अण्णाभाऊ साठे मराठी माहिती |Annabhau Sathe Marathi Mahiti
प्रस्तावना
Annabhau Sathe Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण मराठी साहित्यिक, लेखक आणि कवी त्याचप्रमाणे शाहीर अण्णाभाऊ साठे मराठी माहिती Annabhau Sathe Marathi Mahiti याबाबत संपूर्ण माहिती या लेखातून अभ्यासणार आहोत. आपणास माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना आणि वाचक प्रेमी मित्रांनाही सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा.
अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव म्हणजेच जन्म नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगांव येथे १ ऑगस्ट१९२० रोजी झाला. त्यांचा जन्म सर्वसामान्यपणे इंग्रज राजवटीत झाला. त्यावेळेस आपल्या देशावर ब्रिटिशांचे साम्राज्य होते. अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन दिनांक 18 जुलै 2024 रोज गुरुवारी इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे जन्मतिथी असल्यामुळे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या लेखाच्या आधारे त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा महत्त्वपूर्ण लेख लिहिण्यासाठी ब्लॉगर ने ब्लॉक पोस्ट लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. या लेखातून अतिशय महत्त्वपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण मित्रांनो पाहूया.
अण्णाभाऊ साठे हे एक महान शाहीर , कवी, लेखक, साहित्यिक, कादंबरीकार त्याचप्रमाणे समाज सुधारक म्हणून मागासवर्गीय समाजामध्ये मातंग या समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. समाजासाठी आणि देशासाठी त्याचबरोबर इंग्रज राजवटीतून भारत मुक्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्या लेखणीतून महत्वपूर्ण साहित्य लिहून एक प्रकारचे समाज प्रबोधन करण्याचे महान कार्य त्यांनी केले म्हणून त्यांच्या स्मृती दिनाची आठवण जागृत करण्यासाठी लेख लिहिण्याचे मुख्य प्रयोजन आहे. चला तर मित्रांनो पाहूया संपूर्ण त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी माहितीया लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत
![]() |
Annabhau Sathe Marathi Mahiti |
Annabhau Sathe Marathi Mahiti(TOC)
अण्णाभाऊ साठे मराठी माहिती
मित्रांनो अण्णाभाऊ साठे यांचे आयुष्य फार अल्प असलेले दिसून येते. कारण त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला तर त्यांचा मृत्यू 18 जुलै 19 69 रोजी मृत्यू झाला. वयाने विचार करता वयाच्या 48 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. हा निधन दिवस अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिवस म्हणून महाराष्ट्रात दरवर्षी साजरा केला जातो. 'Annabhau Sathe Marathi Mahiti'
महान साहित्यिक
अण्णाभाऊ साठे हे कोणत्याही शाळेत शिकण्यासाठी गेले नाही. ते सर्वसामान्यपणे अशिक्षित होते. परंतु महान साहित्यिक म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचे फार मोठे साहित्य आपणासाठी वाचण्यास आज उपलब्ध आहेत. त्यांचे राष्ट्रीयत्व भारतीय होते. धर्माने ते हिंदू होते. मागास मातंग समाजा त समाजासाठी फार मोठे प्रबोधन त्यांनी केले. ते जरी अशिक्षित होते तरीसुद्धा लेखक समाज सुधारक कादंबरीकार आणि शाहीर म्हणून ओळखले जातात. मुळातच लोक त्यांना शाहीर अण्णाभाऊ साठे असे म्हणतात. कारण ते महान शाहीर सुद्धा होते. त्यांची मातृभाषा म्हणजेच मायबोली मराठी भाषा होती. त्यामुळे त्यांचे लिखाण मराठी भाषेमध्ये सर्व साहित्य लिहिले गेले. मराठी वाचकांना आणि वाचक रसिकांना आवडेल अशा सोप्या मराठी भाषेमध्ये त्यांचे लिखाण वाचण्यास मिळते
चळवळीचा इतिहास
त्यांच्या कार्यक्षेत्राचा आढावा घेतल्यास आपणास असे आढळून येईल की अण्णाभाऊ साठे यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन देशाला इंग्रज राजवटीतून मुक्त करण्यासाठी त्यांचे कार्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील उल्लेखनीय असे कार्य इतिहासात दृष्टीस पडते. त्याचबरोबर त्यांनी संयुक्त महाराष्ट्रात चळवळीमध्ये सुद्धा सहभाग घेऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळ व भारत स्वातंत्र्य चळवळ यशस्वी पणे यशस्वी केल्याचे उदाहरण इतिहासातील आढळून येणाऱ्या नोंदीवरून स्पष्टपणे लक्षात येते.
जीवनावर प्रभाव
शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रभाव हा कम्युनिस्ट नेत्यांचा पडलेला आहे.त्यांच्या जीवनावर श्रीपाद अमृत डांगे, काल मार्क आणि मॅक्झिम गार्गी या नेत्यांचा फार मोठा प्रभाव दिसून येतो त्यामुळे ते केमिस्ट चळवळीकडे आकृष्ट झालेले दिसून येतात.
शाहीर अण्णाभाऊ साठे जीवन परिचय.
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 01 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्यांचे मूळ नावे मुख्यत्वे करून तुकाराम भाऊराव साठे हे होते. परंतु ते समाजामध्ये टोपण नावाने ओळखल्या जाऊ लागले. त्यांचे टोपण नाव हे शाहीर अण्णाभाऊ साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे हे होते तर त्यांच्या आईचे नाव वालुबाई साठे हे होते. शाहीर अण्णाभाऊ साठे यांना यांचे दोन लग्न झाले. त्यांना दोन पत्न्या होत्या. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई साठे हे असून दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंत साठी हे होते. त्यांना एकूण त्यांच्या आयुष्यात 48 वर्षात तीन अपत्य जन्माला आले. त्यांच्या तीन अपत्यांची नावे अनुक्रमे मधुकर, शांता, आणि शाकुंतला हे होते.
शाहीर अण्णाभाऊ साठे जीवन चरित्र
मागास मातंग समाजात हिंदू धर्मात जन्मलेले तुकाराम हरिभाऊ साठे हे आयुष्यभर स्वातंत्र्य चळवळ व समाज प्रबोधन आणि लेखन कार्य करण्यात अतिशय गुंतून गेलेले होते. असे असले तरीसुद्धा त्यांच्या लेखन कार्यामुळे त्यांना शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे एक मराठीतील महान कवी, कादंबरीकार, लेखक आणि समाज सुधारक म्हणून ओळखले गेले. त्यांचे लेखन कार्य संपूर्णपणे कृतीशीलतेवर आधारित राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या समाज प्रबोधन कार्यावर आधारित लेखन आहे. सुरुवातीच्या काळात अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी चळवळीकडे आकर्षित होऊन साम्यवादी विचारांचा फार मोठा पगडा किंवा प्रभाव त्यांच्या साम्यवादी विचारसरणीतून दिसून आल्याशिवाय राहत नाही. दलिताचे साहित्य लिहिणारे संस्थापक म्हणून सुद्धा लोक त्यांच्याकडे त्यावेळी दलित साहित्यकार म्हणून ओळखू लागले. Annabhau Sathe Marathi Mahiti भारताच्या स्वातंत्र्य चळवळी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांनी बजावलेल्या भूमिका महत्वपूर्ण ठरल्या आहेत.
शाहीर अण्णाभाऊ साठे वैयक्तिक जीवन
मागास जमातीतील मातंग समाजात हिंदू धर्मात जलमलेले अण्णाभाऊ साठे हे महान शाहीर आणि साहित्यिक म्हणून प्रसिद्ध झाले. त्याकाळी मागासवर्गीयांना शिक्षण घेण्यास स बंदी होती. मागासवर्गांना शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी प्रवेश नाकारला जात असे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे शाळेत शिक्षण घेण्यासाठी आणि प्रवेश घेण्यासाठी गेले. शाळेत त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर फक्त शाळेत ते दीड दिवस हजर राहिले म्हणजेच दीड दिवस शाळेत होते. कारण तेथे उच्चवर्णीय होणाऱ्या भेदभावणीमुळे त्यांना शाळा सोडून द्यावी लागली. दीड दिवस शाळेत हजर असणारा व्यक्ती म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठे. दीड दिवस शाळेत गेले पण त्यांनी निर्माण केलेले आणि लिहिलेले साहित्य आज अनेक विद्यापीठातून अभ्यासल्या जात आहे. सामान्य अशिक्षित माणूस असंख्य विषयावर लिखाण करू शकतो शाळेत न जाता यावर आपला विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. खडतर काटेरी जीवन वाटेवर मार्गस्थ होऊन प्रबोधन करणे आणि साहित्य लिहिणे हे काम फक्त सामान्यातील असामान्य व्यक्तीच करू शकतो म्हणजेच शाहीर अण्णाभाऊ साठे हे असामान्य व्यक्तिमत्व असणारे महान कादंबरीकार, कवी, शाहीर, साहित्यिक, लेखक म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्यांनी भरपूर विषयावर आपले साहित्य लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या त्या साहित्याबाबतही सुद्धा या लेखात पुढे आपण पाहणारच आहोत ही माहिती.त्यापूर्वी आपण त्यांच्या राजकीय जीवनाच्या कार्याचा मित्रांनो अभ्यास करूया.
राजकारणात प्रवेश
शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी राजकारणात प्रवेश केला. अण्णाभाऊ साठे यांनी सुरुवातीला केमिस्ट विचारसरणीने प्रभावित होऊन कॅप्टन श्रीपाद अमृत डांगे यांच्या विचाराच्या प्रभावाने प्रभावित होऊन मोलाचे कार्य केले .याच विचारसरणीमध्ये पुढे ते 1944 मध्ये दत्ता गव्हाणकर आणि अमर शेख यांच्यासोबत काम करू लागले. दत्ता गव्हाणकर हेही सुद्धा शाहीर होते त्याच बरोबर अमर शेख हेही सुद्धा शाहीर होते आणि यांच्या शाहिरीला जोड मिळाली ती शाहीर अण्णाभाऊ साठे यांची. या तिन्ही शाहिरांनी एकत्र येऊन आपल्या शायरी माध्यमातून समाज प्रबोधन करण्यासाठी एक प्रथम कला पथक स्थापन केले. त्यांनी स्थापन केलेल्या कलापथकांचे नाव होते "लालबावटा कलापथक"हे होते .या कला पथकाने महाराष्ट्रात ठीक ठिकाणी कार्यक्रम करून सरकारच्या अनेक धोरणांवर आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून टीकात्मक शस्त्र सोडले.
त्यांचे कार्य सुरू असतानाच 1940 च्या दशकामध्ये कार्यरत असणारे आणि तेविया अब्राहम यांच्या मतानुसार भारतातील समाजवादाच्या आधी स्वातंत्र्याची 1950 च्या दशकातील रोमांचक नाटकीय घटना फार मोठी घडली. त्या घटनेचे सुद्धा वर्णन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात असणारी एक महत्वपूर्ण कार्यक्रम करणारी संस्था होती. त्या संस्थेचे नाव होते. इंडियन पीपल थिएटर असोसिएशन. या संस्थेत ते दाखल झाले आणि तेथेही महत्वपूर्ण व्यक्तिमत्व जडणघडण महत्वपूर्ण ठरली. त्या संस्थेत सुद्धा त्यांनी उत्कृष्ट प्रकारचे कार्य केले. त्यामुळे पुढे या संस्थेच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती. त्या शाखेमध्ये सुद्धा शाहीर अण्णाभाऊ साठे सामील झाले आणि या दोन संघटनेमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये कार्य सुरू केले. त्यांनी आपल्या कार्यातून भाषिक विभागातून वेगवेगळी मराठी भाषिक राज्य म्हणजेच बॉम्बे राज्य निर्माण करण्याची त्यांनी मागणी केली होती. मराठी बोलणारे भाषिक लोकांसाठी एक महत्वपूर्ण राज्य निर्मिती करण्याचा त्यांनी सफल प्रयत्न केला.
दलितांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजन
शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दलित समाजा त जन्म घेतल्यामुळे दलित समाजासाठी समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून दलितासाठी वेगवेगळ्या कार्यक्रम आयोजन करून त्यामार्फत उत्कृष्ट प्रबोधन केले. त्यांनी आपल्या साहित्यातून कामगाराच्या जीवनाच्या अनुभवावर आधारित कामगारांचे शोषण कसे होते हे त्यांनी आपल्या कथेमधून वापर करून जागृती करण्याचे कार्य केले. त्या कार्याच्या संदर्भात सन 1958 मध्ये बॉम्बे मध्ये त्यांनी दलितांसाठी दलित साहित्य संमेलन आयोजित करून त्या संमेलनाचे उद्घाटन बॉम्बे येथे त्यांनी केले. दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे भाषण प्रथम त्यांनी केले. आपल्या उद्घाटन भाषण मध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे उद्घाटन भाषण मध्ये म्हणाले की, आपल्या लोकांमध्ये प्रथम अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजे. आपल्या लोकांचे मत आहे की"आपली पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर आहे. ही आपल्या लोकांची कल्पनाच मुळी चुकीची आहे. पृथ्वी ही कोणत्याही शेषनागावर तरंगत उभी नसून ती उभी आहे ती दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरंगलेली आहे. कामगारांनी काम बंद केले तर समजून येईल पृथ्वी कशावर आहे तरंगत आहे. जगामध्ये त्याकाळी जागतिक स्वरचनेमध्ये मालक आणि कामगार हे समाजवादावर आधारित आहे. मालक लोकांकडून कामगाराची पिळवणूक होते. म्हणूनच साम्यवादी चळवळीमध्ये काल मार्क्सच्या प्रभावाने प्रभावित होऊन कामगार वर्गांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या लिखाणातून लिहिला आहे. दलित समाजावर आधारित असणारे लेखकाचे विपरीत परिणाम अण्णाभाऊ साठे च्या कार्यातून दिसून येते."Annabhau Sathe Marathi Mahiti" कारण अण्णाभाऊ साठे यांच्या वर काल मार्क्स या विचारवंता चा आणि साम्यवादाचा फार मोठा प्रभाव असल्यामुळे कामगाराची दशा आणि दिशा जवळून त्यांनी पाहिली व त्या आधारावर लिखाण कार्य केले.
अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनातून म्हणतात की, महाराष्ट्रातील दलित लेखकांना सध्याच्या संसारिक व अत्याचारापासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांची संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे कारण समाजा पारंपारिक अंधश्रद्धेवर आधारित असून त्यांच्या मनातील संपूर्ण अंधश्रद्धा जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत समाजाचा विकास होत नाही. कामगाराच्या अत्याचारावर तसेच दलितांच्या शोषणावर आणि अंधश्रद्धेवर त्यांनी कडाडून विरोध दर्शविला.
अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण साहित्य
अण्णाभाऊ साठे यांनी त्यांचे लेखन मराठी भाषेतून केले आहे. कारण त्यांची मूळ भाषा मराठी ही होती. Annabhau Sathe Marathi Mahiti मराठी भाषेमध्ये त्यांनी ही एकूण त्यांच्या जीवनात 35 कादंबऱ्या लिहून ठेवल्या आहेत. या सर्व कादंबऱ्या पैकी त्यांच्या महत्त्वपूर्ण कादंबरीतील एक कादंबरी म्हणजे "फकीरा"ही कादंबरी त्यांनी 1959 मध्ये लिहून पूर्ण केली. या त्यांच्या 'फकीरा 'या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरी म्हणून 1961 मध्ये उत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार या कादंबरीला प्रदान करण्यात आला आहे. अण्णाभाऊ साठे हे लघुलेखक आणि लघुकथा लेखक म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या हयाती एकूण पंधरा लघुकथा लिहून पूर्ण केल्या . त्यांच्या लघु कथांचे भारताच्या अनेक भाषेमध्ये आता काही भाषांतर करांनी भाषांतरित सुद्धा केली आहे. त्यांच्या 27 कादंबऱ्या ह्या भाषिक भाषेमध्ये पुढे भाषांतरित झाल्या.म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांना लघुकथा कार वजा कादंबरीकार म्हणून इतिहासात त्यांचे नाव आजरा अमर झाले आहेत.
अण्णाभाऊ साठे यांनी लघुकथे बरोबरच नाटकही सुद्धा लिहिली आहेत. त्यांचे गाजलेले नाटक म्हणजे' रशियातील भ्रमंती'हे नाटक होय.
लिखाण कार्यातच त्यांनी पुढे हळूहळू पटकथा लिहिण्यास सुद्धा सुरुवात केली. मी त्यांनी काही पटकथा ही सुद्धा लिहिल्या आहेत.
शाहीर या नावाने प्रसिद्ध होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी शाहिरी भाषेमध्ये काही पोवाडे लिहिले आहेत. मराठी भाषेत आणि मराठी भाषा शैलीत त्यांचे दहा पोवाडे आणि काही पोवाडे वजा गाणे सुद्धा दिली आहे.
लिखाण कार्यात शाहीर अण्णाभाऊ साठे लोककथात्मक शैलीचा वापर करून पोवाडे आणि लावण्या यांच्यासारखे लोककथात्मक कथा शैलीतील त्यांचे पोवाडे लोकप्रिय बनले. त्यांनी हे सर्व कार्य शोषण होणाऱ्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वपूर्ण कार्य करून लिखाणातून समाजप्रबोधनाकडे यशस्वी वाटचाल केलेली होती.
शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शोषणाचे कार्य समाजापर्यंत राबवण्यासाठी दलितावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी फकीरा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केली. या फकीरा कादंबरीमध्ये भूकमारी आणि ग्रामीण रुढीवादी प्रणाली त्याच बरोबर ब्रिटिश शासनाला विद्रोह विरोध करण्यासाठी प्रमुख जर नायक कोण असेल तर तो म्हणजे फकीरा हे चित्र फकीरा नायक आणि त्याच्या समुदायाला नंतर ब्रिटिश अधिकाऱ्याद्वारे अटक आणि छळ दिला जातो आणि अखेरीस फकीराला फाशी देऊन ठार मारले जाते हा तो कादंबरीचा सारांश आहे.
पर्यावरणवादी विचार
संयुक्त महाराष्ट्रातील बॉम्बे हे त्यांनी जवळून पाहिले. बॉम्बे मध्ये अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये कामगार काम करतात. आणि कंपन्यामुळे नैसर्गिक प्रदूषण वाढते आणि या वाढलेल्या प्रदूषणावर आधारित मुंबई मधील शेरी पर्यावरणा च्या बाबत त्यांनी लिखाण करण्याचे कार्य हाती घेतले. प्रभावीपणे प्रदूषणावर आधारित पर्यावरणावर प्रकाश टाकण्यासाठी महत्त्वपूर्ण लिखाण केले मुंबईमधील कामगारांना न्याय मिळत नव्हता. त्यांच्यावर अन्याय होत होता. त्यांचे शोषण केले जात होते. कामगाराबरोबर आर्थिक दुर्व्यवहार करून असमानतेची वागणूक मुंबईमध्ये निरनिराळ्या कंपन्यांमध्ये हे कार्य सुरू होते. त्यामुळे त्यावर आधारित त्यांनी "मुंबईची लावणी" त्याचबरोबर "मुंबईचा गिरणी कामगार" या दोन गाण्याच्या माध्यमातून कामगाराच्या अन्यायाला वाचा फोडण्याची कार्य त्यांनी केले.
अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली साहित्य
१) लोकनाट्य 1945 मध्ये 'अकलीची गोष्ट'
२) अण्णाभाऊ साठे: प्रातिनिधी कथा
३) अमृत
४) आघात
५) आबी (कथासंग्रह)
६) आवडी (कादंबरी संग्रह)
७) इनामदार (1958 मध्ये नाटक लिहिले)
८) कापऱ्या चोर (लोकनाट्य)
९) कृष्णाकाठची कथा (कथासंग्रह)
१०) खुळंवाडा(कथासंग्रह)
११) गजाआड(कथासंग्रह)
१२) गुऱ्हाळ
१३) गुलाम (कादंबरी)
१४) चंदन (कादंबरी)
१५) चिखलातील कमळ (कादंबरी)
१६) चित्रा(कादंबरी 1945 मध्ये लिहिली)
१७) चित्रा (कादंबरी 1945 मध्ये लिहिली)
१८) चिरानगरीचे भूतं(कथासंग्रह 1978)
१९) नवती(कथासंग्रह)
२०) निखारा (कथासंग्रह)
२१) तारा
२२) देशभक्त घोटाळे (1946 मध्ये लिहिलेले लोकनाट्य)
२३) पाझर (कादंबरी)
२४) पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)
२५) पुढारी मिळाला (1952 मध्ये लिहिलेले लोकनाट्य
२६) पेंग्याचं लगीन (नाटक)
२७) फकीरा (1959 मध्ये लिहिलेली कादंबरी पुरस्कार प्राप्त)
२८) फरारी (कथासंग्रह)
२९) मथुरा (कादंबरी)
३०) माकडीचा माळ (1963 मध्ये लिहिलेली कादंबरी)
३१) रत्ना (कादंबरी)
३२) रानगंगा (कादंबरी)
३३) बरबाद्दा कंजारी (कथा संग्रह 1966 मध्ये लिहिला)
३४) रूपा (कादंबरी)
३५) बेकायदेशीर (1947 मध्ये लिहिलेले लोकनाट्य)
३६) माझी मुंबई (लोकनाट्य)
३७) मूक मिरवणूक (लोकनाट्य)
३८) रानबोका
३९) लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य 1952मध्ये लिहिले)
४०) वारणेचा वाघ (1968 मध्ये लिहिलेली कादंबरी)
४१) वैजयंता(कादंबरी)
४२) वैर(कादंबरी)
४३) शेटजीं चे इलेक्शन (1946 मध्ये लिहिलेले लोकनाट्य)
संघर्ष
१) सुगंधा
२) सुलतान (नाटक)
प्रवास वर्णन
१) हे माझं बेटच आहे कविता आणि माझा रशियाचा प्रवास.
काव्य
अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या.
समाज परिवर्तन कार्य
ते मागास जमातीत जन्माला आल्यामुळे त्यांना त्यावेळी मागस वर्गीय समाजाचे परिवर्तन करण्याचे ठरवून त्या दिशेने त्यांनी त्यांच्या कार्याची वाटचाल सुरू केली. प्रथम आपल्या समाजामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे. समाजावर होणारे अन्याय आणि अंधश्रद्धा याबाबत नवा दृष्टिकोन समाजाला प्रबोधनातून करून देण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. त्यामुळे अण्णाभाऊ साठे चे साहित्य हे परिवर्तनशीलतेला दिशा व चालना देणारे साहित्य म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर मागास समाजाला आणि संपूर्ण समाजाला फार मोठे योगदान त्यांच्या कार्यातून आणि साहित्य लेखनातून आढळून आल्याशिवाय राहत नाही. लिखाण हे संशोधनावर आधारित असावे असे त्यांचे स्वतःचे मत होते. आजच्या सुद्धा अनेक विद्यापीठांमध्ये अनेक अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणावर संशोधनात्मक कार्य करत असल्याचे निरीक्षण केल्यास दिसून येईल.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ
अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अत्यंत मोलाचे कार्य केले आहे आणि त्यांच्या कार्याने लोक समाजामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी करून यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संयुक्त महाराष्ट्रात चळवळीच्या कार्यात त्यांना सहकार्य करणारे अनेक साहित्यिक आणि शाहीर त्यांना करू लागली. त्यापैकी काही शरीरांचे आणि साहित्यिकांचे येथे उल्लेख करणे आवश्यक असल्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख चळवळीच्या दृष्टिकोनातून समोर आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच जाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी सुद्धा शाहीर आण्णाभाऊ साठे सोबत चळवळीत सहभाग नोंदवला आणि चळवळ यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी समाज प्रबोधन करत असताना महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कला पथकांचे कार्यक्रम आयोजित केले. त्यांच्या कला पथकांचे नाव 'आपला लाल बावटा कला पथक' असे होते. या कलापतकाने महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई येथे या कलापथकाने अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करून यशस्वी करून दाखवले. त्यांच्या या कला पथकातून आणि साहित्यातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ व भारत स्वातंत्र्य चळवळ याबाबतचे शाहिरी स्वरूपात गीतांनी पोवाडे सादर करून संपूर्ण समाज प्रबोधन करणारे महान कलाकार कलापतकाची यशस्वी आयोजक म्हणून ओळखले जातात.
सारांश
अण्णाभाऊ साठे म्हणजेच शाहीर अण्णाभाऊ साठे अशिक्षित असून सर्वात जबरदस्त लेखक, नाटककार, साहित्यिक, कवी, कादंबरीकार ,लघुलेखक कथा आणि लावण्या आणि पोवाडे लिहून समाजाचे प्रबोधन करणारे समाज सुधारक म्हणून कार्य करत असतानाच राजकीय जीवनातील प्रवास संयुक्त चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात महत्वपूर्ण कामगिरी करणारा नामवंत शाहीर म्हणून महाराष्ट्राच्या सर्व लोकांना परिचित साहित्यिक म्हणजे शाहीर अण्णाभाऊ साठे होय. त्यांच्या अनेक लेखनावर आधारित चित्रपटसृष्टीमार्फत चित्रपट सुद्धा तयार करण्यात आले आहेत. अशा महान शाहिराचा सरकारने आठवण राहावी म्हणून पोस्टाच्या टपाल तिकिटावर अण्णाभाऊ साठे 2019 मध्ये छापला. ठीक ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे सुद्धा उभारण्यात आलेले आहेत. उपेक्षित समाज जातीत जलमलेले महान शाहीर अण्णाभाऊ साठे हे मांग समाजाचे प्रतीक बनले म्हणूनच भारताचे बाबासाहेब गोपले यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली असून त्याच बरोबर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली आहेत अण्णाभाऊ साठे यांचा पुण्यातील स्मारक आणि मुंबईच्या कुर्ला मधील उडानपुळास आणि इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे. अशा महान शाहीर आला त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल सन्मान व सलाम करून पूर्णविराम देतो आहे
FAQ
1) शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव सांगा?
उत्तर-तुकाराम भाऊराव साठे
2) शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन किंवा आहेत?
उत्तर-18 जुलै 2024 रोजी यावर्षी स्मृतिदिन आहेत.
3) शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गाजलेल्या दोन कादंबऱ्या चे नाव सांगा?
उत्तर-फकीरा, वारणेचा वाघ ह्या सर्वात गाजलेल्या कादंबऱ्या आहेत.
4) अण्णाभाऊ साठे किती वर्ष जगले?
अण्णाभाऊ साठे 48 वर्षे जगले.
5) टपाल खात्याच्या कोणत्या तिकिटावर अण्णाभाऊ साठे यांचा फोटो आहे?
टपाल खात्याच्या चार रुपयाच्या तिकिटावर अण्णाभाऊ साठे यांचा फोटो छापण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी खालील लेख अवश्य वाचा.
Mukhymantri Majhi Ladaki Bahin Yojana Marathi Mahiti
अधिक माहितीसाठी Vedio