धेचे आयोजन
शाळेतील प्रत्येक शिक्षकाने विविध स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना विकासासाठी वाव प्राप्त करून देणे.सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी खालील विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
- शासकीय क्रीडा स्पर्धेत पावसाळी आणि हिवाळी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवणे.
- शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेस विद्यार्थी बसवणे व चित्रकला स्पर्धा आयोजित करणे. विविध विषयावर भाषण स्पर्धा घेणे.
- खेळ स्पर्धेचे आयोजन करणे
- वाद विवाद स्पर्धेचे आयोजन करणे
- सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा आयोजित करून सांस्कृतिक कार्यक्रम घेणे.
- वार्षिक स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांच्या कडून विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करावे.
- कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करत असताना आपल्या प्रमुखांकडून मान्यता घेतल्यानंतरच स्पर्धेचे आयोजन व नियोजन करून स्पर्धा घेणे.
शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षा संदर्भात कर्तव्य
आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवा आणि वर्ग आठवा या परीक्षेत विद्यार्थ्यांना बसविणे. तसेच नवोदय परीक्षेसाठी वर्ग पाच मधील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी प्रवृत्त करणे व शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवोदय परीक्षा ला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्गाचे जादा तास घेऊन या विषयात तयारी पूर्ण करून घ्यावी.
शासकीय योजनेचा लाभ संदर्भात कर्तव्य
शासन स्तरावरून विद्यार्थ्यांसाठी अनेक लाभाच्या योजना राबवण्यात येत आहे. संबंधित लाभार्थींना मार्गदर्शन करून लाभाच्या संदर्भात मिळणारा लाभ किती फायदेशीर आहे याबाबत मार्गदर्शन करून संबंधित विद्यार्थ्यांना तो लाभ प्राप्त करून देणे.
शिक्षकांचे विशेष कर्तव्य यादी
- नियोजनानुसार अध्यापनाचे काम करणे
- नियमित व वेळेवर शाळे त उपस्थित राहणे.
- वार्षिक नियोजन तयार करणे.
- घटक नियोजन तयार करणे.
- घटक नियोजनानुसार पाठ टाचण काढणे.
- वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करणे
- मुख्याध्यापकांच्या सूचनेचे पालन करणे
- उपमुख्याध्यापकांच्या सूचनेचे पालन करणे.
- परिवेक्षकाने दिलेल्या सूचनेचे पालन करणे.
- दैनिक नियोजन तयार करणे.
- साप्ताहिक नियोजन तयार करणे.
- वेळापत्रक मिळाल्यापासून एक आठवड्याच्या आत मुख्याध्यापकांना कळविणे
- अध्यापकाने वेळेवर येऊन शिक्षक हजरीवर व बायोमेट्रिक्स पद्धतीने हजरी नोंदवणे.
- विद्यार्थ्यांची दैनिक हजेरी पूर्ण करणे.
- महिन्याच्या शेवटी दैनिक हाजरी च्या संदर्भात सरासरी उपस्थिती प्रमाण काढणे
- विद्यार्थी दैनिक हजेरी पत्रकावर प्रत्येक महिन्याच्या शेवटी सरासरी प्रमाण काढल्यानंतर मुख्याध्यापकाची साक्षांकित करून घेण्यासाठी सही घ्यावी.
- वेळापत्रकाप्रमाणे वर्ग अध्यापन वेळेवर उपस्थित राहून करणे
- विद्यार्थी सर्वेक्षणाचे काम करणे.
- शासनाने दिलेल्या कामाचे आदेश पाळणे व कार्य करणे.
- विद्यार्थी यांची 100% पटनांनी करून घेणे.
- शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे.
- शासनाने निर्धारित केलेल्या प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहणे.
- पालक सभा घेऊन पालकाचे समुपदेशन करणे.
- विविध शालेय समितीची स्थापना करणे. केलेल्या
- समित्यांचे इतिवृत्तांत अभिलेख तयार ठेवणे.
- विद्यार्थ्यांच्या घटक चाचण्या घेणे.
- घटक चाचण्या तपासून पालकांना व विद्यार्थ्यांना माहिती देणे.
- कृती संशोधन किंवा नवोपक्रम राबवणे.
- शैक्षणिक साहित्याचा अध्यापन करताना आटोकाट प्रयत्न करणे.
- विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे.
- विद्यार्थ्यांची गळती थांबवण्यासाठी जागरूक राहून प्रयत्न करणे.
- विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकारण करण्याचा प्रयत्न करणे.
- अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रगतीसाठी उपाययोजना करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.
- अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांबरोबर आणण्यासाठी प्रयत्नशील असणे.
- विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुयोग्य अध्यापन पद्धती व शैक्षणिक साहित्याचा वापर करणे.
- दररोज परिपाठ घेणे.
- सर्वधर्मसंभाव व समानतेची वृत्ती वापरणे.
- शासनाने निर्धारित केलेली विद्यार्थ्यांची विविध फी वसूल करून मुख्यालयात मुख्याध्यापकाजवळ किंवा लिपिकाकडे सादर करून पावती घेणे.
- शैक्षणिक उठाव योजना राबवणे.
- आर टी ई च्या 25% प्रवेशास मुख्याध्यापकास या कार्यात मदत करणे.
- समाज संपर्क वाढवणे.
- पालक संपर्क वाढवणे.
- अध्यापन करताना नियोजनानुसार फलक लेखन करणे.
- उत्कृष्ट अध्यापनाचे कार्य करणे .
- शासनमान्य निर्धारित अभ्यासक्रम राबवणे
- सर्व कस सातत्यपूर्ण मूल्यमापन प्रक्रिया राबवणे.
- प्रथम सत्र परीक्षा घेणे.
- दुतीय सत्र परीक्षा घेणे.
- घटक चाचण्या घेणे.
- शैक्षणिक सहलीचे आयोजन करणे. यासाठी शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय हे कार्य पूर्ण करू नये.
- वर्गात शिस्त राखणे.
- स्वतः शिस्तीत राहणे.
- शैक्षणिक दर्जा अध्यापनाद्वारे वाढवणे.
- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून आलेल्या सर्व परिपत्रकाच्या नोंदी ठेवून त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा संदर्भातील सर्व कार्य पूर्ण करणे.
- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या संदर्भातील सर्व कार्य पूर्ण करणे.
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने दिलेली कार्य परीक्षा घेण्यासंबंधीचे व पेपर तपासणी च्या संदर्भातील सर्व कार्य निर्धारित वेळेत नियमानुसार पूर्ण करणे.
- संस्था, मुख्याध्यापक, मुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक यांनी सोपवलेली सर्व कामे पूर्ण करणे.
सारांश
शालेय शिक्षण क्षेत्रातील मानवी घटक शिक्षक हा खरा मुख्य मार्ग दाखवणारा महत्वपूर्ण कुंभाराची भूमिका पार पाडणारा मुख्य घटक आहे. विद्यार्थ्यांना अध्यापक म्हणून शिकवण्याचे कार्य उल्लेखनीय असे असावे लागते. संपूर्ण शाळेचा अध्यापनाचा पाठीचा कणा हा शिक्षक आहे. वेगवेगळ्या स्तरावर शिक्षकाला वेगवेगळ्या भूमिका कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक असते.
शिक्षकी पेशा किंवा व्यवसायात मानवी घटकाशी परस्पर सलोख्याचे संबंध ठेवून शिक्षण क्षेत्राचा विकास घडवणारा किमान पातळीवर काम करणारा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करणारा असा शिक्षक असावा लागतो. त्यामुळे यासाठी या ब्लॉग पोस्टमध्ये शिक्षकांचे कर्तव्ये व जबाबदारी संदर्भात शक्य तितक्या जास्तीत जास्त प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे.
मित्रांनो आपल्या शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि समाजात आपली प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी शालेय शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्याची मुख्य जबाबदारी अध्यापनाद्वारे शिक्षकाची असते. ही जाणीव लक्षात घेऊन किंबहुना तशा प्रकारचा प्रयत्न शिक्षकाने करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्ययन अध्यापन प्रक्रियेत समाविष्ट करून त्यांना फक्त दिशा दाखवणे व त्या दिशेने त्याला मार्ग दाखवून प्रवृत्त करणे व निर्धारित उद्दिष्ट पर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षकांचे असते शासनाच्या नियमाच्या साकोरीत राहून काही स्वतःच्या स्वायत्तता चा उपभोग घेता येतो आणि काही प्रमाणात घेता येत सुद्धा नाही.
शिक्षण शास्त्राच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या मानसिक वयाचा विचार करून आपल्या अध्यापनाच्या कर्तुत्व शैलीने मानसशास्त्रीय पद्धतीने अध्यापन करून त्या अभ्यासातून विद्यार्थ्यांमध्ये परिणामकारकता आणि समृद्ध करण्यासाठी नवीन दिशा आणि प्रेरणा मिळवून देण्याचे मुख्य कर्तव्य शिक्षकाचे असल्यामुळे आपण या विषयावर उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे सविस्तर माहिती नमूद केली आहे. मित्रांनो,
आपणास याबाबत काही तांत्रिक त्रुटी आढळल्यास या ब्लॉग पोस्ट च्या कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्यक सूचना, प्रतिक्रिया आणि त्रुटी आवश्यक कळवा. आपण कळवलेल्या प्रतिक्रिया किंवा त्रुटी योग्य असल्यास या लेखात त्वरित सुधारणा करून लेख अद्यावत करण्यात येईल. मित्रांनो आपणास हा लेख वाचल्यानंतर आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर करावा ही विनंती.
FAQ
1) शिक्षकांचे मुख्य कर्तव्य काय?
उत्तर- विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अध्यापन करणे.
2) शिक्षकांच्या सेवाशर्ती ची नोंद शासनाने कोणत्या कायद्यात घेतली आहेत?
उत्तर -माध्यमिक शाळा संहिता , अधिनियम महाराष्ट्र नागरी सेवा 1981 ज नमुन्यात पोट कलम चारआणि आर टी ई एक कायद्यात सेवा शर्ती समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
3) शाळेत विषय शिक्षक कोणत्या विषयाचे असतात?
उत्तर -शारीरिक शिक्षक आणि चित्रकला शिक्षक हे विषय शिक्षक म्हणून संच मान्यतेत मान्य केले आहे.
4) शिक्षणाचे सार्वत्रिकरण म्हणजे काय?
उत्तर- शाळेतील आपल्या वर्गातील शंभर टक्के पट नोंदणी करून गळती थांबून त्यांना विशेष मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे.
5) वर्ग शिक्षकांचे मुख्य काम कोणते?
उत्तर- वर्गातील विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती घेऊन गैरहजर विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नोटीस देऊन माहिती कळवणे व नियोजनाप्रमाणे वेळापत्रकानुसार आपल्या विषयाचे अध्यापन करून आपल्या वर्गांचा सर्व विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल तयार करणे म्हणजेच मूल्यमापन करणे हे मुख्य कार्य आहे.
अधिक माहितीसाठी आपण आवश्यक खालील लेख वाचा .
भारतीय निवडणूक आयोग मराठी माहिती
ॲक्टिव्ह एज्युकेशन युट्युब व्हिडिओ आवश्यक पहा