शेवगा मसाला करी मराठी माहिती | Shevga Masala Carry
प्रस्तावना
Shevga Masala Carry मित्रांनो, आज आपण पाककृती संदर्भाने शेवगा मसाला करी मराठी माहिती बाबत सविस्तर माहिती या लेखातून पाहूया. आपणास हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना आवश्यक शेअर करा.
देशभरात अनेक प्रकारच्या पाककृती कला संदर्भात अनेक प्रकारच्या स्वादिष्ट आणि रुचकर चवीसाठी अनेक प्रकारच्या भाज्या दैनिक जेवणामध्ये तयार करत असतो. घरापासून तर हॉटेलपर्यंत अनेक प्रकारच्या भाज्या मोठ्या आवडीने तयार केल्या जातात. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण भाजी म्हणजे शेवगा मसाला करी होय.शेवगाही एक वनस्पती आहे. या वनस्पती पासून अनेक भाज्या बनवल्या जातात. शेवग्याची पाने, फुले आणि शेंगा पासून विविध प्रकारच्या भाज्या रुचकर तयार केल्या जातात
त्यापैकी आपण आज शेवग्याच्या शेंगा पासून बनवण्यात येणाऱ्या भाज्यापैकी शेवगा मसाला करी ही भाजी स्वादिष्ट जेवणासाठी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती आजच्या लेखात स्पष्टपणे नमूद केली आहे. चला तर पाहूया शेवगा मसाला करी ही भाजी कशी बनवतात त्याबाबत माहिती पाहूया.
![]() |
Shevga Masala Carry |
शेवगा मसाला करी
मित्रांनो खाली दिलेल्या कृतीप्रमाणे शेवगा मसाला करी ही रेसिपी तयार करा. त्याबाबत संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे पाककृती कला अंतर्गत माहिती देण्यात येत आहे.'Shevga Masala Carry' आपणास आपल्या कुटुंबातील चार व्यक्तीसाठी शेवगा मसाला करी भाजी जेवणासाठी रेसिपी म्हणून तयार करण्यासाठी खालील साहित्य भाजी तयार करण्यासाठी अगोदर तयार करून ठेवा.
रेसिपी चे नाव-शेवगा मसाला करी.
शेवगा मसाला करी साहित्य
१) चार शेवग्याच्या शेंगा
२) एक कांदा
३) एक टोमॅटो
४) एक चमचा मुगाची डाळ
५) पाच लसणाच्या पाकळ्या
६) 25 ग्रॅम गोड येतील
७) थोडी कोथिंबीर
८) थोडा कढीपत्ता
९) दोन चमचे शेंगदाणाची तयार केलेली पावडर
११) एक लहान गुळाचा खडा
१२) खडा मसाला 25 ग्रॅम
शेवगा मसाला करी तयार करण्याची कृती
१) प्रथम शेवग्याच्या शेंगा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर शेंगा वरील बाहेरील टोकदार शिरा चाकूने काढून टाका. शेंगांचे एक एक इंचाचे बारीक तुकडे चाकूने कापून तयार करून ठेवा. Shevga Masala Carry शेंगाची कापलेले तुकडे खराब होऊ नये म्हणून थोड्या पाण्यात ठेवा.
२) कांदा व लसुन यांची पेस्ट तयार करा.
३) खडा मसाला पावडर तयार करून ठेवा
४) कोथिंबीर चे बारीक तुकडे करा.
५) कढीपत्ता स्वच्छ धुऊन घ्या.
६) मुगाची डाळ स्वच्छ धुऊन घ्या.
७) चवीनुसार योग्य तेवढी मीठ जवळ तयार ठेवा.
८) शेंगदाण्यापासून बनवलेली पावडर तयार ठेवा.
९) आवश्यकतेनुसार 25 ग्रॅम गोडेतेल तयार ठेवा.
१०) जिरे , मोहरी आणि हळद
११) गरजेनुसार आवश्यक ते भाजी बनवण्यासाठी भांडे तयार ठेवा.
शेवगा मसाला करी तयार करण्याची पद्धत
शेवगा मसाला तयार करण्याची कृतीमध्ये मुख्य तीन पायऱ्या आहेत. त्या सर्व भाजी तयार करण्याच्या पायऱ्या पुढील प्रमाणे वापरून योग्य कृती करून शेवगा मसाला करी तयार करा. भाजी तयार करण्यासाठी पुढील पायऱ्या चा वापर करा हे कुकिंग यांनी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावे.
पायरी क्रमांक एक
प्रथम गॅस सुरू करावा. गॅस नसेल तर चूल पेटवून घ्यावी. गॅसवर किंवा चुलीवर कढई ठेवा. कढईमध्ये 25 ग्रॅम गोडेतेल कढईमध्ये गरम करण्यासाठी टाका. कढईतील तेल गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाका. त्यानंतर कांदा व लसूण टाका. वरील पदार्थ टाकल्यानंतर दोन मिनिटे तेलात लाल रंग येईपर्यंत गरम करा.
पायरी क्रमांक दोन
कढईत टाकलेले पायरी क्रमांक एक मधील सर्व पदार्थ लाल झाल्यानंतर थोडी चमच्याने हलवून घ्या आणि त्यानंतर त्या तेलामध्ये बारीक चिरलेल्या टोमॅटो टाका. बारीक चिरलेले टोमॅटो टाकल्यानंतर दोन मिनिट पर्यंत तेलामध्ये तळू द्या. त्यानंतर चवीनुसार योग्य तेवढे तिखट त्या तेलामध्ये टाका.
त्यानंतर दोन मिनिटांनी कढईमध्ये मसाला पावडर खडा मसाला पासून बनवलेली टाका. त्यानंतर दोन मिनिट कढईमध्ये वरील प्रमाणे टाकलेले सर्व पदार्थ तळून झाल्यानंतर त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा चे बारीक केलेले सर्व तुकडे कढईत टाकून चमच्याच्या साह्याने परतवून घ्यावे. त्यानंतर दोन मिनिटांनी थोडी हळद कढईत टाकून परतून घ्या. "Shevga Masala Carry "
विशिष्ट लाल प्रकारचा रंग आल्यानंतर पुढील पायरी सुरुवात करा.
पायरी क्रमांक तीन
पायरी क्रमांक तीन मध्ये कुकिंग ने त्या कढईतील शेंगा शिजण्यासाठी आवश्यक तेवढे एक ग्लास किंवा दीड ग्लास
पाणी सोडा. त्या पाण्यामध्ये शेवग्याच्या शेंगा दहा ते पंधरा मिनिट शिजू द्या. पंधरा मिनिटाने शेंगा शिजल्यानंतर एक गुळाचा खडा कढईत टाका. नंतर पुन्हा पाच मिनिटे शेंगा शिजू द्या. शेंगा शिजवून झाल्यानंतर पुन्हा थोडी कोथिंबीर भाजीमध्ये सोडा आणि आवश्यकता वाटल्यास पुन्हा शेंगदाणा पावडर कढईत सोडा आणि चवीनुसार मीठ टाकण्यास विसरू नका. भाजीत मीठ सोडल्यानंतर दोन मिनिट ते पाच मिनिट पूर्ण भाजी शिजू द्या. भाजीवर तेलाचा तरंग आल्यानंतर आपणास भाजी काळी व लालसर दिसून आल्याबरोबर गॅस बंद करा किंवा चुलीवर भाजी करत असाल तर चूल बंद करा.
आणि चुलीवरची किंवा गॅस वरची कढई खाली उतरा आता शेवग्याच्या शेंगाची करी रुचकर व स्वादिष्ट बनलेली असेल.
आता भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे.
गव्हाची पोळी, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर किंवा तांदळाची आणि मैद्याची तंदुरी रोटी सोबत तुम्ही भाजी आवश्यक खा. आपणास भाजी अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर लागेल. या भाजीसोबत आपण तांदळाचा भातही सुद्धा खाऊ शकतो. आपणास आलेले अनुभव ब्लॉक पोटाच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्यक नोंदवा.
निष्कर्ष
उपरोक्त पद्धतीने सांगितलेले सर्व साहित्य आणि पाककृती त पायऱ्या मध्ये नमूद केल्याप्रमाणे रेसिपीची प्रक्रिया पूर्ण करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपणास शेवग्याच्या शेंगाची करी उत्कृष्टरित्या सांगितलेल्या पद्धतीने तयार केल्यास अतिशय उत्कृष्ट चवदार स्वादिष्ट आणि खाण्यासाठी पोषक भाजी तयार झालेली आढळून येईल. शेवगाच्या शेंगाची करी खाल्ल्यामुळे व्यक्तीच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम या भाजीतून प्राप्त होऊ शकतात त्यामुळे शेवग्याच्या शेंगाच्या पासून बनवलेली शेवगा करी भाजी आरोग्यासाठी किमान आठ दिवसातून एक दिवस तरी खाणे आवश्यक आहे. ही भाजी खाल्ल्यामुळे मनुष्य निरोगी राहू शकतो असा अनुभव आलेला आहे म्हणून आपण आजच्या ब्लॉग पोस्ट लेखामध्ये शेवग्याच्या शेंगाची करी कशी तयार करावी याबाबत सविस्तर माहिती उपरोक्त दर्शविलेल्या पद्धतीने प्रमाणे तयार करून आवश्यक अनुभव घ्यावा ही विनंती. मित्रांनो हा लेख आपणास वाचल्यानंतर आवडल्यास आपल्या वाचक मित्रांना आवश्यक शेअर करायला विसरू नका.
FAQ
1) शेवग्याच्या शेंगाची करी तयार करण्यासाठी किती प्रकारची साहित्य वापरले आहे
उत्तर -11 प्रकारचे साहित्य वापरले आहे.
2) शेवग्याच्या शेंगाची खरी तयार करण्याच्या किती पायऱ्या नमूद करण्यात आल्या आहेत?
उत्तर -तीन पायऱ्या
3)कोणतीही भाजी तयार करण्यासाठी प्रथम कशाची गरज पडते ते सांगा?
उत्तर गॅस किंवा चुल आणि आवश्यकतेनुसार घरगुती भांडे.
4) आज आपण कोणती रेसिपी बनवण्याचे शिकलो आहेत ते सांगा?
उत्तर-शेवग्याच्या शेंगाची करी.
5) शेवग्याच्या शेंगा पासून आपणास कोणते अन्नद्रव्ये शरीराला पौष्टिक आहे ते सांगा?
उत्तर-कॅल्शियम
अधिक माहितीसाठी आपण खालील लेख आवश्यक वाचा
मुख्याध्यापकाचे प्रशासकीय अधिकार