प्रस्तावना
Tirth Darshan Yojana Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने निर्गमित केलेली योजना यासंदर्भा ने तीर्थ दर्शन योजना यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखातून पाहू या. महाराष्ट्र राज्यातील जेवढे धर्म महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत त्या सर्व धर्मीयांकरिता महत्त्वपूर्ण योजना शासनाने ज्येष्ठ नागरिकाकरिता मान्यता दिली आहेत. मित्रांनो आपण हा लेख वाचल्यानंतर आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी व योजनेचा फायदा घेण्यासाठी शेअर करा.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, विस्तार विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यासाठी दिनांक 14 जुलै 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला. Tirth Darshan Yojana Marathi Mahitiया शासन निर्णयाच्या संदर्भाने सविस्तर माहिती या लेखात आपण अभ्यास करणार आहोत.
मंत्रालयाने निर्गमित केलेल्या शासन निर्णया निर्णयानुसार कोणत्या व्यक्तीला या योजनेचा फायदा होणार आहे .वरील त्या संदर्भाने या योजनेचा फायदा घेण्यासाठी आवश्यक अटी आणि पात्रता आणि सर्व प्रकारचे नियम सारांश रूपाने या लेखात नमूद केलेले आहेत.
![]() |
Tirth Darshan Yojana Marathi Mahiti |
Tirth Darshan Yojana Marathi Mahiti(toc)
शासन निर्णयाचे शीर्षक
महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमध्ये साठ वर्ष वय व त्यावरल ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यास मान्यता प्रदानदेणेबाबत.
निर्णय निर्गमित
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यासंदर्भात महाराष्ट्र शासन सामाजिक व विशेष सहाय्य विभाग मुंबई यांनी हा शासन निर्णय दिनांक 14 जुलै 2024 रोजी निर्गमित केला असून या निर्णया च्या अनुषंगाने पात्रता व' Tirth Darshan Yojana Marathi Mahiti'अटी पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या शासन निर्णयाचा शासन निर्णय निर्गमित झालेल्या पासून हा नियम लागू करण्यात आला आहे.
शासन निर्णयाची प्रस्तावना
आपल्या भारत देशात जगातील सर्व धर्माचे लोक गुना गोविंदाने एकत्र राहत असून जगातील सर्व धर्माचे जणू काही आपल्या देशात संमेलन भरले आहे. महाराष्ट्राची भूमि ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. महाराष्ट्रातील अनेक धर्माचे संत आणि धर्मगुरू महाराष्ट्रात होऊन गेले आहेत.
सर्व संतांनी आणि धर्मगुरूंनी अमूल्य अशी शिकवण करून महाराष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे असे संत किंवा धर्मगुरू महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी होऊन गेले त्या त्या ठिकाणी दरवर्षी ठराविक दिवशी निरनिराळ्या धर्मांच्या यात्रा भरवण्यात येते. या यात्रेच्या संदर्भाने तीर्थ दर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्याचा शासनाचा निर्णय विचाराधीन होता.
आपल्या भारतात निरनिराळ्या विविध प्रकारच्या धर्माचे व पंथाचे अनुयायी महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. महाराष्ट्र ही आपल्या देशात संतांची भूमी म्हणून ओळखण्यात येते. महाराष्ट्रातील अनेक संतांनी धर्माचा प्रसार करण्यासाठी भारतभर फिरून भारताची सीमा ओलांडून सुद्धा धर्माचा प्रसार केला आहे.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची भक्तिमार्गाची शेकडो वर्षापासून ची परंपरा अजूनही चालू असून लोक वारकरी संप्रदायामार्फत धर्मकार्य व समाजकार्य करून समाजाचे प्रबोधन करत आहेत. आपला संपूर्ण दैनंदिन व्यवहार व कर्तव्य पार पाडून कोणत्याही गोष्टीची चिंता न करता देव देवतांचे नामस्मरण आणि चिंतन करी त संपूर्ण आयुष्य जगत आहे.
शासन निर्णयातील प्रस्तावनेनुसार अनेक धर्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी व यात्रा करण्यासाठी महाराष्ट्रीयन ज्येष्ठ नागरिकांना मोफत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना च्या दृष्टीने शासन निर्णय निर्गमित करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयोजन महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे शासन निर्णयातील प्रस्तावने नुसार या प्रस्तावनेत त दर्शविलेल्या धर्म स्थळांच्या व दर्शन ठिकाणांच्या यात्रेत सहभागी होऊन तीर्थ दर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा मोफत फायदा मिळण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती होण्यासाठी आणि देवदर्शनासाठी शासनाने संधी उपलब्ध करून दिली आहे.
राज्य आणि भारतातील तीर्थस्थळांना मोफत देवदर्शन आणि भेट दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नागरिकांना दर्शन प्राप्त करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरू करण्याचीबाब शासनाच्या प्रयोजनानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचाराधीनअसल्यामुळे शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.
शासन निर्णय स्पष्टीकरण
महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय राज्यातील सर्व धर्मामधील ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे असल्यास त्यांना या शासन निर्णया नुसार भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभाग महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या योजनेच्या संदर्भाने शासनाने शासन निर्णयात दर्शविलेल्या अटी अनुक्रमे 01ते 27 उद्याच्या आधारे संपूर्ण माहिती शासन निर्णयाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे. या सर्व अटींचे आपण सारांश रुपाने शासन निर्णयात दर्शविलेले सर्व मुद्दे या लेखात स्पष्टपणे नमूद करणार आहोत.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना.
1)शासन निर्णयाचे शीर्षक-मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना.
2) शासन निर्णयाचे उद्दिष्टे-महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा दर्शन उपलब्ध करून देणे.
3) शासन निर्णयाची व्याप्ती
प्रमुख तीर्थस्थळ यात्रा
तीर्थस्थळाची यादी शासन निर्णयाच्या परिशिष्ट "अ "व " ब"मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्याच ठिकाणी तीर्थस्थळांना भेटी देणे. भविष्यात तीर्थस्थळाची यादी कमी होऊ शकते किंवा कदाचित वाढूही शकते. तीर्थस्थळातील यादीमधील फक्त एका तीर्थस्थळांना ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन घेता येईल. हा लाभ फक्त एक वेळेस देण्यात येणार आहे.
तीर्थस्थळांना भेटी देण्यासाठी आर्थिक खर्च म्हणून कमाल मर्यादा शासनाने तीस हजार रुपये पर्यंतच मंजुरी देण्यात येईल. Tirth Darshan Yojana Marathi Mahiti तीर्थस्थळांना ज्येष्ठ नागरिकांना भेट देण्यासाठी खर्च मर्यादा विचारात घेऊन प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी बाबीचाच समावेश खर्चामध्ये समाविष्ट करण्यात आलेला असेल.
4) शासन निर्णयाचे लाभार्थी-या योजनेचा फायदा घेताना लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असून तो ज्येष्ठ नागरिक असावा त्याचे वय 60 वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
5) शासन निर्णयातीलमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मराठी माहिती
पात्रता
- महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा जास्त वय असणारे जेष्ठ नागरिक.
- लाभार्थ्यांची कुटुंबाची वार्षिक आर्थिक उत्पन्न रक्कम मर्यादा दोन लाख 50 हजारापेक्षा जास्त असता कामा नये.
शासन निर्णयाच्या अपात्रता
1)कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर दाता असेल तर अपात्र
2) कुटुंबातील सेवानिवृत्त कर्मचारी अपात्र तसेच खाजगी उपक्रमातील कंत्राटी स्वरूपाचा बाह्य यंत्रणेद्वारे कार्य करणारा स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
3) कुटुंबातील कोणताही सदस्य आजी किंवा माझी आमदार किंवा खासदार असेल तर त्या कुटुंबातील व्यक्ती अपात्र ठरेल.
4) कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही उपक्रमावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असेल तर कुटुंबातील सदस्य अपात्र ठरतील.
5) कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन कोणाच्याही नावावर असले तरीसुद्धा त्या कुटुंबातील सदस्य अपात्र ठरेल.
6) गंभीर स्वरूपातील आजारी व्यक्ती अपात्र असेल.
7) या योजनेचा लाभार्थी यांना सक्षम अधिकाऱ्यांचे वैद्यकीय फिजिकल फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. फिजिकल फिटनेस चे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले प्रवास सुरू होणाऱ्या पंधरा दिवसाच्या आतील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
8) अर्जदार लाभार्थींना लॉटरी पद्धतीने निवड केल्यानंतर प्रवास करण्यासाठी आमंत्रित करण्याचे शासनाचे आदेश लाभार्थींना प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी हा या आदेशान्वये प्रवास पूर्ण केला नसेल तर अशा सदस्यांना किंवा माजी लाभार्थींना पात्र ठरविण्यात येणार नाही.
9) या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपल्या प्रवासा संबंधित खोटी माहिती सादर करून शासनाची दिशाभूल केल्यास अशा लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात येईल व तो अपात्र ठरेल.
वरदर्शिवलेल्या पात्रता आणि अपात्रता याबाबत निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यते नुसार सुधारणा दर्शक परिपत्रक निर्गमित करण्यात येईल.
लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
1) ऑनलाइन अर्ज सादर करणे.
2) अर्जदाराची आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
3) महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला किंवा डोमेसाइल सर्टिफिकेट (आदिवासी प्रमाणपत्र) आभार त्याजवळ आदिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याला पंधरा वर्षांपूर्वीचे जन्माचे पुरावे सादर करावे लागतील. रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
4) सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तसेच कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न हे 2 लाख 50 हजार या मर्यादित असणारे असणारे लाभार्थी व त्यांना सक्षम अधिकाऱ्यांचा उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे.
5) वैद्यकीय प्रमाणपत्र कोणत्याही प्रकारचा आजार नसल्याबाबत.
6) पासपोर्ट आकाराचा स्वतःचा अद्यावत फोटो.
7) जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक.
लाभार्थ्यांच्या प्रवासासाठी टुरिस्ट किंवा बस ट्रॅव्हल बाबत सूचना
सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रेल्वे किंवा प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय .आर. सी. टी .एस .सक्षम अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड निविदा प्रक्रिया द्वारे करण्यात. "Tirth Darshan Yojana Marathi Mahiti "त्याच बस मार्फत किंवा रेल्वे मार्फत प्रवास करणे बंधनकारक असेल.
लाभार्थ्यांची निवड
जिल्हास्तरीय समिती द्वारे लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया करण्यात येईल.
1)प्रत्येक जिल्ह्याचा लाभार्थींचा कोटा निश्चित करण्यात. जिल्ह्यातील लोकसंख्या च्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येईल येईल. अर्जदारांच्या संख्येनुसार सुद्धा कोटा निश्चित करण्यात येईल. जिल्ह्यात ठरवण्यात आलेल्या लाभार्थींच्या कोटा हा मर्यादित संख्येपेक्षा जास्त असेल तर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची संगणक ड्रॉप पद्धतीने निवड केली जाईल. उर्वरित लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार केली जाईल.
2) लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर जर त्याने प्रवास केला नाही तर त्या ऐवजी प्रतीक्षा यादीत समाविष्ट केलेल्या प्रवाशांना प्रवास करण्यासाठी संधी देण्यात येईल.
3) निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी पोर्टलवर त्याचप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल. मध्यमाद्वारे सुद्धा यादी जाहीर करण्यात येईल.
4) तीर्थयात्रेसाठी निवड झालेल्या फक्त एकाच व्यक्तीला प्रवासासाठी जावे लागेल त्यांना कोणी सोबत घेता येणार नाही.
5) एका कुटुंबातील पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल व अर्जामध्ये लॉटरी पद्धतीने दोघांची निवड झाल्यास असल्यास आणि दुसऱ्या जोडीदारांची लॉटरी निवड झाली नसेल तर आयुक्त समाज कल्याण पुणे किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकते.
प्रवास प्रक्रिया
1) जिल्हास्तरीय समितीने निवडलेली लाभार्थ्यांची यादी समाज कल्याण विभागातील आयुक्ताकडे पुणे येथे सादर करणे आवश्यक आहे.
2) लाभार्थ्यांची निवड झालेली यादी बस किंवा टुरिस्ट कंपनी किंवा रेल्वे विभाग यांना सुद्धा देण्यात येईल.
3) प्रवाशांच्या लाभार्थ्यांना कोणत्या सुविधा देण्यात येईल याबाबतचा निर्णय राज्य शासनाद्वारे घेण्यात.
4) निवड झालेल्या टुरिस्ट कंपनी लाभार्थ्यांच्या प्रस्तानाची व्यवस्था संबंधित टुरिस्ट कंपनींना करावी लागेल.
5) लाभार्थ्यांना किंवा यात्रेकरूंना प्रवासाला सुरुवात करण्यासाठी नियोजित स्थळी बसव्यवस्था ज्या ठिकाणी केली आहे त्या ठिकाणापर्यंत स्वखर्चाने तेथे पोहोचावे लागेल.
या शासन निर्णयातील मुख्य मुद्द्यांच्या संदर्भात आपण स्पष्टीकरण केले आहेत
शासन निर्णय फार मोठा असल्यामुळे सर्व मुद्दे लेखात आता सारांश रुपाने स्पष्ट करण्यात येणार आहे. संबंधित शासन निर्णयाची लिंक लेखांमध्ये देण्यात येईल.
मित्रांनो आता आपण फक्त सारांश रुपाने माहिती पाहूया.
प्रवासा रेल्वेने किंवा बसणे निश्चित केलेला असेल
लाभार्थ्यांची आरोग्याबाबत दक्षता संबंधित कंपनीला घ्यावी लागेल
1अधिकृत प्रवाशांचा गट निश्चित झाल्यानंतर किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावर तीर्थयात्रेला सुरुवात होईल.
2प्रवासासाठी लाभार्थ्याशिवाय इतर कोणालाही संधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही.
3)प्रवासामध्ये शासना व्यतिरिक्त मान्य झालेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च लाभार्थ्यांना स्वतः स्वखर्चाने अतिरिक्त भार करावा लागेल .
4)लाभार्थींना प्रवास दरम्यान प्रवासाकडून शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे अपेक्षा क्रमांक एक ते सहा अनुक्रमे पूर्ण कराव्या लागतील.
5)अर्ज करण्याची पद्धत शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे विविध प्रक्रियेनुसार ऑनलाइन करून शासन निर्णयातील कलम क्रमांक एक ते चार अनुक्रमे पूर्ण करावे लागतील.
6) सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात यादीचे प्रकाशन करण्यात येईल.
7) मूळ अर्जदारासह जीवनसाथी किंवा सहाय्यकांच्या प्रवासा संबंधीची तरतूद अर्जात दर्शविलेल्या अनुक्रमे कलम क्रमांक एक ते मधील संपूर्ण अटी पूर्ण करणे आवश्यक असेल.
8) शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे राज्यस्तरीय समिती रचना शासनाने शासनाने निर्धारित करून समिती गठन केलेल्या समितीमार्फत प्रक्रिया राबवण्यात येईल
या समितीमध्ये शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे एक ते सतरा सदस्य असतील . शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे समितीची रचना करण्यात आलेली आहे. या समितीने राज्यस्तरावर कोणत्या प्रकारचे कार्य करावे याबाबत शासन निर्णयात ही संपूर्ण कार्य अनुक्रमे एक ते सहा कलमाप्रमाणे समिती योग्य कार्य पार पाळावे लागतील.
9) जिल्हास्तरावर जिल्हा समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची रचना तयार केली आहेत व शासन निर्णयात कलम क्रमांक 19 मध्ये दर्शवली असून या समितीत अनुक्रमे एक ते सात सदस्य असतील आणि ही समिती शासन निर्णयात दर्शविल्याप्रमाणे दरमहा बैठकीचे आयोजन करून समितीची कार्यकक्षा शासन निर्णयात दर्शविलेल्या कलम क्रमांक एक ते पाच पाठीच्या संदर्भात योग्य कार्य या जिल्हास्तरीय समितीला करावे लागेल
10) समितीचे मूल्यांकन आयुक्त समाज कल्याण पुणे हे करती
11) या योजनेसाठी पोर्टल वेबसाईट तयार करण्याचे काम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाकडून करून घेतले जाईल.
12) संपूर्ण या योजनेसाठी राज्य नोडल अधिकारी काम योग्य ते कार्य नूडल अधिकारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय यांच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्यासाठी मंत्रालय असेल. योग्य आवश्यक मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात येतील.
13) लेखाशिर्ष
या योजनेसाठी स्वतंत्र लेखा शीर्ष मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने करता नव्याने उपलब्ध करून देऊन त्या मार्फत खर्च करण्यात येईल. प्रत्येक आर्थिक वर्षांमध्ये जमाखर्चाचे ऑडिट करण्यात येईल.
14) शासन निर्णयात उपरोक्त दर्शविलेल्या सर्व माहिती ही शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने दिनांक 11 जुलै 2024 च्या बैठकीत निर्णय घेऊन शासन निर्णय निर्गमित केला असून सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि हा शासन निर्णय राज्यपालाच्या नावे निर्गमित करण्यात आला असून महाराष्ट्र राज्याचे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन राजेश मांजरेकर यांच्या डिजिटल सहीने प्रमाणित केला असून शासनाच्या सर्व विभागांना या शासन निर्णयाच्या योग्य कार्यवाहीस्तव देण्यात आला आहे.या शासन निर्णयाची लिंक आपल्या माहितीस्तव पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे.
शासन निर्णय
सारांश
मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा या संदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून भारतातील तीर्थयात्रेसाठी परिशिष्ट मध्ये एकूण 72 स्थळाची नियुक्ती करण्यात आली असून परिशिष्ट ब मध्ये महाराष्ट्र राज्यातील तीर्थस्थळाची यादी नमूद करण्यात आली असून या यादीमध्ये महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रे यांची निवड केली आहे आणि त्या ठिकाणी तीर्थ दर्शन घेता येईल.
शासन निर्णयानुसार निर्धारित केल्याप्रमाणे भारतातील आणि महाराष्ट्रातील तीर्थस्थळांना मोफत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यासाठी शासन निर्णय कार्यान्वित करून महाराष्ट्र वासियांना महत्वपूर्ण दिलासा दिला आहे.
मित्रांनो आपण हा लेख वाचल्यानंतर आपणास काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्यास ब्लॉग पोस्ट च्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया, सूचना आणि त्रुटी नमूद कराव्यात. या त्रुटीचे निरीक्षण करून त्रुटी जर बरोबर असेल तरच लेख त्वरित अद्यावत करण्यात येईल करिता आपण महाराष्ट्रातील रहिवाशांना या योजनेचा फायदा प्राप्त करून देण्यासाठी हा ब्लॉग पोस्ट लेख लिहिला आहे.
हा लेख आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर करावा. म्हणजे योग्य अटी व नियम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ व्हावा या हेतूने हा लेख शासन निर्णयावर आधारित लिहिला आहे.
FAQ
1) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यासंदर्भात शासन निर्णय कोणत्या विभागाने व कोणत्या दिनांकास निर्गमित केला आहे?
उत्तर-महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई यांनी दिनांक 14 जुलै 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
2) या योजनेचा मुख्य फायदा कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला होणार आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक साठ वर्ष पूर्ण व त्यावरील जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख 50 हजार रुपयापर्यंत यांना होणार आहे.
3) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी लाभार्थ्यांना किती मर्यादा पर्यंत खर्च करण्याकरिता मान्य केली आहे?
उत्तर-तीस हजार रुपये
4) या योजनेसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने सादर करावा लागेल.
उत्तर-शासनाने निर्धारित केलेल्या ऑनलाईन पोर्टलवर हा अर्ज सादर करावा लागेल.
5) या योजनेसाठी महाराष्ट्रातील तसेच भारतातील किती तीर्थस्थळांची निवड शासन निर्णयाद्वारे करण्यात आली आहे?
उत्तर-मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेकरिता भारतातील एकूण 73 तीर्थस्थळांची निवड केली तसेच महाराष्ट्रातील 66 तीर्थस्थळांची निवड केली आहे .
अधिक माहितीसाठी आपण खालील लेख आवश्यक वाचा