Type Here to Get Search Results !

नवोपक्रम मराठी माहिती | Navopakram Marathi Mahiti

 नवोपक्रम मराठी माहिती | Navopakram Marathi Mahiti 

Navopakram Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण नवोपक्रम मराठी माहितीनवोपक्रम मराठी माहिती  Navopakram Marathi Mahiti या विषया च्या संदर्भाने या लेखातून माहिती प्राप्त करू या. आपण ह्या लेखाचे वाचन केल्यानंतर जर आपणास हा लेख आवडल्यास आपण आपल्या वाचक प्रेमी मित्रांना शेअर करायला विसरू नका. 


आता आपण शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित नव नवीन उपक्रम राबवण्यास सुरुवात झाल्यामुळे आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नवोपक्रम संकल्पना ला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले आहेत.त्यामुळे ब्लॉगर ने ब्लॉक पोस्ट साठी महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण विषयावर लेख लिहिण्यासाठी ह हाती घेतला आहेत.

Navopakram Marathi Mahiti
 Navopakram Marathi Mahiti 


 आजचा मुख्य विषय "नवोपक्रम"हा आहे. या विषयावर आधारित शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनात्मक समस्या चा उकल व उपाय योजना  करताना  निर्माण होणाऱ्या समस्येचा शोध घेऊन व निर्माण झालेल्या समस्यावर संशोधनात्मक पद्धतीने निर्माण होणाऱ्या समस्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून नवोपक्रम योजना सर्व स्तरावर आज राबवण्यात येत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या  समस्यावर शास्त्रीय पद्धतीने सोडवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे  नवोपक्रम होय. या संदर्भात सविस्तर माहिती मित्रांनो ,या लेखाच्या माध्यमातून आपण पाहू या.

नवोपक्रम संकल्पना 

ही संकल्पना नवीन असून या संदर्भामध्ये आता सर्व स्तरावर आणि सर्व क्षेत्रांमध्ये या संकल्पना ला फार महत्त्व आले आहेत. ही संशोधनात्मक पद्धतीवर आधारित आहे. एखादा नवीन उपक्रम हाती घेऊन तो व्यवस्थितरित्या अभ्यास करून त्या उपक्रमातून निरनिराळे निष्कर्ष प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रातील अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात शासनाने हा प्रकल्प हाती घेतल्यामुळे या विषयावर म्हणूनच आपण या संकल्पनेची संबंधित माहिती आजच्या या नावीन्यपूर्ण लेखातून 'Navopakram Marathi Mahiti ' पुढील प्रमाणे माहिती प्राप्त करूया. 

नवोपक्रम म्हणजे काय ?

शैक्षणिक क्षेत्रातील दैनंदिन सर्व विषयाचा अभ्यास करताना निर्माण होणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून शास्त्रीय पद्धतीने समस्या सोडवण्याचा मार्ग म्हणजे नवोपक्रम होय.

नवोपक्रम संकल्पनेचे स्वरूप 

जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अभ्यास करताना नवीन उपक्रम राबवणे व हे उपक्रम संशोधनात्मक पद्धतीने राबवण्यासाठी संशोधकाला शैक्षणिक क्षेत्रातील अनेक विषयावर आधारित उपक्रम राबवणे आता आवश्यक झाले आहे. यामुळे प्रत्यक्ष केलेल्या कृतीवर आधारित समस्या सोडवण्यासाठी हा अवलंबलेला मार्ग महत्त्वाचा आहे. याबाबतीत आता आपण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नवोपक्रम संकल्पनेचे स्वरूप लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने हा उपक्रम शास्त्रीय पद्धतीने राबवणे आज काळाची नितांत गरज आहे. म्हणूनच आपण या विषयावर माहिती लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहोत. याबाबत संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून अभ्यास करूया.

नवोपक्रम ध्येय आणि उद्दिष्टे. 


नवोपक्रम ध्येय अमर्याद असे आहेत. कारण कोणत्याही विषयावर विशिष्ट ध्येयात्मक आणि धोरणात्मक ध्येय प्राप्त करण्यासाठी या उपक्रमातून आणि हा उपक्रम राबवताना उद्दिष्टे निश्चित करणे आवश्यक आहे. या संकल्पनेचे उद्दिष्टे मर्यादित स्वरूपाचे असावे लागते तर ध्येय हे अमर्याद स्वरूपाचे असावे लागते. कोणताही नवोपक्रम लिहिण्यासाठी हाती घेतल्यास प्रथम त्या उपक्रमाची ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित करून त्या दिशेने हा उपक्रम यशस्वीरित्या नियोजनाप्रमाणे राबवून त्यातून आराखडा व पृथकरण करून मिळालेल्या माहितीच्या आधारे निष्कर्ष पर्यंत जाऊन हा प्रकल्प ध्येय आणि उद्दिष्टे च्या आधारे आराखड्यातून शास्त्रीय पद्धतीने मांडणी करून त्यातून निष्कर्ष प्राप्त करणे आवश्यक असते. ह्या निष्कर्षातून सिद्ध झालेले प्रयोग संपूर्ण शिक्षण क्षेत्रात ते कसे उपयुक्त आहे याचे महत्त्व ध्येय आणि उद्दिष्टावरच आधारित असते. म्हणूनच याबाबती प्रकल्प किंवा जो संशोधक जी समस्या नऊ उपक्रमासाठी हाती घेईल ती पूर्ण करणे त्याच्या दृष्टिकोनातूनतो एक नवोपक्रम होय.

नवोपक्रम संकल्पना चा उगम 

शिक्षण क्षेत्रातील या उपक्रमाचा उगम प्रथम पाश्चिमात्य देशांमध्ये झाला. पाश्चिमात्य देशातील संशोधकांनी प्रथम याबाबत काही समस्या प्रयोगात्मक पद्धतीने हाताळून त्याचा शिक्षण क्षेत्राशी निर्माण होणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी होतो हे सिद्ध केले. हळूहळू आता जगभर सर्वच देशांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून राबवण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे नवोपक्रम संकल्पनेचा उगम हा विसाव्या शतकामध्ये जवळपास 19 47 ते 19 50 पर्यंत अपरिपक्वेकडून परिपक्वतेकडे अनेक विषयावर अनेक शास्त्रज्ञांनी त्यांचे निरनिराळे मते आणि मतांतरे मांडून वेगवेगळ्या विषयावर नवनवीन उपक्रम शास्त्रीय पद्धतीने मांडून हाती घेतलेल्या समस्येचा उकल नवोपक्रम माध्यमातूनपूर्ण केला. सर्वप्रथम ही संकल्पना कर्ट या शास्त्रज्ञाने मांडून त्याने नवीन उपक्रमावर आधारित पद्धतीचा उगम केला आहे. 

नवोपक्रम ही पद्धत अनेक टप्प्यांच्या मार्फत पूर्ण केली जाते. अनेक टप्पे पूर्ण केल्यानंतर त्यातून निष्कर्ष काढले जातात. काढलेल्या निष्कर्षाच्या आधारे हे उपक्रम किती टक्के यशस्वी होते यावर ही संकल्पना अनेक नोंदी घेऊन पूर्ण करावी लागते.सर्वसाधारणपणे कृती संशोधनाचा उगम 1946 मध्ये या विषयावर अनेक शास्त्रज्ञांनी आपापले मत मांडून कृती संशोधन या विषयावर लिखाण केले आहे. कृती संशोधन ही संकल्पना चा उगम सर्वप्रथम कर्ट या शास्त्रज्ञाने उगम कसा झाला याबाबत माहिती प्रतिपादन केली आहे. त्यांनी 1946 मध्ये सैद्धांतिक विषयात मांडणी केली. त्यांच्या मते निर्माण होणाऱ्या समस्या ह्या अनेक टप्प्यातून उगम पावतात व शेवटी त्यातून चांगले वाईट निष्कर्ष येतात. खरे तर ही शास्त्रीय पद्धत आहे.'Navopakram Marathi Mahiti' म्हणून कृती संशोधनाचे आपणास टप्पे माहीत पाहिजे असे शास्त्रज्ञाने मत व्यक्त केले.

नवोपक्रम लिहिण्याचे मुख्य टप्पे 

नवोपक्रम लिहिण्यासाठी महत्वपूर्ण खालील टप्पे असून त्या टप्प्याच्या संदर्भात माहिती आपण मित्रांनो, प्राप्त करूया 

प्रस्तावना 


नवोपक्रम लिहिताना प्रथम प्रकल्पाची थोडक्यात 100 शब्दा त प्रस्तावना लिहिणे आवश्यक आहे. या प्रस्तावनेमध्ये उपक्रमाच्या संदर्भाने पूर्व प्राथमिक पूर्वज्ञानावर आधारित माहितीचे संकलन करून जो आपण नवोपक्रम लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. Navopakram Marathi Mahiti त्या विषयाच्या संदर्भाने आवश्यक असणारे पूर्वज्ञान आणि या पूर्वज्ञानाच्या विषयाचे मुख्य हेतू कथन करून विषयाचे विषय प्रतिपादन करणे.

आवश्यकता 

नवोपक्रम याबाबत या विषयाची आवश्यकता का आहेत हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. हाती घेतलेला प्रकल्प नवीन प्रकल्प संशोधनात्मक असल्यामुळे या प्रकल्पाची काळाच्या दृष्टिकोनातून आज आवश्यकता का निर्माण झाली याबाबत विशिष्ट हेतूने आवश्यकता स्पष्ट करावी लागते. म्हणजे आपण हा उपक्रम का हाती घेतो. हा उपक्रम हाती घेतल्यानंतर या उपक्रमांमधून अध्ययन अध्यापन प्रक्रियेत त तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सर्व वर्गासाठी ह्या नवोपक्रमाची आवश्यकता जास्तीत जास्त 100 शब्दात प्रकल्पाकाने किंवा संशोधकाने मांडणे आवश्यक आहे. जर आपणास आवश्यकताच माहीत नसेल तर पुढे आपण या उपक्रमाबाबत पुढील माहिती काहीच लिहू शकणार नाही. कोणत्याही विषयावर नवोपक्रम लिहिताना उपक्रमाची आवश्यकता लक्षात घेऊनच उपक्रम राबवावा लागतो म्हणून आवश्यकता ही लिहिणे आवश्यक आहे

विषय निवड 

नवोपक्रम लिहिण्यासाठी हाती घेताना प्रकल्पकाला प्रथम विषय निवडावा लागेल. निवडलेल्या विषयावर आधारित योग्य प्रकारे निर्माण होणाऱ्या समस्येच्या संदर्भाने अध्ययन अध्यापन प्रक्रिया राबवताना निर्माण झालेल्या समस्येच्या संदर्भात निवडलेल्या विषयानुसार नवोपक्रम लिहिण्यासाठी हाती घ्यावी लागेल. हा उपक्रम हाती घेतल्यानंतर त्यातून निर्माण होणारी समस्या शोध घेऊन त्या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे असेल.

समस्या निश्चिती 

मित्रांनो नवोपक्रम लिहिताना म्हणजेच कृती संशोधन करताना संशोधकाला प्रथम त्याला निर्माण झालेली समस्या निश्चित करावी लागेल. निश्चित केलेल्या समस्येला मर्यादित स्वरूपात समस्येचे ठराविक पद्धतीने शीर्षक मांडावे लागेल. उपक्रमासाठी हाती घेतलेल्या विषयाच्या संदर्भाने समस्या निश्चिती करण होणे गरजेचे आहे. समस्या निश्चित केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या विषयावर आधारित असणारी जी कोणती समस्या तुम्हाला अध्ययन अध्यापन प्रक्रिया करताना निर्माण झाली असेल त्या समस्येच्या संदर्भाने समस्येचे शीर्षक मांडावे लागेल

समस्येचे शीर्षक 

निवडलेल्या विषयावर आधारित मर्यादित शब्दात समर्पक किंवा योग्य शब्दात समस्येचे शीर्षक लिहा. शीर्षक हे संशोधनात्मक स्वरूपात अगदी थोडक्यात प्रकल्पकास निश्चित शब्दात मांडावे लागेल.

उदाहरणार्थ 

शीर्षक 

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड वाटण्याच्या कारणांचा शोध घेऊन व उपाययोजना चा सखोल मूल्यमापनात्मक अभ्यास.

उपरोक्त शीर्षकाप्रमाणे प्रकल्पकाने समस्येचा शोध घेऊन योग्य शीर्षक नवोपक्रमासाठी लिहिणे आवश्यक आहे.

कार्यात्मक व्याख्या 

शीर्षकांमध्ये लिहिलेल्या प्रत्येक शब्दांची व्याख्या उपक्रमामध्ये प्रकल्पकास लिहिणे किंवा मांडणे आवश्यक आहे. कारण शीर्षकातील प्रत्येक शब्द हा महत्त्वाचा असतो. प्रत्येक शब्द महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक शब्दाची व्याख्या मांडण्याची पद्धत शास्त्रीय पद्धत निर्माण झाली आहेत. ही पद्धत विचारात घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने शीर्षकातील शब्दांच्या व्याख्या उपक्रम आवश्यक आहे.

उदाहरणार्थ 

इयत्ता दहावी या शब्दाची व्याख्या करावी लागेल. कोणत्या राज्यातील विद्यार्थी असून कोणत्या शाळेतील तसेच कोणत्या तुकडीतील विद्यार्थी आणि किती विद्यार्थ्यांना विषय अवघड वाटतो त्याबाबत व्याख्या देणे आवश्यक असते. कार्यात्मक व्याख्या म्हणजे शीर्षकातील प्रत्येक शब्दांचा ठराविक स्वरूपात स्पष्ट अर्थ प्राप्त करून त्या शब्दाला विशिष्ट मर्यादा मध्ये व्यापक शब्दात अर्थपूर्ण मर्यादा स्पष्ट करणे म्हणजे कार्यात्मक व्याख्या होय. शीर्षकांमध्ये जेवढे शब्द असेल त्या प्रत्येक शब्दाची व्याख्या प्रकल्पकाने तयार करावी.

नवोपक्रम व्याप्ती व मर्यादा 

नवोपक्रम प्रकल्प राबवताना या प्रकल्पाची व्याप्ती व मर्यादा अमर्याद नसाव्यात. व्याप्ती व मर्यादा मर्यादित असणे आवश्यक आहे. ठराविक विषय आणि त्या विषयातील प्रकल्प राबवण्यासाठी विषय मर्यादित असणे महत्त्वपूर्ण आहेत. व्याप्ती ही फक्त नवोपक्रम लिहिण्यासाठी मर्यादित घटकावर उपक्रमाच्या व्याप्ती बाबत विषयापूर्तीच व्याप्ती निश्चित करावी . कारण हा प्रकल्प आहे. मर्यादा व व्याप्ती मर्यादित असेल तर इतर लिखाण भटकत जात नाही. प्रकल्प लिहिण्यासाठी एखाद्या शाळेची निवड करून त्या शाळेतील विशिष्ट वर्गातील विद्यार्थ्यांची निवड करून प्रकल्पासाठी ठराविक विषय निवडून संबंधित वर्गातील 20 ते 30 मुलावरच हा  नवोपक्रम वेगवेगळ्या पद्धतीच्या सहाय्याने राबवणे कारण हा प्रकल्प नवोपक्रम म्हणजेच कृती संशोधनात्मक प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे निश्चित निष्कर्ष मांडावे लागणार आहे. 

नवोपक्रम प्रकल्पाचे उद्दिष्टे 

हा प्रकल्प राबवताना प्रकल्पासाठी प्रकल्पकाने किंवा संशोधकाने ठराविक निर्धारित चार किंवा पाच उद्दिष्टे प्रकल्पासाठी निश्चित करावी. निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या आधाराने नियोजन करून निश्चित केलेल्या चार ते पाच उद्दिष्टावर आधारित पुढे याच उद्दिष्टानुसार निष्कर्ष निश्चित सिद्ध होत असतात. ज्या प्रमाणात तुम्ही उद्दिष्टे निश्चित केले त्याच प्रमाणात पुढे निष्कर्ष संशोधकास संपूर्ण हा प्रकल्प राबवल्यानंतर शेवटी याच उद्दिष्टाच्या मार्फत निष्कर्षावर आधारित प्रकल्प यशस्वी होणार आहेत. म्हणून प्रकल्पकाने आपल्या प्रकल्पासाठी उद्दिष्टे चार किंवा पाच पेक्षा जास्त घेऊ नका. जेवढे उद्दिष्ट जास्त तेवढा प्रकल्प पुढे लिहिण्यासाठी किचकट आणि गुंतागुंतीचा होईल . याची नोंद घ्यावी.

गृहितके 

नवोपक्रम प्रकल्प लिहिताना प्रकल्पासाठी प्रकल्प राबवण्यापूर्वी निश्चित स्वरूपाचे काही गृहितके गृहीत धरावी लागतात. हा प्रकल्प राबवल्यानंतर संशोधनात निश्चित बदल होणार नाही असे नकारात्मक गृहीतके गृहीत धरा. आणि प्रकल्प राबवल्यानंतर प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर हे गृहितकेच आपणास स्पष्ट इशारा देईल की तुम्ही गृहीत धरलेली गृहितके आणि प्रकल्प राबवल्यानंतर निश्चित झालेली निष्कर्ष यामध्ये फरक पडला आहे म्हणजेच आपला प्रकल्प यशस्वी झाला आहे हे गृहीत धरून गृहितके खोटी ठरली आहे. असे नक्की स्पष्ट होईल.Navopakram Marathi Mahiti 

शून्य परिकल्पना 


प्रकल्प राबवण्यासाठी ही एक नवीन संकल्पना आता विचारात घेतली जाते. शून्य परिकल्पना म्हणजे प्रकल्प राबवण्यापूर्वी गृहीत म्हणून गृहितकेच्या स्वरूपातच ही शून्य परिकल्पना असते. हे एक प्रकारचे गृहीतकच आहे. शून्य परिकल्पना म्हणजे प्रकल्प राबवण्याच्या अगोदर कोणत्याही प्रकारचा काहीच बदल होणार नाही म्हणजेच राबवण्याअगोदर बदल होणार नसल्याबाबत जी कल्पना गृहीत धरली जाते त्या कल्पनेला शून्य परिकल्पना असे म्हणतात. पण उपक्रम किंवा प्रकल्प राबवल्यानंतर प्रकल्प यशस्वी होऊन उद्दिष्टानुसार आलेल्या नोंदीमध्ये बदल दिसून आल्यास आपला उपक्रम किंवा प्रकल्प यशस्वी झाला हे सिद्ध होईल. म्हणजेच शून्यपरिकल्पना बाद होईल. शून्य परिकल्पना बाबत संपूर्ण माहिती अभ्यास करूनच प्रकल्प राबवण्यास सुरुवात करावी हे योग्य असते. शून्य परिकल्पना सर्वसामान्यांना सुरुवातीला याचा अर्थ न कळल्यामुळे ही संकल्पना कोणताही प्रकल्प आपल्या प्रकल्पाशैक्षणिक क्षेत्रात वरील विषयावर अध्ययन अध्यापन करताना समस्या निर्माण झाली तर ती सोडवण्यासाठी आपणास कृती संशोधन चा प्रकल्प राबवावा लागतो. आणि हा प्रकल्प शास्त्रीय पद्धतीने राबवावा लागतो.


नवोपक्रम प्रकल्पाची पद्धती 

 प्रकल्प राबवण्यासाठी अनेक पद्धती आजच्या युगात विकसित झाल्या आहेत त्यापैकी महत्त्वपूर्ण असणाऱ्या पद्धतीबाबत माहिती आपण या लेखातून स्पष्टपणे नमूद करणार आहे. ह्या पद्धती पुढील प्रमाणे आहे. 

  1. प्रायोगिक पद्धत 
  2. ऐतिहासिक पद्धत 
  3. सर्वेक्षण पद्धत 
  4. वर्णनात्मक पद्धत 
  5. शास्त्रीय पद्धत 
  6. मुलाखत पद्धत 
  7. पदनीचे यांना श्रेणी पद्धत 
  8. गटचर्चा पद्धत 
  9. निरीक्षण पद्धत 
  10. उपयोजनात्मक पद्धत 
  11. मूल्यमापनात्मक पद्धत 

प्रकल्प किंवा उपक्रम लिहिताना सर्व उपरोक्त पद्धती महत्त्वपूर्ण आहे. सर्वसाधारणपणे उपक्रम किंवा प्रकल्प लिहिण्यासाठी वरील पद्धतीपैकी नामांकित पद्धत चार पद्धती महत्त्वपूर्ण आहेत आणि या पद्धतीवर आधारित या पद्धतीचा उपयोग करून प्रकल्प लिखाण केले जातात महत्त्वपूर्ण ह्या चार पद्धती वरच संपूर्ण उपक्रम आधारित असतो." Navopakram Marathi Mahiti "

सहसा प्रकल्प लिहिताना प्रकल्प पुढीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करतो 

  1. प्रायोगिक पद्धत 
  2. सर्वेक्षण पद्धत 
  3. शास्त्रीय पद्धत 
  4. मुलाखत तंत्र 

या पद्धती पैकी प्रकल्प लिहिण्यासाठी माझ्या मते सर्वात सोपी आणि उपयुक्त पद्धत म्हणजे प्रायोगिक पद्धत ही आहेत. म्हणून आपण आता प्रकल्प लिखाण काम करण्यासाठी प्रायोगिक पद्धतीचा वापर करणार आहोत. आपणही सुद्धा प्रकल्प लिहिताना शंभर टक्के यशस्वी होणारी पद्धत म्हणजे प्रायोगिक पद्धत होय. त्यामुळे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने प्रकल्प किंवा उपक्रम लिहिण्यासाठी निवड करावी. 

प्रायोगिक पद्धत 

मित्रांनो, प्रायोगिक पद्धती बाबत आपण खालील प्रमाणे माहिती प्राप्त करूया,प्रायोगिक पद्धतीमध्ये दोन समान ठराविक विद्यार्थी संख्येचे गट निर्माण केले जातात. या दोन निर्माण केलेल्या गटांना विशिष्ट प्रकारची नावे दिलेली असते. ती नावे पुढील प्रमाणे देण्यात येतात. 

  1. प्रायोगिक गट 
  2. अप्रयोगिक गट 

एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गातील 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. निवड करताना महत्वपूर्ण दक्षता घेतली जाते की. एकाच वर्गातील सम समान दर्जा असणारी विद्यार्थी दोन्ही गटात त समतोल पद्धतीने निर्मिती केली जाते. प्रत्येक गटामध्ये दहा विद्यार्थी असतात. या दहा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सम समान असतो दोन्ही गटांमध्ये. नवोपक्रम प्रकल्प फक्त प्रायोगिक गटावर राबवण्यात येतो. नवीन तंत्रज्ञानाच्या पद्धतीने प्रायोगिक गटाला एक महिना संपूर्ण समस्येवर आधारित कल्पनेबाबत अध्यापन करून त्या अध्यापनामध्ये प्रायोगिक पद्धती निरीक्षण व नोंदी घेऊन प्रकल्प राबवला जातो हे अध्यापन फक्त दहा विद्यार्थ्यांसाठीच निवडलेल्या विद्यार्थ्यावर राबवण्यात येते.

दुसरा गट म्हणजे अप्रयोगी गट 

या गटावर नेहमीप्रमाणे दररोज वापरत असलेली अध्यापन पद्धतीने अध्यापन केले जाते हे अध्यापन निवडलेल्या अप्रयोगीक गटातील दहा विद्यार्थ्यांना अध्यापन प्रकल्प करतो. शेवटी दोन्ही अध्यापन पद्धतीचा निष्कर्ष काढण्यासाठी एक 25 गुणांची घटकचाचणी प्रायोगिक व अप्रयोगीक गटाची घेतली जाते. घेतलेल्या चाचणीच्या आधारे निष्कर्ष काढले जातात. प्रायोगिक गटातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुणप्राप्त झाले तर त्याची नोंद घेतली जाते आणि ज्या गटाला आपण नियमित अध्यापन पद्धतीने अध्यापन केलेल्या विद्यार्थ्यांचे गुण प्रायोगिक गटापेक्षा अप्रयोगीक गटाला कमी प्राप्त झाले तर दोन्ही गटाच्या संदर्भातील निष्कर्षाच्या आधारे स्पष्ट केले जाते प्रायोगिक पद्धतीतील गट व या गटावर केलेले अध्यापन उपयुक्त ठरले असून अशाच पद्धतीने अध्यापन होणे आवश्यक आहे असा निष्कर्ष काढू शकता. मग या चाचण्याच्या आधारे आलेख किंवा संख्याशास्त्राचा वापर करून सरासरी काढून गुणात्मक मूल्यमापन केले जाते.म्हणूनच प्रायोगिक पद्धतीचा उपयोग नवोपक्रम प्रकल्पासाठी करणे आवश्यक आहे. 

माहितीचे वर्गीकरण 

प्रकल्पामध्ये उपक्रम राबवताना वेगवेगळ्या माहिती आपणास प्रकल्प राबवत असताना प्राप्त होताना कच्च्या स्वरूपात त्याची नोंद ठेवली जाते आणि या नोंदीच्या साह्याने पुढे माहितीचे सुस्पष्टपणे वर्गीकरण करून अद्यावत निष्कर्ष काढले जातात. कच्चा माहितीचे रूपांतर पक्क्या माहितीमध्ये गणितीय पद्धतीने केलेले वर्गीकरण म्हणजे माहितीचे वर्गीकरण होय. यासाठी संख्याशास्त्रातील सरासरी ,मध्यांक आणि बहुलक पद्धतीने मांडणी करून प्राप्त माहितीचे सुस्पष्ट वर्गीकरण करण्यात येणे अपेक्षित आहे. अशा प्रकारचे उपक्रम लिहिणे म्हणजे एक प्रकारचे पीएचडी किंवा एम फिल चा एक प्रकल्प लिहिणे होय.

नवोपक्रम प्रकल्प वेळापत्रक व नियोजन 

उपक्रम राबवण्यासाठी प्रकल्पकाला अगोदर तयार केलेल्या कच्च्या आराखड्यानुसार नियोजन पूर्वक वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. वेळापत्रक व नियोजन पूर्ण झाल्यानंतर त्याप्रमाणे निर्धारित वेळेत हा संपूर्ण उपक्रम एक महिना च्या आत पूर्ण करणे जबाबदारीयुक्त कार्य प्रकल्पकाला पूर्ण करावे लागते. या वेळापत्रकामध्ये शाळा निवडावी लागते. शाळेतील विद्यार्थी यांची उपक्रमासाठी निवड करावी लागते.ठराविक वर्ग निवडून त्या वर्गातील विद्यार्थी उपक्रमासाठी निवडावे. त्या वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांची निवड करू नये. ठराविक फक्त वीस विद्यार्थ्यांची संतुल्य समतोल साधणारी विद्यार्थी यांची निवड करावी. निर्धारित केलेल्या समस्येवर आधारित प्रायोगिक पद्धतीने उपक्रम वेळापत्रकानुसार निर्धारित वेळेतच पूर्ण करावा. आपणास हा उपक्रम राबवण्यासाठी शाळा व्यतिरिक्त एक तास जास्त वेळात ताज घेऊन पूर्ण करणे अपेक्षित असते. कारण शाळेतील इतर विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे अध्यापन करावे लागत असते. आणि आपण त्या वर्गातले वीस विद्यार्थी उपक्रमासाठी निवडलेले असतात त्यांचे सुद्धा नुकसान होऊ नये हे पाहिले जाते. 

नवोपक्रम प्रकल्पाची विविध क्षेत्रे

उपक्रम राबवण्यासाठी निर्धारित केलेल्या समशे च्या संदर्भात शैक्षणिक क्षेत्रातील विविध क्षेत्रावर आपण प्रकल्प राबवू शकता आणि त्या क्षेत्रातील एखादी समस्या निवडून तुम्हाला ज्या समस्येची गरज आवश्यक पुढे आली असेल त्या समस्येच्या बाबतीत खालील क्षेत्रे उपक्रम राबवण्यासाठी दर्शविण्यात आले आहेत. 

  1. विद्यार्थी वर आधारित उपक्रम
  2. अध्ययन पद्धती आधारित उपक्रम
  3. अध्यापन पद्धती आधारित उपक्रम
  4. विविध प्रकारचे नवनवीन अभ्यासक्रम आधारित उपक्रम
  5. शासनमान्य पाठ्यपुस्तके आधारित उपक्रम
  6. शैक्षणिक क्षेत्रातील सर्व विषय 
  7. प्राकृतिक परिस्थितीवर आधारित उपक्रम
  8. सशालीय कार्यक्रमावर आधारित उपक्रम 
  9. समाज व समाजातील विविध घटकांवर आधारित उपक्रम 
  10. मूल्यमापनावर आधारित उपक्रम 
  11. अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील आंतरक्रियावर आधारित उपक्रम 
  12. जगातील कोणत्याही प्रकारच्या घटकावर आधारित उपक्रम 

वरील उपक्रमा च्या क्षेत्राशी संबंधित नवोपक्रम राबवता येतो. फक्त आपली समस्या अगोदर निश्चित झाली म्हणजे आपल्याला आपले क्षेत्र निश्चित करण्या स वेळ लागत नाही आणि त्या पद्धतीने समस्येवर आधारित प्रकल्प राबवणे प्रकल्पकास अधिक सोपे जाईल याची संशोधकाने किंवा प्रकल्प काढणे नोंद घ्यावी 

मात्र या ठिकाणी एक गोष्ट मुख्य आवश्यक लक्षात असू द्या तुमच्यासमोर निर्माण झालेली समस्या ही तुमची स्वतः ची समस्या तुम्हाला जाणीव झालेली असावी. इतर कोणाच्या प्रकल्पकाच्या समस्येवर तुम्ही प्रकल्प लिहू शकत नाही. निरनिराळ्या विषयावर आपणास उपक्रम लिहिता येईल. फक्त विषय निश्चित होऊन समस्या निश्चित करणे गरजेचे आहे. या उपक्रमासाठी समस्या निर्मिती हा पहिला मुख्य पाया आहे. समस्या निर्माण झाली नाही तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या कोणत्याही विषयावर आधारित समस्या तुम्हाला जाणवल्यास ती तुम्ही समस्या निवडून विशिष्ट कार्यपद्धतीने त्या समस्येवर आधारित प्रकल्प आवश्यक राबवा.


उपक्रमासाठी  मूल्यमापनात्मक तंत्रे 

उपक्रमासाठी राबवण्यासाठी प्रकल्प त्यांच्या इच्छेनुसार योग्य मूल्यमापनाचे तंत्र वापरू शकतो. त्याला त्याबाबतीत स्वतंत्र निर्णय घेण्याची जबाबदारी स्वतःच पूर्ण करावी लागते. प्रकल्पकास उपक्रमासाठी खालील मूल्यमापन तंत्रे वापरू शकतात 

  1. प्रश्नपत्रिका 
  2. घटक चाचण्या 
  3. तोंडी मुलाखती 
  4. पदनिचन श्रेणी 
  5. गटचर्चा 

शैक्षणिक साधनाचा उपक्रमासाठी वापर 

नवोपक्रम प्रकल्प राबवण्यासाठी प्रकल्पकाला स्वतः लागणारे साहित्य प्रकल्प निर्धारित करून समस्या निश्चित झाल्यानुसार अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्य नियोजनाप्रमाणे तयार करून त्याचा वापर आपल्या अध्यापनाच्या मध्ये करणे अपेक्षित आहेत. यासाठी त्याला आलेख कागदे, प्रकल्प लिहिण्यासाठी ए फोर साइजचा, कागद, कंपास पेटी, पेन, पेन्सिल, ब्लॅक बोर्ड, पांढरे खडू, रंगीत खडू, आवश्यकतेनुसार आवश्यक असणारे सर्व साहित्य अगोदर तयार ठेवण्यात यावेत हे अपेक्षित आहे.

संख्याशास्त्राचा वापर 

संख्याशास्त्राचा वापर करून योग्य प्रकारचे संख्याशास्त्रावर आधारित गणितीय पद्धतीने प्रकल्पकाला निष्कर्ष संख्याशास्त्राच्या माध्यमातून काढणे अपेक्षित आहे. आलेले निष्कर्ष पारदर्शक पद्धतीने काढलेले असावे. प्रायोगिक पद्धतीमध्ये वेळीच नोंदी घेऊन त्या नोंदीचा वापर निष्कर्ष काढण्यासाठी करू शकता.

आराखडा लेखन 

प्रकल्पकाने उपक्रमासाठी स्वतः आराखडा लेखन करून या आराखड्यात योग्य ठिकाणी चित्रे आलेख फोटो आणि संदर्भ नोंदी आवश्यक ठिकाणी नोंदवावे. आपणाकडे अगोदरच कच्चा आराखडा तयार केलेला असतो फक्त तो मर्यादित शब्दा त लिहिलेला असतो पण प्रत्यक्ष सादरीकरणासाठी आराखडा लेखन करताना 4000 ते 5000 शब्दात आराखडा लेखन ठराविक नियमाच्या आधारे करावे.

नवोपक्रम आराखडा लेखन पद्धतीचे टप्पे

नवोपक्रम आराखडा तयार करताना खालील मुद्द्याच्या आधारे विविध टप्प्याच्या साह्याने उपक्रम आराखडा प्रकल्पकास राबवणे सोपे जाते म्हणून खालील टप्पे विचारात घेऊन उपक्रम राबवण्यात यावा 

  1. प्रस्तावना लिहिणे.
  2. आवश्यकता व मर्यादा लिहिणे.
  3. व्याप्ती लिहिणे .
  4. गृहीतके लिहिणे.
  5. प्रकल्पाचे स्वरूप लिहिणे.
  6. समस्या निर्मिती लिहिणे.
  7. समस्येचे गृहितके निशितीकरण लिहिणे.
  8. समस्येच्या संदर्भात परिकल्पना ची मांडणी करून माहिती लिहिणे .
  9. समस्येची आवश्यकता लिहिणे 
  10. समस्येची मर्यादा लिहिणे.
  11. समस्येची संबंधित योग्य क्षेत्राची निवड लिहिणे. 
  12. समस्येची कार्यात्मक व्याख्या लिहिणे.
  13. संशोधन पद्धतीची निवड करून योग्य पद्धत चा वापर. 
  14. समस्येबाबत सुस्पष्टता लिहिणे. 
  15. प्रत्यक्ष उपक्रमाचा आराखडा लिहिणे. 
  16. संशोधन पद्धतीची सर्व कृती लिहिणे. 
  17. योग्य वेळी नोंदी घेऊन आणि मुलाखती घेऊन माहिती लिहिणे. 

  18. चाचण्याच्या प्राप्त गुणांच्या नोंदी लिहिणे 
  19. संख्याशास्त्रीय गणितीय पद्धत लिहिणे 
  20. माहितीचे विश्लेषण करून अहवाल लेखन करणे. 
  21. शेवटी निष्कर्ष प्रयोगातून सिद्ध झालेले योग्य पद्धतीत पद्धतीत लिहिणे. 

स्पर्धा परीक्षेसाठी नवोपक्रम आराखडा 

स्पर्धेसाठी आराखडा लेखन करताना व्यवस्थित लिहिणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे स्पष्ट करत आहे 

  1. मुखपृष्ठ 
  2. प्रमाणपत्र 
  3. अभिप्राय पत्र 
  4. प्रस्ताविक 
  5. समस्येचे शीर्षक
  6. समस्येची पूर्वतयारी 
  7. समस्येचे उद्दिष्टे 
  8. परिकल्पना 
  9. संशोधन पद्धत 
  10. साधनसामग्री संकलन 
  11. योग्य कार्यवाही 
  12. विश्लेषण 
  13. वेळापत्रक 
  14. प्रकल्पातून जाणवलेले बदल 
  15. निष्कर्ष 
  16. परिशिष्टे 
  17. प्रमाणपत्र 

नवोपक्रम संदर्भात लेखन करताना चे नियम


  1. उपक्रम हा व्याकरण दृष्ट्या योग्य पद्धतीने लिहिणे. व्याकरणाच्या सुखा करू नका. 
  2. उपक्रम हा बॉण्ड पेपर वर लिहिणे योग्य आहे. 
  3. उपक्रम लेखन करण्यासाठी निवडलेला बॉण्ड पेपर हा ए फॉर साईज चा असणे आवश्यक आहे. 
  4. कागदाच्या एकाच बाजूने उपक्रम लिहा. 
  5. पाठीमागच्या पानावर काही लिहू नका. 
  6. आवश्यक ठिकाणी पुरावे जोडा. 
  7. आवश्यक ठिकाणी फोटो जोडा. 
  8. आवश्यक ठिकाणी आलेख जोडा. 
  9. टंकलेखन करण्याअगोदर तज्ञ मराठी विषय शिक्षकाकडून उपक्रम तपासून घ्या. 
  10. टंकलेखन करताना प्रकल्पा त चुका होऊ देऊ नका. 
  11. स्पर्धेसाठी पाठवण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये स्वतःचे नाव कुठेही लिहू नका. 
  12. उपक्रम राबवल्याबाबतचे प्रमाणपत्र शेवटी जोडण्यास विसरू नका. 
  13. मराठी, इंग्रजी किंवा हिंदी या भाषेत आपण आपला प्रकल्प लिहू शकता.
  14. महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी नवोपक्रम स्पर्धा म्हणजेच कृती संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात येते. 

जिल्हास्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था याबाबत स्पर्धा दरवर्षी राबवत असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे तर्फे ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. या स्पर्धेचे परिपत्रक सुद्धा शाळेला पाठवण्यात येते. त्याचबरोबर शिक्षण संक्रमण या मासिकात सुद्धा शेवटच्या काही पानावर शासन निर्णयात ही माहिती देण्यात आलेली असते. त्यासाठी शिक्षण संक्रमण व जीवन शिक्षण मासिके वाचणे आवश्यक आहे. 

सारांश 

मित्रांनो नवोपक्रम म्हणजे काय या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपण आजच्या ब्लॉग पोस्ट लेखांमध्ये स्पष्टपणे नमूद केली आहे. आजच्या आधुनिक डिजिटल युगात शैक्षणिक पद्धतीमध्ये प्रचंड प्रमाणात बदल होत आहे. अगदी 34 वर्षापासून शिक्षण आराखडा बदलला गेला नव्हता. आता नवीन शैक्षणिक धोरणास सुरुवात झाली असून नवीन शैक्षणिक धोरणात नवोपक्रम किंवा कृती संशोधन तत्वाचा अध्ययन अध्यापन पद्धतीत अवलंब करण्याचा मार्ग देण्यात आला आहे. आजच्या दृष्टीने अशा प्रकारचे उपक्रम राबवणे हे शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे सर्व विषयावर तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्याही घटकावर असे उपक्रम आपण लिहू शकता. त्यासाठीच आपण स्पर्धेसाठी उपक्रम बाबत संपूर्ण माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी सोप्या पद्धतीने या लेखाच्या माध्यमातून वाचकांसाठी लिहिली आहे. वाचक बंधू भगिनींनो हा लेख आवश्यक वाचा. हा लेख वाचल्यानंतर आपणास काही तांत्रिक अडचणी आल्यास किंवा काही त्रुटी आढळून आल्यास या ब्लॉग पोस्ट च्या कॉमेंट बॉक्समध्ये ब्लॉगरला आवश्यक सूचना, प्रतिक्रिया आणि त्रुटी आवश्यक कळवा. आपल्या सर्व सूचना व त्रुटी योग्य असल्यास त्वरित या लेखांमध्ये अद्यावत करण्याचा नेहमीच प्रयत्न ब्लॉगर चा असेल. आपणास हा लेख आवडल्यास मित्रांनो, आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा ही नम्र विनंती.

FAQ

1) नवोपक्रम म्हणजे काय? 

उत्तर- शैक्षणिक क्षेत्रात अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये निर्माण होणारी समस्या चा शास्त्रीय पद्धतीने उकल करण्याच्या पद्धतीला नवोपक्रम असे म्हणतात. 

2) नवोपक्रम पद्धत प्रथम कोणत्या वर्षी शैक्षणिक क्षेत्रात मांडली गेली. 

उत्तर- 19 47 मध्ये ही कल्पना शैक्षणिक क्षेत्रात मांडली गेली. 

3) नवोपक्रम उपक्रमात त मुख्य प्रमुख मुद्दा कोणता आहे? 

उत्तर समस्या निर्मिती हा प्रमुख मुद्दा आहे. 

4) नवोपक्रम प्रकल्प राबवण्याचा मुख्य फायदा कोणता आहे? 

उत्तर- विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा वाढवणे. 

5) नवोपक्रम दुसरे शास्त्रीय नाव काय आहेत? 

उत्तर -कृती संशोधन हे दुसरे नाव आहेत.

अधिक माहितीसाठी आपण खालील लेख आवश्यक वाचा

मुख्याध्यापकाचे प्रशासकीय अधिकार मराठी माहिती


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.