रानभाजी हादगा मराठी माहिती | Ran Bhaji Hadga Marathi Mahiti
प्रस्तावना
Ran Bhaji Hadga Marathi Mahiti मित्रांनो आज आपण रान भाजी हादगा मराठी माहिती याबाबत आजच्या लेखात माहिती चा अभ्यास करणार आहोत. हा लेख आपणास वाचल्यानंतर आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करावा ही विनंती.
हादगा ही एक उपयुक्त वनस्पती आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत लोक हादगा वृक्षाची लागवड करतात. हादगा वृक्षाची लागवड शेतकरी हा आपल्या शेतीमध्ये लागवड करत असतो. हा वृक्ष भाजीसाठी प्रसिद्ध आहे. ह्या वृक्षांच्या फुलांची आणि शेंगांची भाजी तयार केली जाते. ह्या भाजीला आपण रानभाजी असे म्हणतो त्याचे मुख्य कारण म्हणजे हा हा वृक्ष रानात फार झपाट्याने वाढणारा आहे. एका वर्षातच या वृक्षाला फुले आणि शेंगा येतात.
हादगा ह्या वृक्षाला जीवशास्त्रात शास्त्रीय नाव सेस्बनिया ग्रॅंडिफ्लोरा असे आहेत. या वनस्पतीची जीवशास्त्रात वर्गीकरण करताना फेबीसी फॅमिली कुळात केली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हादगा हा वृक्ष महत्त्वाचा आहे. हादगा या झाडाची उंची साधारणता 30 ते 40 फूट उंची असते. झाड ठिसूळ असून या झाडांचे आयुष्य फार कमी असते. झाडाच्या शेंड्यावर फुले आणि शेंगा येतात. म्हणून आज या वृक्षापासून रानभाजी तयार करण्याच्या बाबत सविस्तर माहिती आजच्या लेखात स्पष्टपणे नमूद करत आहोत. हादग्याच्या झाडाला 'अगस्ता' अशी सुद्धा म्हणतात
![]() |
Ran Bhaji Hadga Marathi Mahiti |
हादगा झाडांची पाने
हदगाव झाडांची पाने संयुक्त पद्धतीची असून ही पाने एका आड एक अशी निमुळत्या स्वरूपाची असते. या पानाची लांबी अंदाजे दहा ते पंचवीस सेंटीमीटर लांब असून अनेक जोड्या पानांच्या तयार झालेल्या असतात. साधारणतः झाडांच्या पानांच्या जोड्या 15 ते 35 असू शकतात . ' Ran Bhaji Hadga Marathi Mahiti ' कमी जास्त १०ते ३० जोड्या सुद्धा आढळून येतात. खेड्यातील आणि शहरातील अनेक लोक या पानांची रानबाजी सुद्धा तयार करून खातात.
हादग्याच्या झाडांची फुले
हादग्यांच्या झाडांच्या फुलांचा रंग पांढरा असतो. फुलाचा आकार हा लंबगोलाकार असतो. फुलाच्या देठाचा भाग हिरव्या रंगाचा असतो. हादग्याची फुले ड्रिलिंगी असून संयुक्त दलाची असते. फुलाची लांबी पाच ते दहा सेंटिमीटर आकाराची असून या फुलांना दोन पाकळ्या असतात. ह्या दोन पाकळ्या एकमेकाला चिकटलेल्या असतात. ह्या दोन पाकळ्याच्या आतील भागात जीवशास्त्र प्रमाणे पुंकेसर नलिका तयार झालेली असते. या या नलिकेत बीजांड कोष लांब आकाराचा चपट्या कप्प्यात आढळून येतो. जीवशास्त्राच्या दृष्टीने ही वनस्पती अत्यंत मानवास उपयुक्त आहे असे शास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे.
जीवशास्त्रीय दृष्ट्या औषधी वनस्पती
हादग्याच्या झाडांपासून अनेक औषधी तयार केली जाते.
ह्या झाडांच्या खोडापासून आणि मुळापासून जानकर व्यक्ती किंवा शास्त्रज्ञ अनेक प्रकारचे उपयुक्त औषध तयार करतात.
मानवी शरीराला ह्या औषधी पासून अ जीवनसत्वभरपूर प्रमाणात उपलब्ध होतो. अ जीवनसत्व युक्त औषधी शास्त्रीय दृष्ट्या तयार करून विकली जाते.
हादग्याच्या पानांमध्ये दोन प्रकारचे द्रव आढळून येते.
हे दोन द्रव म्हणजे अनुलोमिक आणि शिरोविरेचन आहेत.
ह्या द्रव्यापासून प्रयोगशाळेत किंवा घरगुती जाणकार लोक आयुर्वेदिक औषध तयार करतात. हादग्याची पाने हे मूळ उष्ण वीर्य, शोथध्न आणि कपघ्न साठी फार उपयुक्त आहेत. या झाडांची दीपनयुक्त व आनुलोमीक द्रव्यधारी असल्यामुळे ह्या झाडाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.
हादग्याच्या झाडांच्या फुलांची भाजी सुद्धा तयार केली जाते. ह्या फुलांची भाजी खाल्ल्यानंतर मानवी शरीराचे फुफ्फुस सुजले असेल तर ते कमी होते. ताप आल्यास किंवा झाल्यास किंवा शरीरामध्ये अतिशय कप तयार झाल्यास ह्या झाडांच्या फुलांची भाजी व्यक्तीला खाण्यास देतात. मानवी शरीरामध्ये जास्त प्रमाणात कफ तयार झाल्यास व ताप आल्यास संबंधित व्यक्तीला हादग्याच्या झाडांच्या मुळ्यांच्या सालीचा विडा तयार करून तो खाण्याच्या पानात तयार करून मधासोबत व्यक्तीस खाण्यास दिला जातो. त्यामुळे व्यक्तीला काही प्रमाणात घाम येतो आणि लवकरच मानवी शरीरातील कप बाहेर पडण्यास सुरुवात होते.
मानवी शरीरावर एखादी दुखापत झाली तर हादग्याच्या झाडांच्या पानांचा ठेचून लेप तयार केला जातो. तयार केलेला लेप हा जखम झालेल्या ठिकाणी लावण्यात येतो त्यामुळे मानवी जखम त्वरित बरी होते असे आयुर्वेदामध्ये स्पष्ट केले आहे. संशोधनाअंती असे सिद्ध झाले आहे की मानवाची दृष्टी कमी झाल्यास फुलांचा रस करून डोळ्यांमध्ये एक दोन थेंब टाकल्यास दृष्टी दोष दूर होऊ शकतो.
मानवाला ताप आली किंवा डोकेदुखी सुरू झाली तर हादग्याच्या झाडांच्या पानाचा रस पुष्कळ वेळेस मानवाला पिण्यासाठी दिल्या जातो त्यामुळे ताप आणि डोकेदुखी सुद्धा कमी होते हेही आयुर्वेदात सिद्ध झाले आहेत.
भाजी खाल्ल्याचे फायदे
हादग्याच्या फुलापासून भाजी तयार केली जाते.
तयार केलेली भाजी ची चव थोडी तुरट कडवट आणि तिखट असते. या तीन प्रकारच्या चवीमुळे तीन प्रकारच्या रोगावर ही भाजी खाणे उपयुक्त आहे. ही भाजी खाल्ल्यामुळे व्यक्तीचा पित्त दोष आणि वात दोष दूर होतो. तसेच व्यक्तीला सर्दी आली तर हादग्याच्या फुलांची भाजी खाण्यास देतात कारण हादग्याच्या फुलाची भाजी ही सर्दी पडसे यावर गुणकारी औषध आहे. हे फुल खाण्यास तिखट असल्यामुळे सर्दीचा त्रास कमी होतो. Ran Bhaji Hadga Marathi Mahiti
ज्या व्यक्तीला भूक लागत नसेल किंवा त्या व्यक्तीचे दररोज पोट नियमित साप होत नसल्यास अशा व्यक्तीने नियमित हाद्यांच्या फुलांची भाजी खाणे अत्यंत गुणकारी औषध आहे.
त्याचबरोबर स्त्रियांचे असणारे अनेक प्रकारचे गुप्तरोग
हादग्याच्या फुलांची भाजी खाल्ल्यास ते गुप्तरोग नष्ट होतात.
हादग्यांच्या झाडांच्या फुलांमध्ये अ जीवनसत्व आढळून आलेले आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तीला रातांधळेपणा असेल म्हणजेच त्या व्यक्तीला रात्री स्पष्ट दिसत नसेल तर त्या व्यक्तीने हादग्याच्या फुलांची भाजी खाल्ल्यास रात आंधळेपणा दूर होऊ शकतो. रातांधळेपणा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीने ती भाजी नियमित दररोज खाणे आवश्यक आहे. हादग्याच्या फुलांची आणि शेंगाची भाजी केली जाते. ही वनस्पती जंगला त आढळून येते तर आता शेतकरी आपल्या शेतामध्ये लागवड करतात त्याच बरोबर आपल्या घराच्या सभोवती सुद्धा हदग्यांची झाड लोक लावतात. मानवी दृष्टीकोनातून हादग्यांचे झाड हे एक मानवाला अनेक रोगापासून मुक्त करण्यासाठी वरदान ठरले आहेत. या झाडांच्या पासून अनेक प्रकारचे मानवाला फायदे मिळतात म्हणूनच लोक हाद्यांच्या फुलांची आणि शेंगांची भाजी करून खातात. आपण आता प्रथम फुलाची भाजी कशी करावी हे या लेखात नमूद करत आहोत.
हादग्याच्या फुलांची भाजी.
हादग्याची भाजी खाण्यासाठी अत्यंत गुणकारी असल्यामुळे ही भाजी कशी तयार केली जाते याची संपूर्ण प्रक्रिया या लेखातून पाहूया.
भाजीसाठी लागणारे साहित्य
दहा लोकांना खाण्यासाठी भाजी तयार करण्यासाठी खालील खाद्य साहित्य पाककृतीसाठी निवडावे.
- 25 ग्रॅम तेल
- चिमूटभर जिरे
- थोडा हिंग
- थोड्या ओल्या मिरच्या
- लसणाच्या दहा पाकळ्या
- एक कांदा.
- एक किलो हादग्याची फुले.
- भिजवलेली मुगडाळ
- मीठ
- थोडा गुळ.
- भाजलेले खोबरे.
- थोडी खसखस
- शेंगदाणा पावडर
- कढई
- चमचा
- पाणी
- हळद
- पकड किंवा सांडस
भाजी बनवण्याची प्रक्रिया.
प्रथम फुले स्वच्छ करून घ्या.
एक कांदा बारीक चिरून घ्या.
दहा लसणाच्या पाकळ्या व कांदा बारीक चिरून त्याची पेस्ट तयार करा. भाजीसाठी वर दर्शविलेले साहित्य जवळ तयार करून ठेवा.
कृती
प्रथम गॅस सुरू करा. खेड्यामध्ये गॅस नसतो त्यावेळी खेड्यातील लोकांनी आपली चूल पेटवून घ्या.
चुलीवर किंवा गॅसवर एक कढई ठेवा. कढईमध्ये 25 ग्रॅम खाण्याचे म्हणजेच गोड तेल उकळण्यासाठी सोडा. तेल गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये लसूण व कांदा यांची केलेली पेस्ट सोडा. चमच्याच्या साह्याने तिकडे परतून घ्या. त्यानंतर थोडे भाजलेले खोबरे बारीक करून कढईत सोडा. थोडा वेळ एक ते दोन मिनिट पदार्थ लालसर रंग येईपर्यंत चमच्याच्या साह्याने परतून घ्या. लाल रंग आल्यानंतर थोडी हळद आणि मीठ आणि गूळ चवीनुसार आवश्यक तेवढा त्या कढईत असलेल्या तेलात टाका. पुन्हा दोन मिनिट परतून घ्या. आणि फोडणी लालसर रंगाची पूर्ण झाल्यानंतर त्या फोडणीत हादग्याची फुले स्वच्छ धुतलेली कढईत टाका आणि चमच्याच्या साह्याने कढईत पूर्ण फुले परतून घ्या. कढई पक्की धरण्यासाठी पकडचा वापर करा. थोडा भाजीचा रंग पिवळसर झाल्यानंतर त्या भाजीमध्ये भिजलेली मुगाची डाळ सोडा. मुगाच्या डाळीचा पेस्ट करून सोडला तरी चालू शकतो. किंवा भिजलेली डाळ सोडली तरी चालेल. आपल्या आवश्यकतेनुसार योग्य प्रक्रिया करा. शेवटी भाजलेली थोडी खसखस भाजीत सोडा. शेवटी भाजी मध्ये दहा ग्रॅम शेंगदाणा पावडर सोडा. भाजी गॅसवर किंवा चुलीवर कमीत कमी 20 मिनिट पर्यंत शिजू द्या. भाजीला पाणी सुटण्यास सुरुवात झाल्यानंतर भाजी गॅसवरून किंवा चुलीवरून खाली उतरून घ्या. भाजी थोडी खाली उतरल्यानंतर थंड होऊ द्या. आता संपूर्ण भाजी शिजवून तयार होऊन खाण्यास अतिशय चविष्ट अशी तयार झालेली आहेत. ही भाजी आपण पोळी बाजरीची भाकर किंवा गव्हाची पोळी किंवा तांदळाचा भात बरोबर खाऊ शकता. " Ran Bhaji Hadga Marathi Mahiti "उपरोक्त प्रक्रिया दर्शविल्याप्रमाणे हदग्यांच्या फुलांची भाजी आपण तयार करून आवश्यक पहा.
हादग्याच्या शेंगाची भाजी
हादग्याच्या झाडांच्या फुलांची भाजी ज्याप्रमाणे तयार करण्यात येते त्याचप्रमाणे हादग्याच्या झाडाच्या शेंगाची भाजी सुद्धा तयार करतात. चला तर पाहूया हादग्याच्या शेंगाची भाजी पाककृती कला जाणून घेऊया या लेखातून.
साहित्य
- बारीक लहान कोवळ्या हादग्याच्या शेंगाची तुकडे.
- बारीक चिरलेला एक कांदा
- 25 ग्रॅम खाद्य गोडेतेल
- आवश्यकतेनुसार तिखट
- आवश्यकतेनुसार मीठ
- नारळातील ओले खोबरे
- थोडी कोथिंबीर.
- दहा ग्रॅम गरम मसाला
- कढई
- चमचा
- ताट
- हळद
- पकड किंवा सांडस
- गॅस शेगडी किंवा चूल
भाजी बनवण्याची प्रक्रिया
प्रथम गॅस किंवा चूल पेटून घ्या.
गॅस किंवा चुलीवर कढई ठेवा.
कढईमध्ये थोडे 25 ग्रॅम
गोडे खाद्यतील टाका.
नंतर चिरलेला कांदा तेलामध्ये सोडा.
कांदा लालसर तपकिरी रंगाचा होईपर्यंत चमच्याने परतून घ्या.
कांदा लालसर तपकिरी झाल्यानंतर हादग्याच्या शेंगांची बारीक केलेली तुकडे कढईमध्ये सोडा. कढईमध्ये थोडे तिखट सोडा. दहा मिनिट त्या शेंगांचे तुकडे कढईतील तेलात व्यवस्थित परतवून घ्या .परताळून घेण्यासाठी चमचाचा वापर करा. चमच्या नसेल तर सराटाही सुद्धा वापरला तरी चालेल. आवश्यकतेनुसार दहा ग्रॅम मसाला कढई टाकून परत दोन मिनिट परतून घ्या. त्यानंतर ओल्या खोबऱ्याचा किस तयार केलेला भाजीत सोडा. आवश्यकता वाटल्यास शेंगदाण्याची पूड सुद्धा सोडली तरी चालेल. त्यानंतर थोडी हळद कढईत सोडा.खोबरे टाकून झाल्यानंतर सर्वात शेवटी थोडी कोथिंबीर कढईतील बाजीत सोडा. भाजी शिजण्यासाठी थोडे 200 ग्रॅम पाणी कढईत सोडा. संपूर्ण भाजी बरोबर पंचवीस मिनिट शिजू द्या. संपूर्ण भाजी शिजल्यानंतर भाजीवर तेलाचा लाल रंग प्राप्त झाल्यानंतर भाजी गॅसवरून खाली उतरून थंड होण्यासाठी ठेवा. भाजी थोडी थंड झाल्यानंतर खाण्यास अतिशय रुचकर व चविष्ट असेल हे आपण खाल्ल्यानंतर नक्की सिद्ध होईल. या भाजीच्या सोबत गहू, ज्वारी, बाजरी किंवा तांदळाचा भात सोबत खाऊ शकता. ही भाजी आरोग्य स खाण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे म्हणून आजच्या लेखात आपण हादग्याची भाजी रानभाजी बाबतची संपूर्ण प्रक्रिया या लेखात उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे पाहिली आहेत.
सारांश
हदगा ही एक वनस्पती असून हादग्याची झाडे सर्वत्र आपणास आढळून येतात किंवा दृष्टीस पडतात. हादग्याच्या प्रत्येक भागापासून अनेक प्रकारे औषधे आणि भाज्या तयार केल्या जातात. हादग्याच्या रानबाजीचा आरोग्यासाठी फार लाभदायक फायदा होतो. त्यामुळे हादग्याच्या झाडांची आता शेतकरी लागवड करताना दिसून येत आहेत व बाजारात सुद्धा हादग्याच्या शेंगा त्याचप्रमाणे फुले सुद्धा विक्री आलेले असतात. भाजी मार्केटमध्ये आपण गेल्यास आवश्यक हद्याची फुले किंवा शेंगा विकत आणून उपरोक्त दर्शविलेल्या पद्धतीप्रमाणे भाजी आवश्यक तयार करा. तयार केल्यानंतर आपण खाल्ल्यास आपल्या आरोग्याचं सदृढ राहण्यास ही भाजी खाणे आवश्यक आहे. काही लोकांना याबाबत भाजी कशी तयार करावी आणि या भाजीचे शरीराचे असणारे उपयुक्त फायदे माहित नसल्यामुळे शहरी विभागातील नागरिक याकडे म्हणजेच या भाजीकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच आपण मित्रांनो आजच्या लेखात रानभाजी या सदरात हदग्यांच्या शेंगांची व फुलांची भाजी प्रक्रिया स्पष्ट केली असून ही वनस्पती आरोग्यास फायदेशीर असल्यामुळे आयुर्वेद शास्त्रात अनेक प्रकारची औषधे सुद्धा या वनस्पती पासून तयार केलेली अनेक मेडिकल वर सुद्धा उपलब्ध आहे.
एकंदरीत हादग्यांची झाडे आवश्यक मोकळ्या जागेत लागवड करावी .
निष्कर्ष
हादग्याच्या शेंगाची रानभाजी म्हणून तयार केलेली भाजी आरोग्य फायदेशीर ठरली असून अनेक रोगमुक्त करण्याचे काम भाजी सेवन केल्यामुळे होऊ शकते. हे निष्कर्ष आयुर्वेद शास्त्राने सुद्धा सिद्ध केले आहे. प्रत्येकाने ही भाजी खाणे आजच्या जीवनात आवश्यक आहे म्हणून हा लेख वाचकासाठी ब्लॉग पोस्ट म्हणून लिहिला आहे.
FAQ
१) हादग्याच्या वृक्षाला शास्त्रीय नाव काय आहे?
उत्तर -सेस्बॅनिया ग्रॅंडिफ्लोरा .
२) या वनस्पतीचे जीवशास्त्रीय कुळ कोणते आहेत?
उत्तर-फॅबेसी
३) हादग्याच्या फुलांमध्ये आणि शेंगांमध्ये कोणते जीवनसत्व असते?
उत्तर-अ जीवनसत्व कोणत्या
४) फुफ्फुसवर सूज आल्यास कोणती भाजी खावी?
उत्तर- यांच्या फुलांची भाजी किंवा शेंगाची भाजी
५) हादग्याच्या शेंगाची भाजी किंवा फुलाची भाजी खाल्ल्यास कोणते फायदे होतात?
उत्तर-रातांधळेपणा कमी होतो, वात व कफ नष्ट होतो
आणि स्त्रियांच्या गुप्त रोगावर इलाज हादग्याच्या झाडापासून मिळणाऱ्या विविध भागातून औषध तयार केले जाते.
अधिक माहितीसाठी आवश्यक खालील लेख वाचा.