दिवाळी
सण मराठी माहिती 2024| Diwali festival
in Marathi Mahiti 2024
प्रस्तावना
Diwali festival in Marathi Mahiti 2024 मित्रांनो आज आपण महत्वपूर्ण विषयावर आधारित माहिती या लेखातून पोस्ट करणार आहोत. आज आपण आजच्या लेखातून दिवाळी सण मराठी माहिती 2024 या विषयावर लेख लिहिणार आहोत. आपण लेख वाचल्यानंतर आवडल्यास आपल्या वाचक मित्रांना आवश्यक वाचनासाठी पोस्ट करावा
![]() |
Diwali festival in Marathi Mahiti 2024 |
भारतीय
संस्कृतीमध्ये अनेक सण भारतात
नियमितपणे दरवर्षी साजरे केले जातात. या
सर्व सणांमध्ये सणाचा राजा म्हणून दिवाळी
या सणाला ओळखण्यात येते. दिवाळी सण मोठ्या आनंदाने
भारतात सर्व समाजामध्ये आणि
धर्मामध्ये साजरा करण्यात येतो.
सर्वसामान्यपणे
दिवाळी सण पाच दिवस
साजरा करण्यात येतो. दिवाळी सण अनुक्रमे
पाच दिवस वेगवेगळ्या दिवशी
वेगवेगळ्या नावाने साजरा करण्यात येतो. पाच दिवसाची वेगवेगळी
नावे पुढील प्रमाणे या लेखक दर्शवण्यात
आली आहे.
धनत्रयोदशी
नरक
चतुर्दशी
लक्ष्मीपूजन
बलिप्रतिपदा
दीपावली पाडवा
भाऊबीज.
याबाबतही
माहिती आपण या लेखातून
पुढील प्रमाणे स्पष्ट करणार आहोत.
दिवाळी तारीख मुहूर्त समारंभ 2024
सर्वसामान्यपणे
दिवाळी ही ऑक्टोबर किंवा
नोव्हेंबर या महिन्यात येते.
मराठी कॅलेंडर वर्षाप्रमाणे अश्विन महिन्यात येते. आणि पाच दिवस
भारतीय परंपरेनुसार वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते.' Diwali festival in Marathi Mahiti 2024'
दिवाळी
सण हा यावर्षी इंग्रजी
कॅलेंडर प्रमाणे ऑक्टोबर 2024 व नोव्हेंबर 2024 दोन
महिन्यात आली आहे. याबाबत
संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे पाहूया.
दिवाळी
2024 पाच दिवसांच्या मुहूर्त दिनांक
धनत्रयोदशी
यावर्षी
धनत्रयोदशी दिनांक 29 ऑक्टोबर 2024 या दिवशी साजरी
करण्यात येणार आहे.
नरक
चतुर्दशी
यावर्षी
नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी करण्यात
येणार आहे.
लक्ष्मीपूजन
यावर्षी
लक्ष्मीपूजन 01 नोव्हेंबर 2024 रोजी साजरी करण्यात
येणार आहे. सहसा या
दिवशी अमावस्या असते.
बलिप्रतिपदा
दिवाळी पाडवा
यावर्षी
बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा 2 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा करण्यात
येणार आहेत.
भाऊबीज
मित्रांनो
यावर्षी भाऊबीज बहिण भावाचा महत्त्वाचा
दिवाळी सणाचा शेवटचा दिवस असून यावर्षी
3 नोव्हेंबर 2024 रोजी दिवाळी भाऊबीज
साजरी करण्यात येणार आहे.
दिवाळी सणाचे महत्त्व व पार्श्वभूमी
दसरा
सण संपल्यानंतर भारतीय लोक चातक पक्षा
प्रमाणे दिवाळीची आतुरतेने कधी येणार याची
वाट पाहत असते. दिवाळी
ही भारतीय लोकांचा परंपरेनुसार अतिशय महत्त्वपूर्ण सण साडेतीन मुहूर्तापैकी
एक मुहूर्त म्हणून मानल्या जातो.
भारतातील
सर्वच घटक राज्यात दिवाळी
सण मोठ्या आनंदाने साजरा करत असतात. दिवाळीतील
दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे सर्वकाही दिवाळी अंधारमय दृश्य समाप्त होऊन प्रकाशमान सुरू
होते. भारतात नव्हे तर सर्वच घटक
राज्यात दिवाळी सणाचे महत्त्वपूर्ण पर्व असल्यामुळे लोक
साजरे करतात.
लोकांचा
दिवाळी आनंद गगनात मावेनासा
असा होतो.
दिवाळी सणाची सुरुवात
मित्रांनो
यावर्षी दिवाळी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात
साजरी केली जाणार आहे.
दिवाळीला सुरुवात होणार असल्यामुळे आता लोकांची वेगवेगळ्या
वस्तू खरेदी करण्याची घाई सुरू झाली
आहे. दिवाळी सणाच्या मुहूर्तावर बाजार सुद्धा रंगीबेरंगी आकाशदिवे व लाइटिंग त्याचप्रमाणे
कापड दुकाने तसेच किराणा दुकाने
गर्दीमुळे दिसून येतात. बाजारात दिवाळी सणानिमित्ताने अनेक वस्तू खरेदी
करण्यासाठी लोक जातात आणि
अनेक उपयुक्त वस्तू खरेदी करतात. दिवाळी सणासाठी लोक नवीन कपडे
खरेदी करतात व दिवाळीच्या दिवशी
ते परिधान करतात. दिवाळी सणाची फटाक्याची खरेदी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात
होते. लहानापासून तर थोरापर्यंत सर्व
लोक फटाके खरेदी करतात. आणि दिवाळीच्या दिवशी
फटाके फोडतात. मात्र सर्व लोकांनी एक
महत्त्वपूर्ण जबाबदारी पाळली पाहिजे ती म्हणजे प्रदूषण
मुक्त दिवाळी साजरी करावी. फटाके फोडल्यामुळे प्रदूषण होण्याची दाट शक्यता निर्माण
होते आणि त्यातून प्रदूषण
निर्माण होते. या प्रदूषणाचा परिणाम
लोकांच्या दैनिक जीवनमानावर होत असतो म्हणून
मित्रांनो दिवाळी ही प्रदूषण मुक्त
साजरी करावी ही नम्र विनंती
या लेखातून स्पष्ट करत आहे.
दिवाळीच्या
दिवशी लोक सकाळी लवकरच
उठतात स्नान करून नवीन कपडे
परिधान करतात. तसेच दिवाळीनिमित्त आपल्या
मित्रपरिवार आणि नातेवाईकांना हार्दिक
शुभेच्छा सुद्धा देऊन सणाचा आनंद
घेत असतात. या सणातून राष्ट्रीय
एकात्मता सुद्धा साधली जाते. दिवाळीसाठी आपल्याकडे आलेल्या नातेवाईकांचे स्वागत केले जातात.
फटाके
आणि लाइटिंगने दिवाळी साजरी केली जाते. प्रत्येक
घरी आकाश दिवा घरावर
लावल्या जातो. माता-भगिनी दिवाळीच्या
दिवशी नवे कपडे परिधान
करून दारात सुशोभित रांगोळी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांनी काढत असतात.
प्रकाशमय सण
दिवाळी
सण हा खऱ्या अर्थाने
प्रकाशमय सण म्हणून ओळखला
जातो. दिवाळी या सणाला कोणी
कोणी दिपवाळी सुद्धा असे म्हणतात. या
सणाच्या दिवशी रात्री सर्व घर आणि
दार दिव्यांनी प्रकाशमय करून टाकतात. जीवनातील
अंधार संपून आता प्रकाशमान जीवनाकडे
लोकांची वाटचाल दिवाळीपासून सुरू होते. दिवाळीचे
विशेष महत्त्व म्हणजे विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. अज्ञानरूपी
अंधाराच्या वाटेवर प्रकाश देणारी महत्त्वपूर्ण दिवाळी असते. सर्वसाधारणपणे पाच ते सहा
दिवस देशभर घरोघरी आनंदही वातावरण निर्मिती झालेली असते. या सणाच्या दिवशी
लोक खाण्यासाठी गोडधोड पदार्थ निर्मित करतात तर काही लोक
मेवा आणि मिठाई दुकानातून
सुद्धा खरेदी करतात. लोकांचा आनंद गगनात मावेनासा
होतो. लोक प्रफुल्लित होतात.
म्हणून
दिवाळी ची सुरुवात आनंदी
वातावरणाने होते.
धनत्रयोदशी
दिवाळी
सणातील एक महत्त्वपूर्ण दिवस
म्हणून दिवाळीची सुरुवात दिवाळीच्या अगोदर एक दिवस पूर्वी
धनत्रयोदशी लोक साजरी करतात.
धनत्रयोदशी साजरी करण्याचा मुख्य उद्देश असतो ही या
दिवशी हा सण साजरा
केल्यास धनसंपत्ती मध्ये वाढ होते आणि
धन प्राप्त होते म्हणून या
दिवशी लोक धनप्राप्ती होण्यासाठी
सोन्या चांदीच्या दुकानावर जाऊन या शुभ
मुहूर्तावर सोने किंवा चांदी
खरेदी करून अंगावर परिधान
करतात. तसेच या दिवशी
धनाची पूजा केली जाते.
त्याचप्रमाणे या दिवशी लोक
अभिषेक सुद्धा करतात.
त्याचे
मुख्य कारण म्हणजे धन्वंतरीची
पूजा करणे म्हणजे धनाच्या
देवीची पूजा करणे असा
अर्थ अभिप्रेत असतो. म्हणून दिवाळीतील पाच दिवसांपैकी दिवाळीची
सुरुवात धनत्रयोदशी पासून सुरू होते.
नरक चतुर्दशी
दिवाळीतील
पाच दिवसांपैकी हा दोन क्रमांकाचा
दिवस आहे. धनत्रयोदशीनंतर दुसऱ्या
दिवशी किंवा कधीकधी तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी येते.
हा सण दिवाळीचा सण
म्हणूनच लोक भारतभर साजरा
करतात ही एक प्रकारची
नरक चतुर्दशी म्हणजे अल्पशा प्रमाणात दिवाळीचे रूप मानली जाते.
या दिवशी सुद्धा आपली घरे व
दारे विविध रंगाने रंगवितात किंवा सजवतात. घराच्या दाराला पुष्पहार लावला जातो. स्त्रिया आपल्या हातावर मेहंदी सुद्धा काढून हात रंगवितात. दिवाळी
सणाच्या अगोदरचा हा दिवस असल्यामुळे
या दिवशी दिवाळीच्या तिसऱ्या दिवसाचे पूर्वनियोजन केले जाते. लहान
मुलांना या दिवशी उपहार
दिले जातात त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे खाण्याचे
आणि भोजनाचे आणि तेलात तळलेले
वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करतात
उदाहरणार्थ
अनारसे, बुंदी लाडू, खोबरा लाडू आणि चिवडा
यासारखे खाण्याचे पदार्थ याच दिवशी तयार
करून ठेवले जातात. दुकानदार लोक सुद्धा या
या दिवशी दुकानाची पूजा करतात. म्हणून
नरक चतुर्दशी सणालाही सुद्धा महत्त्व प्राप्त झाले आहे.
लक्ष्मीपूजन
आपण
लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी पूजन असे म्हणतो.
दिवाळीतील
सर्वात महत्त्वाचा हा लक्ष्मीपूजनाचा दिवस
असतो. याच दिवशी लहान
मुले भरपूर प्रमाणात फटाके फोडतात. घरात दिवाळी पूजन
परंपरेनुसार लोक पूजन करतात.
आपल्या घरात लक्ष्मी पूजा
मांडली जाते. लक्ष्मी म्हणजे संपत्ती होय.
खऱ्या
अर्थाने संपत्तीचे पूजन केले जाते.
याच दिवशी लक्ष्मी मातेचे सुद्धा पूजन केले जाते.
याच दिवशी माता सरस्वती चे
सुद्धा पूजन केले जाते.
तसेच या दिवशी पूजेची
सुरुवात गणेश मूर्तीची पूजा
करून सुरुवात केली जाते. या
दिवशी लक्ष्मी मातेचे पूजन केल्यानंतर आपल्या
घरात नेहमी लक्ष्मी म्हणजेच संपत्ती वास करत असते.
याच
दिवशी घरातील खिडक्या आणि दरवाजे उघडे
ठेवले जातात. उघडे ठेवण्याचे काम
म्हणजे केव्हाही घरात संपत्ती येऊ
शकते तसेच घरात तिजोरी
असेल तर तिजोरी सुद्धा
खुली करून ठेवली जाते.
याचा मुख्य उद्देश असा असतो की
आपल्या घरात बाहेरून लक्ष्मी
देवता पदार्पण करून वर्षभर आपणास
धनसंपत्ती प्राप्त होईल असे मानले
जातात. आपल्या परंपरेनुसार लोक आपापल्या परीने
आपापल्या घरात विविध देवदेवतेची
पूजा मांडतात. सायंकाळी विविध देवतेच्या आरत्या पूजन केल्या जातात.
लहान मुला पासून तर
मोठ्या माणसापर्यंत सायंकाळी या दिवशी प्रचंड
प्रमाणात फटाके फोडले जातात. दिवाळीच्या दिवशी सुना ह्या सासरी
जातात व लक्ष्मीची पूजा
करतात व नवनवीन कपडे
परिधान करतात हेही एक महत्त्वपूर्ण
उद्दिष्ट आहेत. सासु सुनांच्या दृष्टिकोनातून
दिवाळीचे पूजन महत्त्वपूर्ण पूजन
असते.
दिवाळीचा नैवेद्य
देवीच्या
समोर विविध बनवलेले नैवेद्यासाठी चे सर्व पदार्थ
ठेवले जातात. व्यापारी लोक या दिवशी
आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा लक्ष्मीपूजन मांडून देवदेवतेची पूजा करून लक्ष्मी
माते नैवेद्य दाखविला जातो या दिवशी
व्यापारी आपले खाते वही
आणि पेन देवासमोर म्हणजेच
लक्ष्मीपूजन देवते जवळ ठेवतात आणि
पूजा करतात.
व्यापारी
या दिवशी भगवान कुबेर यांची सुद्धा दुकानात पूजा करतात हे
एक महत्त्वपूर्ण दिवाळीचे व्यापाऱ्यांचे व्यापार भरभराट होण्यासाठी केलेले पूजन होय.
दिवाळीच्या
दिवशी लोक एकमेकांचे शुभ
आशीर्वाद देऊन दर्शन सुद्धा
घेत असतात. या दिवशी होणारी
लक्ष्मी मातांची पूजा म्हणजेच आपल्या
संपत्तीची पूजा म्हणून महत्वपूर्ण
वैशिष्ट्ये या सणाचे प्राप्त
झाले आहेत.
बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा.
दिवाळीतील
पाच दिवसाच्या सणापूर्वीचा मुख्य दिवस म्हणजे चौथा
दिवस होय. काही लोक
या दिवसाला गोवर्धन दिन असे सुद्धा
म्हणतात. हाच दिवस दिवाळी
पाडवा म्हणूनही सुद्धा ओळखल्या जातो. या दिवशी लोक
एकमेकांना आमंत्रण देऊन दिवाळीचे पदार्थ
खाण्यासाठी देतात. आजही सुद्धा भारतात
या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते.
गोवर्धन पूजेच्या दिवशी लोक गाईची पूजा
करतात. आपल्याकडे असणाऱ्या गाई म्हशी बैल
यांची पूजा करून यांना
सुद्धा दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाण्यासाठी देतात. खेड्यात लोक आपल्या गोठ्याच्या
समोर वेगवेगळ्या आकारांच्या प्राण्यांची मूर्ती शेना च्या साह्याने
सकाळीच काढतात आणि पूजा करतात.
पुरातन काळामध्ये असे म्हटले जाते
की या दिवशी श्रीकृष्णाने
गोवर्धन पूजा केली होती
आणि त्या परंपरेची आठवण
राहावी म्हणून खेड्यात लोक गोवर्धन पूजा
करतात. गो मातेला आई
म्हणून गो मातेची पूजा
मांडली जाते.
भाऊबीज
दिवाळी
सणांचा पाच दिवसांपैकी चा
हा पाचवा दिवस आणि सणाचा
शेवटचा दिवस म्हणून मानला
जातो. दिवाळी सणाचा शेवटचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज
होय. हा बहिण भावाचा
दिवस म्हणून सुद्धा ओळखल्या जातो. बहिण भावाचे अतूट
नाते दर्शवणारा प्रेम बंध निर्माण करणारा
महत्त्वपूर्ण सण आहे. या
सणाच्या दिवशी भाऊ बहिणीकडे भाऊबीज
साठी जातात. तर कधी बहीण
आपल्या भावाकडे भावाची पूजा करण्यासाठी आणि
भावाची ओवाळणी करण्यासाठी जात असते. याच
दिवशी भावाने बहिणीला भेटवस्तू बंधू प्रेम म्हणून
देत असतात. या दिवशी बहीण
आपल्या भावाची पूजा करून ओवाळणी
करतात तर ओवाळणी केल्यानंतर
भावाचे रक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी या सणाच्या निमित्ताने
भावावर येऊन पडलेली असते.
आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी भाऊ बहिणीच्या मदतीला
धावून जातात
भाऊ
बहिणीचे अतूट व असीम
प्रेम च्या नात्याची जोपासना
या दिवशी केली जाते. बहिणीकडून
भावाची ओवाळी झाल्यानंतर ओवाळणीच्या बदल्या त बहिणीला भेट
वस्तू देतात. इतिहासामध्ये बहिण भाऊ यांच्या
अतूट प्रेमाच्या अनेक कथा दर्शविण्यात
आल्या आहेत. हा दिवस अति
मंगलमय दिवस म्हणून मानला
जातो. हा सण रक्षाबंधन
सारखाच पवित्र आणि तोला मोलाचा
असतो. भारतात सर्व लोक भाऊबीज
दिवाळीचा एक सण म्हणून
साजरा करतात.
दिवाळी
सणाचे ऐतिहासिक महत्त्व
मुख्य
करून हा सण धार्मिक
सण असून धार्मिक देवतेची
व्यक्तिमत्त्वाची संबंध जोडलेली एक महत्त्वपूर्ण कहानी
आहे किंवा गोष्ट आहे. इतिहासात असे
मानले जाते की या
दिवशी श्रीराम प्रभू ने रावणाचा पराभव
केला आहे. रावणाचा पराभव
झाल्यानंतर श्रीलंकेचे राज्य बिभीषणास देऊन श्रीराम प्रभू
आपले बंधू लक्ष्मण आणि
आपली पत्नी सीता यांना घेऊन
आयोध्या ला परत आले.
असे म्हटले आहे.
दिवाळी
सण हा बुद्धी देवतेचा
आणि समृद्धतेचा मंगलमय दिवस असून आपल्या
मार्गातील सर्व अडथळे दूर
करणारा महत्त्वपूर्ण सण म्हणून भारतात
साजरा केला जातो.
जीवनात
येणारे संकटमय अडथळे दूर करण्यासाठीच गणेशाची
व बुद्धिदेवतेची त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची फार मोठ्या प्रमाणात
भारतभर पूजा करून पाचही
दिवस मंगलमय वातावरणात नागरिक आपला आनंद द्विगुणीत
करत असतो.
पारंपारिक महत्त्व
भारतात
दिवाळीला पारंपारिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतातील
सर्व प्रादेशिक विभागामध्ये हा सण विशिष्ट
परंपरेने साजरा करण्यात येतो. या सणाच्या दिवशी
लोक आपापल्या पद्धतीने विविध देवदेवतेची पूजा करत असतात.
याचे मुख्य कारण म्हणजे या
सणाचा संबंध विविध देव देवतेशी जोडल्या
गेला आहे.Diwali festival in Marathi Mahiti 2024
लक्ष्मी
माता प्रसन्न होण्यासाठी विष्णू आणि कुबेर त्याचप्रमाणे
हनुमान आणि धन तरी
व विश्वकर्मा ची सुद्धा पूजा
करतात.
तर काही भागांमध्ये दुर्गा,
महादेव, काली यांची सुद्धा
पूजा केली जाते. पारंपारिक
पद्धतीने सर्व धर्मातील जाती
पंथाचे लोक आपापल्या धर्मांचे
रक्षण करण्यासाठी दिवाळी साजरी करतात.
हिंदू
लोक हिंदूंच्या परंपरे ने साजरी करतात.
जैन
लोक महावीराची पूजा करून दिवाळी
साजरी करतात.
जैन
लोकांच्या म्हणण्यावरून महावीर हे जैन धर्माचे
मुक्ती देणारे एक फार मोठे
प्रतीक मानले जाते.
त्याचप्रमाणे
शीख धर्मामध्ये सुद्धा दिवाळी साजरी केली जाते.
शीख
धरणामध्ये दिवाळी साजरी करण्याचे मुख्य कारण म्हणजे मुघलांच्या
ताब्यातून शीख लोकांनी उठाव
करून त्यांचे गुरु हरगोविंद सिंग
यांची सुटका या दिवशी म्हणजे
दिवाळीच्या दिवशी केली असे इतिहासात
उदाहरण आहे. म्हणून शिक
लोक दिवाळी बंदी चोर दिवस
म्हणून साजरी करतात.
बौद्ध
धर्मामध्ये सुद्धा बौद्ध धर्मीय दिवाळी साजरी करतात लक्ष्मी मातेचे पूजन करून.
पूर्व
भारतामध्ये सुद्धा देव देवतेची पूजा
करून दिवाळी साजरी करतात.
परदेशात
सुद्धा सामान्यतः बंगलादेशामध्ये हिंदू असणारे लोक देवी काळी
ची पूजा करून दिवाळी
उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात.
दिवाळी सणातील विविध उपक्रम
दिवाळी
सणामध्ये दिवाळीमध्ये सर्व लोक घरे,
देवांची मंदिरे आणि काही धार्मिक
स्थळे यांची सुशोभा करून रंगरंगोटी करून
घरे आणि देवळामध्ये मेणबत्त्या
पेटवून व कंदीला ने
प्रकाश देऊन साजरी करतात.
दिवाळीसाठी अनेक लोक आकाशदिवे
स्वतःच्या घरीच स्वतःच तयार
करत असतात.
व त्या आकाश दिव्यामध्ये
एक दिवा ठेवला जातो
आणि तो दिवा प्रकाशमय
होत असतो. दिवाळी सणामध्ये फार मोठ्या प्रमाणात
सजावटी केलेल्या असतात.
दिवाळीतील
मुख्य गोष्ट म्हणजे निरनिराळ्या प्रकारची गोडधोड पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया
सुरू केलेली असते.
मोठ्या
प्रमाणावर मेजवाई आणि मिठाई प्रचंड
प्रमाणात उपहार म्हणून वाटप करतात यामुळे
देशात राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्याचे हे महत्त्वाचे प्रतीक
समजले जाते.
शहरी
भागामध्ये सुद्धा दिवाळी त अनेक लोक
एकत्र येतात आणि दिवाळी साजरी
करतात वेगवेगळ्या समाजामध्ये सामूहिक मेळाव्याचेही सुद्धा आयोजन केले जातात.
दिवाळी
सणातील एक महत्त्वाचा उपक्रम
म्हणून दिवाळी गिफ्ट म्हणून ग्रीटिंग कार्ड आणि मिठाई एकमेकास
देतात आणि एकमेकास पाठवतात.
भारतीयांच्या संस्कृतीतील हा सणाचा एक
पैलू म्हणून पूर्वजाचे स्मरण टिकून ठेवणारा महत्त्वपूर्ण सण आहे.
जगात
विविध देशात साजरी होणारी दिवाळी
जगातील
अनेक देशात दिवाळी सण साजरा करण्यात
येतो.
परंतु
वेगवेगळ्या नावाने साजरा करण्यात येतो.
भारतात
दिवाळी म्हणून साजरा करण्यात येतो.
पाकिस्तान
,नेपाळ, म्यानमार ,मलेशिया आणि फिजी या
देशात सुद्धा हा सण दिवाळी
म्हणूनच साजरा करण्यात येतो.
तसेच
दिवाळी सण स आणखी
काही देशात सुद्धा साजरा होतो
टोबॅगो,
सिंगापूर सूरीनाम, त्रिनिदाद आणि श्रीलंका याही
देशात दिवाळी साजरी करण्यात येते.
दिवाळी
साजरी करणाऱ्या देशांमध्ये दिवाळी साजरी करणाऱ्या लोकांसाठी सरकारकडून अधिकृतरित्या दहा ते पंधरा
दिवसाच्या अधिकृत सुट्ट्या देण्यात आलेल्या असतात.
दिवाळीचे प्राचीनत्व
फार
प्राचीन काळापासून दिवाळी सण किमान उपलब्ध
पुराव्याच्या आधारे असे सांगता येईल
की हा सण तीन
ते चार हजार वर्षापूर्वीचा
जुना सण आहे. भारतात
प्राचीन काळात प्रथम आर्य आले. आणि
आर्याने आपले अस्तित्व उत्तर
भागात आपले अस्तित्व निर्माण
केले व त्यांनी उत्तर
भारतात रहिवासी झाल्यापासून दिवाळी साजरी करत आहे.
आर्यानंतर
भारतात द्रविड आले. द्रविड हे
मुख्यत्वे करून भारताच्या दक्षिण
विभागात स्थिरावले. अनेक द्रविड लोकांपैकी
काही द्रविड लोक दक्षिण भारतात
सुद्धा यज्ञ करून दिवाळी
साजरी करतात असे समजले जाते.
श्रीराम
प्रभू ने 14 वर्षाचा वनवास संपून आवी दिला परत
आले तो हाच दिवस
होय म्हणून भारतात दिवाळी साजरी केली जाते असे
मानले जाते. अंधार संपून किंवा दूर करून प्रकाशमय
निर्माण करणारा हा दिवाळी सण
मांगल्याचे प्रतीक म्हणून जगभरातील हिंदू लोक दिवाळी साजरी
करतात.
महाराष्ट्रातील दिवाळी.
भारतात
महाराष्ट्र या घटक राज्यात
सुद्धा दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रात
दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने घरोघरी देवतेची पूजा करून घरादारात
पणत्या प्रकाशमय केल्या जातात. घरावर आकाश दिवे व
लाइटिंग लावली जाते. दिवाळीच्या काळात लहान लहान मुले
घरोघरी किल्ले बनवण्याचे ही सुद्धा उपक्रम
राबवत असतात त्याचप्रमाणे अनेक लहान प्रमाणात
माती पासून वेगवेगळ्या खेळण्या तयार करून मानतात.
याच काळात महाराष्ट्रामध्ये दिवाळी सणापासून शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून रब्बी हंगामाची सुरुवात होत असते. या
रब्बी हंगामात रब्बी हंगामातील शेतकरी देवतेची पूजा दिवाळीच्या दिवशी
करून आपल्या शेतीमध्ये परंपरेनुसार धान्य पेरतात. पावसाळ्यातील पिके हातात आल्यानंतर
दिवाळीनंतर रब्बी पिके घेत असतात.
आश्विन आणि कार्तिक महिन्याच्या
या दरम्यान येणाऱ्या सणामुळे थंड वातावरणात रब्बी
हंगामातील पिके चांगली येतात.
म्हणून शेतकरी दिवाळीनंतर रब्बी हंगाम्यातील पिके घेत असतात.
ती पिके चांगली यावी
म्हणून देवतेची पूजा करतात. व
देवाकडे पिके चांगली यावे
अशी प्रार्थना ही सुद्धा करतात.
दिवाळीचे महत्त्व
अंधारातून
प्रकाशाकडे नेणारा हा एक महत्त्वपूर्ण
सण आहे.
अज्ञानरूपी
अंधार दूर करून प्रकाशमय
जीवन निर्मिती करणारा हा सण आहे.
म्हणून दिवाळीत लखमय प्रकाश करणारे
लाइटिंग लावली जाते. मानवी जीवनातील आनंद निर्माण करून
उत्साह वाढवणारा हा सण महत्त्वपूर्ण
म्हणून मानला जातो. या सणापासून लोकांमध्ये
नवचैतन्य निर्माण होते असेही सुद्धा
महत्त्व इतिहासात प्रतिपादन केली आहे.
म्हणून
या सणाला चैतन्यमय सण असेही सुद्धा
म्हणतात.
लोक
आपल्यावर येणारे संकट दूर करण्यासाठी
दिवाळी सण
सन साजरा करतात. राम आयोध्या ला
परत आल्यामुळे श्रीराम प्रभू लक्षमन आणि सीतामाई यांची
सुद्धा पूजा करण्यात येते.
दिवाळी साजरी करण्याची पद्धत
भारतात
मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हिंदू
लोक दिवाळी साजरी करत असतात.
दिवाळीला एकूण
13 दिवे लावले जातात."Diwali festival in Marathi Mahiti 2024"
आपल्या घरादारा वर लाइटिंग व
आंब्याच्या पानाचे तोरण तयार करून
त्याचबरोबर झेंडूच्या फुलांचे हार तयार करून
दरवाज्याच्या मुख्य ठिकाणी लावले जातात. घरा घरी शोभित
रंगरंगोटी करून आकर्षित बनवतात.
दिवाळीच्या
दिवशी स्त्रिया दारात रांगोळी काढून साजरी करतात.
दिवाळीच्या
दिवशी आपल्याकडे येणाऱ्या पाहुणे मंडळींच्या स्वागतासाठी हिंदू धर्मात रांगोळी ही काढण्याची फार
पुरातन काळापासून सुमारे 300 00 वर्षापूर्वीची परंपरा शुभकारक मानली जाते. लोक मातीचे तयार
केलेले दिवे घराच्या चारी
बाजूला लावून सायंकाळी घर प्रकाशमय केले
जाते. त्यालाच लोक दीपोत्सव म्हणून
साजरी केलेली आनंददायी दिवाळी असे म्हणतात. दिवाळीच्या
सणाच्या निमित्ताने लोक विविध साहित्याची
खरेदी सुद्धा करतात. त्याचबरोबर पारंपारिक पद्धतीने विशिष्ट मुहूर्तावर लोक आपल्यासाठी आणि
आपल्या नातेवाईकांसाठी वस्तू आणि सोने सुद्धा
खरेदी करतात. विशेष म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी केले
जाते किंवा चांदी खरेदी केली जाते. दिवाळी
येण्याच्या अगोदरच दिवाळी मार्केट सुरू होते आणि
निरनिराळे दुकानदार किंवा व्यावसायिक दिवाळीसाठी उपयुक्त वस्तू विकण्यासाठी दुकानात ठेवतात. दुकान हे साहित्याने गजबजलेले
असतात.
वस्तू
खरेदी करण्यासाठी लोकांची बाजारात झुंबड उडली जाते. जीवनावश्यक
वस्तू त्याचप्रमाणे कपडे खरेदी करतात.
शहरी
लोक तर मोठ्या प्रमाणात
टू व्हीलर आणि फोर व्हीलर
सुद्धा या शुभ मुहूर्तावर
खरेदी करत असतात.
ऐतिहासिक कथा दिवाळी बाबत
दिवाळी
सणाच्या संबंधाने इतिहासात अनेक कथा घडल्या
आहे असे मानले जाते.
श्रीराम
प्रभुणे रावण सारख्या दृष्ट
राक्षसांचा पराभव केला.
14 वर्षाचा
वनवास पूर्ण करून घरी या
आला त्यांच्या स्वागतासाठी तोरणे आणि दिवे लावून
हा सण विजयाचे प्रतीक
म्हणून साजरा केला जातो.
त्यानंतरची
मुख्य कथा म्हणजे श्रीकृष्णाच्या
पत्नीने म्हणजेच सत्यभामा ने नरकासुर नावाच्या
राक्षसाचा पराभव केला. राक्षसाकडून होणारी स्त्रियांची मानहानी थांबवण्यात आली. म्हणून नरक
चतुर्दशी साजरी केली जाते. म्हणूनच
या दिवशी सुद्धा दिवे लावून किंवा
प्रज्वलित करून नरक चतुर्दशी
साजरी केली जाते. ज्या
दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म
समुद्रमंथना असून झाला देव
देवता आणि असुर यांच्या
दुधाच्या वैशिक समुद्रांचे मंथन केले म्हणून
पाच दिवस साजरी केली
जाते.
सारांश किंवा निष्कर्ष
आपल्या
भारतामध्ये दिवाळी सण हा प्रकाश
देणारा सण व विजयाचे
प्रतीक मानणारा सण आहे. अंधाराकडून
प्रकाशाकडे घेऊन जाणारा जागृत
सण आहे.
हा सण साजरा केल्यामुळे
व्यक्तीच्या जीवनातील अंधार संपून जातो असे म्हटले
जाते. या सणाच्या निमित्ताने
राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक एकता
ही सुद्धा वाढीस लागते. समाजामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा सण आहे.
सामूहिक
भावना वाढवणारा सण आहे.
या सणाच्या निमित्ताने बरीच आर्थिक उलाढाल
देशभर वस्तू खरेदी केल्यामुळे होते त्याचा परिणाम
असा होतो की देशाच्या
अर्थव्यवस्थेला एक प्रकारची चालना
निर्माण करून देणारा हा
एक महत्त्वपूर्ण सण म्हणून मानला
जातो.
शेतकऱ्यांच्या
दृष्टीने रब्बी हंगाम महत्त्वाचा असल्यामुळे या दिवाळी सण
संपल्यानंतर शेतकरी रंबी हंगामातील पिके
पेरतात. व भरघोस उत्पन्न
घेतात. या सणामुळे भारतीय
सर्व धर्मांच्या समाजामध्ये आपुलकीची भावना निर्माण करणारा सण आहे. या
सणाच्या निमित्ताने प्रदूषण थांबवण्यासाठी महत्वपूर्ण पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जाणू जागृती निर्माण
करणारा सण म्हणून समजला
जातो.
या सणाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा जपली जाते.
या सणाच्या निमित्ताने आनंदमय आणि समृद्ध करणारे
जीवन निर्माण होते.
या सणाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची जपणूक ही सुद्धा केली
जाते. एका पिढीकडून दुसऱ्या
पिढीकडे या सणाच्या निमित्ताने
संस्कृतीचे संक्रमण केले जाते. या
सणाच्या निमित्ताने लोक एकमेकांना हार्दिक
शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन
करतात त्यामुळे एकमेकांमध्ये असणारे वैर करणारा हा
महत्त्वपूर्ण सण आहे. म्हणूनच
मित्रांनो
यावर्षी
दिवाळी 2024 या अंतर्गत आपणास
या ब्लॉग पोस्ट च्या निमित्ताने सांगू
इच्छितो की प्रदूषण मुक्त
दिवाळी साजरी करा. फटाके फोडा
पण कमी प्रमाणात फोडा.
फटाक्यामुळे फार मोठ्या प्रमाणात
आग लागल्याचे अनेक प्रकरणे पुढे
आलेली आहे ते आता
आपण थांबवले पाहिजे. म्हणूनच प्रदूषण मुक्त फटाके फोडा. एकमेकांना शुभ आशीर्वाद देऊन
दिवाळी हा साजरा करूया.
FAQ
1) दिवाळीचे
महत्त्व काय असते?
उत्तर-अंधार दूर करून प्रकाश
निर्माण करणारा दीप मंगल याचे
प्रतीक मानला जातो.
2) दिवाळी
कशाचे प्रतीक आहे?
उत्तर-विजयाचे प्रतीक दिवाळी आहे.
3) दिवाळी
सण का साजरा केला
जातो?
उत्तर-देव देवतेची पूजा
करून संपत्तीची वृद्धी होण्यासाठी साजरी केली जाते.
4) दीपावली
पाच दिवस का साजरी
केली जाते?
उत्तर-ज्या दिवशी देवी
लक्ष्मीचा जन्म समुद्रमंथना असून
झाला देव देवता आणि
असुर यांच्या दुधाच्या वैशिक समुद्रांचे मंथन केले म्हणून
पाच दिवस साजरी केली
जाते.
5) दिवाळीला
किती दिवे लावले जातात?
उत्तर-दिवाळीला एकूण 13 दिवे लावले जातात.
अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.