बाल हक्क संरक्षण मराठी माहिती | Protection Of The Child Rights in Marathi Mahiti
प्रस्तावना
Protection Of The Child Rights in Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण बाल हक्क संरक्षण मराठी माहिती या संदर्भाने महत्त्वपूर्ण लेख या संदर्भाने माहिती आजच्या लेखात स्पष्टपणे नमूद करत आहोत. आपण या लेखातील माहिती सविस्तर वाचल्या नंतर माहिती आपणास आवडल्यास वाचक प्रेमी मित्रांना हमखास ही माहिती शेअर करावी ही विनंती.
![]() |
Protection Of The Child Rights in Marathi Mahiti |
आपल्या देशात 18 वर्ष वय खालील सर्व मुले आणि मुली यांना बालक असे म्हणतो. अठरा वर्षाखालील बालकांचे संरक्षण करण्याच्या संदर्भाने भारतीय राज्यघटनेत बाल हक्क बाबत सविस्तर माहिती नमूद करण्यात आली आहे.
मित्रांनो विशेष करून बाल हक्क व बाल हक्काचे संरक्षण या संदर्भाने विशेष करून वय वर्ष सहा ते 14 या वया गटातील सर्व मुलांसाठी शासनाकडून मोफत सक्तीचा शिक्षण हक्क कायदा मंजूर करण्यात आला आहे. या कायद्याच्या अनुषंगाने बालकांचे हक्क आणि संरक्षण तसेच शिक्षण या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आज आपण या लेखाद्वारे लेखात स्पष्टपणे पुढील प्रमाणे नमूद करणार आहे.Protection Of The Child Rights in Marathi Mahiti
बाल हक्क
आपल्या देशातील बालकांना बाल हक्क प्रदान करण्यात आली आहेत. बालकाला विचार मांडण्याचा हक्क आहे.
तसेच शिक्षण शिकण्याचा सुद्धा अधिकार आहे. बालकांना वयाच्या 18 वर्षाच्या आत बाल मजूर म्हणून जबरदस्तीने उद्योगात गुंतवता येत नाही. त्याचप्रमाणे बालकांना शिवीगाळ अत्याचाराच्या विरोधात संरक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे. बालकाच्या हक्काच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्यपणे बाल हक्क संदर्भात संपूर्ण माहितीचे स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहेत. Protection Of The Child Rights in Marathi Mahiti म्हणूनच प्रत्येक वर्षी बाल सुरक्षा सप्ताह आपल्या देशात साजरा करण्यात येतो.
बाल हक्काचा जाहीरनामा
उद्द्देशिका
बालकाला त्याचे सर्व हक्क व स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने बालक हक्क संरक्षण जाहीरनामा सर्व जगातील देशांसाठी जाहीर केला आहे. ' Protection Of The Child Rights in Marathi Mahiti 'या जाहीरनाम्यात प्रमाणे बालकांना महत्वपूर्ण बाबीवर स्वातंत्र्य देण्यात आले आहेत.बालकाची कायद्यानुसार शारीरिक व मानसिक काळजी व संगोपन करावे लागतात. बालकांना जात ,वर्ण, लिंग ,भाषा व धर्म या बाबतीत भेदा भेद करता येणार नाही. कायद्यानुसार बालकाला जाहीरनाम्यात संरक्षण देण्याची हमी संयुक्त राष्ट्र संघ यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली आहे.Protection Of The Child Rights in Marathi Mahiti
ठराव
संयुक्त राष्ट्र संघाने बालकांचे हक्क संदर्भ मध्ये खालील महत्त्वपूर्ण विषयावर ठराव घेतलेले आहे.
१) बालकाची शारीरिक व मानसिक परिपक्वता मुळे त्याचे संगोपन करावे लागते.
२) बालकांच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून अधिक काळजी घेणे आणि संगोपन करणे आवश्यक आहे.
३) औपचारिक पद्धतीने कायद्याने सुद्धा संरक्षण देण्याची गरज असते.
४) बालकांचे आरोग्य निरोगी असावे याकडे लक्ष देणे काळाची नितांत गरज आहे.
५) आरोग्याच्या काळजी बरोबरच त्याला पाणी, पोषक अन्न आणि शिक्षण प्रदान करण्याची आवश्यकता आहे.
६) जगातील प्रत्येक देशाने बालकाच्या सर्वांगीण विकासाकडे व सुखी जीवन उपलब्ध करून देण्याच्या हेतूने प्रेरित होऊन बालकाच्या हक्काचे संरक्षण करणे
७) बालकाच्या संरक्षणाच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्र संघाने 20 नोव्हेंबर 1959 रोजी बालकांचे जन्मजात हक्क घोषित केले आहे.
८) 20 नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक बालक हक्कदिन '
म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो.
९) बालक हक्क समिती संयुक्त राष्ट्र संघाने केली आहे.
बालक हक्क समितीमध्ये संयुक्त राष्ट्र संघाने ५४ कलमे आणि ४ अधिकार समाविष्ट केले आहे.
१०) बालकांचे मुख्य चार अधिकार संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे बालक हक्क संरक्षणासाठी जगासमोर मांडले आहेत.
संयुक्त राष्ट्र संघाच्या जाहीरनाम्यातील चार अधिकार
१) जगण्याचा अधिकार-
जगात जन्माला आलेल्या प्रत्येक लहान मुलांना किंवा बालकांना स्वतंत्ररीत्या जीवन जगण्याचा हक्क मूल जन्मताच संयुक्त राष्ट्र संघाने बालकास प्रदान केला आहे.
२) विकासाचा अधिकार-
बालक संदर्भ मध्ये बालकाच्या विकासासाठी त्याचा सर्वांगीण विकास करताना शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास मुलांना जन्मजात प्राप्त झालेला असतो. याबाबतही सुद्धा बालक हक्क लक्षात घेऊन बालकाच्या विशेष विकासाकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
३) सुरक्षितता चा अधिकार -
बाल जन्माला आल्याबरोबर त्याला सुरक्षितता प्रदान करण्याची पहिली कार्य आई आणि वडीलांचे असून जगातील प्रत्येक आई-वडिलांनी मुलाच्या सुरक्षितता कडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे स्थान आहेत. वय वर्ष एक ते अठरा वर्षापर्यंत ही संपूर्ण जबाबदारी पालकाने निभावणे गरज आहे विशेष म्हणून वय वर्ष सहा ते 14 वर्षे या काळात सुरक्षिततेचा अधिकार संयुक्त राष्ट्र संघाने कुटुंब आणि शासन यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या जाहीरनाम्यात दर्शविल्याप्रमाणे बालकांचे हक्क सुरक्षित असणे आवश्यक आहे.
४) सहभाग अधिकार
बालकांना स्वतःच्या विकासासाठी देशातील सर्व उपक्रम आणि सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग अधिकार संयुक्त राष्ट्र संघाने बालकांना अधिकार असल्याचे सांगितले आहेत.
तत्वे
संयुक्त राष्ट्र संघाच्या जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे बालकांच्या योग्य कार्यवाहीसाठी महत्वपूर्ण दहा तत्वे स्पष्ट केली आहेत. हे तत्व संयुक्त राष्ट्र संघाच्या बालहक्क जाहीरनाम्यात सुचवण्यात आली आहेत किंवा नोंदवण्यात आली आहेत. त्या सर्व 10 तत्वांचे स्पष्टीकरण मित्रांनो आपण आपल्या आजच्या लेखात स्पष्ट करणार आहोत.
चला तर पाहूया बालक हक्क संरक्षण तत्वे. Protection Of The Child Rights in Marathi Mahiti
१) जाहीरनाम्यात स्पष्ट केल्याप्रमाणे प्रत्येक बालकाला जात धर्म वर्ण भाषा आणि लिंग तसेच राजकीय धर्म आणि स्वतःची मतप्रणाली त्याचबरोबर राष्ट्रीय आणि सामाजिक उगम मालमत्ता इत्यादीचा विचार न करता बालकांच्या हक्काचे संरक्षण करून सर्वसामान्य त्याला जगात जगता येईल अशी प्रणाली उपलब्ध करून देणे.
२) बालकाचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक, नैतिक, अध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टीने विकास होईल अशा प्रकारची संधी प्रत्येक देशाने आपापल्या देशात कायद्याने प्रस्तावित करून व अन्य मार्ग उपलब्ध करून बालकाचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहेत.
३) जगातील प्रत्येक बालकाला बालकांचे नाव आणि राष्ट्रीयत्व हक्क प्रत्येक देशाने त्याला प्रदान करून द्यावा किंवा उपलब्ध करून द्यावा.
४) सामाजिक सुरक्षिततेचे लाभ बालकांना प्राप्त करून देणे.
५) देशातील अपंग असलेल्या बालकांना विशेष प्रकारची वागणूक देऊन अपंगत्व प्राप्त मुलांना शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या विकास करण्याची संधी उपलब्ध करून देणे पालकाची आणि राष्ट्राची गरज आहे.
६) अपवादात्मक परिस्थिती वगळता बालकाला पूर्ण व सुसंवादी व्यक्तिमत्त्वाच्या विकासात त्याला प्रेम व सलोखा याबाबत असणारी गरज कोवळ्या वयातील बालकांना उपलब्ध करून देऊन अपवादात्मक परिस्थिती वगळता त्याला आईपासून दूर करू नये. जर मुलाला आईपासून दूर केले तर असे मुले अनाथ व निराधार बालकांची विशेष काळजी घेणे आणि त्यांना आधार देणे हे समाजाचे व शासनाचे कर्तव्य ठरते. समाजाने आणि शासनाने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आधुनिक युगात निर्माण झाली आहे.
७) बालकाचा निर्णयात्मक बौद्धिक विकास आणि नैतिक विकास व त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होईल या दृष्टीने प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे किमान प्राथमिक शिक्षण देणे आवश्यक आहे त्यासाठी समाजाला त्याचा उपयोग होईल अशा प्रकारचे शिक्षण बालकाला उपलब्ध करून देणे हे शासनाचे महत्त्वपूर्ण कर्तव्य आहेत. म्हणूनच भारतामध्ये मोफत शिक्षणाचा अधिनियम कायदा भारत सरकारने मंजूर केला असून मोफत व सक्तीचे शिक्षण देणे सुरू आहे.
८) जगातील प्रत्येक बालकाला सर्वप्रथम मुख्य गरज म्हणजे बाल हक्काचे संरक्षण होणे व त्याला साह्य मिळवून देणे आवश्यक तत्त्व मानले आहेत. कोणीही बालकांचे संरक्षण कायद्याने हिरावून घेऊ शकत नाही तसेच त्याला कायद्याने संरक्षणात्मक सहकार्य करणे आवश्यक आहे.
९) बालकांच्या हक्काचे संरक्षण त्याला मिळून देताना कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही परिस्थितीत बालकाची पिळवणूक, क्रूरता आणि दुर्लक्ष या सर्व प्रकरणापासून बालक हक्काचे संरक्षण होणे व मिळावयास हवे. त्यासंदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा बालकाच्या हक्क संदर्भात अपव्यवहार होता कामा नये.
त्याचे किमान 18 वर्षे वय पूर्ण होईपर्यंत बालकाला कोणीही नोकरीवर व कामास बालमजूर म्हणून घेऊ नये.
त्याचप्रमाणे बालकाच्या जीविताला हानी व धोका होईल अशा संभाव्य परिस्थिती व अशा धोक्याच्या जागी कोणत्याही ठिकाणी आरोग्य कारक किंवा हानिकारक व्यवसायामध्ये बालकाला गुंतू नये. त्याची विशेष काळजी घेण्याची गरज संयुक्त राष्ट्र संघाने स्पष्टपणे जाहीरनाम्यातील तत्त्वात उल्लेख करून स्पष्ट केली आहेत.
१०) सामाजिक आणि धार्मिक तसेच अन्य प्रकारच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही भेदभाव न करता किंवा भेदभाव उत्पन्न न करता बालकाच्या हक्काच्या प्रवृत्तीचे आणि बालकांच्या हक्काचे रक्षण केले पाहिजे तसेच बालकांमध्ये त्यांच्या बाल वयामध्ये काही गोष्टी बिंबवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ बालकाच्या मनावर बालकाचे संगोपन करताना सहिष्णता , सौख्य, शांतता आणि बंधुभाव या गोष्टीचे बालकांमध्ये संवर्धन करून त्याचे संगोपन करणे हे महत्त्वपूर्ण कार्य कुटुंब समाज आणि शासन यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी संयुक्त राष्ट्र संघाने बालकाच्या हक्काच्या संरक्षणाच्या संदर्भात स्पष्टपणे नमूद केली आहेत ."Protection Of The Child Rights in Marathi Mahiti "म्हणून बालकांच्या हक्कांचे संरक्षण होणे ही आता काळाची गरज निर्माण झाली आहे.
सारांश
आजच्या काळात अनेक उदाहरणावरून असे लक्षात येते की बालकांचे हक्कांचे संरक्षण होत नसल्याचे दिसून येत आहेत आणि समाजातील दृष्ट प्रवृत्तीचे व्यक्ती बालकांच्या हक्कावर अत्याचार करताना दिसून येत आहे म्हणून पुन्हा एकदा बालकांच्या हक्कांच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये माहिती देणे आवश्यक वाटल्यामुळे ह्या लेखात याबाबत महत्वपूर्ण गोष्टीवर वर्णन केले आहे. किंवा स्पष्टीकरण केलेले आहे. आज जन्मलेला बालक म्हणजे देशाचा भावी नागरिक असल्यामुळे त्यांच्यावर सुसंस्कृत आचार आणि विचार निर्माण करणे आवश्यक आहे त्यासाठी शासन स्तरावरून अनेक प्रकारचे कायदेही सुद्धा तयार केले आहे. परंतु दुरुस्त प्रवृत्तीच्या काही व्यक्ती कायद्यातून पळवाट काढून बालकांचे हक्क हिरावून घेत आहे असे दृष्टीस येत आहे आणि अनेक वर्तमानपत्रातून या संदर्भात बातम्या प्रसिद्ध होत आहेत. नुकत्याच घडलेल्या बदलापूर घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत घडलेली घटना म्हणजे बाल हक्काचे बाल हक्काचे संरक्षण होताना दिसून येत नाही म्हणून शालेय शिक्षण विभागाने या संदर्भामध्ये शासन निर्णय निर्गमित करून बालकाच्या हक्काच्या संरक्षणाची संपूर्ण कार्यवाही शासन स्तरावरून शासन पूर्ण करत आहे. म्हणूनच मित्रांनो आजच्या या आपल्या लेखात बालकाच्या हक्काच्या संदर्भामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या जाहीरनाम्यात दिलेल्या प्रमुख बाबीच्या संदर्भात सविस्तर चर्चा लेखात दर्शविल्याप्रमाणे स्पष्ट केली आहे.
मित्रांनो हा लेख आपण वाचल्यानंतर आपणास या लेखांमध्ये काही त्रुटी किंवा सूचना तसेच प्रतिक्रिया व्यक्त करायच्या असेल तर ब्लॉक च्या कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्यक सूचना व प्रतिक्रिया आणि त्रुटी नमूद कराव्या म्हणजे ब्लॉगर ला आपल्या सूचनेची माहिती प्राप्त होताच लेखांमध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून लेख अद्यावत करण्यात येईल.
FAQ
1) मुलाचे हक्क म्हणजे काय?
उत्तर- मुलांची हक्क मुलांची जुळवून घेतलेले हक्क अशा प्रकारे मुलांना जगण्याचा आणि शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या योग्यरीत्या विकसित होण्याचा अधिकार आहे मुलांच्या चांगल्या विकासासाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी बालहक्क योजना आखतात जसे की योग्य आहार आवश्यक काळजी शिक्षण मुलांचे हक्क मुलाचे असुरक्षित चारित्र्य मानतात.
2) आपण बालकाच्या हक्कांचे संरक्षण कसे करू शकतो?
उत्तर-आपण बाल हक्कांचे संरक्षण कसे करू शकतो स्माईल फाउंडेशन नुसार मुलांचे अपहरण होणार नाही किंवा त्यांची विक्री होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी मुलांच्या विकासाला हानी पोहोचणाऱ्या कोणत्याही क्रिया कलापांपासून मुलांचे संरक्षण केले पाहिजे कायदा मोडणाऱ्या मुलांना क्रूर वागणूक देऊ नये त्यांना प्रौढांसोबत तुरुंगात टाकले जाऊ नये आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क ठेवता आला पाहिजे.
3) बालकाचे किती अधिकार आहेत?
उत्तर-बालक किती आहेत दैनिक प्रभात नुसार भारतात बालहक्क घटने 41 बालक देण्यात आले असले तरी यातील 16 हक्क भारतीय मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत यामध्ये जगण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकाऱ्यांपैकी एक आहे.
4 )संयुक्त राष्ट्र संघाच्या जाहीरनाम्यात 'जागतिक बालहक्क दिन' म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
उत्तर-20 नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो'.
5 मी शिक्षक म्हणून बाल हक्क कसे संरक्षण करू शकतो?
उत्तर- मुलाचे मित्र तत्त्वज्ञानी आणि मार्गदर्शक व्हा वर्ग मनोरंजक आणि माहितीपूर्ण बनवा एकतर्फी संवाद टाळा आणि मुलांना त्यांच्या शंका आणि प्रश्न सोडवण्याची संधी द्या गैरवर्तन दुर्लक्ष शिकण्याचे विकार आणि इतर न दिसणारे अपंग ओळखण्यास आणि ओळखण्यास शिका.
अधिक माहितीसाठी खालील लेख आवश्यक वाचा