Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र विधानसभा आचार संहिता मराठी माहिती 2024 | Maharashtra Vidhansabha Aacharya Sanhita Marathi Mahiti 2024

 महाराष्ट्र विधानसभा आचार संहिता मराठी माहिती 2024 | Maharashtra Vidhansabha Aacharya Sanhita Marathi Mahiti 2024 


प्रस्तावना 

Maharashtra Vidhansabha Aacharya Sanhita Marathi Mahiti 2024 मित्रांनो आज आपण महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता मराठी माहिती 2024 या संदर्भाने संपूर्ण माहिती या लेखातून स्पष्ट करणार आहे. ही माहिती आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रास आवश्यक शेअर करा. 


महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे प्रमुख आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतल्यानंतर दिनांक 15 ऑक्टोंबर रोज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा केली. त्यानंतर दिनांक 15 ऑक्टोबर 2024 दुपार वेळेनंतर आचारसंहिता महाराष्ट्रात लागू करण्याचे आदेश निर्गमित केले. 

Maharashtra Vidhansabha Aacharya Sanhita Marathi Mahiti 2024
Maharashtra Vidhansabha Aacharya Sanhita Marathi Mahiti 2024 


विधानसभा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो. हा कार्यकाल महाराष्ट्रात दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण पाच वर्षाचा कालावधी संपुष्टात येणार होता. म्हणून निवडणूक आयोगाने कार्यकाल संपुष्टात येण्याच्या अगोदरच निवडणुका घेणे निवडणूक आयोगाला आवश्यक होते. म्हणून निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेऊन आचारसंहिता लागू करून निवडणुकीचे वेळापत्रक त्याच दिवशी दुपारी जाहीर केले. महाराष्ट्रात दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून आचारसंहिता लागू झाली असून ही आचारसंहिता नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत चालू राहणार आहे. सर्वसामान्यपणे आचारसंहिता ही 49 दिवसाची आहे. 


महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणूक वेळापत्रक 


महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता सुरू झाल्यानंतर विधानसभेचे निवडणूक वेळापत्रक निवडणूक आयोगाने पुढील प्रमाणे जाहीर केले आहे. 


१) उमेदवारी अर्ज भरण्याची दिनांक 20 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात होऊन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2024 रोज मंगळवार पर्यंत कार्यालयीन वेळेत उमेदवाराला या कालावधीत अर्ज भरता येईल.

२) उमेदवाराने भरलेल्या अर्जाची पडताळणी तारीख 30 ऑक्टोबर 2024 रोज बुधवारी होणार आहे. 

३) उमेदवाराने आपला अर्ज परत मागे घेण्याची दिनांक चार नोव्हेंबर 2024 रोज सोमवारी कार्यालयीन वेळेत घेण्याची निर्धारित केले आहेत. 

४) महाराष्ट्र विधानसभा मतदान 20 नोव्हेंबर 2024   रोज बुधवारी होणार आहे. निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेत हे मतदान घेण्यात येणार आहे. 

५) महाराष्ट्र राज्य विधानसभा मतमोजणी ची दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी अगदी सकाळपासून सुरू होणार असून शेवटचा निकाल हाती येईपर्यंत मतमोजणी चालू राहील. 

६) महाराष्ट्रात मतदान एकाच टप्प्यात सर्व जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.


आचार संहिता म्हणजे नेमके काय आहे? 


यासंदर्भात आपण माहिती या लेखात स्पष्टपणे नमूद करणार आहोत.

व्याख्या-विशिष्ट वेळी , विशिष्ट परिस्थितीत आणि निर्धारित काळात निवडणूक आयोगाने देशातील किंवा घटक राज्यातील निवडणुका पारदर्शकपणे आणि निष्पक्षपाती  दृष्टिकोनातून काही विशिष्ट नियम निवडणूक आयोगाने तयार खुल्या वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी घालून दिलेले नियम कलमे उप कलमे आणि पोट नियम आचार संहिता च्या काळात पालन करण्याच्या पद्धतीला किंवा नियमावली आचारसंहिता असे म्हणतात.' Maharashtra Vidhansabha Aacharya Sanhita Marathi Mahiti 2024' 

निवडणुकी त सहभागी होणाऱ्या सर्व पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अतिशय अनिवार्य केले आहे.

राजकीय कोणत्याही पक्षाने किंवा एखाद्या उमेदवारांनी तसेच एखाद्या व्यक्ती किंवा समूहाकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोगाकडून निवडणूक आयोगाने तयार केलेल्या नियमा नुसार संबंधितावर कारवाई केली जाते अशीही तरतूद केली आहेत. 

सर्वसामान्यपणे निवडणुकीच्या काळात जाहीर झालेल्या आचारसंहिता नुसार सर्व घटकांकडून नियमाचे पालन करणे सर्वांवर बंधनकारक असते.

आचारसंहिता मध्ये बऱ्याच गोष्टीचा समावेश करण्यात आलेला असतो. राजकीय पक्षापासून तर विरोधी पक्षा पर्यंत निवडणूक कालावधीमध्ये आचार संहिता लागू झाल्यापासून आचारसंहिता संपेपर्यंत निवडणूक आयोगाचे नियम पालन करण्याची पद्धत म्हणजे आचारसंहिता होय.


महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता 2024 


महाराष्ट्र विधानसभा कार्यकाल संपत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता आचारसंहिता उपरोक्त दर्शविलेल्या तारिख पासून सुरू झाली असून ही क्रिया वेगाने घडत घडत आहे. राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. 

प्रत्यक्ष लोकांपासून समाजापर्यंत तसेच सत्ताधारी पक्षापासून विरोधी पक्ष पर्यंत निवडणुकी संदर्भाने निरनिराळ्या राजकीय विषयावर चर्चा संमेलने प्रचार सुरू झाला आहेत. 


आचारसंहितेचा इतिहास 


मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये आचारसंहिता ही 1960 या वर्षापासून सुरुवात झाली आहेत. भारतात सर्वप्रथम आचारसंहिता केरळ विधानसभा निवडणुकीच्या काळात 1960 मध्ये आचारसंहिता लागू झाली होती. 

परंतु या कालची आचारसंहिता म्हणजे राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सर्वांच्या सहमतीने निवडणुकीचे नियम तयार करून त्या नियमाचे पालन करण्याचे सर्वांनी ठरवलेली पद्धत म्हणजे त्या काळातील आचारसंहिता होय. 

1962 मध्ये तयार केलेली आचारसंहिता तेवढी पारदर्शक नव्हती व कठोर शिक्षेची सुद्धा तरतूद केलेली नव्हती. 

भारतामध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या नंतर 1967 मध्ये खऱ्या अर्थाने आचारसंहिता संदर्भात विचार विनिमय निवडणुकीच्या संदर्भाने होऊन निवडणुकीच्या काळात आचारसंहिता पालन करण्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. या आचारसंहिता मध्ये काही नव्या आणि काही जुन्या वेगवेगळ्या नियमांना एकत्र करून बनवलेली ही आचारसंहिता 1967 मध्ये अमलात आणली. 


आचारसंहिता मध्ये कोणताही कठोर कार्यवाही किंवा अंमलबजावणी करण्याचा नियम त्यावेळी अस्तित्वात आला नव्हता. त्यावेळची आचारसंहिता नियम आय पी सी च्या कलमा च्या अनुषंगाने जे कलमे अस्तित्वात होते त्या कलमाचा वापर आचारसंहितेत त्यावेळी करण्यात येत होता. त्याकाळी कोणताही राजकीय पक्ष किंवा विरोधी पक्ष किंवा लोक आचारसंहिता कडे गांभीर्याने विचार न करता आचारसंहिता कडे दुर्लक्ष करत होते. या या कालावधीत सर्वांकडून आचारसंहितेचा भंग झालेला दिसूनही आलेला आहे.



आचारसंहितेचा कालावधी. 


सर्वसामान्यपणे आचारसंहिता ही निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतल्यापासून तर नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहितेचा कालावधी निर्धारित असतो. महाराष्ट्रामध्ये विधानसभा आचारसंहितेचा कालावधी निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 च्या दुपारी साडेतीन वाजे नंतर जाहीर करून नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत ही आचारसंहिता लागू राहणार आहे म्हणजेच सर्वसाधारणपणे दिनांक 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत आचारसंहितेचा कालावधी निर्धारित केला आहे.


आचारसंहिता केव्हा लागू होते. 


ज्यावेळी देशातील सरकारचा नेमून दिलेला ठराविक कालावधी संपुष्टात आल्यानंतर आचारसंहिता लागू केली जाते. किंवा मुदतपूर्व निवडणुका घोषित केल्यास निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू केली जाते. 

किंवा सरकार अल्पमतात येऊन सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण सरकार संपुष्टात येते. त्यावेळी निवडणूक आयोगाकडून नवीन निवडणुका वेळापत्रक तयार करून आचारसंहिता लागू केली जाते. 

राष्ट्रपती द्वारा देशात सरकार व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती ने देशात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर देशात राष्ट्रपती राजवट लागू होते. राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर नवीन निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू केली जाऊ शकते. 

तसेच सरकारने राजीनामा दिला व कोणत्याही पक्षाला बहुमत नसेल तर मुदतपूर्व निवडणुका घोषित झाल्यानंतर निवडणूक आयोग नवीन सरकार अस्तित्वात आणण्यासाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर करून आचारसंहिता लागू करू शकते.


आचारसंहिता किती दिवस लागू असते.


निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतल्यानंतर आचारसंहिता लागू होऊन नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता लागू असते. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक आचार संहिता ही आता 49 दिवसाची असून ही आचारसंहिता दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात झाली असून सुमारे 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत लागू असणार आहे.


आचार संहिता केव्हा समाप्त होते 

सर्वसामान्यपणे निवडणूक झाल्यानंतर मतमोजणी होते मतमोजणीनंतर ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होईल तो पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणून सरकार अस्तित्वात आणतो आणि 

नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर निवडणूक आयोगाने घोषित केलेली आचारसंहिता संपुष्टात येते महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू असून ही आचारसंहिता मतमोजणी नंतर 26 नोव्हेंबर 2024 रोजी नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्रात आचारसंहिता संपणार आहे.


निवडणूक आचारसंहिता 

देशात किंवा राज्यात निवडणूक आचारसंहिता ही निवडणूक आयोगाकडून घोषित केली जाते.

महाराष्ट्र विधानसभा 2024 ची आचारसंहितेचा आता कालावधी सुरू असून याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक आचारसंहिता मुख्य निवडणूक आयोगाद्वारे घोषित करण्यात आली आहे. या आचारसंहितेच्या काळात सर्व व्यवहार हे निष्पक्षपाती पणे व पारदर्शक दृष्टीने खुल्या वातावरणात निवडणुका होण्यासाठी किंवा घेण्यासाठी निवडणूक आचारसंहिता निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आली आहेत आणि ही आचारसंहिता देशात किंवा राज्यात निवडणुका घोषित झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून घोषित केलेली निवडणुकीच्या संदर्भातील नियमावली म्हणजे निवडणूक आचारसंहिता असे म्हटले जाते ‌


आचारसंहिता संदर्भात नियम 

भारतात आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहिता नियमाच्या संदर्भाने काय करावे आणि काय करू नये यासंदर्भातील नियमावलीचे स्पष्टीकरण या लेखात येते स्पष्टपणे खालील प्रमाणे नमूद केले आहेत. विशेष करून महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या संदर्भाने वर्णन करण्यात येणार आहेत. 

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. 

राज्यात विधानसभा 2024 निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. 

संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. 

त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवाराने आणि राजकीय पक्षाने तसेच इतर लोकांनी काय करावे काय करू नये यासंदर्भातील संपूर्ण बाबी खालील प्रमाणे स्पष्ट करण्यात येत आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 "काय करावे"

१) आचारसंहिता लागू होण्यापूर्वी चे सर्व कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतात .

२) आचारसंहिता च्या काळात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास किंवा आल्यास नैसर्गिक आपत्तीचे त्वरित पुनर्वसन करावे.

३) गंभीर स्वरूपाच्या आजाराच्या संदर्भात आचारसंहितेत आजारी व्यक्तीला दवाखान्यातील वैद्यकीय सुविधा प्राप्त करण्यासाठी उचित स्वरूपात रोख रक्कम खर्च करणे चालू ठेवता येते.

४) सर्व पक्षांना समान प्रमाणात सार्वजनिक मैदान मध्ये हेली पॅड वापरण्याची संधी उपलब्ध करून देणे. पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे.

५) आचारसंहिता च्या काळात राजकीय पक्ष व उमेदवार यांच्यावरील टीका व धोरणे कार्यक्रम यांच्या संदर्भाने पारदर्शक पद्धतीने भाषण करण्यास संधी उपलब्ध करून देणे.

६) गृहस्थ जीवन जगणाऱ्या व्यक्तीला शांततामय वातावरणात जीवन जगण्याचा पूर्ण देण्यात आलेला अधिकार जो असेल त्या अधिकारांचे जतन करण्यात यावे.

७) प्रत्येक पक्षाने किंवा उमेदवाराने प्रचार सभेचे आयोजन करताना पोलीस खात्याची पूर्वपरवानगी घेऊन सर्व नियमाचे पालन करावे. प्रचार सभेच्या व वेळेच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी निर्बंध लागू असल्यास संबंधित बाबतीत पूर्वपरवानगीशिवाय सभा घेऊ नये. 

८) सामाजिक सुव्यवस्था बिघडू नये म्हणून अगोदरच योग्य बंदोबस्तासाठी पोलिसाची पूर्व परवानगी घेऊन त्यांची मदत घ्यावी.

९) निवडणूक रॅली किंवा मिरवणूक सभा या संदर्भाने व्यवस्थित नियोजन करून कोणतीही सुव्यवस्था बिघडणार नाही याकडे लक्ष देऊन वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सुनियोजित रीतीने कार्य करण्यासाठी योग्य प्रकारचे नियोजन करून अधिकारी वर्गांना सहकार्य करावे व सर्व कार्यकर्त्यांनी आपले पिल्ले ओळखपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे. सभेचे नियोजन व रॅली चे नियोजन काही दिवस पूर्वी पोलीस खात्यास योग्य वेळी सादर करावे व पूर्व परवानगीनेच रॅली चे नियोजन करावे.

१०) निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदान चित्र देताना त्या चिठ्ठ्या वर कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराचे नाव असू नये Maharashtra Vidhansabha Aacharya Sanhita Marathi Mahiti 2024 आणि निवडणूक चिठ्ठ्या ह्या सर्व पक्षांनी पांढऱ्या कागदावरच उपलब्ध करून द्याव्यात. निवडणूक बूथ वरून हे संपूर्ण नियोजन करावे.

११) कोणत्याही मतदान कक्षात प्रवेश करताना निवडणूक आयोगाकडून वैद्य अधिकार पत्र मिळवलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा. फक्त मतदान यादीमध्ये नाव असणाऱ्यांना व ओळखपत्र सादर करणाऱ्यांनाच मतदान कक्षा प्रवेश देण्यात यावा या अटी ला अपवाद म्हणून मुख्यमंत्री, मंत्री, खासदार किंवा आमदार यांना सूट देण्यात आली आहेत.

१२) निवडणूक नियमांचे सर्व पालन करून जर कोणाला तक्रार दाखल करायची असेल तर निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेऊनच निवडणूक संदर्भात तक्रार निवडणूक अधिकाऱ्याकडे द्यावी.

१३) मतदान केंद्रावरील मत देणे संपल्यानंतर मतदाराने तेथून त्वरित निघून जावे. ते थांबू नयेत. 


आचारसंहितेच्या काळात काय करू नये ?

१) सत्तेवर असणाऱ्या सरकारने निवडणूक कालावधीमध्ये सरकारी तिजोरी तील कोणत्याही खर्चाने कोणतेही कार्य करू नये. आचारसंहिता काळात सरकारने कोणतेही निर्णय घेऊ नये.

२) उमेदवाराने जाहिरातीवर होणारा खर्च सरकारी तिजोरीतून खर्च करू नये. उमेदवार शिवाय मतदान कक्षात मतमोजणीच्या जागी कोणीही प्रवेश करू नये.

३) शासकीय कामाची निवडणूक प्रचारात सरमिसळ करू नयेत म्हणजेच सरकारी कामाची जाहिरात करू नये.

४) मतदान खरेदी करण्याचा व्यवहार करू नये.

५) मतदाराला कोणत्याही प्रकारचे पैशाचे प्रलोभन दाखवू नये.

६) आचारसंहितेच्या काळात जातीय तणाव निर्माण होईल किंवा राजकीय तसेच सामाजिक तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे कोणतेही वर्तन करू नये व अशा प्रकारचे भाषणही करू नये. जातीय समूहाच्या भावना दुखू नयेत. भाषिक तणाव आणि धार्मिक तणाव निर्मिती होणार नाही याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असून याबाबतीत कोणताही तणाव निर्माण करू नये. अशी खबरदारी घ्यावी.

७) कोणत्याही इतर पक्षाने किंवा कार्यकर्त्याने सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक जीवनाच्या संदर्भात नसलेल्या खाजगी आयुष्याच्या जीवनाच्या विविध पैलू वर टीकात्मक भाषण करू नये.

८) प्रचाराचे बॅनर कुठेही लावू नये. जेथे बॅनर पोस्टर किंवा जाहिराती संबंधित जाग्या च्या मालकाच्या पूर्व परवानगीशिवाय लावू नये.

९) मंदिरे मज्जिद चर्च गुरुद्वार किंवा इतर धार्मिक स्थळी तसेच प्रार्थना स्थळी निवडणूक प्रचाराची भाषणे भिंती पत्रके संबंधित ची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय लावू नये 


१०) मतदार वर गैरवाजवी दडपण आणून मतदारांना लाच देऊ नये.

११) तोतयागिरी मतदारांना मतदान कक्षाच्या 100 मीटर च्या आज प्रचार करू देऊ नये.

१२) 100 मीटरच्या आत मतदान कक्षा फक्त मतदान देणाऱ्या मतदारांना ओळख पटवून घेऊन मतदान कक्षात मतदान करण्यास प्रवेश देण्यात यावा.

१३) मतदारांना मतदानाच्या दिवशी ने- आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था उपलब्ध करून देऊ नये.

१४) ज्या दिवशी मतदान होणार आहे त्या दिवशी च्या पूर्वी 48 तास अगोदर प्रचार मोहीम समाप्त करून कोणत्याही प्रकारचा प्रचार करू नये.

१५) आचारसंहितेच्या काळात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करू नये.

१६) मतदानाच्या दिवशी देशी दारूचे दुकाने बंद ठेवावी. 


१७) कोणाच्याही घरासमोर पूर्व परवानगीशिवाय निदर्शने करू नये.

१८) घर मालकाच्या किंवा जागा मालकाच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा ध्वज संबंधित जागेवर किंवा इमारतीवर लावू नये तसेच जाहिरात पण पेस्ट करू नये .


१९) कोणत्याही पक्षाने किंवा उमेदवाराने प्रचार करत असताना आचारसंहितेच्या काळात उमेदवारांचे बॅनर फाडू नये किंवा माती आणि चिखल फेकू नये.

२०) राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने प्रचार करत असताना सार्वजनिक सभा किंवा मिरवू नका यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये.

२१) क्षेपणास्त्र किंवा शस्त्र यांचा दुरुपयोग करू नये व जवळ बाळगू नये.

२२) इतर पक्षांनी लावलेले भिंती पत्रके फोड तोड करून विद्रूप करू नये.

२३) मतदान कक्षाच्या जवळ भिंती पत्रके ,ध्वज ,चिन्ह किंवा इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये.

२४) सकाळी सहा वाजे पूर्वी किंवा रात्री दहा वाजेनंतर अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही ध्वनी वर्धक वाजवू नये.

२५) लेखी परवानगीशिवाय कोणतीही सभा मिरवणुका रात्री दहा वाजे नंतर चालू ठेवू नये. तसेच सणासुदीच्या दिवसात व परीक्षेच्या कालावधीचा विचार करून त्या घटकांना विनाकारण आवाजाचा त्रास देऊ नये. 

२६) निवडणुकीच्या काळात दारूचे वाटप करू नये. 

२७) निवडणुकीच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या सुरक्षिततेचा धोका असल्याची खात्री झाल्यास अशा व्यक्तींनी सरकारची सुरक्षा पुरवण्यात आली असल्यास अशा व्यक्तीने मतदान केंद्रावर जाताना सुरक्षा कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आज प्रवेश करू नये. अशा व्यक्तीने मतदानाच्या दिवशी सुरक्षा कर्मचाऱ्या सह मतदारसंघांमध्ये फिरणार नाही याची दक्षता घ्यावी व कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊ नये. 

२८) ज्या व्यक्तीने सुरक्षा घेतली असेल ती आणि ती शासनाची असेल त्या व्यक्तीला शासनाकडून रक्षक म्हणून सोबत देण्यात येईल त्या रक्षकांना सोबत घेऊन मतदान प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करू नये. 

वरील दोन घटकांमध्ये आचारसंहिता काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत सविस्तर स्पष्टीकरण नमूद केले आहे 


आदर्श आचारसंहिता 

उपरोक्त आचारसंहिता संबंधित लेखात वर्णन केलेली माहिती अचूकपणे वापरात आणून आपले दैनंदिन व्यवहार सुरक्षित ठेवून निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता संदर्भात दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून खुल्या पारदर्शक वातावरणात निवडणुका लोकशाही पद्धतीने निवडणुका पार पाडाव्या. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष देऊन निवडणूक प्रचार करावा. महाराष्ट्र विधानसभा 2014 आचारसंहिता लागू झाली . "Maharashtra Vidhansabha Aacharya Sanhita Marathi Mahiti 2024 "असून महाराष्ट्रातील 288 मतदार संघात वेगवेगळ्या सत्ताधारी आणि विरोधी तसेच इतर पक्षांनी निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध केलेल्या आचारसंहिता प्रमाणे कार्य करणे व निवडणूक आयोगाला सहकार्य करणे याला म्हणतात आदर्श आचारसंहिता. 


सारांश

मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 आचार संहिता सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी आणि युवकांनी निवडणूक आयोगाकडून लागू केलेल्या आचारसंहितेचे पालन करावे. व निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा कोठेही भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. याचे मुख्य कारण असे आहे की आचारसंहिता निवडणूक आयोग नियमावली फार कठोर असल्यामुळे ज्या उमेदवाराने ,नागरिकाने किंवा युवकांनी म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वांनी आचारसंहिता चे योग्य पालन करावे. 

कोणाकडूनही आचारसंहितेचा भंग झाल्यास त्या संदर्भात कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे. सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्यामुळे वातावरण निवडणूकमय झालेले असून या सर्व वातावरणात सर्व काही शांततेने सणासुदीच्या दिवसात ही निवडणूक आचारसंहितेचा भंग न होता यशस्वी करणे हे महाराष्ट्रीयन नागरिकाचे कर्तव्य आहेत. करिता मित्रांनो हा लेख आपण लिहिला आहे. 

हा लेख आपणास वाचल्यानंतर आवडल्यास आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तसेच आपल्या काही सूचना प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद असेल तर वेबसाईटच्या कॉमेंट बॉक्स मध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्यास त्वरित कळवण्यात याव्या. म्हणजे योग्य वेळी योग्य काळात योग्य रीतीने त्रुटी दुरुस्त करता येईल. धन्यवाद! 

FAQ

1) महाराष्ट्र विधानसभा कार्यकाल कोणत्या दिवशी संपुष्टात येणार आहे? 

उत्तर - 26 नोव्हेंबर 2024 रोजी सध्या कार्यरत असणाऱ्या सरकारचा पाच वर्षाचा कालावधी संपुष्टात येणार आहे.

2) महाराष्ट्राचे प्रमुख निवडणूक अधिकारी सध्या कोण आहे? 

उत्तर - महाराष्ट्राचे प्रमुख निवडणूक आयोग सध्याचे राजीव कुमार हे आहेत.

3) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आचारसंहिता 2024 कोणत्या दिवसापासून सुरू झाली आहेत? 

उत्तर- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आचारसंहिता2024

         दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी साडेतीन     वाजता पासून आचारसंहिता महाराष्ट्रात सुरू झाली आहेत.

4) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी कोणत्या दिवशी सुरू होणार आहे?

उत्तर - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळीच सुरू होणार आहे.

5) महाराष्ट्र विधानसभा 2014 ची आचारसंहिता एकूण अंदाजे किती दिवसाची आहे?

उत्तर - आचारसंहिता महाराष्ट्रात एकूण 49 दिवसाची आहे.

अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा. 

लोकसभा मराठी माहिती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.